Harvalya Premachya katha - 6 books and stories free download online pdf in Marathi

हरवलेल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 6)

________________________________________________

द लार्वे - हरवलेला देवमासा

सायंकाळची वेळ माणसाची नसतेच रहस्यमय ओढयात बंधिस्त करून घ्यायला खोल खोल दरीत भू मातेच्या शोधात भटकणारा हा देह न थकता महासागरी प्रवासाच्या दिशेने झुकलेला असतो . भूगर्भ त्या दिवशी खवळलेल्या लाटांशी एकजूट होऊन मला ओढत खोल खोल दरीत ढकलू पाहत होता अंगातलं सर्व त्राण एकटवून मी बाहेर निघण्याच्या प्रयत्नात होती . त्या खवळनाऱ्या लाटा मला ओढुन घेणाऱ्या असफल ठरावयात असचं काही झालं . बाहेरचा परिसर नजरेच्या दृष्टीक्षेपात पडला आकाश निरभ्र होतं . सूर्य क्षितिजाच्या पल्याड जाऊन मला हसतं असावा असा भास झाला त्याची आणि माझी गट्टी न हरणाऱ्या भावनिक ओढीची होती . पण आता लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी सडा पाडला होता . दोन हाताने लाटाना मागे सारत southern च्या किनाऱ्यावर येऊन हात लांब केला दोन किनारी गोवलेल्या खडकाच्या आधारे वर आली .. गिटो नेहमी सारखंच आजही त्याचे दोन्ही हात मला कवेत घ्याला मोकळे करून उभा होता . त्याला आलिंगन देत मी विचारणा केली ..

“ गिटो , ह्या महासागराच्या प्रवासात तुला कधी काही गवसलं का ? “

गिटो माझ्याकडे नजर रोखून बोलू लागला .... “ यस माय चाईल्ड , जगण्याचे धडे मला ह्या महासागराकडून मिळाले . “

मला त्याच्या कडून अपेक्षित असलेल्या उत्तराच्या हव्यासात मी होते . हा मला काय सांगतो जगण्याचे धडे ह्या जलांतरीत महासागरकडून मिळावे मी जरा अवाक होऊन विचारले ..” गिटो ते कसं काय ? “

“ तुला सांगू एकदा काय झालं ? “

“ हं ...”

“ नावाडयाने मला नाव चालवायला दिली मी चौदा वर्षाचा असेलं तेव्हा .. “

“ मग ..”

“ मग काय ? मला नाव चालवण्याची शैली अवगत नव्हतीच तरीही वाट नेईल तिकडे मी सैरवैर हा आस्मंत धुंडाळू लागलो . वादळाने अचानक तीव्र रूप धारण केले नाव घेऊन मी कोणत्या बांधावर येऊन पोहचलो हे माझ्याच ध्यानात नव्हते नाव मला ढासळू लागली . लाटा खवळू लागल्या लाटाचा शिरकाव माझ्या तोंडापर्यंत पाणी उसळून फेकत होत्या . नाव डामलडोल होऊ लागली . स्ट्रेनजर माझ्याजवळ नव्हताच मी त्या नावेवर मोठ मोठ्याने विलाप करू लागलो कोणी तरी वाचवा मला वाचवा . माझ्या मदतीसाठी माझ्या बचावासाठी साक्षात जेसु सुद्धा येणारं नव्हता . नावेने मला पाण्यात ढकलले नाव लाटाच्या वेगात तरंगत होती मी नावेला पकडून उठण्याच्या प्रयत्नात होतो तोच लाटा मला घेरत होत्या एक मोठी लाट आली आणि त्या लाटेने मला दूर फेकले नावेपासून खूप दूर . पाण्याच्या तुडुंब भरलेल्या त्या महासागरात माझ्या डोळ्यात पाण्याचा प्रचंड डोह साचला होता . काय करू मी तेव्हा विचार करण्यापेक्षा कृती करून बाहेर पडणे हितकर होते . “

एवढ्यात मी ओरडून गिटोला म्हटले , “ बापरे गिटो , पण तूच तर माझा स्विमिंग मास्टर आहे आणि तुझ्यावर ही वेळ आली होती मग तू बाहेर कसा पडला ?? “

ह्यावर गिटो आपल्या दोन्ही हातानी मला खुणावत सांगत होता . “ त्या वेळेनेच मला स्विमिंग मास्टर बनवलं , कधी पोहणे न जाणारा मी दोन हात दोन पाय शाबूत आहे म्हणून जोर जोराने त्या लाटाच्या तावडीतून हेलकावे देत पोहू लागलो तेव्हापासून माझ्यात एक वेगळीच उर्मी संचारली . कोणत्याच शिकवणीचा आधार न घेता मी स्वतः एक स्विमिंग मास्टर झालो . आणि तुला माहिती आहे मी त्या मध्यरात्री जग धुंडाळत महासागराच्या दुनियेतून बाहेर कुठे येऊन पोहचलो होतो ?? “

प्रश्नार्थक नजरेने मी गिटो कडे बघत , “ कुठे ... कुठे येऊन पोहचला होतास गिटो तू ? “

समोर असलेल्या वोडकावर नजर खिळवत गिटो उद्गारला , “ लुसिआ तो तुझ्यासमोर असलेला वोडका बघतेय southern ऑसेन च्या ह्याच दक्षिणी किनारपटीवर येऊन मी मोकळा सुटकारा घेतला . “

ओह्ह्ह तर म्हणून तुला जगण्याचे धडे ह्या महासागराने दिले . असं म्हणतच मी गिटो चा निरोप घेतला . गिटो चा सहवास त्याच्या प्रेरणा देणारा संवाद माझ्या मनाला मोहून घेत असला तरी माझी जन्मदात्री घरी माझी वाट बघत दाराजवळ उभी असते वाटेकडे टकलाऊन ...

तसं गिटो माझा स्विम मास्टर पण तो मला स्वतः च्या लेकी सारखा जपतो अलबतचं माय स्वीट चाईल्ड म्हणून कुरवाळतो . कधी त्याला मी त्याच्या परिवाराबद्ल विचारयला गेली तर तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत गिटो ने जगातल्या सर्व रहस्यमय ताकदीची न उलगडणाऱ्या कोड्यात डोकून पाहण्याची मला भरभरून हुरूप दिली . त्याचं वय तो मला बरोबर सत्तर वर्ष असल्याचं सांगतो पण कधी त्याचा जन्मदिन असतो हे सांगत नाही . माझ्या जन्म दिनी मात्र मला नवनवीन भेट वस्तू तो मोठ्या कर्तबगारीने देत राहाला ... सत्तरी ओलांडलेला गिटो मात्र आजही मला मनाने नवतरुण वाटतो कारण ती धम्मक मी त्याच्यात पाहिली आहे अजून आपल्याला खूप काही करायचं असल्याचं त्याच्या डोळ्यातल चैतन्य मला माझा नव्याने जन्म झाल्याचे डोहाळे लावतात . जसा साप कात टाकल्यावर नवं रूप नाही पण नवा जन्म धारण करतो तसचं गिटो च्या बोलण्याने मी भारवून जाते .

आजपर्यंत मी आणि माझी लाडकी मैत्रीण मार्टिना म्हणजे माझी सर्वस्व ह्या विश्वातली सौख्य देन माझी मॉम ... ह्या रक्ताच्या दोन नात्यापैकी तिसरे नाते कधी अनुभवलेच नाही . मॉम म्हणायची मला रक्ताचाभाऊ आहे माझ्यापेक्ष्या चार वर्ष मोठा असलेला पण तो अजून काही मला साक्ष्यात भेटलेला नाही . त्याच्या भेटीसाठी मी आतुर आहे त्याचं प्रेम नको मला त्याचे खांद्यावर धीर देणारे हात नकोय पण मला कोणी भाऊ आहे ह्याच कल्पनेने माझ मन भरून येतं .. तो कुठे असेलं आता ? कसा दिसत असेलं दिसायला तो मार्टिनामॉम सारखा असेलं की ? मॉम मला त्याच्या बदल कधीच काही सांगत का नाही सांगत ?? ह्यावर मी तिला खुपदा विचारून तिच्या निरागस चेहऱ्यावर एक चिंतातूर स्पर्श करून गेलेली छटा बघून हा प्रश्न तिला कधी विचारायचाच नाही म्हणून ह्या नात्याच्या भावविश्वातून स्वतःला दूर सारते .... एकदा मला अडगडित एक फोटो फ्रेम दिसली ती फ्रेम घेऊन मी मॉम जवळ गेली तिला विचारणा करू लागली , “ मॉम , हा फ्रेम मधला माझा भाऊच आहेना ! आणि ही त्याच्या कडेवर असलेली मी तो किती प्रेम करायचा न ग मझ्यावर किती सुंदर वाटते ही फ्रेम ... नाही ?? “ हे शब्द ऐकताच मॉमने माझ्या हातून ती फ्रेम हिसकावली आणि मला म्हणाली , “ हो हा तुझा भाऊच आहे जॉन पण तू ही फ्रेम ....” ह्या समोर काहीच न बोलता ती ते फ्रेम घेऊन तिथून निघून गेली . जॉन हे नावं फक्त मी ध्यानात ठेवत जॉन नावाच्या मिळेल त्या माझ्या पेक्ष्या वयाने चार वर्ष मोठ्या असलेल्या तरुणाशी मैत्री करून तो माझा भाऊ आहे का हे जाणण्याचा प्रयत्न करीत होती . पण अजून पर्यंत माझ्या संपर्कात दोन जॉन येऊन गेलेत ते माझे कोणी असणे शक्यचं नाही . त्यांना पूर्ण परिवार आहे . जॉनचा शोध अद्यापही घेणे सुरूच होते ..

आज घरी पोहचायला मला नऊ वाजलेत मार्टिनामॉम माझी वाट बघत बसली होती . माझ्या पायाचा आवाज येताच ती बाहेर आली .

“ बेटा किती वेळ ? चल लवकर आत ये मी आज तुझ्या आवडीची डिश बनवली . “

आत शिरताच चिकन फ्राय चा खमंग घरभर दरवळत होता . हातपाय धुवून मी चिकनफ्राय वर ताव मारला . मॉमच्या हातच चिकन फ्राय खाण्यात काही वेगळाच स्वाद असतो . मी जेवण होताच अंथरुणावर लवडली .

त्रानलेल्या देहाला रात्री झोप कशी लागली मला कळलच नाही . मॉम सकाळीच स्कूल मध्ये निघून गेली . म्याक्स्न माझी वर्ग मैत्रीण तिचा फोन वाजत होता . कधीची फोन करत असावी ती मी फोन उचलताच तिने मला सुखद धकका दिला .

“ हे माय च्याम्प तू तुझी पदवी पूर्ण केलीस तू पदवी पास झाली ...”

“ ओह्ह म्याक्सन मी तुझी खूप आभारी आहे , खूप खूप धन्यवाद तू झाली ना पास ? “

“ हो हो मी पण पदवी पास झाली , येत्या रविवारला ज्याकसन जूरेन सोबत माझं लग्न ठरल्य तू येशील नक्की . “

“ अरे एवढ्या लवकर लग्न करते ? “

“ तुला माहितीये न लुसिआ , मॉम त्यांना माझं शिक्षण अमान्य आहे . “

पदवीचा निकाल पास होण्याचा आनंद काही औरच असतो पण तो कुणाजवळ व्यक्त करणार मॉम ती तर पहाटे आवराआवर करून लवकर घरून निघून जाते . बर्गर खाऊन मी चर्च मध्ये निघून गेली तिथे जाऊन माझं सर्व सुखं दुख मी गिटार वाजवण्यात संगीताच्या मंत्रमुग्ध दुनियेत जाते . आज आनंद व्यक्त करायला माझ्या हातात गिटार आणि सुरांची ताल छेडायला स्वर होते .

Acoustic guitar माझ्या हातात होता बोट ताल छेडत होते . मी माझ्या दुनियेत हरवून गात होते . चर्च मध्ये रम्य शांतात वास करत होती . एवढ्यात एक नवतरुण माझ्या बाजूला जेसू च्या समोर उभा राहून माझं गायन एकाग्रतेने ऐकत होता . त्याच्याकडे लक्ष जाताच मी थबकली . त्याच्या नजरेवर नजर पडताच माझी बोटं गिटारवरून सुटली .

“ थांबली का ? खूप छान गाते तुझा सूर म्हणजे येशूने तुला दिलेलं गोड गिफ्ट आहे .... गा ना !“ मला खरतर कोणी ऐकत आहे ह्याचं भानच नव्हत माझ्या संगीताची वहा वा ! करणारा तो पहिलाच व्यक्ती जीवनात भेटला . अनोळखी व्यक्ती सोबत मी काय बोलावं म्हणून मी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला . “ सॉरी मिस्टर मला एकांतात गायला आवडतं .. “ त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोलण्याने तीळ मात्र नाराजी नव्हती पसरली . तो मला ओके म्हणून तिथून निघून गेला .. मला जरा ओशाल्यासारखं वाटलं मी त्या अनोळखी व्यक्तीला दुखवल तर नाही ना ! त्याला क्षमा मागायला मी चर्चच्या बाहेर पाय ठेवला पण तो दूरवर मला कुठेच दिसत नव्हता .

मी घरी गेले सांयकाळ होत आली म्हणून मी स्विमिंगसाठी जायला निघाले . दार उघडतच तर मॉम माझ्यासमोर उभी तिला घट्ट आलिंगन देत मी पदवी पास झाल्याचे सांगितले . तिच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसडून वहात होता तिने मला आज सरावाला न जाण्याची विनंती केली . पण माझ्यासाठी सराव खूप महत्वाची बाब होती . तिला आज मी लवकर येईल हे सांगून घराच्या बाहेर पडली ..

किनारपट्टीवर जाताच मी गिटोला सर्व दूर शोधू लागली . गिटो मला कुठेच दिसत नव्हता तिथे असलेल्या एका कोळ्याला मी विचारलं , “ गिटो ला कुठे पाहिलंत का ? तो माझ्याकडे बघत मला म्हणाला , “ हो गिटोचा मुलगा आला आहे तो आज येणारं नाही तो कालच मला बोलला . “

“ ओह्ह्ह पण गिटोने मला असं काही सांगितलं नाही , गिटो च्या परिवारात आणखी कोण कोण सदस्य आहेत तुम्हाला माहिती आहे ?? “

“ गिटोला त्याच्या मुलाशिवाय कोणीच नाही ह्या जगात त्याचा मुलगाही परदेशात शिकायला होता तो तीन , चार वर्षांनी त्याला भेटायला येत असतो . “

“ ओके , मी सरावाला निघते मला वेळ होत आहे . “ त्याचा निरोप घेत मी महासागराच्या खडकावर येऊन उभी होतं सागराला निरखून बघू लागली . आज मला जीवन म्हणजे ह्या महासागराच्या भरती ओहटी सारखं वाटायला लागलं . स्वीमवेअर परिधान करीत खडकावरून मी महासागरात उडी मारली . सूर्य तांबूस होतं क्षितिजाच्या पल्याड मावळत होता पक्षी निरभ्र काळसर अवकाशातून उडताना दिसत होते मी तेवढ्याच जोमात पोहायला सुरवात केली आज मला खूप खोल वर खूप खूप दूर जायचं होतं एकतासात मी आठकिलोमीटर दुरिच्या वेगाने खूप लांब निघून गेली दक्षिणी महासागराला मागे टाकत . खोल भूगर्भात मी पोहत जात होती खोल खोल दरीत निरनिराळ्या पानखुटी वनस्पतीची नव्याने ओळख होतं होती . एवढ्यात मला मागून पायाला थंड स्पर्श झालेला जाणवला मी माझ्या पोहण्याची दिशा बदलवत मागे वळली ते भयाण रूप बघून मी चित्कारलीच श्वास घेण्याचा वेग वाढला जोराने हार्टबीट होतं होत्या माझ्या समोर देवमाशाचं पिल्लू होतं . ते मला काही करेल म्हणून मी भीत होती . पण तो शांत कसलीही हालचाल ओढाताण न करता तसाच एखाद्या स्टयाचू प्रमाणे माझ्याकडे सारखा बघत होता त्याने त्याच्या शेपटीनी मला समोर जाण्यापासून रोखले मी समोर जाण्याचा प्रयत्न करू लागली तो हालचाल करते का म्हणून बघू लागली मला समोर जाताना बघून तो माझा मागोवा घेत येऊ लागला तो आता माझ्या अगदी बाजूला येऊन मी ज्या दिशेला वळन घेईल तसा वळू लागला ... त्याच्या हालचालीकडे त्याच्या शरीरयष्टीकडे बघून मला पुरती खात्री पटली हे देवमाश्याच नुकतच एक महिन्याचं पिल्लू आहे . मी त्याला जाणून घेण्याच्या प्रयत्नात होती तो तोंडानी फुत्कार्त मला काही सांगू पाहत होता पण मला त्याची भाषा कळेना मी ही त्याला हेच विचारण्याच्या प्रयत्नात होती . “ देवमाश्या तू तुझ्या आई पासून हरवला आहे का ? तू कोणत्या दिशेने इकडे आला तुझी आई कुठे असेलं आता आपण तिला शोधूयात का ? “ इत्यादी प्रश्न ... त्याला आणि मला संवाद साधता आला असता तर कदाचित त्याच्या आईला शोधनही सोपं गेलं असतं . आमच्याकडे देवमाश्याच्या प्रजातीला लार्वे म्हणतात . लार्वे हे खूप चपळ असतात म्हणून त्या पिलाची आईही त्याला शोध घेत असेलच ह्यात तीळ मात्र शंका नव्हती . लार्वे माझ्या सोबत पोहत होता त्याच्या सोबतीला तेवढ्या मोठ्या जलाशयात जलचर प्राणी सोडले तर माझ्याविना कोणीच नव्हत . मी काय करावं म्हणून काही मिनिटासाठी थांबली देवमासा माझ्या पायथ्याशी कसाबसा चाचपडत होता . मी मागे परतण्याच्या प्रयत्नात दिशा बदलवली देवमासा मला सोडायला तयार नव्हताच मी किनाऱ्याच्या दिशेने वोडका शोधत पोहू लागली किनाऱ्याजवळ जाऊन कोणत्या नावाड्याला मला विचारायचं होतं तुम्ही देवमाशाची टोळी बघितली का ? वादळ विरुद्ध दिशेने येत होतं लाटा खवळत होत्या देवमासा भीत होता त्याला माझ्यासोबत आता पोहता येणे शक्य नव्हत . तो प्रयत्न करीत स्वतःला माझ्या सोबत जायचं म्हणून रेटत होता त्याला माझ्या सोबत भीती नव्हती म्हणून तो माझ्या मागेमागे येत होता त्याला आशा होती मी त्याच्या आईला नक्कीच शोधून काढणार ही . मी त्या खवळनाऱ्या लाटांचा प्रतिकार करत होती . लाटा अजून तीव्र वेग धारण करीत होत्या . एक उंच लाट आली आणि तिने लार्वेला माझ्यापासून खूप दूर नेऊन फेकले मी लार्वेच्या दिशेने जायला सुरवात केली तर त्या लाटा मला मागे ओढत होत्या एक लाट उसळत खूप तीव्र तांडव धारण करून चक्री वादळा सारखी घुटमळत होती त्या लाटेनेच मला ओढुन घेतले त्या लाटेत मी सतत दहा मिनिटे गोल गोल चक्रावत राहिली . त्या लाटेने मला लार्वे पासून एक किलोमीटर दूर अंतरावर नेऊन फेकले . लाटा उसळतच होत्या . ह्या लाटेनेच लार्वे आणि माझी ताटातूट केली . लार्वे मला शोधत होता का कुणास ठाऊक ? मी दूरवरून लार्वेला माझ्याजवळ येताना बघत होती . तो एवढा वेळ पोहत मला शोधत मझ्या जवळ येत होता . मी बाळमाश्याला सांगत होती आपण नक्की शोधून काढू तुझ्या आईला कितीही वेळ झाला तरी तू फक्त माझी सोबत सोडू नको . उसळत्या लाटाचा सामना करत आम्ही आता वोडकाच्या अगदी जवळ होतो दोन किलोमीटर दुरिच्या अंतरावरून वोडका माझ्या नजरेला खुणावत होता बाळमासा थकलेला दिसत होता त्याच्यात पोहण्याचा त्राण उरलेला नसावा . आता मी वेग धारण केला बाळमासा हळूहळू पोहत येत होता माझी नजर समोर खडकाच्या दिशेने होती मी समोर पोहण्याचा वेग धारण करत लार्वे माझ्या मागे आहे का हे बघत होती . किनाऱ्याच्या जवळ येताच मी नावाड्याला ओरडून ओरडून जवळ बोलवण्याचा प्रयत्न करीत होती . माझ्या आवाजाचा वेध घेत माझ्या जवळ आले मी त्यांना विचारले , “ तुम्ही देवमाश्याचा कळप सागरी प्रवाहाने जाताना कुठे बघितलं काय ? “ तेव्हा नावडी म्हणाले , “ नाही नाही मी तर नाही बघितलं पण आताच मी कुणाच्या तरी तोंडून ऐकलं southern च्या उत्तरेस एक दहा , पंधरा देवमाश्याचा कळप आला आहे . “ मी त्यांचे बोलणे ऐकून मोठ्या आशेने मागे वळली .. ह्याचा अर्थ देवमाश्याची आईही त्याचा शोध घेत होती . मी देवमाश्याच्या जवळ जाताच तो थबकला तो खूप दमलेला मला भासत होता त्याला भूक लागली असावी का ? तो काय खाऊन जगत असेलं बर ! तो त्याच्या आईवर अवलंबून राहत असेलं तर आता त्याचं कस्स होणार तो समोर पोहू शकणार की नाही ह्याचं काळजीने माझं मन बधीर झालं . देवमाश्या चल आपल्याला तुझी आई भेटणार आहे आपण लवकर तिच्या पर्यंत पोहचू असा धीर देत मी त्याचं सागरी प्रवाहाने उतरेकडे निघाली . दहा वाजले होते उत्तरेची सीमा गाठत आम्ही पोहत येऊन एवढ्या दूरवर मला देव माश्याचा कळप कुठेच दिसतं नव्हता . देव माश्याने मात्र आता वेग धारण केला होता तो माझ्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊ लागला त्याच्या मागोमाग मी जणू त्याला त्याची आई आवाज देऊन जवळ बोलवत होती . पाण्याच्या ल्हीरीतून त्यांचा संवाद होतं असेलं का ? होत असावा म्हणूनच देवमासा माझ्या विरुद्ध दिशेने पोहू लागला होता मी पोहत त्याच्यापर्यंत गेली पण तो आता थांबलेला होता . काय झालं लार्वे चल ना समोर असा थांबू नको तुझ्या आईला शोधायचं ना आपल्याला ? त्याच्या पाठीवर हात फिरवत मी मनातच बोलू लागली . तो चित्कारत होता जागेवर पंख हलवत होता पण समोर जात नव्हता मला काही कळेना ह्याला काय झालं असावं . माझ्या डोळ्यासमोर आता दूरवरून माश्यांचा कळप दृष्टिस पडत होता पाण्याचा खळखळाट करत देवमाश्याचा कळप आमच्या समोर दहा फुटावर येऊन थांबलेला होता त्यातून एक मासा देवमाश्या जवळ येत होता मी दूर होतं होती पण लार्वे सारखा माझ्याकडे डोकावत होता . लार्वेची आईजवळ येताच तो त्याच्या आईकडे बघून काहीतरी त्याच्या भाषेत सांगत होता . आता मला पक्की खात्री पटली होती लार्वेला त्याची आई मिळाली होती आणि हिच त्याची आई होती . एका हरवलेल्या देवमाश्याला त्याची आई मिळाली होती . मी माझा दक्षिण महासागर सोडून लार्वेसाठी दिशा बदलवली होती आता मला आधी उत्तरेचा किनारा गाठायचा होता मी मागे परतीच्या मार्गावर जायला आरूढ झाली तेव्हा माझ्या मागे संपूर्ण देवमाश्याचा कळप होता आणि माझ्या बाजूला लार्वे ... लार्वे आधीच खूप थकलेला होता पण त्याची आई त्याला मिळाली म्हणून तो त्याचं जोशात माझ्यासोबत येत आसवा ते माझ्या सोबत कुठवर येणारं हे मलाही ठाऊक नव्हते . मी उत्तरेच्या किनाऱ्यावर येऊन पोहचली खडकाला हातधरून किनाऱ्यावर पाय ठेवला तेव्हा तो देव माश्यांचा कळप मला सार करताना दिसत होता मी किनाऱ्याच्या मधोमध येऊन मागे वळून बघितल्यावर मला देवमाश्याचा कळप ज्या दिशेने आम्ही त्याच्या शोधार्थात गेलो त्याचं दिशेने परतताना दिसला . ते दृश्य मी माझ्या नजरेत कैद करून ठेवलं खरचं आज मला ह्या महासागराने कधी नव्हे ते अनोख गिफ्ट दिलं ... एका हरवलेला पाडसाला त्याचं मातृत्व भेटावं ह्या सारखी जगात आनंदायी सुखद गोष्ट दुसरी कोणती असू शकते ... मी उत्तरेकडून सागरी मार्ग बदलवत southern च्या दिशेने वळली . आज माझा स्वतः वर विश्वास बसला मी पाण्यात १६ किलोमीटर अंतराचा एवढा मोठ्ठा पल्ला एकटीच गाठू शकते ... धन्यवाद लार्वे तुझे आभार मानावे तेवढे अपुरे तुझ्यामुळे आज माझ्या प्रवासाला गती मिळाली . ....!! मी लार्वेचे स्मरण करीत दक्षिण किनारपट्टी जवळ आली दुरूनच वोडका दिसत होता किनारपट्टीच्या मधोमध येताना मला माझ्या समोर भलामोठा मगर दिसला मी माझा वेग वाढवला त्याला विरुद्ध आढा देत मी समोर निघाली तो परत माझ्या मागे लागला आता मी न राहून जोराने किंचाळलीच वाचवा मला कोणी वाचवा म्हणून . पण एवढ्या रात्री त्या किनाऱ्यावर मला कोणीच दिसतं नव्हत आहा मगर मला आता रक्तबंबबाळ करून जखमी करणार होता . एवढ्यातच हातात सुरी घेऊन कोणीतरी पाण्यात उडी मारली मगराने माझा पाय पकडला होता मी ओरडत होती आणि त्याचं क्षणी मी पाण्यात बेशुद्ध पडली ... 

येव्हाना मी किनारपट्टीवर वाळूत पडलेली होती कोणी तरी मला उठवण्याच्या प्रयत्नात माझ्या शेजारीच बसून माझा हात आपल्या हाताने रगडत होता . मला जाग येताच मी त्याला घाबरून उठली आणि जोरातच किंचाळली .. पाय शरीराजवळ दुमडून घेत मी चाचरतच होती त्याचा पहिला शब्द ... “ सिस्टर ...” हे ऐकताच मी म्हटल कोण तुम्ही ? मला इथे वाळूत का आणून टाकलं ?? त्या वर तो बोलता झाला , “ सिस्टर , प्लीज शांत हो बघू घाबरू नको , माझ्यापासून तुला कसलीच भीती नाही .” त्याच्या ह्या वाक्याने जरा मनाला दिलासा भेटला . “ तू पाण्यात ओरडत होती तेव्हा तुझा आवाज ऐकून मी तुला पाण्यातून बाहेर काढायला आलो तुझा पाय मगरच्या तोंडातून सोडवत त्याला मी तिथून घायाळ करून दूर केलं ... “

“ ओह्ह्ह्ह सॉरी , मला माफ करा मला वाचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद ! “

“ डियर धन्यवाद कसले अडचणीत असलेल्या प्रत्येक जीवाला वाचवने हे माझं आद्यकर्तव्यच आहे . ”

त्याचा अंधारात मला किनारपट्टीवर चेहरा ही दिसत नव्हता .. आम्ही जेव्हा लाईट जवळ आलो तेव्हा त्याला बघून मी शॉक झाले ... हा तोच चेहरा होता दुपारला चर्च जवळ मला गा ना ! म्हणारा आणि मी त्याला एकांत सांगितला . तोही माझ्याकडे बघून उद्गारला .

“ यु ?? इथे काय करत आहे आता एकांत शोधायला आले होते की काय ? “ असं म्हणून माझ्याकडे बघत हसू लागला . आणि स्वतःच म्हणाला , “ सॉरी हं राग आला असेलं तर . “ मी त्याच्याशी काहीच न बोलता माझ्या पायाला चिकटलेले बूट काढत बसली होती तो माझ्यासमोर खुर्ची टाकून बसला होता त्या लाईटच्या प्रकाशात तो काहीतरी लिहित होता . माझ्या बूट मध्ये वाळू घुसलेली होती कसाबसा बूट पायातून निघाला पायाची चामडी बूट सोबत खिचत आली पाय सुजले होते डोळ्यातून आसवं गळत होती ती पुसत मी उठली घराकडे जायला पण तो अजूनही वर मान करून बघायला खाली नव्हता आपल्या लिखानात मग्न असलेला एकमेव व्यक्ती मी आज पहिल्यांदाच बघतं होती .. जातना मी त्याच्या समोर जाऊन बसली आणि त्याचं बुक त्याच्या जवळून लिहिताना ओढुन घेतलं ....

तरीही तो माझ्यावर ओरडला अजिबात नाही मी विचार करू लागली कोणी स्वभावाने एवढ सौम्य कसं काय असू शकतं ? “ तुम्हाला चलायचं नाही का घरी ? “ मी त्याला म्हटल घर हा शब्दच ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी तराळलं डोळ्यातले अश्रू लपवत तो हसत म्हणाला , “ ह्हाहाह्ह्ह घर ... कोणत्या घराची गोष्ट करत आहे तू जिथे माझी रक्ताची नाती नाहीच आहे एक रक्ताचं नातं असून ते मला कधी गवसलं नाही ग मी इथे फक्त ह्या घरात त्या एका व्यक्तीसाठी येत असतो .. माझा गिटो . “

गिटोच नाव ऐकताच त्या नावाडयाने मला सांगितलेलं स्मरणात आलं गिटोचा कोणी मुलगा आला म्हणे तो हाच असणार पण हा तर म्हणतो ह्याची रक्ताची नाती इथे कोणीच नाही ...

“ गिटो तुमचे फादर आहेत ना ? “

ह्यावर तो काही वेळ निशब्द राहिला आणि उद्गारला , “ नाही गिटो माझे फादर नाहीच . “

म्हणजे गिटोचा हा मुलगा नव्हताच मग गिटोचा परिवार कुठे असेलं ?? असंख्य प्रश्नांनी मनात घर केलं आणि ह्यांची ती रक्ताची नाती ती कोण म्हणून मी विचारती झाली , “ आणि जे तुम्ही म्हणाले रक्ताचं एक नातं असून ते गवसलेलं नाही ते कोणाबद्दल बोलत होता ?? “

“ ज्या व्यक्ती आपल्या असून आपल्या नशिबात नसतातच त्याचा मीच कधी पाठलाग करूनही मिळाल्या नाही त्यांच्या बद्ल तू जाणून काय करशील , चल तुला तुझ्या घरपर्यंत सोडून देऊ की जाशील तू एकटी ? “

“ नाही नको मी जाते ..”

“ इथून फार दूर आहे का तुझं घर ? “

“ फार नाही पंधरा मिनिटांचा रस्ता ...”

“ गिटोला तू ओळखते वाटतं ?? “

“ हो गिटो माझा स्विममास्टर .. “

“ ओह्ह्ह ...” आम्ही बोलत बोलत एकाच रस्त्याने किनाऱ्याच्या बाहेरच्या दोन रस्त्याच्या मधोमध असलेल्या शाल वृक्षा पर्यंत येऊन पोहचलो ...

“ एक विचारू तुम्हाला ? “ माझ्या मनात प्रश्नाची कालवाकालव होत होती .

“ हा बोल ना ..”

“ तुम्ही मला किनारपट्टीवर असताना सिस्टर का म्हटलं ?? “

“ कारण तू तेव्हा खूप घाबरली होती तुझी भीती दूर करण्यासाठी तुला मायेचा दिलासा देण्यासाठी .. “

“ ओह्ह्ह सॉरी .... “

“ का काय झालं तू एवढी दुखी का झाली ... “

“ काही नाही उद्या गिटोला सकाळी किनाऱ्यावर मला भेटायला सांगा . “

“ हह्ह्ह सांगतो ....”

आमच्यात आता काळोखासारखी चालताना भयाण शांतता होती . रातकिडयाचा आवाज घोगावत होता . इथून त्याचा रस्ता बदलणार होता . तो न बोलताच माझ्यापासून आपल्या मार्गस्थी वळला . मला रस्त्याने आता भीती वाटायला लागली एवढ्या किरर्र अंधारात जावं लागणार मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला ..

“ मला घर पर्यंत सोडून देऊ शकता का ? काळोख खूप आहे ... “

तो थांबून मला म्हणाला , “ मी तर तुला आधीच म्हटलं सोडून देतो चल आता ..”

तुझी साथ अशीच मला आयुष्यभर मिळाली तर , तुझ्या सोबत मला खूप सुरक्षित वाटतं माहिती नाही तुझं आणि माझं नातं कोणत ते ?? काश माझ्या मनातल्या भावना तुझ्याजवळ व्यक्त झाल्या असत्या तर ... तू मात्र अजून आपल्यात नीरव शांतता पसरवत मुकाट्याने वाट तुडवत चालत आहे . मलाच त्या भयाण शांततेचा बुरखा दूर सारत तुझ्याशी हितगुज साधायची आहे .... म्हणून म्हटलं तुझ्या जगण्याची आणखी कोणती शैली आहे ते तू अवगत केलेली जाणून घायवं ...

“ तुम्ही लिहिता पण ? “

ह्या अचानक मी विचारलेल्या प्रश्नावर भांबावून जात तो म्हणाला , “ हो लिहितो , पोएट्री अजून फावल्या वेळत मनाला जे वाटेल ते .... “

“ मला काही ऐकवना ! “

“ ह्म्म्म ऐक , तू मला एवढा आदर न देता तू मी असं बोलशील तरच हं .... “

“ ठीक ... “

“ बरं काय ऐकवू तुला ? “

“ तुझे विचार ....” तो क्षणभर विश्रांती घेत बोलू लागला ,

“ हा वारा मला काही खुणावत होता ....

उसळणाऱ्या लाटा साद घालत होत्या ,

तू बघतेस ना ह्या भयाण निरवतेला

त्या पाषाणालाच कवटाळून मी जगत आलो , तुला

वाटतं असेलं मी एवढा शांत का ??

माझं हास्यच मी देण केलं ..... त्या भोळ्या भाबड्या सुखाला जे

तूसभरही माझं न झालं ,

मी माझा न राहिलो ह्या शब्दाचा

एक उनाड कोसलेला महल झालो ......”

त्याचे हे शब्द ऐकून मला तात्पुरती कल्पना झालीच त्याच्या वेधळ्या जीवनाची .... अन त्याच्या आयुष्यात त्याने केलेल्या तडजोडीची .... प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून मी त्याला म्हटलं , “ वॉव खूप छान लिहितोस .... ह्या ओळी आता तयार केल्या ना तू ? “

“ हो काहीतरी ऐकवायचं होतं आणि तुला माझ्याकडून ऐकून घायचं होतं म्हणून ...”

“ ओह्ह्ह्ह .... चल घरी माझ घर आलय मॉम सोबत तुझी ओळख करून देते . “

“ नको हं मला निघायचं आहे तू एकटी होती म्हणून तुला इथवर सोडून द्याला आलो .. “

असं म्हणतं तो माघारी वळला ... त्याला मी थांबवण्याचा प्रयत्न तरी करू शकले नाही . त्याच्या वेगाने जाणाऱ्या पावलांकडे मी बघतच राहले अरे निदान माझ्या मॉमला तर भेटून जायचं होतं शेवटी तिच्या लेकीला वाचवलं तू मरणाच्या दारातून नाहीतर त्या मगराची मी शिकार झाले होते आणि चीरघळून उद्या त्या जलाशयात माझी जलसमाधी पुरली असती ..

मी आत पाय ठेवताच मॉम बाहेर आली .... “ हे मॉम जेवलीस ? “

ती जरा रागातच माझ्याकडे बघत होती तिचा हा लटका चेहरा त्यावर माझ्यासाठी घोर काळजीच पसरलेलं सावट मलाच क्षणभरात दूर करता येतं ... ती जेवणाच्या रूम मध्ये जात मला बोलू लागली हे नेहमीचच असतं हे ही मला ठाव आहे ..

“ काय हे तुला स्वतःची तर काळजी नाहीच पण माझी तरी बरं मला काही नाही होणार पण तू ? अगं एवढ्या वेळ कोणी सरावला जात का ते पण किती तास पाण्यात राहिली ? “

“ अग हो हो अजून नको ना ओरडू ? “

“ ओरडू नाही तर काय करू बाळा ... “

मी माझ्या पायातला स्विम बूट बाजूला सारत एवढ्यात मॉमची नजर माझ्या पायाकडे गेली आणि तिच्या हातातलं जेवणाचं भांड खाली पडलं ..

“ हे काय झालं तुझ्या पायला पाय असा का झाला आणि ह्या कशाच्या जखमा पडल्यात ??”

तिचं माझ्यावर असलेलं आतोनात प्रेम मी तिच्या ह्या काळजीतून जाणत होती .

“ अगं काही नाही झालं एक महासागरात देव मासा हरवला होता त्याला त्याच्या आईच्या स्वाधीने केलं , त्याच्या आईला शोधण्यातच वेळ गेला . जेव्हा मी दक्षिणी किनारपट्टीवर आले तेव्हा एका मगराने मला गाठले .. त्याच्या तावडीत माझा पाय सापडला . बर झालं मॉम तो गिटो नाही का त्याच्या मानस मुलाने मला त्या मगरापासून वाचवले ...”

“ हे येशू काय करावं माझ्या ह्या मुलीचं हिला कितीदा सांगून चुकले सोड तो स्विमिंगपटू होण्याचा नाद पण , तू ऐकणार नाहीस ना माझ ? “

“ ओह्ह्ह नो मॉम चल मला जाम भूक लागली आज जेवायला वाढ आणि आज तुझ्या हाताने भरव मला . “

“ आधी तुझ्या पायाला मलम पट्टी करू दे ! नंतरच तुला जेवण मिळणार कळलं का ? “

“ मॉम जखम फार काही त्रासदायक नाही तू उगाच नको काळजी करू ..”

मॉमने जखमेवर मलम पट्टी करून जेवण वाढलं .. जेवण झाल्यावर मी माझ्या रूम मध्ये जाऊन गिटोच्या मुलात हरवून गेली . का झाली असेलं आमची भेट ? आधी चर्च मध्ये मग त्यानेच का मला वाचवायला यावं ..! हे केवळ योगायोगाने घडतं गेलय का ? हा फक्त योगच असावा जो आम्हाला एकत्र घेऊन येतो पण का ? त्याचं माझ्या सोबत कोणतही नात नसताना असं का व्हावं .... हे येशू मला अश्या कोड्यात नको फसवू . असं म्हणत मी झोपी गेली .

सकाळ होताच मॉम मला उठना म्हणून आवाज देऊ लागली . अरे हो आज मला मॉमची आणि गिटोची भेट करून द्यायची होती मॉम पण रात्री हो जाऊयात म्हणाली कारण मॉमही गिटोला आणि त्याच्या मुलाला भेटण्यास उत्सुक होती . मी लवकरच बेड वरून उठली आणि आणि ब्रश करून कॉफी घेतली मॉमला नास्ता बनवण्यात मदत केली दोघींनीही फ्रायफिश खाल्ली आणि निघालो किनारपट्टीच्या दिशेने .. मॉमला किनारा आधीपासूनच नाही आवडत की जणू ह्या किनाऱ्यानेच तिचं काही बिघडवल होतं मला काही कळतच नव्हत पण आज मी खूप आनंदी होती ती गिटोला भेटायला तर येत होती ...

आम्ही किनारपट्टीवर आलो गिटोने उभारलेल्या शेडखाली मॉमला बसवत तिला मी म्हटल , “ मॉम तू इथे बस्स गिटो असेलच इथे कुठेतरी मी त्याला लवकर शोधून आणते .”

“ हो पण लवकर ए ....”

“ ओह्ह्ह मॉम आता गेली आणि बघं त्याला घेऊनच आली . “ असं म्हणत मी धावतच गिटो गिटो करत महासागराच्या दिशेने गेली गिटो मला पोहून बाहेर येताना दिसला त्याच्या जवळ जात .

“ काय हे गिटो , आता सकाळची वेळ ही पोहण्याची असते का ? “

गिटो बाहेर येत म्हणाला .. “ ओह्ह्ह माय बेबी पोहण हाच माझा आता एकमेव छंद राहिला काय करू मग ? “

“ काही नको चल माझी मॉम आली तुझ्याशी मी भेट करून देते ती तुझ्यावर खूप खुश आहे . “ ह्यावर माझ्याकडे बघत गिटो म्हणाला , “ तुझी मॉम माझ्यावर कशासाठी खुश मी काय केलं ? “

“ ओह्ह्ह असं काय करतोस गिटो काल तुझ्या मुलाने मला मगराच्या तावडीतून वाचवलं त्याने सांगितलं नाही का ? “

“ ह्ह्ह हं सांगितलं त्याने मला म्हणून तू तुझ्या मॉमला मला भेटायला घेऊन आली . “

“ हो गिटो .... “

“ तू खरच बावळट आहे ह तुला वाचवलं त्यांनी आणि तू माझी भेट तुझ्या मॉमसोबत करून देतो म्हणते . बर चल भेटून च घेतो ह्या गुणी मुलीच्या मॉमला . “

असं बोलत गिटोच्या सोबतच मी त्याचा हात हातात घेऊन शेडखाली मॉम जवळ आली मॉम मागे वळून बघतच मी मॉमला म्हटले , “ मॉम हा गिटो .... “

मॉम त्याच्याकडे बघताचं शॉक झाली मला काही कळेना मी गिटोला म्हटले , “ आणि गिटो ही माझी मॉम ... “ मॉम उभी झाली गिटो आणि मॉम काही मिनिट एकमेकाकडे सारखे बघतच राहिले . जणू काही ते खूप आधी पासून एकदुसऱ्याला ओळखत होते . मी मॉमला आणि गिटोला म्हणाली , “ तुम्ही एकदुसऱ्यांना ओळखता का ? “

कोणीच काही बोलत नव्हते गतजन्मीची शांतता त्यांच्यात भयाण विस्तारली असावी ह्याच पोखरलेल्या बंधिवासात ते जगत होते . दूरवरून गिटो चा मुलगा मला येताना दिसत होता तो जवळ येताच गिटोला म्हणाला , “ फादर , एवढ्या सकाळी तुम्ही इकडे निघून आलात ? “ मॉम त्याच्याकडे बघत त्याच्या जवळ जात त्याला कुरवाळत म्हणाली , “ जॉन .... बेटा जॉन .”

आणि त्याचं क्षणी ती गिटोकडे बघत म्हणाली , “ गिटो हा आपला जॉन आहेना ! जॉन तू किती मोठा झाला किती बदला ! “

मला तर काहीच सुचेनासे झाले . हा मला वाचवणारा जॉन ? कसा असू शकतो म्हणजे माझ्या डोक्यात चक्क प्रकाश पडला मॉम त्या फ्रेम मध्ये मला कडेवर घेऊन असलेल्या मुलालाही तो जॉन माझा भाऊ असल्याचं सांगत होती .. हा तो फ्रेम मधलाच जॉन असावा का ??

मॉमला दूर सारत तो म्हणाला , “ सॉरी मी आपल्याला ओळखत नाही . “

तो माझ्याकडे बघू लागला तो गिटो जवळ जात त्याला म्हणाला , “ फादर ह्या कोण आहेत ? “

तेव्हा मॉम गिटोला म्हणाली , “ गिटो ह्याला पण तू माझ्या बद्दल कधी सांगितलच नसावं , हो ना ! “ गिटो मॉमला म्हणाला , “ मी त्याला काय सांगू मार्टिना तुझ्या बद्दल जी मला सोडून माझ्यापासून कायमची दूर झाली होती . आणि तू सांगितलं होतं का लुसिआला कधी माझ्याबद्दल ? “

“ हे बघ गिटो मी तुझ्यापासून दूर नव्हतीच गेली दूर तर तू मला केले स्वतः पासून ..”

मी गिटो आणि मॉम जवळ जात त्यांना विचारू लागली तुम्ही माझे फादर आहात का ? तेव्हा जॉन ही माझ्याकडे सारखा बघत होता त्याला माहिती होते जॉन हा त्यांचा मानस पुत्र आहे म्हणून जॉन माझा भाऊ आहे तर मग गिटो आणि मॉम ह्याचं काय नात गिटो माझा कोण ? ?

