संध्या Shailaja Patil द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संध्या

इन्स्पेक्टर अजित पाटील...सांगली शहर पोलीस स्टेशन चे नवीन इन्चार्ज म्हणून कालच रुजू झाले होते..अतिशय हुशार ..कर्तबगार आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती...शिवाय मूळचे ते सांगलीचेच असल्यामुळं हा भाग काही त्यांना नवीन नव्हता ............जुन्या नवीन केसेसची माहित करून घेणे आपल्या अखत्यारीत असलेल्या भागाची माहिती करून घेणे..मागचे सगळे रेकॉर्डस् तपासणे अशी किरकोळ कामे सध्या चालू होती...आजच्या डूटीचे काम संपवून निघण्याच्या तयारीत असतानाच एक तरुणी धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आली..पोलीस स्टेशनच्या पायरीला ठेचकाळली आणि तिला चक्कर आली असावी बहुदा ..ती बेशुद्ध झाली.....
हवालदार धावत आत आले ....त्यांनी साहेबाना हि गोष्ट सांगितली ......लेडीज कॉन्स्टेबल ना बोलावलं आणि त्यांनी त्या तरुणीला आत आणलं ..पाणी दिलं..


इन्स्पेक्टर अजित केबिन मधून बाहेर आले..त्यांनी चहाची ऑर्डर दिली आणि ते त्या तरुणीकडे आले ....


ती नुकतीच सावध होऊ लागली होती....प्रचंड घाबरलेली ..केस अस्ताव्यस्त...अंगावरचे कपडे मळलेले....गळ्यात एक छोटी मंगळसूत्राची वाटी ....चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा ...हातावर खरचटल्याच्या जखमा..चेहरा पार सुकून गेलेला .........


तशाही अवस्थेत अजित ने तिला बरोबर ओळखलं ...


''संध्या तू? काय झालं ? अशा अवस्थेत तू पोलीस स्टेशन मध्ये काय करतेस?''


संध्या अजितच्या शेजारी राहणारी त्याची बालमैत्रीण..दोघे एकत्रच शाळेला जायचे..दोघांमध्ये अतिशय घनिष्ट मैत्री ........मात्र शाळा संपल्यावर दोघांच्या वाट विभक्त झाल्या...संध्या साहित्यात रमणारी..स्वप्नाळू मुलगी ..कथा ..कविता ..कादंबऱ्या..चारोळ्या एवढंच तीच जग ...


अजित मात्र अगदी विरुद्ध..धाडसी .कणखर ...दोघांनी आपापल्या आवडीचे क्षेत्रे निवडली ...आता अचानक ८-९ वर्षांनी दोघे एकमेकांसमोर आले....तेही ह्या अवस्थेत


संध्याला ग्लानी आली ...तेवढ्यात चहा आला ...अजितने संध्याला चहा दिला..तिला थोडी हुशारी वाटू लागली...ती चांगली सावध झाल्यानंतर अजित तिला केबिन मध्ये घेऊन गेला ...


''रिलॅक्स...एकदम शांत हो..कसलंही दडपण घेऊ नकोस आणि कसलाही विचार करू नकोस...थोडा वेळ शांत बसून राहा...मी अर्ध्या तासात घरी जाऊन येतो..बाहेर दोन लेडीज आहेत काही लागलं तर त्यांना सांग...आलोच ''

''हं ''...संध्या अजूनही शून्यातच बघत होती ........

अर्ध्या तासानंतर अजित परत आला संध्यासाठी थोडस खायला देखील घेऊन आला ..



''हं बोल ...काय झालं ..तुझी हि अवस्था ??आणि आई बाबा कुठे आहेत?????''

''अजित काय सांगू तुला...माझ्या नशिबानेच माझ्यावर हि वेळ आणली म्हणायची ...कॉलेज मध्ये असताना पंकज मला भेटला..आम्ही लग्न केलं..मात्र त्याच्या घरच्यांना मी नाही आवडले ...पंकजमुळं त्यांनी मला त्या घरात ठेऊन घेतलं..मात्र आता पंकज सुद्धा बदललाय..त्याला मी आवडेनाशी झालेय ..सारखं चिडचिड ..किरकोळ भांडण मात्र आता तो मला मारहाण सुद्धा करतो..सारखं बाबांकडून पैसे घेऊन ये म्हणून सांगतो.... घराबाहेर सुद्धा काढतो ..आत्ता सुद्धा तो मला मारणारच होता...पण मी कशीबशी तिथून पळून आले ..'' संध्या रडू लागली...

''संध्या हे बघ रडू नकोस ..ह्यातून नक्की काहीतरी मार्ग काढू आपण..मला बाबांचा नंबर दे ..मला जरा त्यांच्याशी बोललं पाहिजे ...''

'' नाही नाही अजित .बाबाना ह्यातलं काही कळता काम नये ..प्लीज त्यांना खूप वाईट वाटेल अरे ..संध्या रडू लागली
अजित ने तिला खूप समजावलं आणि बाबाना फोन केला...



दहाव्या मिनिटाला बाबा पोलीस स्टेशन ला आले .सोबत संध्याचा भाऊ संकेत देखील होता ...ते दोघेही अतिशय घाबरलेले दिसत होते ..दमल्यासारखे वाटत होते...कदाचित पोलीस स्टेशन मध्ये येण्याची पहिलीच वेळ असेल म्हणून असावं बहुदा....
अजित ने अगदी शांतपणे त्या दोघांना संध्याच्या सद्यःपरिस्थितीची कल्पना दिली..बाबांनी देखील अगदी व्यवस्थित सगळं समजावून घेतलं...


''संकेत ...तू ताईला घेऊन घरी जा ...मी जरा अजितशी बोलून येतो ''

''अजित जरा मला पाणी सांगशील ...थोडं दमल्यासारखं होतंय ''

'' हो हो काका ...काका आपल्याला आता काहीतरी हालचाल केली पाहिजे ...अशा परिस्थितीत संध्याने तिच्या सासरी राहणं हे तिच्या जीवावर सुद्धा बेतू शकत..तुम्ही ह्यापूर्वी काहीच तक्रार का नाही केली ...?''

''अरे अजित ..काय तक्रार करणार आणि कोणाविरुद्ध ..आपलेच दात आणि आपलेच ओठ ''

" असं कसं म्हणता काका ..आपल्या संध्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे ..सगळं आयुष्य तीन असाच काढायचं का??''

''अजित अरे ह्या गोष्टीला पर्यायच नाही ...यापुढं आयुष्य हे असंच ..तीच पण आणि आमचंपण ''

''म्हणजे ..??''


''अजित अरे आपल्या संध्याच लग्नच झालेलं नाही...हे प्रेमविवाह ....सासर....नवरा ...मारहाण ...पैश्यांची मागणी ...ह्या सगळ्या तिच्या मनाच्या कल्पना आहेत ....तुला तर माहितेय तिला साहित्याची किती आवड होती ...तिने आत्तापर्यंत वाचलेल्या कादंबऱ्या ..नाटक ..कथा ह्या सगळ्याचा तिच्या मनावर खूप नकारात्मक परिणाम झालाय ...आणि हि त्यातून मनोविकृती निर्माण झालीय ...पुस्तकातून वाचलेल्या सगळ्या घटना आपल्या सोबतच घडतात असे भ्रम तिला होतात...आणि त्यामुळं ती सैरभैर होते ..आणि त्या पात्रांनी जी कृती करावी असं तिला वाटत तास वर्तन तिच्याकडून घडत ....हा पण दरवेळी ती अशीच असते असं नाही बरं का.....तिच्या कथेतील पात्र ज्यापद्धतीची असतात तास तीच वागणं बदलत असत ....कधी आनंदी ..कधी खेळकर ...कधी विनोदी ..कधी रुद्रावतार ..तर कधी आजच्यासारखा ..''

''ह्यावर उपचार नाही का काका ?''

'' सध्या तरी काही ठोस उपचार नाही ...समुपदेशन चालू आहे ..मात्र त्याचा काही फारसा परिणाम होतोय असं वाटत नाही रे ..असो ..चल अजित ...घरी ये सवडीने ...खरतर इतक्या वर्षांनी अशी गाठ पडायला नको होती .....निघतो ..थँक्यू.''

काका चालू लागले ...निराश ..थकलेले ..झुकलेले खांदे ..कशीबशी उमेद जमवत......


त्यांना पाठमोरं पाहताना अजित मात्र हतबल झाला होता ......



पोस्ट : शैलजा सुशांत
फोटो : नेट साभार