Aayushy ek vegla vichaar books and stories free download online pdf in Marathi

आयुष्य एक वेगळा विचार

आयुष्य.... 


‍‍‍‍‍कस असत ना  प्रत्येकाच जीवन  जिथे प्रत्येक जन. आपल्या विचारा मध्ये जगत असतो. माहीत नाही पुढे काय करायचं आहे ? काही धेय्य नाही,  हया जगात कशा साठी आलो आहे हेच माहित नसत ,आपलं आयुष्य कसं जगायचं हेच माहित नसेल, तर काय करणार?..कधी कधी असेही प्रसंग येतात ज्या वेळेस कोणाला समजत नाही की ,काय कराव जिथे आपण आपल्या मनाशी बोलत असतो.. आणि विचार करत असतो की काय केलं पाहिजे ..पण उत्तर मिळालं नाही तर खूप त्रास होतो ,,"तुम्ही कधी स्वतःशी बोलताना का?.". जर नसेल बोलत तर एक तास तरी स्वतःला द्या... स्वतःला विचारा की मी काय करू शकतो माझ्या कुटुंब साठी माझ्या मित्रमैत्रिणी साठी हया समाजासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशा साठी..प्रत्येक व्यक्ती ही स्वार्थी असते ती फक्त आपल्या स्वतः बद्दल विचार करत असते.. कधी दुसऱ्या साठी जगून बघा खूप छान वाटेल.. कारण स्वतःला खुश आणि आनंदी ठेवन्यासाठी आपण स्वतः असतो.. पण दुसऱ्याला आनंदी ठेवणारी व्यक्ती कायम आनंदी असते..  ती त्यांच्या आनंदा मध्ये आपला आनंद शोधत असते.. जीवन खूप थोडे आहे हो..इथे कोणी कधी जाईल सांगता येत नाही.. त्या साठी स्वतःला वेळ द्या. आणि आपल्या कुटुंब बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करा.. ज्या आई ने जन्म दिला तिला कधी विसरू नका.. आज काल खूप वाईट वाटत हो..की आपल्या आई वडिलांना आश्रमात ठेवले जाते.. ज्या आई वडिलांन मुळे आपण आहोत ते.काय विचार करत असतील आपल्या म्हातारपणाची काठी असणारे आपले मुलं आज त्यांना आम्ही नको आहोत..तुम्हीं स्वतः विचार करा.की आपण कुठे चुकत आहोत..कारण मी खूप चुकलो आहे..माझ्या जीवना मध्ये मी अशा काही चुका केल्या आहेत ज्या मुळे  समोरच्या व्यक्तीला माझ्या कुटुंबाला.. माझ्या मित्रमैत्रिणी ना खूप त्रास झाला.. आज लेख लिहिताना काही गोष्टी आठवतात.. खर तर लिखाण करणार प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस लिखाण करत असतो तेव्हा त्याला खूप काही अठवत असत आणि त्या नंतर त्याला समजत की आपण कुठे चुकलो..जीवना मध्ये पैसा सगळं काही नाहीये हो.. कधी सगळं विसरून नव्याने जीवन जगण्याचा प्रयत्न केला ना तर खरंच खूप काही मिळवता येईल .. जे कधी विचार पण करू शकलो नाही ..ते सर्व काही मिळवता येईल..जगात देव आहे की नाही माहीत नाही ,पण माणसांमध्ये देव नक्की मिळेल.. सकाळी झोपेतून जागे झाल्या नंतर काही लोकांना माहीत नसतं की आजचा दिवस कसा जाणार आहे.. पण सकाळीच तुम्ही चांगला विचार करून ठरवलं ना की आजचा दिवस माझा चांगला जाईल.. तर खरंच चांगला जातो.. एकदा करून बघा..मी पण रोज हेच करतो.. आणि अजून एक विचार असा करा की , आज माझ्या मुळे समोरच्या कसा आनंदी होईल..कमीत कमी एका व्यक्तीला जरी तुम्ही मदत किव्वा आनंदी ठेवलंत ना..तरी  खूप छान वाटेल...प्रयत्न करत आहे की , माझ्या लेखणीतून प्रत्येकाच्या जीवनात काही बदल आले तर माझ्या लेखाचा प्रवास असाच चालू राहील आणि कळतं नकळत कोणाच्या जीवना मध्ये काही चांगलं झालंत्र मला खूप आनंद होईल.. अस बोलतात की विचारा मध्ये खूप ताकत असते.. आणि ते विचार करायला शब्द लागतात आणि ते शब्द मी माझ्या लेखणीतून लिहीत असतो.. तुम्हाला काय वाटत आपल्या आयुष्या बद्दाल कस असावं .. ? काही वेगळा विचार प्रत्येकाची जीवन जगण्याची सवय बदलू शकतो.. तुम्ही.. जीवनात छोटे मोठे प्रॉब्लेम तर येतच राहतात पण ते सगळ बाजूला ठेऊन दुसऱ्या साठी जगायची.. मजाच वेगळी असते. एकदा जगून बघा.. आणि लेख आवडला तर नक्की सांगा..


सुमित

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED