veshya vstit books and stories free download online pdf in Marathi

वेश्या वस्तीत

Komal Mankar

वेश्या वस्तीत
 वेश्या वस्तीत 


देह तुझा 

जळत होता आगीच्या 

निखाऱ्याने , सरणावर तू 

पेटत होती स्त्री देहाने पण 

ह्या समाजातील पुरुषी 

वासनेने तुला वेश्या बनवले ...


स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही मानवी जातीने अनेक नाते सबंध झोपासले ... स्त्री रुपात पुरुषाला आई , बहिण आजी आत्या काकू इत्यादी नाते मिळाली 

मायेचा ओलावा पत्नीचे प्रेम बहिणीची माया तरही तो ह्या नात्याने पुरेपूर न सुखावता शरीर सुखासाठी तिचा शोध घेत फिरू लागला आणि त्याच्या वासनेची उणीव भरून काढायलाच त्याने स्त्रीला वेशा बनवले ... आज समाजात वावरणाऱ्या स्त्रीया सुखी आहेत कारण त्यांच्याच मुळे 

हे कधी कळणार आपल्याला ??? हा प्रश्न पडतोच गांभीर्याने ....

***************************

ही कहाणीही त्याचं उर्मिलेची आहे ...

ती उर्मिलाही सामान्य स्त्री सारखीच एक आहे पण ह्या समाजमान्य खोट्या चेहऱ्याने तिला वेशेचा एक कलकचं लावला ती सामान्य स्त्री सारखी जगू पाह्यला खूप धडपडली पण शेवटी तिचं ह्या समाजात जगनच त्यांना अमान्य होतं ..

ती कोणी वेशा असण्याआधी आधी हाडामासाची स्त्री असते हे ह्या समाजाला आणि त्यांच्या नजरेतला तिचा अस्तित्वाचा दृष्टीकोन कोण बदलवणार ???

हे चित्र बदलवायचं म्हणून ती ह्या समाजासमोर नवा आदर्श निर्माण करते .

****************************

वेशेला कुठे असतात भावना मन ?? 

तिच्या जगण्याने तर बेगडी धारण केली आणि तुम्ही मात्र स्वतःला सुशिक्षित समजत 

देवदासीची पदवीच तिला बहाल केली ...

ती तर भुकेल्याची भूक भागवते वेशा मग ती कशी तिच्याकडे बघणाऱ्यांच्या नजरा वेशा झाल्यात हे मात्र पुरेपूर सत्य आहे भाकीत कुठल्याही प्रकारचं रंगवलेल नाही ....तिच्या चरित्रावर ही मी काळे फासले नाही , उपभोग्तेचे शिंतोडे उडवत .... 

...................................................................................................................


शे दीडशे लोकांची वस्ती असलेलं गाव उदाम्पूर . त्या गावात छबूचा परिवार मोठ्या गुण्यागोविंदाने राहत होता . परिवारात तीनच सदस्य . छबुचा नवरा बारा वर्षा आधी विषमज्वरने दगावला . कुटुंबाची सारीच जबाबदारी तिच्यावर येऊन पडली तिला हाथभार लावावा म्हणून तिच्या धाकट्या मोठ्या मुलाने गुणवर्धनने नववी नंतर शाळा सोडून मोलमजुरीला लागला . छबूची लहान मुलगी उर्मिला नुकतीच बारावीत सेंटर फस्ट आली . आता छबूला तिच्या उच्च शिक्षणाची आस लागली ती शेतात कामावर गेल्यावर तिथल्या बायांना सांगायची .. " मायी उर्मिला लय मोठी आफ्सर होणार आहे . " त्या स्त्रियाही तिचं बोलण गंभीर घेत म्हणायच्या " व्ह्य व्ह्य तुही पोरगी लय हुशार निघाली तालुक्यात तीने आपल्या गावाचं नाव काढलय व्हयं ... "

तिकडे छबूचा मोठा मुलगा वेसनाच्या आहारी जाऊन वाईट मुलांच्या संगती लागला . आता तो मायच्या भरोस्यावर खात होता मजुरी सोडून जुवा खेळत अड्यावर जाऊन बसायचा . छबूला त्याचा खूप वैताग यायचा ती त्याला रागाच्या भरात मारायचीही पण सुधारण्याची लक्षणे आता काही त्याच्यात नव्हतीच . 

उर्मिला आईला हातभार व्हावा आणि आपली ऍडमिशन चांगल्या ठिकाणी व्हावी म्हणून शेतात जायची . एक दिवस छबू तापाने पडली रोजच्या मजुरीचे पैसे त्याच्यात तेल मिठाचा खर्च भागायांचा . उर्मिला ज्या मालकाकडे शेतात जायची त्याच्याकडून तिने आपल्या रोजनदारीचे पैसे मागितले आणि छबुला दवाखान्यात घेऊन गेली . डॉक्टरन तात्पुरती औषधी देऊन उर्मिलाला सांगितलं तुमच्या आईला शहरातील मोठ्या रुग्णालयात दाखल करा त्यांना ब्लड कॅन्सर झाला आहे . डॉक्टर चे हे शब्द ऐकताच उर्मिलाच्या पायाखालची जमीन सरकली . क्षण भर ती जमिनीवरच बसली . 

