माझी शाळा आणि आमच्या बाई
हि गोष्ट आहे साल १९९७ .. जेव्हा माझ्यासारखे अनेक मुले मुली या ठिकाणी एकत्र झाले ते म्हणजे माझी शाळा .. वयवर्ष ५ ह्या वयात.. काहीच माहीत नसतं ..आणि आपल्या आई वडिलां पासून दूर केलं जातं तो त्रास तर खूप होता कारण अनोळखी.. मुलं मुली. त्यात अनोळखी शिक्षिका .. खर तर खूप घाबरलो होतो तेव्हा मी.. की कशाला ज्याचं शाळेत.. पण आई आणि बाबा ह्यांची स्वप्न असतात की आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे.. आणि मोठा होऊन चांगला मोठ्या हुद्द्यावर असायला पाहिजे.. ही आपल्या आई वडील यांची स्वप्न.. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले आई वडील आपल्याला शाळेत टाकतात... पण त्या वयात काहीच माहीत नसतं साधं बोलता पण येत नसत हो.. पण आपल्याला अशी एक समजून घेणारी आणि आपल्या आई सारखं प्रेम करणारी व्यक्ती भेटते .. ती म्हणजे आपली शिक्षिका..
रागवणाऱ्या ,मारणाऱ्या ,आणि प्रेमाने समजून सांगणाऱ्या आमच्या शेलार बाई.. शाळेचा पहिला दिवस. घरात रडून रडून गोंधळ घालणारा मी.. की मला नाही जायचं शाळेत .. आईचा खूप मार खाल्ला.. शेवटी.. वडिलांनी उचलून रिक्षा मध्ये टाकून शाळेत आणल.. आणि सुरू झाला माझ्या शाळेचा प्रवास.. पहिला दिवस असा होता की अस वाटत होत की आई वडील किती वाईट आहेत आपल्या मुलाला एका अनोळख्या ठिकाणी सोडून आले.. आणि जशी माझी अवस्था होती तशीच सगळ्या मुलामुलींची होती.. वर्गात बाबांने सोडल आणि लगेच निघून गेले. खूप रडलो मी.. वर्गात खिडकी होती तिथून बाबां दिसत आहे का..खाली वाकून बघितलं आणि बाबा दिसले म्हणून अजून जास्त रडायला आल.. आणि बाबा निघून गेले.. वर्गात सगळेच रडत होते.. आई ने शर्ट च्या खिशाला रुमाल पिन ने लावला होता.. त्याने डोळे पुसले.. आणि बाई नी सगळ्यांना शांत केलं काहीं मुले अशे ही होते की ते शांतच नव्हते होत.. काय करणार ती मुले ज्यांना शाळा काय हे माहीतच नव्हतं.. शाळा ही असते जिथे मुलांना घडवल जात तिथे त्यांना चांगले संस्कार दिले जातात.. आणि जीवना मध्ये कसं राहायचं हे शिकवलं जातं.. आणि हे शिकवणाऱ्या आमच्या शेलार बाई.. खर तर मी खूप आगाऊ होतो लहान असताना.. शाळेत कधीच अभ्यास नाही केला .. पण कायम सगळ्या विषयात पास मात्र होत होतो.. .. व्हाइट शर्ट आणि लाल पँट.. खिशाला शाळेचं नाव.. आदर्श बाल मंदिर.. खूप छान दिवस होते ते.. शेलार बाई kinetic bike वर येत होत्या.. ते दिवस आणि त्या बाई कधीच विसरून शकत नाही.. कारण लहान असताना गाडी चवताना फक्त पुरुष मंडळींना बघितल होत पण आमच्या बाईंना पण गाडी येते अस घरी सांगायचो.. शाळेत असताना मधल्या सुट्टी मध्ये उसळ मिळायची.. ती जी चव आहे तशी उसळ मी अजून पर्यंत कुठेच खाल्ली नाही.. माझी शाळा खूप छोटी दोन मजले फक्त.. बालवाडी ते चौथी पर्यंत.. पण टी शाळेतल्या आठवणी खूप मोठ्या आहेत.. शाळेची खूण म्हणजे जानकी. हॉल.. आणि जानकी हॉल चं नाव आलं की सगळ्यांना अठवणारी ती म्हणजे दुर्गा .. कायम पान खाणारी.. आणि चेहरा असा की काही बोलण्याच्या आधीच घाबरून जाणारे ते माझ्यासारखे माझे मित्र.. मैत्रिणी... शाळेच्या गेट वर थांबणारे आणि प्रत्येक मुलाला त्याचे पालक येत नाही तो पर्यंत. त्यांच्या सोबत शेवट पर्यंत थांबणारे आमच्या सगळ्यांचे लाडके चंद्रकांत मामा..शेलार मॅडम आणि चंद्रकांत मामा तुम्हाला आम्ही कधीच विसरून शकत नाही..
कारण मॅडम तुम्ही.. आम्हाला बालवाडी पासून चौथी पर्यंत जे काही संस्कार दिले आहेत त्या मुळे आज प्रत्येक जण आपापल्या पाया वर खंबीर पणे उभे आहेत.. ज्या वयात आम्हाला काहीच माहीत नव्हतं त्या वयात सगळ्यात जास्त समजून घेणाऱ्या आणि समजून सांगणाऱ्या तुम्ही होता मॅडम.. आई.वडील शाळेत टाकतात आपल्याला, ते त्यांचं कर्तव्य पूर्ण करतात पण त्या नंतर त्याला घडवण्याचं काम तुमच्या सारखे शिक्षिका करतात... चांगलं आणि वाईट काय ह्याचा फरक तुम्ही सांगता आम्हाला.. आपणच म्हणतो की, पाया मजबूत असेल तर इमारत ढासळत नाही.. मॅडम आमच्या साठी पाया हा बालवाडी ते चौथी पर्यंत होता .. जिथे तुम्ही आम्हाला शिकवलं .. चुकल की मारल देखील ओरडल्या सुध्दा.. पण आज स्वतःला बघतो ना की काय होतो आणि काय घडवलं.. हे फक्त शाळे मुळे आणि तेथील असणाऱ्या शिक्षकानं मुळे घडू. शकत.. मॅडम तुमच्या बद्दल सांगायचं झालं तर एक अस व्यक्तिमत्व.. ज्यांना मी कधीच दुखी नाही बघितल.. कारण मॅडम तुमचा चेहरा कायम हसरा आणि आनंदी बघितला आहे.. आणि आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे की कायम अशाच हसत आणि आनंदी राहा.. मॅडम तुमच्या सारखे शिक्षिका मुळे आज आम्ही.. पुढे गेलो.. जन्म देणारे आई वडील असतात.. आणि त्या मुलांना मोठे करणारे शिक्षिका असतात ..
तुमचा एक आगाऊ विद्यार्थी
सुमित भालेराव