एकटेपणा
काय चाललय आयुष्यात ? काहीच मनासारख होत नाहीये ! कितीही ट्राय केल तरी इंटरव्यु क्रँक नाही होत. हे शहर सोडायचय ते ही जमत नाहीए . पुन्हा परिक्षेत फेल . परत त्याच वर्गात. परत मुलाने रिजेक्ट केल . ३० वर्षाची झालेय अजुन लग्न होत नाहीए . परत बिझनेस लाँस . तो मला सोडुन गेला . ती मला सोडुन गेली. जमीनीची केस अजुन साँल्व्ह होत नाही. घराच लोन पास होत नाही.. इत्यादी ...इत्यादी ... असंख्य जणांचे असंख्य प्राँब्लेम . यातुन होत काय ? वाढत जाते भिती , स्ट्रेस , एकटेपणा.. सतत काहीतरी सुटतय याची जिवघेणी जाणीव . एकलकोंडे होत जातो आपण. सगळ मनात साठवायच. कोणाशी बोलायच नाही , शेयर करायच नाही . का ? लोक काय म्हणतील ? घरचे समजुन घेतील का ? मिञ हसणार नाहीत ना माझ्यावर ? माझ्या इमेज च काय होईल ?? अजुन भिती.. अजुन एकटेपणा . कसली इमेज ? मुळात इमेज असते काय ? आपल्या लोकांच आपल्या बद्दलचे मत म्हणजे इमेज. तर हे मत बदलेल , मला कमी समजल जाईल , मला एक सोशल टँबु लावला जाईल अशी इमेज ब्रेकींगची भिती निर्माण होते. आणि त्या भितीपोटी मनातल मनातच दडपुण टाकतो आपण. आणि साचत जात एक डबक... त्यावर घाण पसरायला लागते. त्यामुळे हळुहळु स्वभावात बदल होतात..ते आपल्याला जाणवतात पण आपण ते मान्य करायला घाबरतो. यासर्व प्रकारात आपण काही गोष्टी विसरतो. एक इमेज ब्रेकिंगची भिती कुणाबद्दल असते , आपल्या लोकांबद्दल. मग जी लोक आपली आहेत त्यांच्यापासुन लपवायची किंवा घाबरायची काय गरज ? आणि दुसरी अशी जे आपले नाहीत त्यांना सांगायची आणि घाबरायची गरजच नाही. गरज असते व्यक्त होण्याची. तुम्ही चुक आहात की बरोबर हे महत्त्वाच नाही... आधी घरच्यांजवळ , मिञांजवळ , प्रिय व्यक्तीजवळ व्यक्त होण बेसीक हक्क / निड आहे. मनात साचलेल बाहेर काढल ना... आत नवीन जागा होते, नवीन स्विकारांसाठी. आपल मन एका काचेच्या ग्लास सारख असत. आत जे ओतु ते बाहेर स्पष्ट दिसत. सो आत काय भरायचय हे आपण ठरवायच. मोकळे व्हा.. व्यक्त व्हा . घरच्यांशी बोला . ते नसतील तर मिञांना बोला . ते ही नसतील प्राण्यांशी बोला.. प्राणी नेहमी भावनेच्या बाबतीत माणसा पेक्षा विश्वसनीय असतात. डायरी लिहा . निसर्गाशी बोला... स्वतः शी बोला.. कदाचित पाहणारे लोक ' वेडा ' म्हणतील . पण , न बोलुन मानसिकरित्या खरच वेड होण्यापेक्षा..फक्त इतरांकडुन वेडा हे ऐकण केव्हाही सोयीस्कर .
आयुष्यातील डिफिकल्ट फेझमध्ये , एक लक्षात ठेवायच.. जे होत ते चांगल्यासाठी ! भलेही आज ते कळणार नाही.. पण भविष्यात काही काळाने स्वतः लाच जाणवत की , यार जे झाल ते बेस्टच ! सो दुरदृष्टी ठेवा. डिप्रेशन , स्ट्रेस , फिअर आँफ लुझिंग समवन , लँक आँफ काँन्फिडन्स , हारण्याची भिती , एकटेपणा ... यांचा जेव्हा भडिमार होतो ना ? तेव्हा एकतर ते आपल्याला संपवत किंवा आपल्याला नवीन जन्म देत. आपल्याला आरपार बदलुन टाकत. अशावेळी स्वतः विषयी विचार करायचा .. खुप खोलवर . स्वतःच्या क्षमतांबद्दल , स्वतःच्या स्वप्नांबद्दल . मग सापडतो आपणच आपल्याला नव्याने. त्या फेझमधुन शिकायच . कुठे चुकलो स्वतः ला विचारायच . आणि पुढे ती चुक टाळायची.
वाईट परिस्थितीमध्ये , आपण स्वतः ला न्युनगंडाच्या , भितीच्या अंधार्या खोलीत बंदिस्त करतो. मग अचानक कधीतरी कुठुनतरी एक आशेचा किरण , फटितुन आत प्रवेश करेल अशी आपण वाट पाहतो. पण ; जर त्यावेळी खिडकी उघडली तर हजारो आशेचे किरण आत येतील. दरवाजा उघडला तर लाखो किरण आत येतील. आणि जर स्वतः च त्या अंधार्या खोलीतुन बाहेर पडलो तर..तिथे फक्त आशेचे किरणच किरण असतील. अंधाराच अस्तित्वच नसेल. म्हणुन एका संधीची / आधाराची... कोणीतरी येवुन बदल घडवेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वतः च स्वतःची मदत करा. जोपर्यंत आतुन स्वतः ला बदलावस वाटत नाही तोपर्यंत काहीही बदलु शकत नाही. स्वतः स्वतः साठी स्टँड घ्या . बी इंडिपेंन्डन्ट ! बँकेकडुन लोन घेवुन आपण घर बांधतो खरं.. पण त्या घराच्या समाधानापेक्षा , लोन फेडायचय ही चिंताच जास्त भेडसावत असते. अगदी तसच .. इतरांकडुन तात्पुरती घेतलेली उसनी प्रेरणा.. समाधानकारक यशाची बिल्डींग कधीच बांधु शकत नाही. त्यासाठी पाया स्वतःच्या ओरिजनल प्रेरणेचाच बांधांयला हवा.
खुप अपयश , दुःख पचवणार्या माणसात आपोआप एक प्रकारची शांती येते. समजुतदारपणा येतो. एक डाऊन टु अर्थ असा अँटिटुड येतो. एक मजबुत कणखरपणा येतो. आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टींवर टचकन डोळ्यात पाणी आणणारा भावनीकपणा ही येतो. हा स्वभावाचा एक फ्लेवर आहे. त्यात बदल करण्यापेक्षा तो एंजाँय करा. कारण त्या परिस्थितीने आपल्याला माणुस म्हणुन जास्त घडवलेल असत. म्हणुन हे नव मिळालेल माणुसपण एंजाँय कराव कारण जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती " माणुस " बनु शकेलच अस नाही. इमोशनल असण खुप सुंदर आहे !१०० लोक जर चिञपट पाहत असतील तर इमोशनल सिनला रडणारे ४-५ जणच असतात. आणि त्यापैकीच तुम्ही एक आहात ! म्हणजे यु आर स्पेशल वन ! फिल प्राऊड फाँर वाँट यु आर... डोन्ट चेंज फाँर समवन ! एखाद अनोळखी निरागस बाळ खेळताना पाहुन .. तुम्हाला छान वाटतय.. कारण तुम्ही छान आहात ! कुणाच तरी दुःख पाहुन तुम्हाला वाईट वाटतय. कारण तुम्ही चांगले आहात. आणि हाच चांगुलपणा दुर्मिळ आहे.. तो जपा. कारण.. सरेआम मर्डर होताना वाचवायच सोडुन व्हिडीओ बनवणारे असंवेदनशील खुप असतात पण वाचवण्यासाठी धावणारा एखादाच असतो. सो फिल गुड अँण्ड बी हँपी! कोणीतरी गेलय , फेल झालोय म्हणुन रडत आहात , म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. ती गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची होती..ही जाणीव असण सुद्धा गरजेच आहे . नाहीतर आपण कशासाठी जगतोय हे सुद्धा माहित नसणारे करोडो आहेत. तुम्ही त्यातील नाही , वेगळे आहात.. प्रिझर्व इट ! लव युवरसेल्फ ! एकटेपणा जितका वाईट आहे , तितकाच चांगलाही.. फक्त त्यातुन चांगल्याचा शोध घ्यायला शिकल पाहिजे.