म्हातारी आणि चेटकीण Sushil Padave द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

म्हातारी आणि चेटकीण

शकुंतला नावाच्या एक आज्जीबाई एका खेडेगावात राहत असत. शहरापासून आणि शहरी सुविधांपासून तसं हे गाव खुपच लांब होतं..
एका डोंगराच्या कुशीत लपलेलं हे गांव तितकंसं मोठं नव्हतं मोजकीच लोकवस्ती होती..
आणि आपल्या शकुंतला आजीचं घर अगदी गावाच्या टोकाला होतं..
आज्जी एकट्याच एक मुलगा होता पण तो लग्न करून शहरात राहायला गेला तो परत परातलाच नाही तीन-सहा महिन्यांनी मानिऑर्डर यायची पण तेवढीच त्याच्या पलीकडे काही नाही..
आज्जींच घर एका झोपडी च्या खोपटा सारख होतं..पण त्या नीट रोज झाडलोट करून आक्ख घर स्वच्छ करत..

तसं आज्जीच घर गावाच्या एका कोपर्याला तस ही त्या आज्जीच्या घरी गावातलं कोण फिरकत ही नसे..
कोण तिला वेडी समजायचे तर कोण तिच्या घरात भुताटकी आहे असं समजायचे..
पण गावातली पाच सहा लहान मुलं शाळा सुटल्यावर तिच्याकडे नक्की यायची आज्जी कायतरी खाऊ देईल म्हणून आणि एखादी गोष्ट पण ऐकायला मिळेल म्हणून..

पण शकुंतला आजींची ही एक डोकेदुखी होती..ती म्हणजे ती चेटकीण..
कुठून कोणास ठाऊक..पण रोज संध्याकाळी एक झग्या सारखा काळा ड्रेस घातलेली..चेहर्याने जराशी विद्रुप पण विनोदी दिसणारी अशी ती चेटकीण चुंद्री तिचं नावं..
म्हातारीच्या घरात यायची आणि हवा तसा धुडगूस घालायची..कधी माळावर जाऊन भांडी कुंडी आस्तव्यस्त करायची..तरी कधी म्हातारीने काय जेवण बनवून ठेवलाय का ते धुंडायची..तर कधी अंगणात जाऊन झाडावर चढून झाडाच्या फांद्या हलवायची..
म्हातारीच्या मते नको नको ते चाळे करायची ती..म्हणून म्हातारी तिला चिचुंद्री ह्या नावानेच बोलवायची..
ती फक्त तिलाच दिसायची इतर कोणालाही नाही...

म्हातारी तिला घाबरत तर मुळीच नव्हती या उलट तिच्या ह्या रोजच्या येण्याची तिला आत्ता सवयच झाली होती..

कुठचा सण वार असला की म्हातारी मस्त तूप वैगरे घालून छान असं कायतरी गोडधोड बनवायची पण ही चेटकीण येऊन सगळं फस्त करून जायची..
म्हातारी ला काय शिल्लकच राहायचं नाही..
लहान मुलं ही जी तिच्या घरी खाऊ खायला यायची ती ही रिकामी हाती परत जायची..

म्हातारीला त्यावेळेस त्या चुंद्री चा भयंकर राग यायचा पण काय करणार ती तिला झाडून किव्हा दांड्याने मारलंय गेली ती चेटकीण लगेच टुणकन उडी मारून वर माळ्यावर नायतर कौलावर जाऊन बसायची..
विचित्र आवाजात खिदळायची...
म्हातारीची झालेली धावपळ बघून तिला खुप मज्जा यायची..
म्हणून रोज तिला त्रास द्यायला ती यायची..
म्हातारीला ती डोकेदुखीच झाली होती

एकदा म्हातारी बसल्या बसल्या ह्या चेटकिणीला कशी पळुउन लावायची ह्याचा विचार करत होती..
तेवढ्यात तिथे तिच्याकडे रोज येणारी ती तीन चार लहान मुलं आली..
ती आज्जी ला विचारू लागली की आज्जी उद्या होळी आहे ना आपण तुझ्या अंगणात होळी करूया आणि मग तू आमच्या साठी छान छान पुरनपोळ्या कर..हां..

म्हातारी मुलांना हो बाळांनो असं तर म्हणाली पण तिला चिंता होती ती त्या चेटकीण ची पुरणपोळ्या बनवल्या तरी ही चुंद्री सगळ्या पोळ्या खाऊन टाकणार..

पण त्या बरोबरच म्हातारी ला एक युक्ती सुचली..
म्हातारीने मनात ठरवलं की पुरणपोळ्या करायच्या होळी ही करायची आणि चेटकिनीला धडा पण शिकवायचा...

होळी चा दिवस उजाडला नेहमी प्रमाणे म्हातारीने सकाळी सकाळी उठून डोंगरावर जाऊन लाकडं गोळा करून आणली आज जरा जास्तच आणली होळी ला लागणार होती ना..
आजीबाईंनी दुपारी मस्तपैकी स्वयंपाक बनवला पुरणपोळ्या बनवल्या आणि संध्याकाळी मुलांची वाट बघत बसली आणि अर्थातच त्या चेटकीनीचीही वाट बघत होती..
तिला कायमचा जो धडा शिकवायचा होता...

संध्याकाळ झाली मुलं ही अंगणात आली होती..
म्हातारीने मुलांच्या मदतीने अंगणात एक लाकडांची होळी बनवली..
मुलांनी मस्त होळी सजवली..
आणि मुलं सारखी आज्जी कडे पुरणपोळ्यांसाठी हट्ट करू लागले..

पण म्हातारी चेटकीनीची वाट बघत होती..तिला अद्दल जी घडवायची होती..
म्हातारी ने मुलांना सांगून ठेवलं की मी जेव्हा तुम्हाला पुरणपोळ्या देईन तेव्हा आधी त्यातील एक एक पोळी ह्या होळी मध्ये टाकायची आणि मग होळी पेटवायची मगच बाकीच्या पुरणपोळ्या खायच्या..

तेवढ्यात ती चुंद्री चेटकीण आली..आल्या आल्या स्वयंपाक घरात जाऊन कायतरी धुंडू लागली तेवढ्यात म्हातारीने आवाज लगावला ए चुंद्रे इकडे ये पुरणपोळ्या इकडे आहेत..
म्हातारीने पुन्हा मुलांना बजावलं सगळं काय करायचं माहितीय ना आधी पुरणपोळ्या होळीत टाकायच्या मगच आपण खायच्या..
 चेटकीण अंगणात आली तशी तिला म्हातारीने खुणावून सांगितलं की पुरणपोळ्या त्या होळी च्या आत टाकल्या आहेत म्हणून..
 चेटकीण पटकन जाऊन त्या होळी च्या खोपट्यात बसली आणि मुलांनी होळीत टाकलेल्या पोळ्या खाऊ लागली..
 तेवढ्यात म्हातारी मुलांना म्हणाली चला आत्ता होळी पेटऊया..

आणि म्हातारी आणि मुलांनी होळी पेटवून दिली..
जशी होळी पेटली तसं आत बसलेल्या चेटकिनीला आगी च्या झळा बसू लागल्या..
चेटकिनीला कसचं होऊ लागलं ती होळीतुन बाहेर पडली आणि सैरावरा इकडे तिकडे पळू लागली..
आणि शेवटी त्या डोंगरावरून उड्या मारत धूम पळून गेली...
म्हातारी आत्ता तिच्याकडे बघून जोरजोरात हसू लागली..

मुलांनी तिला विचारलं काय झालं आज्जी..
म्हातारी म्हणाली..की बाळांनो ह्या होळी जास्ती येते आणि आपली दुःख घेऊन जाते ना..तशीच माझी पण डोकेदुखी पळवून लावली ह्या होळीने..
बरं का..हा हा हा!!

लेखक:- सुशिल सुर्यकांत पाडावे