Harvalya Premachya katha - 4 books and stories free download online pdf in Marathi

हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 4)

शेवटी जातीने प्रेमाचा घात केला .

सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .
मंद संचारलेला गारवा पहाटेच्या वातावरणात हसमुख झालेला उत्साही चेहरा नव्या जोमाने कामाला लागला पहाटेचे पाच वाजले होते मश्जीद मध्ये नमाजचे प्रयोजन सुरू होते .अवतीभोवती अल्लाहा हो अकबर ह्या ध्वनीने कानात आवाज गुंजत होता .त्या आवाजाने तायराला जाग आली .नेहमी प्रमाणे ती उठली .तेजस्वी गौरवर्ण चेहरा गुलाबाच्या पाकळ्या सारखे तिचे ओठ ..डोळे मिटलेले दोन्ही हात त्या सुंदर चेहर्यासमोर अल्लाहाचे स्मरण करत होते .सर्व आवराआवर करीत संपूर्ण घरातील केर काढून टाकला अंगणात पाणी शिपडले .ब्रश अंघोळ करून तिने चहा गँसवर ठेवला .तिचा आजचा बीएचा शेवटचा पेपर होता .ती पुस्तक हातात घेऊन वाचत होती चहाला उभळ आली .लक्ष जाताच तिने गँस बंद केला .तिची सावत्र आई बिसमिल्ला हातपाय धुऊन गँस जवळ आली तायराकडे बघत ती रागाने म्हणाली ,
‘चहा झालाय का ?’
‘होय झाला ,देते बसा तुम्ही.’
तिने आपल्या आई बाबाला लहान भावाला चाय दिला .तिचा आजचा शेवटचा पेपर असून अभ्यास अपूर्ण झालेला .ती पुस्तक घेऊन वाचत बसली होती .तिच्या रूम मध्ये तिची आई आली आणि तिच्यावर जोरात ओरडायला लागली .
‘अंग ए सटवे ,इंथ का तोंडासमोर पुस्तक घेऊन बसलीस ? चहा नास्त्याची भांडी कोण वरून तुझी ती मेलेली माय येऊन घासणार अन् स्वयंपाक कोण करणार ?’
बिसमिलाकडे रागारागाने बघत तायरा उठली पुस्तक बाजुला ठेवले आणि भांडी घासून स्वयंपाकाला लागली .दहावीत असलेला तिचा सावत्र भाऊ तिच्या जवळ आला आणि म्हणू लागला ,
‘ये तायरा दिदी ,मी तुला मदत करू स्वयंपाकात चल मी भाजी बनवतो .’
तायरा ही हो म्हणाली सावत्र आई सर्व कामाचा व्याप एकट्या तायरा वर टाकत असे .फार दमून जायची ती काम करता करता .तिच्या भावाने भाजी बनवली आणि तो तिला पोळ्या बनवायला ही मदत करू लागला तर बाहेरून स्वयंपाक घरात तिची सावत्र आई ओरडत आली .
“काय गं ये बये ,तु माझ्या पोराला स्वयंपाक करायला लावते उद्या जाऊन तु त्याला घरातली भांडी धुणी करायला लावशील की काय ?”
“चुकले आई माझे आता परत कधी अशी चुक होणार नाही .”
पांढरा सलवार त्यावर मँचिंग लाल ओढणी असा साधा पेहराव तायराचा बघताच क्षणी कुणाला भुरळ पडावी अशी दिसायला ती .लांब सडक केस पाठीवर पडलेली दाट वेणी. ओढणी सावरत हातात पेपर सोडवायचा खर्डा आणि दोन पेन घेऊन ती घाईने निघाली .वऱ्हांडा ओलाडतच तर मागून सावत्र आईची हाक ऐकू आली.
‘'तायरा, थांब... चालली कुठे घराच्या बाहेर बुरखा कोण घालणार ?तुला का आता लहान सहान गोष्टीचे ही भान नाही रहात का की प्रत्येक गोष्ट मीच सांगावी थांब झालं तुझं लय शिक्षण बाहेरच्या पोराना तोंड दाखवायला जाते घरी बुरखा ठेवून?? .’'
'' नाही घातला मी बुरखा तर तुझ्या डोक्यावर आभाळ नाही कोसळणार आहे ."
‘' अंग ये पोरी मला उलटी बोलते आहे , तुझ्या बापाला सांगितलं तू बुरखा नाही घालत आणि वर तोंड करून मला बोलते तर तुला जिवंत ठेवणार नाही .’
तायराच्या गालावर एक थांपड मारली आणि तिला बुरखा घालायचा आदेश दिला . नसेल बुरखा घालायचा तर पेपरला जाऊ नको घरी बस अशी सुचना ही मिळाली .
तायराने तिच्याकडे लक्ष्य न देता .बुरखा घातला आणि निघाली .
ईस्लामपुरच्या स्टँड जवळ येऊन तायरा बसची वाट बघू लागली .सव्वा नऊची बस आली खूप गर्दी होती .खिडकी जवळ एक मुलगा बसलेला होता .त्यांच्या बाजुची शिट खाली होती .तायरा जाऊन बसली तिथे तो मुलगा विचार करू लागला ही मुलगी बुरखा घालुन आहे हिला गरमी नसेल होत का बरे . न राहून त्याने तिला विचारलेच .
“क्या आपको इतने धुप मे इस बुरखे से गर्मी नही हो रही ?”
तिने ह्यावर उत्तर दिले नाही .त्यावरून त्याला समजले तिला मराठी पण बोलता येते म्हणून .बुरखा घातल्या जाते चेहरा परपुरूषाला न दिसावा म्हणून परपुरूषासोबत बोललं तरी ह्या समाजात पाप समजल्या जाईल .म्हणून तीने त्याला एका शब्दात प्रतिउत्तर देऊन बरं केले .त्यानंतर तो शांत बसलेला होता कॉलेज आले दोघे कॉलेजचा गेट समोर उतरले . तो तिच्याच क्लास मध्ये होता नेहमी दिसायचा पण ती मुलांकडे लक्ष देत नसे . आज तो तिच्यासोबत दोन शब्द बोलला म्हणून तिला त्याचं बोलणं आवडलं .ती क्लास मध्ये पेपर सोडवताना त्याच्याकडे सारखी बघतं होती . त्याचा रोल नंबर ही तिच्या शेजारी होता . तो तिला आवडू लागला . कधी तिने बुरखा चेहऱ्यावर घेतला नसायचा तेव्हा अनुप ही तिच्याकडे बघायचा तो तिच्यावर कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ती नळावर पाणी पिताना त्याला दिसली तेव्हा पासून तो तिच्यावर प्रेम करायचा पण बस मध्ये त्याला ठाऊक नव्हते ती तायरा आहे म्हणुन ..

तिला आज तर वेड लागले होते अनुपचे . पेपर सुटल्यावर तायरा अनुपच्या मागेच बसस्टॉप वर गेली आणि अनुप बसला त्याच्या शेजारीच ती जाऊन बसली . बुरखा चेहऱ्यावरचा वर करत ती बस ची वाट बघत होती तिच्या जवळच पाणी संपलेलं होतं . अनुपचा बॉटलकडे तिचं लक्ष्य गेलं . ती अनुपला म्हणाली 

" प्लिज , मला तुझ्याजवळच पाणी देशील ."

" हो , घेणं ."

एवढा वेळ अनुपही तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्नात होता पण काय बोलावं त्याला सुचतं नव्हते . अनुपनेच शांततेचा भंग केला . अनुपला आता तिच्यासोबत बोलायची संधी सोडायची नव्हती . तो तिला विचारता झाला .

" तायरा , पेपर कसा गेला तुझा आजचा ? "

" छान गेला , तुझा ? "

" माझा पण छान गेला .."

" तू माझ्या घराजवळच राहातेना मागच्या गल्लीत ? "

" मला तू रोज कॉलेज मध्ये दिसतो आजच बस मध्ये दिसला , तू कुठे राहतो ते मला नाही माहिती . "

" हो , रोज मी बाईकने येतो आज बाईक भावाने नेली म्हणून आलो बसने .."

" रोज येत जा बसने मग .."

" का ? माझी बाईक असतेना ! "

" तू रोज बसने आला म्हणजे मला सोबत होईलनं म्हणून .."

" अच्छा तसं असेल तर तुझ्या सोबतीला बसनेच येईल मी .."

" ठीक आहे तर मग ."

" पण तू माझ्यासोबत माझ्या बाईकवर येत जा चालेलन तुला ? "

" नाही रे नको बसनेच ठीक आहे . "

दोघे रोज बसने सोबत जायचे . दोघात गप्पाची मैफिल रंगायची . त्याचं बोलणं कधी संपायचंच नाही . ती त्याच्यासाठी रोज कॉलेजला जाऊ लागली . पहिल्या वर्षी दोघे चांगल्या मार्काने पास झाले . दुसरं वर्ष संपत होते . तायराची एकूणच परिस्थिती अनुपच्या ध्यनात आली . तिची सावत्र आई तिचा छळ करायची . अनुपला वाटालं आपण हिच्यासोबत लग्न करावं आणि हिला आयुष्यभर सुखात ठेवावं . त्याने तिला प्रपोस केले . तो जीवापाड तिच्यावर प्रेम करायचा दोघे कुठेना कुठे कॉलेज सुटल्यावर फिरायला जायचे . तिचा आईचा लक्षात येत होते ही रोज घरी उशिरा का येते . म्हणून एक दिवस कॉलेज सुटल्यावर तिच्या आईने तिचा पाठलाग करायचे ठरवले . पण त्या दिवशी अनुप कॉलेज मध्ये आलाच नव्हता म्हणून तायरा वाचली ..पण सत्य हे स्वयम प्रकाशित असतं ते लपणार कसं ?

दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर अनुप आणि तायरा एका देवीचा मंदिराजवळ असलेल्या उंचवट्यावर झाडाखाली खोडाला टेकून बसले अनुपचा हात हातात घेऊन तायरा म्हणाली ," अनुप , चाल ना रे आपण लग्न करू . "

" हो , तायरा आपलं शेवटच वर्ष संपू दे मी माझ्या आईवडिलांसोबत बोलतो आपल्या लग्नाबद्दल . "

" ते मानतील असं वाटतं तुला ? "

" ते थोडे नाराज होतील गं पण विरोध नाहीच करणार आपल्या प्रेमाला . "

एवढ्यात तायराची सावत्र आई तिथे आली आणि तायराने तिच्याकडे नजर जाताच आपला हाथ अनुपचा हातातून सोडवून घेतला . तायरा आता तिच्या आईचा तावडीतून सुटणार नव्हती . तिची आई जवळ येताच तिला अपशब्द बोलू लागली .

" ह्याच्यासाठी तू कॉलेजला येते का घरी चाल सांगतो तुझ्या बापाला . "

तिथेच अनुप समोर तिचा थोबाडीत मारली . अनुपचा जीव कळवळला .

" अहो काकू प्लिज तिचा काही दोष नाही तिला असं मारू नका ."

" तू सांगणारा कोण ? ह्या नंतर तिला भेटायचा प्रयत्न देखील केलास तर याद राख माझ्यासारखी दुसरी वाईट स्त्री नसेल जगात .....''

तिला ओढत तिची आई घरी घेऊन गेली . त्या रात्री तिने आईबाबांच्या हातचा मार खालला . दोन दिवस तिच्या सावत्र आईने तिला जेवणही दिले नाही . तिथून आठ दिवसाने तिला पावणे बघायला आले . अनुपला काय करावं सुचत नव्हते . त्याने आपल्या घरच्याना तिचा वडिलांशी बोलायला सांगितलं . तेव्हा त्यांनी लग्नाला चक्क नकारच दिला . आम्ही आमच्या मुलीचं लग्न एका हिंदू मुलाशी नाही करून देऊ शकतं ह्या शब्दात ते बोलले .

लग्नाच्या आदल्या दिवशी तायराच्या हातांवर मेहंदी लागली त्या दिवशी तायराचं मन अनुपला भेटण्यासाठी आतुर होतं होते . तिला शेवटचं एकदा तरी अनुपला भेटायचं होतं . हातावर मेहंदी काढून झाली होती त्या तिच्या नाजूक हातावर फाझील नाव लिहण्यात आले . ज्या हाताला सुख दुखात अनुपने हृदयाशी कवटाळून साथ दिला तो तिचा हात आता अनुपचा नव्हताच राहिला . तायराच्या वर्गमैत्रिणी तिच्या घरी आल्या होत्या त्या एकीच्या फोन वरून तायराने अनुपला कॉल करून रात्री सर्व झोपी गेल्यावर साडेबारा वाजता भेटायला घरामागच्या गल्ली जवळ बोलवले .

सोसाट्याचा वारा सुटला होता मेघ एकत्र जमले होते . काळोख सर्वदूर पसरलेला होता विजेच्या कडाडल्याने आसमंत दुमदुमून निघाला .तायरा कुणाची ही परवा न करता अनुपला शेवटचं भेटण्याकरिता घराबाहेर पडली . अनुप आधीच येऊन तिथे काळोखात उभा होता . दूरवरून तायराला अनुपची आकृती गरदकाळोखात भिंतीला टेकून दिसतं होती . ती जवळ जाताच अनुपच्या शरीरातून भीतीचे शहारे करपूलागले . स्मृतीभंग करतं विस्तारलेल्या भयाण शांततेतही तायरा ढाल बनून आजही अनुप सोबत उभी होती . पण दोघे पळून जाण्यासही तयार नव्हते . वातावरणात संचारलेल्या उभर अंधारातही अनुपचे सर्वांग गारठले होते . त्याला स्पर्श करतं तायरा म्हणाली .'' अनुप , सर्व काही संपलं रे ! जगणं भकास वाटतं आहे ."

तायराच्या ओठांवर बोटं ठेवतं अनुप उदगारला ," तायरा , असं नको गं बोलू जूनं सर्व काही विसरून जा आणि माझ्यासाठी नव्याने तुझा संसार चालू कर ." मेघ गर्जत सरींची उधळणं करतं होता त्या पावसाच्या सरीत दोन प्रेमींच्या डोळ्यातून अश्रूंची बरसात होत होती .

तायरा लग्नाच्या दिवशी पर्यंत रडतच राहिली ..शेवटी तिला मान्य नसूनही त्या मुलाशी लग्न करावे लागले . अनुपने मात्र ठरवलं आपण आयुष्यात कधीच कुणासोबत लग्न नाही करायचं कारण त्याने प्रेम तायरावर केले होते .

शेवटी जातीने घात केला . असे कितीतरी प्रेमी आपल्या आयुष्यात प्रेमापासून वंचित राहतात शेवटी जात धर्म प्रेमापेक्षा मोठा ठरतो ..

रोते रहे तुम भी, रोते रहे हम भी,
कहते रहे तुम भी और कहते रहे हम भी,
ना जाने इस ज़माने को हमारे इश्क़ से क्या नाराज़गी थी,
बस समझाते रहे तुम भी और समझाते रहे हम भी।
?


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED