shani aala rahu gela books and stories free download online pdf in Marathi

शनी आला राहू गेला आणि मंगळाने घात केला .. - शनी आला राहू गेला आणि मंगळाने घात केला .


शनी आला राहू गेला अन मंगळाने घात केला .
दैवी शक्तीच्या आहारी जाऊन माणसाने स्वतःची बुद्धीतर गहाण ठेवलीच पण , आकाशातले ग्रह तारे  माणसाच्या संसारीक

जीवनाशी तीळ मात्र सबंध नसताना ते कुंडलीत कसे प्रवेश करतात हेच मला कळतं नाही . राशी ग्रह , जन्म कुंडली , राशी देवता ह्या साऱ्याचा प्रभाव माणसावर पडतंच नाही जशी निसर्गानी मानवाची निर्मिती केली . तशीच निर्मिती सर्व नैसर्गिक घटकांची

झाली आपण त्याकडे निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे हे समजून न बघता आध्यत्मिक कल्पना करतं बसने किती

मूर्खपणाचे लक्षण आहेत हे समजून येईलच .

माणूस एखाद्या गुरु किंवा ढोंगी बाबाच्या आहारी जाऊन उलट स्वतःच नुकसान कसा करून घेतो हे मला माझ्या वैक्तिक जीवनात

बघितलेल्या उधारणावरून स्पष्ट करावे लागेल .

अनिता जवळ जवळ तीस वर्षाची झाली . अनिता शिकतं राहिली आणि लग्नाचं वय वाढतं गेलं . पावना घरात ठरायचं नाही लग्न जुळायचं नावं नाही म्हणून अनिताच्या आईला शेजारच्या एका स्त्रीने फुकटचा सल्ला दिला .

अनिताची आई तुम्ही देवळात जा म्हणे तिथे रिद्धी- सिद्धी प्राप्त झालेले बाबा बसले असतात ते नक्कीच तुम्हाला लग्न जुळण्यासाठी

उपाय सांगतील ते करा . अनिताच्या आईनेही त्या स्त्रीच म्हणणं ऐकलं . अनिता तिच्याजवळ तर देवळातल्या बाबांजवळ जाण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता . एक दिवस दोघीही मायलेकी देवळातल्या बाबांजवळ गेल्या . देवळातल्या बाबाने आधी तिचा हाथ बघितला त्यांचं हाथ बघणं हे प्रथम कार्य असतं मग हळूहळू थोतांडपणची सुरु होतं असते . त्यांनी हाथबघून तिला सुचवलं , " अनिता आपल्या हातात लग्न रेशा सुकळ समृद्ध आहे . लग्न आज ना उद्या होईलच पण तुमच्या नाव राशीत दोष आढळतो मला तुमची कुंडली आणून दाखवा म्हणजे काय करायचं ह्यावर मी तुम्हाला तोडगा सांगतो . " ह्या आधी अनिताची कधी जन्म कुंडली बनवून नव्हती . नव्याने कुंडली बनवून त्या बाबांसमोर नेऊन ठेवल्यास त्यांनी अनिताच्या राशीत दोष सांगितला . ते म्हणाले , " तुमच्या राशीत शनी ग्रह आहे , राहूची तुमच्यावर साया आहे . त्याला शांत करावे लागेल नाही केल्यास तुमचं लग्न जुळणं अशक्य आहे . तुम्हाला सहा महिने शनीची शांती करा लागेल त्यासाठी दर शनिवारला कुणाची दृष्ट तुमच्यावर न पडता केळीच्या झाडाची फांदी आणून दर शनिवारी नवीन नारळ आणून एका तांब्याच्या कलशावर पूजा मांडायची . पूजा पूर्ण झाल्यास ती पूजा नदी पात्रात शिरवून द्यायची आणि शनिवारीच इथे मंदिरात एरंडीच तेल दिव्यात आणून टाकायचं "

बाबाने सांगितलेलं हे नियम तिने करण्याचा प्रयत्न केला . दर शनिवारला ती कुणाची नजर आपल्यावर केळीच्या फांद्या तोडताना पडू नये म्हणून पहाटे पाच वाजता उठायची . सहा महिने तिने सतत बाबाने सांगितलेल्या उपाययोजना केल्या . पण लग्न जुळायचं नाव नाही . आणि बाबाने हे उपाय सांगायच्या आधीच राशी ग्रह कुडंलीतले दोष बघायचे तिच्याकडून सहा हजार घेतले . आता सात महिन्याने ती पुन्हा बाबाकडे गेली एवढे उपाय करून अजून माझं लग्न कसं नाही जुडलं हे विचारायला . तर बाबाने तिचा हात कुंडली बघून सांगितलं तुमच्या राशीत शनी आणि राहुला तुम्ही शांत केलं पण आता मंगळ ग्रहाने प्रवेश केला . पोरी तुझ्यावर साडेसातीच चक्र राशीत सुरु झालं ही एक खूप मोठी अडचण आहे . साडेसाती सुरु झाल्यावर सात वर्ष आता तुझं लग्न होणे शक्य नाही . तेव्हा न राहून अनिता बाबाला विचारते बाबा ह्यावर कोणताच उपाय नाही का तुम्ही रिद्धी- सिद्धी प्राप्त आहात म्हणून मी माझं लग्न जुळेल ह्या आशेनं तुमच्याकडे आली तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे . तेव्हा बाबाने तिला घरात होम करून तिच्या नावाची पूजा घेण्यात येईल ते ती स्वतः घेतील असे सांगितले ह्या होममध्ये जाळण्यात येणाऱ्या सामग्री वीस हजाराच्या आणि पाच महाराजना जेवण देण्यात यावं असं त्यांनी तिला सांगितलं हे सर्व केल्यास तेव्हा तिचं लग्न जुळेलच ह्याची शाशवती त्यांनी दिली नाही . ह्यावरून अनिताच्या लक्षात आले हे बाबा पैशानी सामान्य जनतेला असेच लुटतात ह्याच्या नादी लागून आपण फसलो ह्याची जाणीव होताच ती त्या बाबाच्या उपाययोजनापासून सावध झाली . परंत तिने त्या बाबाच्या मंदिराचा उंबरठा ओलांडला नाही . बाबानी तिला हे उपाय केल्याशिवाय सात वर्ष तुझं लग्न होने शक्य नाही असेही सांगितले होते पण तिचं त्याचं महिन्यात लग्न जुडलं आता तिच्या लग्नाला तीन वर्ष होतील अनिता एका लेकराची आईही आहे . ह्यावरून माणसातला अंधविश्वास दिसून येतो

आणि अश्या बाबा महाराजच्या आहारी जाऊन सुशिक्षितांनी स्वतः वर ओढवून आणलेलं संकट , पैशाचा चुरडा वेळेचा झालेला दुरुपयोग

आणि बाबाच्या कचाट्यात सापडल्यावर एकदाची तिथून सुटका होणे कठीण ते तुम्हाला बरबाद करूनच सोडतील हे सत्य नाकारता येणार नाही .... म्हणून सतर्क राहा भोंदू बाबांपासून सावध व्हा ! शनी आला राहू गेला अन मंगळाने घात केला असं होऊ देऊ नका .. 


- कोमल प्रकाश मानकर

(विजय कॉलनी ) सिंदी रेल्वे . वर्धा  इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED