part - 13 books and stories free download online pdf in Marathi

निर्भया - part 13

                                         निर्भया- १३
   सुशांतने दीपाला फोन केला आणि  दुसऱ्या  दिवशी  येणार  असल्याचं सांगितलं. ते तिच्या घरी गेले, तेव्हा ती  त्याची वाट बघत होती. 
  गेल्या काही दिवसांत तिने सुशांतच्या स्वभावातले अनेक पैलू  पाहिले  होते. त्यांचा  धाडसी   स्वभाव,  बुद्धिमत्ता   यांची   स्तुती  नेहमीच     वर्तमानपत्रात वाचायला मिळत होती पण त्याचबरोबर तो  किती  सहृदय  आहे हे तिने स्वतः अनुभवलं  होतं.  तिला  तिच्या   दु:स्वप्नातून   बाहेर   काढण्यासाठी   त्याने किती  प्रयत्न  केले  होते,  हे  ती   विसरू   शकत.   नव्हती.  राकेशच्या  आई - वडिलांकडून  नक्कीच तिच्याविषयी सर्व माहिती त्याला मिळाली असणार  हे  तिला माहीत  होतं पण तिच्याशी बोलताना त्या गोष्टींचा  उल्लेख तो  टाळत  होता. तिच्याविषयीचं प्रेम ती  त्याच्या नजरेत पाहू  शकत होती. तिलाही    तो   आता   मनापासून  आवडू    लागला    होता.  राकेशचा स्वार्थी स्वभाव तिने  पाहिला  होता, त्या तुलनेत   सुशांत  तिला   देवमाणूस  वाटत   होता.  त्याच्याविषयी  आपल्या  मनात  फक्त आदर नाही; तर अधिक काही आहे, हे तिच्या लक्षात आलं होतं.   पण आपले  संबंध मैत्रीच्या पलीकडे जाऊ  शकत  नाहीत  हे  तिने  स्वतःच्या  मनाला  बजावलं  होतं. त्यासाठीच  ती  त्याच्यापासून अलिप्त   रहाण्याचा प्रयत्न करत होती.                           
        सुशांतना  दीपाच्या  आईने   त्यांचा आवडता आल्याचा  चहा   दिला. " आज  जेवूनच  जा!"  ती मनापासून त्यांना म्हणाली. त्या  तरुणाचं तडफदार व्यक्तिमत्व तिलाही आवडत  होतं.जरी त्या दोघांनी बोलून दाखवलं नाही, तरीही एकमेकांविषयीचा प्रेम त्यांच्या  डोळ्यात  त्यांच्या अनुभवी नजरेला दिसत होतं. पण दीपाचा भूतकाळ आठवला की त्यांचं मन दचकत असे. तिला वाईट वाटेल म्हणून  त्या  कधी बोलून दाखवत नव्हत्या पण तिच्यावर ओढवलेल्या त्या  प्रसंगानंतर त्या तिच्या भविष्याविषयी साशंक होत्या. तिची त्यांना  खूप  काळजी वाटत   होती.
     "सुशांतला त्याविषयी काही माहीत नाही. पण  त्याला  कळलं, तर त्याची  प्रतिक्रिया  काय असेल     हे सांगता येत  नाही. आपण  नशीबाकडून  जास्त  अपेक्षा  न  केलेली  बरी  नाहीतर   नंतर  मनस्ताप  व्हायचा. तो आला, की  निदान  दीपा खुश  असते. त्याच्याशी गप्पा मारण्यात, हास्य विनोद करण्यात तिचे  काही  क्षण  तरी  आनंदात  जातात  हेसुद्धा    कमी  नाही. मध्ये  काही  दिवस  तर, ती  हसायचं विसरूनच गेली होती.  सुशांतमुळे  ती  हसू खेळू लागली  आहे."  त्या स्वतःच्या मनाला समजावत होत्या.
          ********        
त्या जेवणाची तयारी  करायला  किचनमध्ये गेल्या,तेव्हा दीपा सुशांतला म्हणाली,
 " आई आज तुमच्यासाठी काहीतरी  स्पेशल जेवण बनवेल. तुम्ही बसा.मी तिला मदत करायला जाते." आई काम करत असताना सुशांतशी  गप्पा मारत बसणे तिला योग्य वाटत नव्हते.

  " तू कुठे जाऊ नको! इथेच बस! तुझ्याशी काही  महत्वाचं  बोलायला  मी आलोय! तू इथेच थांब!" सुशांत तिला थांबवत म्हणाला.
    दीपा    प्रश्नार्थक  चेहऱ्याने  त्याच्याकडे पहायला लागली.
    " आई   माझ्यासाठी   मुलगी   बघायला शनिवारी येत आहे. रविवारी  मला  घेऊन तिकडे जाणार  आहेत." तो   तिच्याकडे  निरखून  पहात म्हणाला. तो   तिच्या  चेह-यावरचा  बदल  पहात  होता. तिच्या प्रतिक्रियेवरूनच तिला लग्नाविषयी विचारायचं की नाही; हे तो ठरवणार होता.
  त्याचं बोलणं ऐकून दीपाचा चेहरा पडला;     हे  त्याच्या नजरेतुन सुटले नाही. आणि त्यामुळेच त्याच्या  मनातली  भीती  थोडी कमी झाली. दीपा  धडधडत्या  हृदयाने त्याचं   पुढील   बोलणं   ऐकू लागली.

     " मी काही त्यांच्याबरोबर जाणार  नाही. उगाच मुलगी बघायची आणि तिला नकार द्यायचा;    हे  काही  मला  पटत  नाही. आई  आली; की  मी तिला  स्पष्टपणे   तुझ्याविषयी   सांगून   टाकणार  आहे. मी  रविवारी  संध्याकाळी  तिला घेऊन इथे येईन. पण तू मात्र  घरीच रहा." त्याच्या स्वभावाप्रमाणे  कोणताही  आडपडदा  न  ठेवता सुशांतने  त्याच्या मनातली गोष्ट  सांगून  टाकली.
  तो आपल्याला अप्रत्यक्षपणे  लग्नाविषयी विचारतोय हे  तिच्या   लक्षात  आलं,  आणि   ती थरथरत्या   आवाजात   म्हणाली, "  तुम्ही   खरंच मला लग्नाविषयी  विचारताय?  तुम्हाला   माझ्या  पूर्वायुष्याविषयी  माहिती  अाहे नं? आपल्यामध्ये   जरी कधी विषय निघाला नाही तरीही  राकेशच्या आई- बाबांनी  तुम्हाला  सर्व   काही सांगितले  असणार; याविषयी माझी खात्री आहे." हे बोलताना  तिचा   गळा  भरून  आला   होता, डोळे पाण्याने  भरले     होते.  चेहरा लालबुंद झाला होता.
 '' होय! तुझ्या  बाबतीत  काय घडलं, ते सर्व काही  त्यांनी   मला  सांगितलं. पण त्यावेळी मला  त्यांच्या कोत्या  मनोवृत्तीची चीड आली होती. तुला तिथे त्यांचा मुलगा घेऊन गेला होता ; ही गोष्ट ती दोघं जाणीवपूर्वक विसरली होती.  आणि फक्त तुलाच दोष देत होती. अाजच्या जमान्यात घटस्फोटित  आणि विधवा  स्त्रियाही  मनासारखा जोडीदार  मिळाला तर  परत लग्न करतात. आणि तेच योग्य आहे.  काही अघटित  घडलं  तर  स्त्रीचं आयुष्य  तिथेच   थांबावं    हे  या    नव्या   युगाला   मान्य  नाही." आपल्या बोलण्याचा तिच्यावर काय परिणाम  होतोय, याचा  अंदाज घेत  ते  पुढे  बोलू लागले,
      " जे  काही घडलं त्यात तुझा दोष नव्हता. त्या एका घटनेमुळे तुझ्या सुखांना पूर्णविराम लावायचा   का? जे झालं, ते सर्व  विसरण्याचा प्रयत्न कर. मी  तुला ते विसरायला  लावेन. खूप  सुखी   ठेवेन मी   तुला!"  तिला  समजवण्याचा  सुशांत   आटोकाट प्रयत्न करत होते. 
  पण  दीपा मात्र   त्याचं   ऐकायला   तयार नव्हती.                                                 
सुशांत दीपाला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण तिला ते पटत नव्हतं. 
 " ते मला कळतंय! पण तरीही माझ्यासाठी तुमच्या आयुष्याचे  नुकसान मी नाही होऊ देणार! असं समजा;  की  मी  तुमच्या  योग्यतेची   राहिले नाही. हा तुमच्या लग्नाचा प्रस्ताव मला मान्य नाही." हे बोलताना दीपाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
" ते आपण  नंतर  पाहू!  मी रविवारी   त्यांना     फक्त तुझी ओळख करून देणार आहे. तू घरी रहा. आणि  त्या  दोघांना तुझ्या  पूर्वायुष्याविषयी  काही   सांगू  नको. तुझी योग्यता  मी जाणून आहे.  त्यांचं   मन     उगाच   स्वतःविषयी  कलुषित    होऊ  देऊ  नको. आताच त्यांना सांगितलं, तर  त्यांच्या  मनात पूर्वग्रहदूषित नजरेनं  तुझ्याकडे  पहातील.  कारण आता  ती दोघं तुला ओळखत  नाहीत. योग्य  वेळ येईल तेव्हा  मी  सर्व  काही  त्यांना  सांगेनच. पण त्याआधी तुझ्या स्भावातले चांगले पैलू त्यांना कळू देत! त्यांच्या मनात  सहवासाने  तुझ्याविषयी  प्रेम   निर्माण होऊ  दे! मनातला संशय काढून  टाक. मी तुला  परत एकदा  सांगतो, जे  काही  घडलं, त्यात तुझा दोष नव्हता. कोणाच्या तरी कुकर्मांची शिक्षा    तू का भोगायची? आणि  आयुष्य त्या क्षणाजवळ   का थांबवायचं?  तुलाही  सुखी  जीवन जगण्याचा अधिकार आहे."  सुशांत तिचा नकार ऎकण्याच्या   मनःस्थितीत नव्हते.
  "पण  त्या    प्रसंगाने   मला   मातृत्वाच्या अधिकारापासून    वंचित  केलंय.  तुम्ही  तुमच्या  आईवडिलांचे   एकुलते   एक     सुपुत्र   आहात.   तुमच्या  घराण्याला मी वारस देऊ शकणार नाही. मला  तुमच्या आईबाबांना दुःखी  करायचं  नाही. किती अपेक्षा असतील त्यांच्या तुमच्याकडून! मी  त्या  कशा  पूर्ण  करू?" 
त्याला  नाही म्हणताना तिच्या मनाला खूप   यातना होत  होत्या. पण  "  त्यांचं    कायमचं    नुकसान  होण्यापेक्षा  एकदाच  स्पष्ट  नकार दिला  तर   ते    थोड्या   दिवसांनी  मला  विसरून  जातील."  हे  तिने  मनाशी  पक्कं ठरवलं होतं. "माझ्या दुर्दशेला राकेश  जबाबदार    होता. त्याने  जर ती जाणीव ठेवून माझ्याशी  लग्न  केलं  असतं, तर ती वेगळी गोष्ट  होती. या  निष्पाप  माणसाला   मी  माझ्या वाट्याला  आलेलं  दुःख   का   भोगायला  लावू? मला स्वार्थी होऊन चालणार नाही. " ती स्वतःला समजावत होती.
" दीपा!अापल्याला जर लग्नानंतर ही गोष्ट कळली असती, तर आपण एकमेकांना सोडून  दिलं असतं कां?  नाही  नं? मग  अगोदर  माहीत  आहे  म्हणून लग्न का करायचं  नाही? तू मला  जीवनात  उत्तम साथ देशील याची खात्री  आहे मला! 
    मी पूर्ण विचार करूनच तुझा  हात मागितलाय! माझी नोकरी अशी आहे, की  दररोज नवे अाव्हान  समोर  उभे असते. माझी सहचारिणी तुझ्यासारखी खंबीर असायला हवी.  तुला प्रथम पाहिलं तेव्हा तुझ्या सौंदर्याने मला आकर्षित केलं, पण तुला आयुष्याची जोडीदार म्हणून तुला पाहू लागलो, ते तुझ्या लाघवी स्वभावामुळे! स्वतःच्या आधी तू नेहमी इतरांचा विचार करतेस.  तू अजून ज्यांची  सून झाली नाहीस, त्या माझ्या आई-बाबांची तुला आत्तापासून  इतकी   काळजी  वाटतेय!  त्यांच्याविषयी   एवढी  आपुलकी  बाळगणारी  सून  त्यांना  तुझ्याशिवाय  दुसरी कोणी  मिळेल  असं  मला वाटत  नाही. मी उद्या त्यांना इथे घेऊन येतोय. तू तयार  रहा.  सर्व  संशय सोडून दे. सगळं काही चांगलं होईल."  सुशांतने   तिला  आपला  निर्णय   सांगून टाकला.
    सुशांतचं हे प्रपोझल म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर  आयुष्य जगण्याची नशीबाने दिलेली सुवर्णसंधी आहे; हे दीपाला कळत होतं.  त्याने  हा निर्णय   भावनेच्या  भरात  नाही;  तर  पूर्ण  विचार करून घेतला आहे,  हे तिला त्याच्या बोलण्यावरून  जाणवलं होतं. त्याच्या मनातलं प्रेम त्याच्या स्वरात दिसत होतं. त्याच्या बोलण्यातील हक्काच्या भावनेनं ती मनोमन सुखावत  होती. तिने  होकारार्थी  मान  हलवली. 
      जेवण  झाल्यावर निघताना त्याने  निर्मलाला रविवारी  संध्याकाळी आई-वडिलांना  घेऊन  येत असल्याचे   सांगितलं.   त्याचा     दीपाशी   लग्न करण्याचा  विचार  जेव्हा निर्मलाला कळला तेव्हा तिचा   उत्साह    दुथडी  भरून    वाहू    लागला.  सुशांतच्या आई-वडिलांच्या स्वागताच्या  तयारीला सुरवात   केली.  त्यांच्यासाठी     खायला    काय बनवायचे इथपासून ते सोफा कव्हर आणि टेबल- क्लॉथ बदलण्यापर्यंत तिची धावपळ  सुरू झाली. तिच्या   उत्साहाला  आवर  घालण्यासाठी  दीपा म्हणाली , " आई!  तू  फार  अपेक्षा  ठेवू  नकोस. त्यांनी  सून   पसंत करून ठेवलेली  आहे. आणि    जर ते  ठाम राहिले तर  सुशांतचं  म्हणणं   ऐकून घेतीलच असं  नाही. जरा  शांतपणे   विचार  कर.    हो !आपल्याकडे ते पाहुणे म्हणून  येतायत त्यांची  ऊठबस अवश्य कर, पण मनाचे  मनोरे फार  रचू   नको!  नितीनचा  मेडिकलचा महत्वाचा  अभ्यास      चालू  आहे.  इतक्यात  येईल  तो!  त्याच्याकडे या गोष्टी बोलू नको. नाहीतर अभ्यासाऐवजी माझाच  विचार तो  करू लागेल." दीपाने  आता  स्वतःच्या नशिबावर जास्त विश्वास ठेवणं सोडून दिलं  होतं. त्यामुळे नंतर आईला  धक्का  बसू  नये  यासाठी  तिचा  प्रयत्न  चालला होता.

                              **********
सुशांतचे आई- बाबा ठरल्याप्रमाणे मुंबईला आले. आता  सुशांतची  खरी परीक्षा  होती. रात्री जेवणं झाल्यावर दुस-या दिवशीचा कार्यक्रम ठरू लागला, तेव्हा तो त्यांनस म्हणाला,
   "  तुम्ही सुप्रियाला  माझ्यासाठी पसंत केलंय!  मला खात्री आहे की तुमची पसंती  नक्कीच  चांगली असणार. एरवी मी तिला न पाहताही लग्नाला तयार झालो असतो, पण माझ्या मनात दुसरीच कोणीतरी आहे!  माझं  मन दीपाने  जिंकून घेतलंय. खरंच ! ती  खूप चांगली आहे. तुम्ही एकदा तिला भेटा  तुम्हाला ती नक्की  आवडेल."  
     
       *******       Contd.  ...Part -14-

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED