अव्यक्त प्रेम Kirti Kumavat द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अव्यक्त प्रेम

माझं पत्र तिला मिळालं भेटण्याची वेळ , ठिकाण त्या पत्रात लिहिलेली होती ...... आता तुम्ही म्हणाल की मोबाईल चा जमाना मॅसेज , कॉल करून सुद्धा तिला बोलवू शकत होतो . पण आमचा काळचं वेगळा होता . रात्री मस्त गच्ची वर जाऊन आकाशात पसरलेले चांदणे न्याहाळत आणि तिच्या आठवणीत रमत पत्र लिहिण्यात रात्र सरून जायची . ( आसमानोसे उतारा नूर हे कोई ... ) आणि ते पत्र घेऊन सही - सलामत घराच्या बाहेर पडे पर्यंत छातीत धडकी भरायची, कारण आमचे बाबा हेडमास्तर आणि शिस्तीचेपण कडक आणि माई त्यांच्या पेक्षा जास्तच कडक.

एकदाचं पत्र घेऊन बाहेर पडलोकी दीर्घश्वास सोडायचो . आणि सायकल घेऊन शीळ फुंकत महाविद्यालयात जायचो मग तो अर्धा दिवस तिच्या पर्यंत पत्र पोहचवण्यातच जायचा आणि तिच्या पर्यंत पोहोचोस्तर अख्या वर्गाने वाचलेले असायचे . पण ते पत्र तिच्या हातात पडताच ते पत्र पाहून तिचे गालातल्या गालात हसणं मनाचा ठाव घेऊन जायचं .

त्या वेळेस ती गंमतच फार न्यारी होती . पत्र देण्याची त्यातून भावना व्यक्त करण्याची आपल्या प्रिय व्यक्तीला कोऱ्या कागदावर रेखाटण्याची बातच काही औरपण शब्द नेहमीच तिच्या साठी अपुरे पडायचे आणि ते पत्र नेहमी अपुरे राहायचे.

( आता भरपूर उशीर झाला . उद्या सकाळी शाळेत जाण्यास उशीर होतो . आता जाऊन झोपा बरे तरी मुलांचे शंभर प्रश्न ''ती आजीचं होती का ? ती आली भेटायला ? कसं सांगितलं तुम्ही तिला ?'' या सर्व प्रश्नांना आणि तिच्या आठवणींना मी नव्याने स्वतःच्या पत्रात सामावून घेतले आणि डोळे मिटून स्तब्ध आराम खुर्चीत तिच्या स्वप्नात हरवून गेलो )

सुना है लोग ऊसे आँख भरके देखते है । सो उस के शहर में कूछ दिन ठेहरके देखते है ।

सुना है बोले तो बातो से फुल झडते है । ये बात है तो चलो बात करके देखते है ।

सुना है दिन को उसे तितलिया सताती है । सुना है रात को जुगनू ठेहरके देखते है ।

अब उसके शहर में ठेहरे के कूच कर जाये । फराज आओ सितारे सफर के देखते है ।

सुना है लोग ऊसे आँख भरके देखते है । सो उस के शहर में कूछ दिन ठेहरके देखते है ।


तुझ्या आठवणीत मी रोज नव्याने रमून जातो , तुला बघण्यासाठी आतुर होऊन जातो . थोडी जरी चाहूल झाली तरी तू असण्याचा भास होतो . तुझा आवाज सतत ऐकावासा वाटतो . हे अस प्रेम आहे की तुला शब्दांत व्यक्त करण्याची गरज नाही . तुझं माझ्यासाठी असणंच पुरेसे आहे . ह्रदयाचे ठोके एक -एक शब्द लिहीतांना कानाला ऐकू येत आहे .

शब्दच सापडेना कसं सांगू तुला शेवटी फक्त एवढेच विचारेल येशील का मला भेटायला ?


त्या दिवशी ठरलेल्या वेळी आम्ही भेटलो आम्ही दोघे एका बाकावर बसलो . किती तरी वेळ आम्ही दोघांनी अबोला धरला . मी मनातच बोललो कसं सांगायचं ? काय काय बोलायचं ? प्रत्येक गोष्टीची तयारी केली आणि ज्या क्षणाची मी इतक्या आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण सुद्धा आला आहे . पण मला काही बोलताच आले नाही . आणि मी स्वतःशीच पुट- पुटत राहिलो . हळूच तिरक्या नजरेने मी तिच्या कडे बघितले आणि तिच्या डोळ्यांनी तिच्या सर्व भावना व्यक्त केल्या . आणि मी तिच्या कडे बघतच राहिलो . त्यावेळी ती वेळ तिथेच थांबावी असं वाटत होत . कारण ती त्यावेळी माझ्यापाशी माझ्याजवळ बसलेली होती . फक्त माझ्यासाठी .

मी बोलणारच तेव्हा तिने माझ्या हातात पत्र दिले आणि ती स्वतःच्या भावना डोळ्यांनी व्यक्त करून निघून गेली .
त्या रात्री मला चैन पडले नाही .कधी महाविद्यालयात जाईल आणि तिला भेटेल ..... पण दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात ती आलीच नाही . मनात शंभर प्रश्नांनी घर केले कारण माझं उत्तर हरवलं होत . तिच्या घरापाशी गेलो घराला टाळा होता . बैचेन मन सैरवैर झालं . मग काही दिवसांनी कळालं ती आता कधी न परतण्यासाठी गेली .

किसे पुकार रहा था वो डुबता हुआ दिन
सदा तो आई थी लेकिन कोई दुहाई ना थी ।

क्रमश :