स्वतःला सावरत ती उठली आईला घरी घेऊन गेली ह्या त्या जवळ पासच्या सर्वच नातेवाईकाना फोन लाऊन ती मदत मागत होती . तिचा मामा शहरात हमालीच काम करत होता दारूच्या अड्यावर तो उद्या येतो म्हणाला . तिला जरा हायस वाटलं पण त्याचं रात्री छबूची प्राण ज्योत मालवली ...

दोन तीन दुखाचे दिवस निघून गेले . उर्मिलाचा मामा तिच्या भावाला गुणवर्धनला म्हणाला , " अरे गुण्या मी माझ्या भाचीला शहरात घेऊन जातो की चांगलं काम मिळवून देतो तिला इथं काय करणं ती खेड्यात .. "

त्यावर गुणवर्धन म्हणाला , " काहिले ते मायासनी ओझं नाही तिले मी नाही पाठवणार तुह्या सोबत .... " 

मामा निघून जातो . गुणवर्धन आईच्या धाकात आधी घरी कोणत्या मित्रांना आणत नव्हता पण आता माय मेली तेव्हा पासून तो घरात दारूच्या पार्ट्या करू लागला . उर्मिला शेतात जाऊन राबराब कष्ट करतं होती आपल्याले काहीबी करून शिकायचं आहे म्हणून . 

एक दिवस दारूच्या पार्टी साठी गुण्यांन घरी मित्र बोलवले त्याच्यातला एक म्हणाला , " अशी जिंदगी जगण्यान काही भलं नाही होणार तुले मह्या एक उपाय सुचवतो .. " ह्यावर गुणवर्धन म्हणाला , " कोणता उपाय सांग मले बी .."

ह्यावर मित्र म्हणतो , " आबे तुही थे बहीण नाय का तिले एका सावकरास्नी वीक .."

त्याच्याकडे रागाने बघत गुणवर्धन म्हणतो , " डोस्कं विस्कं फिरलं का राजा तुह्य .. " रागाचा आव आणत तो म्हणाला , " नाह्य नाह्य आता तुही माय भी नाह्य उगाच मागं लचांड लावण्यापेक्षा वीक तिले तुले सांगतो दोन लाख देईन तो सावकार तुले सुखात जगशीन तू त्या पैशात लगीन बी करून देऊ तुह्य , तशी तुही बहीण पाहले बी साजरी सोबागी हाय ... " सखा भाऊ देखील उर्मिलाचा तिच्या आयुष्याचा विचार न करता मित्राचं ऐकतो तो म्हणतो त्याला . 

" असं व्हय कुठं राहतो तो सावकार त्याले उद्याच बोलावं .. " 

" व्हय व्हय आता फोन करतो मी त्याले .. " 

असं म्हणून तो सावकारासोबत बोलून घेतो , सावकार उर्मिलाला न्याला उद्या येणारं असतो पण ती त्यांच्या सोबत जाणार कशी म्हणून त्या रात्री ती शेतातून आल्यावर गुणवर्धन तिच्यासोबत गोड बोलून तिला आपल्या जाळ्यात ओढतो . तो तिला म्हणतो , " उर्मे आज पासून तुले शेतात जायची कायबी गरज नाही . " त्यावर ती म्हणते का ? 

" तुले शहरात जाऊन शिकायचं न व्ह .. "

" हो हो ... खूप शिकून मोठ अधिकारी वाह्यचं मला .. " 

" हो तर मग उद्या आपल्या घरी कार न तुले न्याले एक साहेब येणारं हाय त्यांच्या सोबत मह्या तुया शिक्षणाची गोष्ट केली ... "

त्याचं कोड्यात टाकणार गोष्ट उर्मिलाच्या लक्षात नाही आलं .. तिचं शिक्षण नाही तर तिच्या देहाचा तिच्या भावाने त्या व्यापाऱ्या सोबत सौदा केला होता तीन लाखात ..

तिला उच्च शिक्षणसाठी शहरात जायची संधी मिळत आहे म्हणून तिला रात्रभर झोप नाही आली त्याचं विचारात सकाळ झाली . तिने आपले कपडे रात्रीच भरभूर करून ठेवले होते . 

पांढरी कार घेऊन तो त्या गरीबाच्या झोपडी समोर आला . उर्मिलाला कार मध्ये बसायला त्याने आदेश दिला .. दोन लाखाचे बंडल गुणवर्धनच्या हाती देत तो म्हणाला आधी आम्ही माल कसा आहे तो चाखून पाहतो उर्वरित रकम देऊच लवकर ... त्यांच्यासोबत गोड बोलत त्याने निरोप दिला आणि तो नोटकडेच बघत राहिला .. आपला भाऊ कसाही असला तरी तो सार करायला येईल म्हणून उर्मिला भिरभिरत्या नजरेन त्याला खिडकीतून बघत होती .तिच्या नजरे समोर तिच्या मायची करून मूर्ती उभी राहत होती .. गाडी सुरु झाली हा तिचा प्रवास तिला नरकाच्या दिशेने घेऊन जात होता ह्याची तिला कल्पनाच नव्हती ...

गाडी एका भरगच्च वस्तीत येऊन थांबली उर्मिला आपली कपड्याची थैली घेत कार मधून उतरली तसाच सावकाराने तिच्या खंद्यावर हात ठेवत वर नजर फिरवली . तिला तो स्पर्श अंगाला काटे रुताव असा भासला हात झडकाळतच ती म्हणाली , " कुठे जायचय आता मला चला .. " 

जिण्याच्या पायऱ्या चढत सावकार पुढे ती त्यांच्या मागे चालू लागली ती चालताना म्हणाली , " तुम्ही कुठे आणले मला ? "

तिच्या ह्या वाक्यावर तो चिडतच तिला म्हणाला , " गप्प बस्स ... "

ती जेव्हा जिनाचढून वर आली तेव्हा तिला खिडकीतून वेगळच दृश्य नजरेस पडलं .. ब्लाउज आणि अर्ध्या कपड्यावर स्त्रिया अर्ध नग्न शरीर घेऊन इकडे तिकडे फिरत होत्या . तिला आता जाणीव झाली आपण वेशा वस्तीत आलो ... 

ती समोर रूमच्या आत जायच्या आधीच दारावर खाली बसून ओक्साबोक्शी रडू लागली त्यांचे पाय धरत म्हणाली ," साहेब कुठ आणल्य मला इथून बाहेर काढा मला माझ्या घरी जायचं आहे . " 

काही बायाच्या हवाली करत तिला तो तिथून निघून गेला जातानी तो एवढच बोलून गेला , " नया कोरा माल है इसे कही जाने मत देना इसके लिये मै एक बारा बजे कस्टमर भेजता ... " त्यांनी बोलले हे शब्द तिच्या कानात घुमत होते ती त्या बायांना विनती करू लागली मला इथून सोडा मला ह्याची सवय नाही मी तशी मुलगी नाही .. त्यावर त्यातली एक शमी तिला म्हणाली , " ए देख चूप बैठ , इथ आलेली कोणतीच कुवारी मुलगी वापस नाही जात . " 

तिच्या समोर जेवणाचं ताट सरकवत रेश्मा त्या घोळक्यातली नवतरुणी तिला म्हणाली , " चार घास खाऊन घे आणि तयारीला लाग ."

त्यावर उर्मिला म्हणाली, " मला भूक नाही हे ताट घेऊन जा तिकडं .."

तिच्या समोर शमी मावशीने गालाला लावायला लाली लिपिस्टिक आणून दिली , खरंतर उर्मिलाला चेहरा सजवायला हि प्रसाधने ही थिटे पडतं होती . तिचं रूप एखाद्या लावण्यवती सारखं मोहक होतं .. सडपातळ देह लांब सडक कंबरेचा खाल पर्यंत केस . गौरवर्ण देह , गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ जणू स्वर्गातली अप्सरा ती तिच्या डोळ्यानेच समोरचा घायाळ होऊन जायचा ...

उर्मिलाला एखाद्या नववधू सारखं सजवत शमी आंटीन तिला बंद खोलीत नेलं आणि इथून उठून बाहेर यायचं नाही अशी ताकीद दिली . 

दिवसा च्या प्रकाशात त्या रूम मध्ये किर्रर्र अंधार होता . एवढ्यात किर्रर्र आवाज करत दार वाजलं तशीच उर्मिला धास्तावली दार बंद करतं तिच्याजवळ कोणी तरी येत असल्याचं तिला त्या अंधुक अंधारमय काळोखात स्पष्ट दिसतं होतं . उर्मिलाने आपले डोळे गच्च मिटवून घेतले आता इथून आपली सुटका होणे शक्य नाही समोरचा वाली आपली दया करून सोडणार नाही तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले . तो तिच्या समोर येऊन बसला . उर्मिलानं आपलं अंग चोरून घेतलं त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि समोर सरसावला ती नाही म्हणता म्हणता तिला त्याने कसलाही विचार न करता उपभोगलं तिच्या शरीरावर हिंस्त्र पशूसारखी झडप घेतली . सारा त्राण एकटवत डोळ्यातून अश्रू धारा ओघळत ती मुकाट्याने सहन करत होती . तीचा आरडाओरडा करणारा गळा ही सुकून गेला होता . ही तिचं पहिलं गिराइक होतं . एव्हांना चार गिराईक तिला उपभोगून गेले . ती त्या कुंटखान्यातून बाहेर निघायला धडपडत होती . आठ दिवस तिला इथे येऊन पूर्ण झाले खालच्या जिन्याने ती बाहेर पडायला निघाली ती वस्तीच्या बाहेर आलीच तर तिला तिथल्या सावकाराने पळताना बघितले तो तिचा मागोवा घेतं गेला आणि तिला त्याने गाठलेच . तिला त्या कुठंखाण्यात आणत पट्या पट्याने वळ उमटेपर्यंत मारले .

शमी आंटी तिला आत येत म्हणाली , " आज एक तुह्यासाठी हँडसम गिराईक येत हाय उर्मिले त्याले लै खुश करजो पुन्हा पुन्हा पाखरू उडतं वस्तीत आलं पाह्यजे .."

ह्यावर ती शमीला म्हणाली , " आंटी आज का दिन रहने दे मेरे पेठ में दर्द हो राहा दो म्हनेसे .... "

हा शब्द ओठातच गिळत ती म्हणाली , " मुझे महावरी आएगी .... "

शमी रागातच म्हणाली , " अभी आयी तो नही ना जादा नाटक मत कर तू गिराईक को खुश करना मैं चलती हू .. " असं म्हणतं शमी बाहेर गेली आणि त्या तरुणाला तिने आतमध्ये पाठवत बाहेरून दार लावून घेतले आणि खाली गेली . 

विजय दचकतच रूम च्या आत शिरला हळूच दाराची कडी लावतं तो उर्मिलाच्या बेडकडे वळला , रूम मध्ये अंधार पसरलेला होता 

तो उर्मिलाच्या अगदी जवळ जाऊन बसला होता उर्मिलाच्या मनात भीतीचं साम्राज्य आजही तेवढंच दाटलं होतं . शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकली दोन महिने झाले आणि आज माझं पोट दुखायला लागलं असं का होतं असावं मी इथे कुणाला सांगू ह्या कुंटखान्यात स्त्रीच्या वेदनेतही पुरुष एवढा नामर्द झाला की त्याला वासना दिसते , शमी आंटी रेश्मा मेहबुबा ह्या सर्व ही त्याचं परिस्थितीतून गेल्या असाव्या का ?? म्हणून त्यांना एका स्त्रीच दुःख कळत नाही आहे . ती भानावर येत मागे सरकली . विजय पुढे सरसावला तिच्या बाजूला त्याला टेबल लॅम्प दिसतं होता तो लावायला तो समोर सरसावलाच इतक्यात भीतीने उर्मिला किंचाळली , आणि आपला चेहरा तिने स्वतःच्या मांडीत डोकं खुपसून घेत रडू लागली . टेबल लॅम्प च्या धूसर प्रकाशात त्याला तीच स्पष्ट रूप जाणवू लागलं . तिला सहानभूती म्हणून खांद्यावर मैत्रीचा हात ठेऊन त्याला सांगावस वाटतं होतं मी तुला उपभोगणार नाही . पण ती खूप घाबरलेली होती म्हणून तो तिच्या काही अंतरावर जाऊन दूर बसला . तिने हळूच आपली मान वर केली . तेव्हा आता कुठे तो उर्मिला सोबत बोलता झाला , " तुझं नाव काय आहे ? "

तिला जरा नवलच वाटलं हा माझं नाव का विचारतो आहे , " उर्मिला .... " एवढं म्हणत ती शांत झाली . तो तिला बोलतं करू लागला , " माझी भीती वाटतं आहे तुला खूप ?? "

तिने आपली मान हलवतच होकार दिला ... तो त्यावर म्हणाला , " मला भिऊ नको ...मी तुझ्या भावा सारखा ...... "

त्यावर त्याला समोर न बोलू देता ती म्हणाली , " चूप राहा माझ्यासोबत भावा बहिणीचं नातं जोडू नका मला नफरत आहे ह्या नात्याची . "

त्यावर तो म्हणाला , " का ?? " 

ती रडतच त्याला सांगू लागली , " मला माझ्या भावाने विकले ह्या लोकांना माझ्या देहाचा सौदा केला त्याने . "

त्याला तिचं बोलणं ऐकून धक्काच बसला , " तो म्हणाला भाऊ असं करू शकतो मी नेहमी बहिणीच्या नात्यासाठी व्याकुळ होतो , ऐक मला बहीण नाही पण समाजतल्या बहिणींना वेश्या म्हणून जगू द्यायचं नाही . "

त्याचे हे वाक्य ऐकून ती म्हणाली , " दादा मग तू मला इथून बाहेर काढणार ??" 

त्यावर तो म्हणाला , " हो मी तुला इथून बाहेर काढायलाच आलोय , तुला सांगू माझं एक ड्रीम होत . " त्याला पूर्ण बोलू न देता मधातच उर्मिला म्हणाली , " कोणत ? "

त्यावर तो म्हणाला , " सांगतच आहे ग मी तूला , ips अधिकारी होऊन मला वेशा वस्तीत यायचं होतं .. "

त्यावर उर्मिला म्हणाली , " एक अधिकारी होऊन तुला वेशा वस्तीत यायचं होतं म्हणतोय .."

" हो इथे दलदलीत फसलेल्या स्त्री जातीचा उधार करायला ... "

आपली ओढणी सावरत ती तिथून ताडकन उठत म्हणाली , " तुम्ही तुम्ही ips अधिकारी ते पोलिसाच्या वरचे आहात ?? " 

तो क्षणभर थांबतच म्हणाला , " हो हो ...."

" मग तुमची खाकी वर्दी कुठेये ? "

" वर्दी वर मला इथे कसे येता आले असते , आणि मी ips जरी असलो तरी तू मला आधी दादा बोलली मला इथून बाहेर काढणार ?? माणूस कितीही उंचावर गेला तरी नाती नसते बदलत गं तू मला दादाच बोल .. " 

ती म्हणाली , " तुम्ही जा इथून असल्या वातावरणात पुन्हा नका येऊ ,आणि माझ्या सारख्या वेशेला बहीण नका मानू ... "

त्यावर तो म्हणाला , " आणि तू ? मी जाईल निघून तुझं इथे काय होईल आयुष्यभर तुला एक पुरुषी देह आपल्या वासनेने लुबाडत राहील , तू स्वतःला वेश्या का म्हणून घेतेस आजही तू चरित्र्याने निर्मळ आहे तुझं मन निखळ पाण्यासारखं शुद्ध आहे ...."

त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले ती खाली बसून त्याचे पाय पकडत म्हणाली जा तुम्ही इथून माझं जे होईल ते होईल तुम्ही देशासाठी कर्तव्य करा .. " 

" अग ज्या देशात स्त्री सुरक्षित नाही दररोज पुरुषाची शिकार होऊन मरते आहे इथे पैशाने रोज तिला पुरुष उपभोगतो हे सर्व मला बंद करायचं आहे मी देशासाठीच कर्तव्य करतं आहे .." 

ती त्याच्या पायावर अश्रू ढाळत म्हणाली , " आज पर्यंत ह्या कुंटखान्यात एका वेशेला बहीण मानायला एकही पुरुष आला नाही इथे रोज सुहागरात होते तिच्या इच्छे पलीकडे जाऊन ...तिला फक्त लुटलं जाते , तिच्या अस्तित्वाची गरिमा पोखरून निघते डोळ्यात असावं दाटत ती मुर्दाड देहाप्रमाणे स्वतःला उपभोगू देते . पण दादा तू विचाराने महान आहे .. मी इथून एक महिन्यात दहावेळा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला पण वस्तीच्या फार दूर मला जाताच आले नाही वेशेला तिच्या देहावरून सार जग ओळखत रे आणि सुखाने जगू देतं नाही ... " तिला आपल्या दोन्ही हाताने उठवत विजयने जवळ बसवले आणि म्हणाला , " माझ्या सोबत चल इथून आज आणि ह्या वेळेला , मी तुझी इथून सुटका करीन माझा प्लॅन मनासारखा झाला आता त्या मेहबूबाला सरळ बघ जेल ची हवा दाखवतो आणि तुला जबरदस्तीने बांधून ठेवल्याच्या गुन्ह्यात रेड टाकून ह्या कुंटखाण्याला ताला लावतो . "

डोळ्यातले अश्रू पुसत उर्मिला त्याला म्हणाली , " दादा , माझी एखाद्या चांगल्या कॉलेज मध्ये दाखला करून दे मला खूप शिकायचं आहे . " 

" हो हो आधी इथून बाहेर पडू आपण .. " त्यांनी खिशातून फोन काढत पोलीसच्या चार पाच गाड्या बोलवून सर्वाना अरेस्ट करून जेल मध्ये घेऊन येण्याचा ऑर्डर दिला .. उर्मिलाला ही आपल्या सोबत चलण्याचा आदेश दिला दोन तास झाले होते त्याने दरवाजा उघडला आणि उर्मिलाला घेऊन तो खाली उतरला , एवढ्यात मेहबुबा त्याच्याकडे बघून उठली आणि म्हणाली , " हे काय करतो आहे तू उर्मिलेला सोड तिला घेऊन कुठे चालला . "

त्यावर विजय म्हणाला , " चालायचं तर तुम्हालापण आहे जेल ची हवा खायला . " 

त्याच्या अंगावर धावत येत मेहबुबा त्याची कॉलर पकडत म्हणाली , " माझ्याशी पंगा घेऊ नको मला इथले सारेच पोलिस ओळखतात ते ही माझं आज पर्यंत काही वाकडं नाही करू शकले तर तू कोण आणि कुठचा आला दादागिरी खपवायला ... "

एवढ्यात पोलिस आलेत आणि सर्वाना अटक करू लागले , विजयने एका पोलिसाला सांगितले मी उद्या भेटतोच ह्यांची चांगली सोय करून ठेवा आणि इथे ताला लावा परत हा कुंटखाना माझ्या नजरेत उघडा दिसायला नको . 

आता मेहबुबाला कळून चुकले विजय हा कोण व्यक्ती होता तो साधा सुधा स्त्रियांना लुटायला येणारा पुरुष नसून एक ips अधिकारी होता .

*********************

विजय उर्मिलाला घेऊन त्याच्या बंगल्यात आला , आई सोबत त्याच्या त्याने उर्मिलाची ओळख करून दिली आज पर्यंत तिच्यासोबत काय घडलं हे देखील त्याने आपल्या घरच्यांपासून लपवलं नाही . आणि विजयची तिथेच चुकी झाली विजयची आई त्याला ओरडतच म्हणाली , " तू आज एका वेश्या मुलीला बहीण मानून घरी घेऊन आला अरे हि मुलगी त्या वातावरणात वाढली आहे आपण समाजात जगतो समाज हिला छी थू करेल सोबत आपल्यालाही तुझं डोकं जागेवर नाही विजय , ह्या मुलीला तिच्या गावला सोडून ये .... " 

आईच एवढावेळ मुकाट्याने बोलणं ऐकून घेत आता विजय म्हणाला , " आई ही एकच महिना तिथे राहिली , ह्याच्यात तिची काहीच चुकी नव्हती . "

ह्यावर त्याची आई म्हणाली , " ठीक आहे तुला ही बहीण म्हणून पाहिजे ना ह्या घरात तर मी गावाकडे निघून जाते .. " नाईलाजाने विजयने मित्रा सोबत सपंर्क करून उर्मिलेला एका चांगल्या वस्तीत रूम मिळवून दिली . तिला मेस लावून दिली . तो तिला रोज भेटायला यायचा आज रक्षाबंधनचा दिवस होता उर्मिलाने राखी विकत आणली तिला बरं नव्हतं वाटतं दिवस मावळायला आला सहा वाजत आले तरी आज रक्षाबंधन असून विजय का नाही आला . ती विचारच करत बसली एवढ्यात दारावर थाप पडली , दाराकडे बघताच उर्मिलाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले , " किती वेळ दादा आज माहिती आहे मी तुझी किती भिर भिर वाट बघते आहे . " 

रूम मध्ये येत विजय म्हणाला , " हो हो मला आतमध्ये तर येऊ दे माझी बहिणाबाई ..."

विजयला ओवाळताना उर्मिलेच्या पोटामध्ये दुखू लागलं कसं तरी स्वतःला सावरत तिने त्याला राखी बांधली . विजय तिच्या हातात भेट वस्तू ठेवतच तर तिला कोरड्या ओकाऱ्या येत होत्या ती बेसिंग कडे वळली तिला उलटया झाल्या चेहरा पुसत ती बाहेर आली . विजय तिची अशी अवस्था बघून चिंतेतच पडला हातातला पाण्याचा ग्लास उर्मिला समोर ठेवतं तो तिला बसायला धीर देत म्हणाला , " बस तुझी तब्येत बरी नाही का ? काय झालं काही सांगशील ? "

ती स्तब्ध होत अश्रू ढाळू लागली एका क्षणातच तिच्या डोक्यात अनेक विचार येऊन गेले , " ह्याला भाऊ मानते मी काय सांगू कसं सांगू ?? माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत विजय दादा निघून गेला तर माझं कोण असेल इथे ... हा गर्भ .." नाही म्हणतं कानावर दोन्ही हात ठेवतं ती किणचाळली . विजय तिथेच बसून होता उर्मिलाच्या पोटात आता जास्तच दुखायला झालं तिला त्या वेदना सहन नव्हत्या होत . विजय तिला सावरत म्हणाला , " हे बघ काय होत तुला एक काम कर तू आताच्या आता हॉस्पिटल मध्ये चल माझ्यासोबत .. " विजयला काही प्रमानात उर्मिलाचं पोट ही आलेलं दिसलं . तो मनातच स्वतःशी पुटपुटला , " आज एका स्त्रीला मी बहीण मानून चूक केली का तिच्या सोबत नियती का अशी खेळ खेळत असावी ?? उर्मिलेच्या पोटात गर्भ वाढत असेल तर ... हा गर्भही नकळत घडलेला तो कोण असेल उर्मिलाही माहिती नसणार ? काय होणार माझ्या बहिणीचं ?? " 

उर्मिला विजयला म्हणाली , " दादा तुला वेळ होईल घरी जायला तू जाऊ शकतो . "

" उर्मिला माझ्यासोबत तू आताच्या आता हॉस्पिटल मध्ये चाल ... " 

" दादा पण .... "

" हे बघ , पण नको आणि वीण नको ..."

विजय तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला तेव्हा डॉक्टर कडून त्याला कळले ती तीन महिन्याची गरोदर आहे . विजयच्या पायाखालची जमीनच सरकली . डॉक्टर म्हणाले , " विजय पेशन्ट ची हालत खूप गंभीर आहे रक्ताची कमी आहे हा गर्भ पोटात ठेवणे आणि काढून टाकणे दोन्ही कडून उर्मिलाचा जीवाला धोका ठरेल . " विजय विचार करू लागला काय करावं हा गर्भ वाढवून उर्मिला त्या लेकराला कुणाचं नाव देईल , समाज तिला सुखाने जगू देईल का ?? 

तिच्या समोर जाऊन काय बोलावे आपण तिला कसं सांगावं तुझ्या पोटात गर्भ वाढतो आहे ? त्याने डॉक्टर च्या हाताने एका सिस्टरला तिला ती आई होणार असल्याचे सांगायला पाठवले . उर्मिला ते ऐकताच धाय मोकळून रडू लागली तिचं केविलवाणं रूप तिला सांभाळायला कोणीच नव्हतं विजयला वाटलं आपल्या आईला बोलवून घ्यावं पण त्याची आई ती दोषाचीच पाठराखण करणारी . विजय तिला त्या परिस्थितीत सोडून तिथून निघून गेला ... 

********************************

उर्मिला आता चार घरचे भांडे घासून जगू लागली . तिचं वाढतं पोट बघत लोक तिला वाईट शब्दात बोलायचे . जिथे ती कामाला जायची तिथल्या घरातील एखादीला भाकर मागितली तर त्या ही तिच्या तोंडावर भाकरी फेकून मारायच्या . दोन महिने लोटले तरी विजय त्या रूम वर भेटायला आला नव्हता म्हणून तिने ते रूम सोडून दुसरीकडे रूम बघितली कमी भाड्याची . तिचा नववा महिना जवळ आला . विजय ऑफिस च्या कामासाठी विदेशातून परत येत तिच्या रूम वर गेला तर आजू बाजूचे सांगायचे ती एक दोन महिन्यापूर्वी रूम खाली करून गेली . विजयने तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही ...

उर्मिलाने एका मुलीला जन्म दिला हे बाळ कुणाचं होत तिला कुणापासून झालं हे तिलाच ठाऊक नव्हतं . घरोघरचे भांडे घासून ती त्या मुलीला जगवू लागली . दुसऱ्याच्या काम करतच मुलीला सांभाळत आपलं शिक्षण पूर्ण केलं . आजू बाजूच्या बाया उर्मिलाच्या मुली सोबत आपल्या लेकरांना खेळू द्यायच्या नाही . उर्मिलाची मुलगी रवीना एकटीच रडत बसायची . 

उर्मिलाला आता एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली . तिने दारोदारी जाऊन लोकांची भांडी धुणं सोडलं . आपल्या मुलीला एका चांगल्या कॉन्व्हेट मध्ये दाखल केलं . वडिलांचं नावं माहीतच नव्हतं पण उर्मिलाला मुलीला शिकवायचं होतं म्हणून तीनं स्वतःच नावं दिलं . बरेचदा रवीना आपल्या आईला विचारायची , "आई माझे बाबा कुठे आहेत ? " ह्या तिच्या प्रश्नावर उर्मिला निरुत्तर राहायची . 

उर्मिला सारखीच तिची मुलगी हुशार निघाली दिसायला जणू दुसरी उर्मिलाचं बुध्दीलाही तल्लख . पोटाला पीळ देत उर्मिला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी शाळेतून मुलांना शिकवून आल्यावर एका कोचिंग क्लास मध्ये शिकवायला जायची . काळ खूप मागे सरून गेला तिला शाळेत बरं वाटायचं घरच्या पेक्षा तिथे तिला आदर मिळतं होता . ती स्वभावाने आणि चारित्र्याने कितीही सुशील असली तरी समाज तिला आजही वेश्या म्हणून हिणवायचा . 

एक शिक्षका होऊनही तिला स्वतःच्या चारित्र्याला लागलेला वेशेचा डाग नाही मिटवता आला . 

उर्मिलेच्या लेकीनही तिच्या सारखं बारावीत अख्या शहरात सेंटर फस्ट येऊन आपली मान गौरवाने उंचावली . रवीनाने बारावीत ९६% घेऊन सरकारी कॉलेज मध्ये mbbs ला ऍडमिशन मिळवली . 

आता उर्मिलाला तिच्या जगण्याचं सार्थक वाटतं होतं .. तिची मुलगी बघता बघता एका सरकारी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होऊन रुंज झाली . रवीनाला हॉस्पिटल मधून घरी येताना उशीर झाला . ती रस्त्याने येत असताना तिथे खूप गर्दी जमली होती म्हणून ती ऑटोतून उतरून त्या गर्दीतून जागा करत शिरली आणि बघते तर काय तिथे अपघातात एक व्यक्ती विव्हळत होता सारे बघतं होते पण कोणीच त्याला हात लावायला समोर नाही गेले . रवीनाने ऍम्बुलन्स ला कॉल करून ताबडतोब बोलवून घेतले आपला स्कार्प त्या माणसाच्या डोक्याला बांधला . रक्त वेगाने ओघळत होतं तिला शंका येत होती हा व्यक्ती वाचणार की नाही म्हणून . ताबडतोब ती त्याचं ऍम्बुलन्समध्ये पुन्हा हॉस्पिटल मध्ये आली . पेशन्टला वेळात योग्य ती ट्रीटमेंट मिळाली . त्या रात्री दोन वाजता ती घरी गेली . पेशंटनला होश आल्यावर त्यांनी विचारले मला इथे कोणी आणले तेव्हा . एका डॉक्टरच्या तोंडून त्याने रविनाचे पूर्ण नावं ऐकले .. रविना आईचं नाव लावतं होती . तो पेशन्ट म्हणाला , " रविना उर्मिला .... कुठे राहते ही डॉक्टर ?? हिला मला भेटायचे आहे . " इतर डॉक्टर ही त्यांना बघून कळून चुकले कि हे ips अधिकारी विजय आहेत . 

रविना दुसऱ्या दिवशी ips विजय समोर येऊन उभी राहिली आणि त्यांना म्हणाली , " सर कशी वाटतेय आता तुमची तब्येत ? " तिच्याकडे बघून विजयला उर्मिलाचं दिसतं होती . तो म्हणाला , " तू तू उर्मिलाची मुलगी आहेस ना ? उर्मिला कुठे आहे ? "

" सर आपण ओळखता माझ्या आईला मी तिला बोलवून घेते ती घरी आहे . " तिने लगेच आईला कॉल करून म्हटले , " आई माझ्या हॉस्पिटल मध्ये ये तुला एका सरांना भेटायचं आहे . " उर्मिला विचार करू लागली मला कोणत्या सरांना भेटायचं आहे असेल आता एखादी आमच्या शाळेतले शिक्षक . उर्मिला तिला हो येते म्हणून हॉस्पिटल मध्ये जायला निघाली . हॉस्पिटल मध्ये गेल्यावर ती रविनाला भेटली आणि म्हणाली , " रविना अंग कोणते सर ? "

" आई चालना ते ह्याच वॉर्डात आहे तू ओळखत असेल त्यांना ते मोठे अधिकारी आहेत ह्या देशाचे .. "

ती आत शिरताच विजय बेडवरुन उठून बसला त्यांची मुलं आणि बायको त्याच्या शेजारीच होती . डोळ्यासमोर विजयला बघून उर्मिला म्हणाली , " दादा तू .." 

रडवलया स्वरात तो म्हणाला , " काळ खूप मागे लोटून गेला उर्मिला खूप शोधलं मला त्या दिवशी मी तुला एकटीला टाकून निघून गेलो आणि दुसऱ्याच दिवशी मला विदेशी दोऱ्यावर जावं लागलं , मी तिकडून येताच लगेच तुझ्यारूम वर आलो पण तू रूम सोडून निघून गेली खूप शोधलं तुला पण नाही मिळाली .. "

त्याचे शब्द ऐकून उर्मिलाच्या डोळ्यात पाणी आलं विजयची बायको अर्चना ही मधातच म्हणाली , " ह्यांनी मला तुमच्याबद्दल सर्व सांगितलं आम्ही तुम्हाला खूप शोधलं ताई आता पर्यंत तुमचा शोध घेत आलो पण तुम्ही कुठे होत्या ?? "

एवढ्यात विजय बोलला , " उर्मिला ही तुझी मुलगी ना ग शेवटी घडवलं तू हिला आणि स्वतःच्या मेहनतीवर डॉक्टर बनवलं ."

" हो दादा , हिचा जन्म झाल्यांनतर मी फक्त हिच्यासाठी जगत आली मला डॉक्टर कलेक्टेर नाही होता आलं पण मला तिला ह्या समाजात एक स्त्री म्हणून जगनं शिकवायचं होतं .. " 

त्यांचं संभाषण ऐकत आता रविना तिचा आईला म्हणाली , " आई हे तुझे भाऊ आहेत ? " 

" हो रविना वेश्या म्हणून जगणारीला ह्यांनीच ह्या समाजात आणले ..."

त्या वेश्या वस्तीत आजही कितीतरी स्त्रिया पुरुषाची उपभोग्य वस्तू म्हणून जगत आहेत ... घरात नवऱ्याची हक्काची वस्तू म्हणून तो तिला लातेने शरीर सबंध ठेवायला तुडवत आहे ... रस्त्याने जाताना हाच पुरुषवर्ग तिला पॉर्न साईट मधल्या सनी सारखा बघू लागतो आणि समाजात वावरणाऱ्या कोहळ्या मुलींवर डोळ्याने बलात्कार करतो ....

वेश्या वस्तीची विदारकता कठीण आहे ... रोज रोज कुणाला त्या वासनेच्या

अग्नित जळणं आहे ..

तुम्हा पुरुषांना तिला 

भर दिवसाही छळनं आहे ..!!

तिला देवदासी म्हटलं , 

एका स्त्रीला तिचं स्त्रीरूप 

घालवतं वेशेचं लेबल फासलं

दिवसा स्त्री म्हणजे नारी शक्तीच रूप ना !

रात्र होताच पुरुषी सामर्थ्याचा प्रयोग का ? एकटवून 

रोज रोज दिवसाच्या उजेडात सूर्य नारायणालाही 

लाजवतं तिच्यावर बलात्कार ?? वा वा !! ह्यालाच 

पुरुषातली मर्दानगी म्हणावी 

छाताडावरचं ज्या दूध पिलं 

त्याचं देहाला ह्यांनी नागवलं ...


© कोमल प्रकाश मानकर 
 

  विजय कॉलनी , सिंदी रेल्वे , जि. वर्धा 

                      

                       mankar123komal@gmail.com


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED