Avyakt prem - 2 books and stories free download online pdf in Marathi

अव्यक्त प्रेम 2

वर्षा मागून वर्ष सरत गेली ......

आणि मी तिची वाट बघत भूतकाळात अडकलो तिच्यात गुंतून गेलो. तिच्या आठवणी माझ्या साठी नव्या बनून परत यायच्या मी त्या रस्त्याच्या वळणावर थांबलेलो जिथे आम्ही शेवटी भेटलेलो . तिला सतत माझे डोळे शोधायचे

न हाथ थाम सके , न पकड सके दामन ,

बडे करीब से उठकर चला गया कोई ,

आता राहण्याचे ठिकाण , शहर बदलले तरी ह्रदयाच्या एका कोपऱ्यात असं वाटायचं येणार का ती मला शोधत . रात्री आकाशात चांदणे न्याहाळत बसलो मनात हाच विचार येत होता कि माझे हरवलेले उत्तर मला सापडेल का, माझ्या पत्रांना पत्ता सापडेल का ? तीच होती का आमची शेवटची भेट ? हाच होता का आमच्या प्रेमाचा शेवट ? शेवटी हा प्रवास इथे संपणार कि जे अर्ध राहीले आहे ते पूर्ण होईल ....... आणि माझे डोळे लागले .आणि मी तिच्या स्वप्नात हरवून गेलो .

सकाळी टेलिफोन ची बेल वाजली . बाबांचा फोन होता . माझ्या नावाने पत्र आलेलं पत्र तिचेच होते, पत्रात भेटायला येऊ शकतोस का ? असं लिहिलेलं , मला आपण जणू स्वप्न पाहत आहोत असं वाटत होत माझ्या आनंदाचा ठाव ठिकाना राहिला नाही . माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते . माझ्या तोंडावाटे शब्द फुटेना तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता . वेळ अशी आली होती कि बस.......

के धूप छाव का आलम रहा जुदाई ना थी

बिछडने वाले में सबकुछ था बेवफाई ना थी

बिछडते वक्त उन आंखो में थी हमारी गजल

गजल भी वो जो किसीको कभी सुनाई ना थी

के धूप छाव का आलम रहा जुदाई ना थी

मोहबत्तो का सफर भी इस तरहा भी गुजरा था

शिकस्ता दिल थे मुसाफिर शिकस्त पायी ना थी

के धूप छाव का आलम रहा जुदाई ना थी

मी आता नवीन वळणावर उभा होतो . आता माझं हरवलेलं उत्तर तर मला मिळणारच होत पण त्या सोबत माझ्या समोर नवीन प्रश्न पण उभे होते . हा आमच्या प्रेमाचा शेवट नव्हता हे समजलं मला मी याच आशेवर त्या पत्यावर गेलो . तिच्या घरासमोर उभा होतो . आता तिच्या माझ्यातील अंतर काही पावलांचंच होत . घराचा दरवाजा ठोकला एका बाबांनी दरवाजा उघडला . त्यांनी मला बघताच ओळखलं त्यांचे डोळे पाणावले त्यांनी मला मिठी मारली . ते तिचे वडील होते . मी घराच्या आत गेलो माझे डोळे सतत तिलाच शोधत होते . त्यांनी मला खुर्चीत बसायला सांगितले . व ते आतल्या खोलीत गेले पण मी अस्वस्थ होतो . कारण ती मला दिसत नव्हती . मी तिला बघण्यासाठी आतुर झालेलो . बाबांनी आतून एक पेटी आणली . त्यात तिने माझ्यासाठी लिहीलेले पत्र होते. पण माझ्यासारख्याच तिच्या पत्रांचा सुद्धा पत्ता हरवलेला होता .

माझे डोळे सतत तिला शोधत होते . पण ती कुठेच दिसत नव्हती , तिचा आवाज येत नव्हता , मी तिचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालो होतो . असे वाटले कि तिला हाक मारावी आणि ती माझ्या समोर येऊन उभी राहील, मग मी तिला बघेल , मला तिच्या शिवाय काही सुचत नव्हते . तिला बघण्याची ओढ लागलेली . मला काही समजण्याच्या आतच बाबांनी माझ्या समोर हात जोडले ते बोलले ज्या दिवशी तुम्ही भेटले त्या दिवशी मी तुम्हाला सोबत बघितले माझा मान , माझी समाजात असणारी प्रतिष्ठा , अहंकार मला माझ्या मुलीच्या आनंद पेक्षा तिच्या आयुष्यापेक्षा मोठा झाला होता . मी चुकलो मी तिला समजू शकलो नाही . त्यावेळेस मी तिला घेऊन नवीन शहरात आलो आणि तीचे लग्न तिच्या वयाच्या दुपट्टीच्या माणसासोबत लावले .वेळ ही वाळूवानी हातातून निसटून गेली तरी ... मला माफ करशील का ?

ही सगळी पत्र तिने तुला लिहीली होती,तिची इच्छा होती हि सगळी पत्र तुला मिळावी म्हणून तुला बोलावले .

मी स्तब्ध बसून राहिलो मला काही ऐकायचे नव्हते मला आता कोणत्याच प्रश्नांची उत्तर नको होती, मला आता फक्त तिला बघायचे होते, बाबांना इतकंच विचारले, ती कुठे आहे ? मी तिला भेटू शकतो ? बाबा स्तब्ध बसून होते ते काही बोलले नाही . त्यांचे डोळे पाणावले , त्यांनी माझा हात धरला मला आतल्या खोलीत घेऊन गेले .

आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो आणि ती माझ्याकडे बघत होती . आमच्या दोघांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते . माझे भान हरपले होते .

आणि अचानक पाठून कोणी तरी आजोबा करून हाक दिली , मी पाठी वळून पहिले , मी भानावर आलो . तो तिचा मुलगा होता .

बाबा घडलेली घटना मला सांगणारच होते पण मी त्यांना थांबवलं , माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला तिच्या डोळ्यातून मिळाले , आणि तिच्या सगळ्या वेदना मला जाणवत होत्या ती मला बघु शकत होती आणि मी तिला ती मला ऐकू शकत होती आणि मी तिला समजू शकत होतो . ती त्या वेळेस माझ्या सोबत असणेच माझ्यासाठी खूप होते . आमच्या प्रेमाला त्या वेळेस सुद्धा कोणत्या शब्दांची गरज नव्हती . ना पुढे कधी भासणार मी तिच्या जवळ गेलो तिचा हात मी माझ्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून बोललॊ .

कि मेंने कितने साल तुम्हारे बारे में सोचा हे । तरस गया था तुम्हे देखने के लीये ।सारी दुनिया को भुला सकता हू पर तुम्हारे प्यार को नही ।

दिन का चैन रात कि निंद सब हराम कर दिया तुमने । यकींन नहीं होता तो मेरे आखों में देख लो ।

मी त्या दोघांना घेऊन नवीन शहरात आलो ,आणि आयुष्याच्या प्रवासाला सुरवात केली . आता आयुष्याची ४० वर्ष उलटून गेली तरी ती माझ्या सोबत आहे .

ती अजूनही हालचाल करू शकत नाही, बोलू शकत नाही तरी ती तीच प्रेम अगदी सहजपणे डोळ्यातून व्यक्त करते जे आपण शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. ' माझ्यासाठी ती आणि तिच्या साठी मी '

' ती ' आणि ' मी ' या दोन शब्दांतच आमचं विश्व .. मला विश्वास आहे एक दिवस नक्कीच ती मला हाक देईन माझ्या सोबत हातात हात धरून फिरेल मला विश्वास आहे .

मी तिचा हात अलगद हातात घेतला .


सुना है रब्त है उसको ख़राब हालों से

सो अपने आप को बरबाद करके देखते हैं

सुना है दर्द की गाहक है चश्म-ए-नाज़ुक उसकी

सो हम भी उसकी गली से गुज़र कर देखते हैं

कहानियाँ हीं सही सब मुबालग़े ही सही

अगर वो ख़्वाब है ताबीर कर के देखते हैं ।

अब उसके शहर में ठहरें कि कूच कर जायेँ

"फ़राज़" आओ सितारे सफ़र के देखते हैं ।

इतर रसदार पर्याय