Lagnantarcha to khadtar pravas - 2 books and stories free download online pdf in Marathi

लग्नानंतर चा तो खडतर प्रवास भाग 2

भाग :२  
तिच्या जवळची व्यक्ती म्हणजे तिच्या बरोबर आलेली कलवरी... सगळे अनोळखी असतात.. तिथे..त्या परिस्थिती मध्ये सगळ्यांना समजून घेणं ..त्यांना मन सन्मान.. हया विचारात.. तिला काहीच समजत नसत..कधी असाही घडत की.. काही वेगळं करायचं असत पण होत भलतंच..स्वतःच्या लग्नात धकुन गेलेली ती नवरी आता झोपेची वाट बघत असते.. आणि विचार करत असते की.. माझे आई वडील कसे असतील ,झोप लागेल का त्यांना  की  माझाच विचार करत असतील.. शांत पने ती झोपते .झोप लागत नसते पण डोळे बंद करून तिच्या सगळ्या आठवणी ती आठवत असते.  आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.. कारण ती  कधी आई वडिलांना एकट सोडून नाही राहिली..अशेच  5 दिवस जातात .. आणि पुन्हा ती तिच्या घरी येते... ते घर आणि तिच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात.. ते आई वडील तिला बघता क्षणी रडू लागतात... त्या दिवसा नंतर ती खूप खुश असते.. आणि नंतर तिच्या सासरी जायची वेळ येते... अनोळखी घर.. अनोळखी माणसं ..ह्या यामध्ये तिला तिच संपूर्ण आयुष्य काढायचं असतं... त्या नवरी मुलीला असं वाटत असते की कोणी हा नियम काढले की आपल्या आई-वडिलांना सोडून दुसऱ्या एका अनोळख्या व्यक्तिबरोबर पूर्ण आयुष्य काढायचं.. तिच्या त्या विचारांचा कोणीच समजू शकत नाही विचार करण्याच्या पलीकडे तिच्याकडे काहीच ऑप्शन नसतो आणि बोलणार तरी कोणाबरोबर कारण की तुझ्याजवळ असं कोणीच नसतं  त्याच्या सोबत मनमोकळेपणाने बोलू शकते... तिचा तो नवरा की कायम कामांमध्ये व्यस्त असतो .. त्यामुळे तो वेळ देऊ शकत नाही एकटी तरी काय करणार तिला एकटे एकटे जाणवत असत ...घरातली काम सासू-सासर्‍यांची काळजी घेणे .... अशा मध्येच दिवस जातात तिचे आई-वडील मुलीचा लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची हळूहळू परत फेड करू लागतात आता ते आई-वडील विचार करत असतात की घर कसं चालवायचं मुलगी होती तोपर्यंत ती घर सांभाळत होती आता मुलगी नाहीये तर त्या वडिलांना कुठे नोकरी मिळेल हाच विचारते आई-वडील करत असतो आई हाच विचार करते की कुठे धुने भांडे ची काम मिळेल का? आणि वडील विचार करतात कुठे सेक्युरिटी गार्डची नोकरी मिळेल का? ती मुलगी फक्त आपल्या आई-वडिलांचा विचार करत असते की माझे आई-वडील कसे असतील कसे जगत असतील... तिच्या विचारांच्या दुनियेमध्ये ती हरवून गेलेली असते तिलाही समजत नाही की काय करावं जेणेकरून माझे आई-वडील खूश राहतील आनंदी राहतील मी नाहीये तर घर कसं चालत असेल माझी आठवण काढत असतील असे खुप सारे प्रश्न त्या मुलीच्या मनात येत राहतात... आणि सुरु होते ती लग्नानंतरची सासरकडची वाटचाल...... सासू सासरे नणंद यामध्ये स्वतःला विसरून जाणारी ती मुलगी म्हणजेच ती नवरी मुलगी आपले स्वप्न बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी जगत असते प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट चांगलीच मिळेल असं नसतं काही मुली विचार करत असतात की काय केलं मी लग्न आणि काही मुली विचार करत असतात की खूप चांगले झाल लग्न झालं कारण वाईट काय झालं की ती मुलगी आपल्या आई-वडिलांपासून लांब राहते आणि लग्न झालं तर ते चांगलं काय झालं तर आई-वडिलांच्या बंधनातून मुक्त झाली करण आई-वडिलांच्या बंधनांमध्ये त्या मुलीला बाहेरच जगता येत नाही मित्र मैत्रिणी नाहीत कारण त्या आई-वडिलांना काळजी असते त्या मुलीची की आपल्या मुलीला कोणी फसवू नये तिला जगाचं ज्ञान नाहीये बाहेर कसं वावरायचं कसं राहायचं हे माहित नाहीये या काळजीपोटी  ते आई-वडील तिला कायम बंधना मध्ये ठेवतात... यामध्ये त्या आई-वडिलांची काही चूक नसते आणि त्या मुलीचे काहीच चूक नसते खूप अवघड असते त्या मुलीचें जिवन कधीकधी स्वतःला कोसत असते ते का म्हणून मी मुलगी म्हणून जन्माला आले कारण की तिने लहानपणापासून फक्त दुःख त्रास सहन केलेला असतो ... त्या मुलीची अपेक्षा असते की माझा नवरा चांगला असावा पण कधीकधी असेही घडतं की मुलगा दारु पिणारा मारणारा त्रास देणारा समजून घेणारा भांडणं करणारा असाच मिळतो तेव्हा ती मुलगी विचार करत असते की का मी लग्न केलं लग्ना आधी आई वडिलांकडून मिळालेला ते प्रेम ती काळजी ती माया हे सगळं आठवत असते आणि लग्नानंतरचा  त्रास त्या मुलीला सहन करावा लागत आहे... कधीकधी त्या मुलीला वाटतं की जीव द्यावा आत्महत्या करावी पण आपल्या आई-वडिलांकडे बघून ती जगत असते.......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED