चारठाण्याचे शिल्प वैभव: बरेचसे अप्रसिद्ध Aditya Korde द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

चारठाण्याचे शिल्प वैभव: बरेचसे अप्रसिद्ध

चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध

चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे, अगदी माळदाचे. ‘माळद’ हा छप्पराचा एक प्रकार असतो. मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात खजीनादागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर माणूस( हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही ह्या घराच्या माळदात लपवले होते असे मला सांगितले) लपवता येतो. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना, झोपताना वरून साप अंगावर पडणे इथल्या लोकाना म्हणे अगदी नित्याचे नसले तरी सवयीचे. (आपली तर हे ऐकून फाटली आणि आपली खाट आपण बाहेर अंगणात लावली. इथे जन्म काढला तरी मला अंगावर वरून साप पडण्याची सवय होणार नाही... असो.)

तसे पाहू जाता चारठाणा हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधेसे खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते. तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही.(ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)

चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर. हा परिसर तसा रखरखीतच पण डिसेंबर-जानेवारी महिन्यात मात्र हवामान आल्हादकारक असल्याने मलातरी सुंदर भासला आणि त्याकाळी तरी नक्कीच सुंदर असणार. हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६वे ते ९वे शतक)राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र, ह्याची आई चारुगात्रीदेवी-ही मोठी शिवभक्त होती. तिने म्हणे ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी)तिची ही इच्छा राजाने पूर्ण केली. आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत.बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत. अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात. भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात. अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात ...असो

गावात( आणि इतिहास प्रेमींमध्ये ) सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दीपमाळ किंवा विजयस्तंभ.गावकरी जरी ह्याला दीपमाळ म्हणत असले तरी ही दीपमाळ वाटत नाही.पणत्या किंवा दिवे लावायचे अनेक छोटे छोटे हात / जागा ह्यावर नाहीत,शिवाय आजूबाजूला तेवढे मोठे मंदीर किंवा त्याचे भग्नावशेषही नाहीत. हा किर्तीस्तंभ किंवा विजय स्तंभच आहे. असे एकलकोंडे किर्तीस्तंभ महाराष्ट्रात विपुल आढळतात. हा जवळ पास ४५ फुट उंच आहे. आश्चर्य म्हणजे हा अख्खाच्या अख्खा, उभा मातीखाली गाडला गेलेला होता. आमच्या सासुबाइन्च्या काकांनी- भाऊ काकानी ( माझे चुलत आजे सासरे- वय वर्षे ८५ )सांगितल्याप्रमाणे मुसलमान आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी तो लोकांनीच माती खाली गाडला. तसेच इतर आणखी ही काही मंदीरेही मातीखाली गाडली.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हा इतका उंच,सुंदर, आणि भव्य आहे कि ह्याच्याकडे कितीहीवेळ बघत राहिले तरी मन भरत नाही पण वर बघून बघून मान मात्र चांगलीच दुखून येते. हा बऱ्याच चांगल्या स्थितीत टिकून आहे त्यामुळे तत्कालीन कला आणि नक्शीकामातले ट्रेंड्स कळून येतात. वेरूळचे कैलास लेणे हे हि राष्ट्राकुटानीच बांधले( मी चूक असल्यास जाणकारांनी सांगावे )पण तिथले विजय स्तंभ आणि हा विजय स्तंभ ह्यात थोडा फरक जाणवतो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ह्या स्तंभाच्या आसपासचा परिसर मात्र अत्यंत बकाल आहे, झाड-झुडप,चिखल, खड्डे त्यात लोळणारी डुकरं, गाई बैलांच्या आणि कुत्र्यांच्या विष्ठा इतस्तत:विखुरलेल्या, त्यांचा उग्र दर्प ह्यामुळे तिथे जाणे अवघड होऊन बसते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्तंभाच्या वरच्या बाजूला असलेले हे रुद्राक्ष आणि घंटाची नक्षी- अत्यंत सुबक,अप्रतिम आणि नाजूक आहे. ४० फुटावरून तरती नुसती लटकवलेली दिसते. मागची आधाराचीदगडी कॉलर दिसतच नाही. फोटो झूम करून पाहिल्यावर ही पातळ दगडी कॉलर दिसते.अत्यंत पातळ आणि परफेक्ट वर्तुळाकार आहे ही.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्तम्भावरचे अप्रतिम कोरीव काम

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तिथेच बाजूला पडलेला कोरीव काम केलेला दगड...

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ह्या विजय स्तंभाच्या जवळच उकंडेश्वर महादेवाचे मंदीर आहे.मंदिराला आणि छताला भीती वाटावी असे तडे आणि भेगा गेल्यात. हे सगळे नष्ट व्हायच्या बेतात आहे

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मन्दीराबाहेरच्या सप्त मातृका,ह्यांनाच सात आसऱ्या असेहीम्हणतात. सर्वसाधारणत: सप्त मातृकांबरोबर गणेशही असतो पण इथे मात्र नाही दिसला.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सासरेबुवांच्या घराबाहेर कडूनिम्बाच्या झाडावर करकोच्यानी केलेलं घरटे. करकोचे माणसाच्या वस्तीच्या इतके जवळ घरटे करून राहतात हे माहितीच नव्हते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

रस्त्याच्या बाजूला अशी भग्न शिल्प पडलेली दिसतात

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

उकंडेश्वर महादेवापासून काही अंतरावर असलेले रेणुका देवीचे मंदीर, हिला खुराची देवी असेही म्हणतात. का? ते पुढे कळेल

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे अख्खे मंदीर मातीखाली गाडलेले होते. वरचे मातीचे ढेकूळ अजुनही तसेच आहे. खाली रेणुका देवी ची मूर्ती

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्पष्ट सांगायचे तर मला वाटते ही मूर्ती नंतर इथे बसवली गेली आहे. मूळ मूर्ती मंदीर मातीखाली झाकताना मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठी हलवली असावी, पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे, पण परत आणलीच गेली नाही किंवा सगळा प्रकार विस्मृतीत गेला असावा.

मंदिराचे छत

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गाईच्या खुरांसाराखा आकार बघितलात म्हणून ही खुराची देवी. ह्यात जी खुर उभारून आलेली दिसताहेत ती प्रत्यक्षात खुराच्या आकाराचे खड्डे आहेत. पूर्ण छताचा फोटो टाकला तर दृष्टीभ्रम कसा होतो ते कळेल. हे असे मला इतर कुठे ही आढळले नाही

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जबरदस्त दृष्टीभ्रम होतो कि नाही! छताला तडे गेलेत त्यामुळे खाली उभे रहायला भीतीच वाटते .

ह्या मंदिराला अगदी जोडून असलेले जोड महादेव मंदीर(म्हणून बहुधा जोड महादेव)

सर्वसाधारणपणे पिंडीची साळून्खा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूने पहिली तर उजवीकडे असते ही डाव्या बाजूला आहे.माझ्या माहिती प्रमाणे शाक्तपंथीयांची पिंड अशी डाव्या बाजूला साळून्खा असणारी असते. की मी चूक आहे? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जोड महादेव मंदिरातले छत – जीर्ण अवस्था

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गावाबाहेर असलेल्या गोकुळेश्वर मंदिराकडे जाताना ही वस्तू लागते. हे मंदीर नाही पण बहुधा जुन्या मंदिराच्या तटाचा भाग असावा.दाराला कडी कुलूप आहे पण पलीकडे काहीच नाही

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आणि हे नक्की काय होते कुणास ठावूक! बहुधा जुनी दीपमाळ असावी, किंवा तटाचा/ बुरुजाचा भाग. जर आसपासएखादी पुरातन मोठी विहीर असेल तर मोठी मोट असण्याचीही शक्यता आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ह्या अशा मुर्त्या/ कोरीव खांब जागोजागी पडलेलेआढळतात

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गोकुलेश्वर मंदिराबाहेर अशा भग्न मुर्त्या लोकांनीच आणून ठेवल्या आहेत. त्या अत्यंत हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. हा अनमोल ठेवा नष्ट होईल किंवा चोरी होईल.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गोकुळेश्वर मान्दिराबाहेरची पुष्करणी – अत्यंत सुंदर

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पुष्कारणीतले कोरीव काम

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ही एवढी पाण्याने भरलेली नसते पण यंदा पाउस तुफान झाला. नेट वरून मिळालेला जुना कमी पाण्यातला फोटो खाली टाकत आहे. पाणी खूप असल्याने आत जाता नाही आले. पुढच्या वेळी जाईन

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नदीकाठचे महांकाळेश्वर (शनी) मंदीर

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

शनी मंदीर म्हणून बाहेर हनुमान असावा पण हा हनुमानही नाही. ही मर्कट शिल्प आहेत. अशीच हम्पीला पहिली होती.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

शनी महाराज! ( मूर्ती नक्कीच नवीन आहे ) ही बाहेर ठेवली आहे आत पिंड आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विष्णू मंदिरात यज्ञ वराह असतो पण हा मात्र मूषक आहे. कानावरून तसे वाटते. जाणकारांनी सांगावे

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

भाऊ काकांच्या शेतात सापडलेले शिव मंदीर. हे त्यानी झाकून लपवून ठेवले आहे (म्हणजे होते.)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे विटांचे बांधकाम त्यांनीच केले दिवाबत्ती ही करतात.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मंदिराचे जोते

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वापरात असलेल्या बर्याप शिल्पाना शेंदूर आहे.शेंदाराने ओबड धोबड मुर्त्या सुंदर दिसतात पण ज्या मुर्त्या सुबक सुंदर आहेत त्यांचा सुबकपणा मात्र कमी दिसतो.कदाचित शेंदराने मूर्त्यांच्या नाजूक नक्षी चे काहीप्रमाणात संरक्षणही होत असावे .

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

भारतीय पुरातत्व खात्याने असे जागोजाग फलक लावणे आणि काही ठिकाणी मान्दिराला आणि देवाला ओबड धोबड दिसणारे लोखंडी दरवाजे लावून कुलूप घालण्यापलीकडे जास्त काही केलेलं नाही.( इथे तर फलकालाच जाळी लावली आहे.धन्य आहे)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गावकरी त्यांच्या पद्धतीने हा ठेवा जतन करतात पण त्यांच्याकडे शास्त्र शुद्ध ज्ञान नाही आणि इतर व्यवधानं आहेतच. एकंदरीत हा ठेवा धोक्यात आहे.एका छोट्याश्या खेड्याच्या आजूबाजूला इतके प्रचंड शिल्प वैभव आहे आणि अगदी आजूबाजूला हो कुठे मोठा डोंगर चढून जायचे नाही कि गुहा धुंडाळायच्या नाहीत. अगदी just around the corner असे ही वैभव पडून आहे . एक दोन दिवसाच्या भेटीत पाहून होणे शक्यच नाही. कमीतकमी आठवडा तरी नक्की लागेल.

पुण्याहून जाण्याचा रस्ता( साधारण ३८०-४०० किमी)

पुणे- अहमदनगर-औरंगाबाद-जालना- मंठा- चारठाणा (हमरस्त्यावर चारठाणाकडे जाणारा फाटा फुटतो. तिथे कमान आहे.)एसटी जाते पण स्वत:चे वाहन घेऊन जाणे उत्तम.

गावात रहायची काहीही सोय नाही.

आदित्य