माझ्या घटस्फोटाचे इव्हेंट मॅनेजमेंट (भाग २ ) Aniruddh Banhatti द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या घटस्फोटाचे इव्हेंट मॅनेजमेंट (भाग २ )

मी ‘सामोव्हार’च्या दाराकडे तोंड करून बसलो होतो, आणि माझ्यासमोर दाराकडे पाठ करून पारस बसला होता. अगदी लक्षपूर्वक आम्लेटचा एक तुकडा गुंडाळून, त्यात काटा रोवून मी तो खाण्याकरता तोंडापाशी आणला, आणि समोर पाहिलं, तर माझं तोंड तसंच उघडं राहिलं. ऑम्लेट काट्यावरचं थिजलं. ‘सामोव्हार’चं दार मला एखाद्या चित्राच्या चौकटीमध्ये नवचित्रकलेसारखं चित्र नव्हतं, तर एखाद्या बिकिनी वॉलपेपरवर असते तशी गुलाबी हॉट पँट, त्यावर जाड काळा चामड्याचा पट्टा त्यावर ज्यात एक हिरा अडकवलाय अशी नाजुक बेंबी, आणि त्यावर निळसर रंगाची चिंधी बांधल्यासारखा डिझायनर टॉप, आणि त्यावर अगदी निरागस चेहरा अन् मोठे डोळे असलेली एक अगदी फे्रश दिसणारी तरुणी उभी होती. तिनं आमच्या टेबलावरच्या पारसला पाहिलं. आणि मान डोलावून ती थेट आमच्या टेबलापाशीच आली.

“हाय पारस !” ती पारसच्या पाठीवर एक मजबूत थाप मारीत म्हणाली. पारसच्या हातातला काटा त्याच्या हनुवटीवर टोचला, आणि तो “ओय ओय!” करीत तिच्याकडे वळला.

“ओ होऽ ! रश्मी !” पारस हनुवटी चोळीत म्हणाला.

ती त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली, आणि माझ्याकडे पाहून म्हणाली, “हा ‘मॅडम तुसॉद’ मधला पुतळा कुणीआणलाय जहांगीर आर्ट गॅलरीत?”

त्याबरोबर मी भानावर येऊन झापड मिटलं आणि तिला “हॅलो !” केलं.

“हा माझा मित्र टंपू ऊर्फ अनिल गडबडे. हा आय.टी. इंजिनियर तर आहेच; पण कविता सुद्धा करतो. याची ‘लाइमरिक’ एकदा ‘प्लेबॉय’मधे छापून आली होती!”

“वाऽवा! पण हा तसा प्लेबॉय टाइप वाटत नाही. अर्थात तू देखील आर्टिस्ट टाइप कुठं वाटतोस म्हणा!” त्याच्या पाठीत आणखी एक धपाटा घालून त्याला कॉफीचा स्प्रे समोरच्या खुर्चीवर उडवायला भाग पाडून खदाखदा हसत रश्मी म्हणाली. बरं झालं, मी पलीकडे बसलो होतो. त्याच्यासमोर नव्हतो. मग दोन-तीन मिनिटांनी ठसका देणं थांबवून पारसनं ओळख करून दिली, “टंपू, ही रश्मी साखरे, ‘लाइटनिंग इव्हेंट मॅनेजमेंट’ची फाउंडर आणि प्रेसिडेंट. मग?”

तो रश्मीला म्हणाला, “झाली का माझ्या ‘इव्हेंट’ची मॅनेजमेंट?”

“होऽ! आणलाय ना उद्घाटक; त्याला आत सोडलंय, अन! तू कुठे दिसला नाहीस, म्हणून वाटलं की तू नक्की ‘सामोव्हार’ मध्ये चरत असणार ! म्हणून इथे आले!”

“बरं, काही खाणार का ?”

“नको, नको ! गॅलरीच्या आता शिरल्याबरोबर समोर तुझे जे चित्र दिसलं त्यानं भूकच गेली माझी!”

“हो!” मी रश्मीला दुजोरा दिला.

“फारच धक्कादायक आहे ते चित्र ! मलादेखील पाहिल्याबरोबर मळमळायला लागलं होतं ! ते पिवळ्या धमक रंगावर जांभळे ठिपके असलेलं, आणि मध्ये मठ्ठ रेड्याचं डोकं दिसतंय? तेच ना?”

“हो, तेच ! पण मला मध्ये रेडा नाही, माकड दिसतंय ! पिवळ्या धमक आणि जांभळ्या रंगानं बर्बटलेलं ! शीऽऽ ! याऽऽक्”

“हो ना ! आय अ‍ॅग्री इन टोटो,” मी म्हणालो.

“काय रे, पारस, नाव काय आहे त्या चित्राचं ?”

“रोमँटिक मिस्टी मॉर्निंग!”

“बाप रे!” रश्मी म्हणाली.

“अरे होऽऽ !” ती एकाएकी काही तरी आठवून म्हणाली, “अरे, दोन चित्रामध्ये तुझी उलटी सही वरच्या कोपर्‍या दिसली मला ! मी सगळ्या अरेंजमेंट चेक करीत होते ना, तेव्हा ! चला, चला लवकर ! आपण आधी आत जाऊन ती चुकून उलटी लावलेली चित्रं सरळ करू या. आणि मग उद्घाटन करू पटकन ! माझ्या आर्टीस्टला आणखी दोन रोल्स करायचे आहेत आज !”

“ओके !”

“चला !”

आम्ही मग दोन्ही उलटी लावली गेलेली चित्रं सरळ केली, गुलाबी रिबिनीच्या पुढच्या मोकळ्या भागात आर्टिस्टिक लोकांची बरीच गर्दी जमली होती तिथे गेलो. कॉर्डलेस माइक हातात घेऊन रश्मीनं ‘इव्हेंट’चा ताबा घेतला. गर्दीत पत्रकार, एवढंच काय, मुख्य टिव्ही चॅनेलचे चक्क चार व्हिडिओ कॅमेरावाले पण थांबलेले होते ! वा ! पारसनं प्रसिद्धी यं.णेची सोय चांगली केली होती ! टिव्हीवर दिसण्याचा चान्स घ्यावा म्हणून मीदेखील पारसच्या खांद्याला खांदा लावून समोर गेलो.

“आजचे आपले उद्घाटक आहेत श्री. रामण्णा तडवेलकर!”

रश्मीनं आणलेल्या भाडोत्री खप्पड छरमाडानं एक दुबळा हात हलवला.

“त्यांची ‘फ्लाइट ऑफ थर्ड मूनस्टोन’ ही कलाकृती प्रसिद्ध आहे, आणि त्या कलाकृतीवर लिहिलेली अनिरुद्ध यांची

अगदी थोड्या दगडांत

संपली माझी नक्षी

उरलेल्या कातळाचा

आभाळात उडाला पक्षी

ही कविता देखील प्रसिद्ध आहे. तसंच या कवितेचं बनहट्टी नावाच्या वात्रट लेखकानं केलेलं

दोन ओळी लिहीपर्यंत

स्टुडिओत पोचली टॅक्सी

दोन मिनिटांत गाणं तयार

मी तर आनंद बक्षी !

हे विडंबन देखील फार गाजलं होतं. पण या सगळ्याची सुरुवात या रामण्णांनी केली होती.