तेव्हा समोर येत मॉम म्हणाली , “ लुसिआ बेटा मी तुझी जन्मदेणारी मॉम नाहीच ..”

मी तर खचून गेली , “ मॉम हे काय बोलते आहे तू ? “

“ हो लुसिआ , गिटो आणि मी बालपणापासून एकाच वर्गात शिकलो कॉलेज पर्यंत आणि एकमेकाच्या प्रेमात पडलो .. लग्न केलं त्याच्या काही दोनवर्ष्यानी आम्ही फिरायला गेलो असताना कार अपघातात दोन दापत्य ठार झाले आणि तुम्ही जॉन आणि तू त्या अपघातातून वाचले तुम्ही त्या दापत्याची मुलं . आम्ही तुम्हा दोघांना घेऊन तुमच्या मॉमला फादरला हॉस्पिटल मध्ये गेलो पण सारे प्रयत्न निर्थक ठरले .... मग तुमच्या परिवाराकडून त्याचं शव त्यांना अत्यसंस्कारासाठी पुरवले आणि तेव्हा पासून तुम्हाला आमच्या जवळ ठेऊन घेतले . जॉन आणि मी काही कारणाने आम्ही वेगळे झालो मी लुसिआ तुला घेऊन जॉन पासून कायमची दूर इकडे निघून आले . जॉन तू गिटो जवळ होता . “

आता मला कळलं जॉन आणि माझं भेटन काही योगायोग नव्हता आमचं रक्ताचं नातं होतं . मी जॉनकडे बघतं होती तो माझ्याकडे बघतं होता एवढ्यात मॉम म्हणाली , “ लुसिआ तू विचारत होती ना तुला कडेवर घेऊन असलेला त्या फ्रेम मधला तुझा भाऊ कुठे आहे ? बेटा तो आता तुझ्या समोर आहे . “

जॉन माझ्या जवळ येत म्हणाला , तू माझी सिस्टर आहेस माझं जगात हे एकच रक्ताचं नातं होतं तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला मी ...पण तू आयुष्यात मला भेटशील हे स्वप्न आहे की सत्य माझा माझ्या नजरेवर विश्वास बसत नाही ..

“ जॉन माय ब्रदर हे सत्य आहे .... “ म्हणतच मला महासागरात पाण्याचा खळखळून आवज यायला लागला . मी महसागराकडे निघाली तेव्हा देवमासा आणि देवमासा त्याच्या आईसोबत पोहताना दिसत होता मी त्याला ओरडून सांगत होती ...” देवमाश्या तुला तुझी आई मिळाली बघं ! आणि मी ज्याचा शोधात होती तो माझा भाऊ .................”

जॉन जवळ येतच मला म्हणाला , “ लुसिआ आज मी धन्य झालो प्लीज तू मला सोडून कुठे जाशील नाही ना ? “

त्याच्याकडे निरुत्तर होतं मी बघतं राहिली तिथे मॉम आणि गिटो ही आले मॉम म्हणाली , “ लुसिआ तुला कुणाजवळ राह्यचं तू ठरवशील मी तुझ्या निर्णयाच्या आड कदापिही येणारं नाही . शेवटी बऱ्याच वर्ष्याने आज तुला तुझा सख्खा भाऊ मिळाला . “

असं म्हणत मॉम जॉन कडे वळली त्याला म्हणाली , “ जॉन तुला माहिती आहे जेव्हा पासून लुसिआने तुला त्या फोटो फ्रेम मध्ये बघितलं आणि तिला माझ्याकडून कळलं तिचा भाऊ ह्या जगात आहे तेव्हा पासून ती तुझ्या शोधात होती तिने ह्या तुझ्या बदलच्या भावना माझ्याजवळ कधीच व्यक्त नाही केल्या पण मला माहिती होतं ती तुला शोधत होती . “

जॉन माझ्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवत म्हणाला , “ हो लुसिआ , बघं तू मला शोधत होती आणि मी तुला वेड्या सारखा शोधत होतो ग तू अशी मला भेटशील कधी ही आशा देखील येव्हाना मी बंधिस्त करत जगत होतो . “

मी मॉमला आणि गिटोला म्हणाली , “ मॉम गिटो तुम्ही दोघं वेगळे का झाले मला नाही माहिती पण आता तुम्हाला माझ्यासाठी आणि जॉनसाठी वेगळ न रहाता सोबत एका छताखाली राहवं लागेल , जॉन आणि मी आम्ही तुमची पोटची मुलं नसलो तरी तुम्ही दोघही आमचे आईबाबा आहात ... “

जॉन पण गिटोकडे जात म्हणाला , “ फादर लुसिआ म्हणते ते खरं आहे तुला आणि मॉमला माझ्यासाठी सोबत रहावच लागेलं ...”

मॉम आणि गिटोने सुद्धा आमच्यासाठी सोबत राहायला परवानगी दिली .... त्याचं प्रेम ही पुन्हा बावीसवर्ष पूर्वी सारखं बहरत होतं , मला मॉम आणि गिटोची अनोन ल्व स्टोरी जाणून घ्यायची होती ... मी मॉमकडे एकदा सायंकाळी विनंती केली तिने त्यांची लव स्टोरी मला सांगावी म्हणून ... पण ती स्टोरी तिने मला किनारपट्टीवर सागराच्या सानिध्यात सांगायला पाहिजे म्हणून मी तिला त्या दिवशी किनारपट्टीच्या दिशेने घेऊन गेली . सरळ आकाश्याकडे बघत उंच वाढलेले पाईन वृक्ष त्याचा मधोमध आम्ही दोघी चालत होतो .. मॉम मला त्यांची लव स्टोरी सांगण्याचा प्रयत्नातच होती एवढ्यात दूरवरून गिटो आणि जॉन ब्रदर मला सोबत येताना दिसले .

चद्रं पाण्यात हसताना दिसतं होता मी आणि मॉम तिथे जाऊन उभे ते दृष्य न्याहाळत होतो ... माझ्या बाजूलायेऊन जॉन मला म्हणाला , “ किती सुंदर .... “

गिटो मॉम जवळ जात तिचा हात आपल्या हातात पकडत म्हणाला , “ लेकरानो हिच ती जागा आहे इथेच उभे राहून रात्रीच्या त्या नीरव शांततेत चंद्राच्या सोबती मी तुमच्या मॉम समोर माझ्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता आणि तिने लाजत तेव्हाचं होकार ही दिला होता .” मॉम लाजतच तिने आपला चेहरा हाताने झाकून घेतला .. जॉन म्हणाला तुम्ही , “ जगातले नशीबवान प्रेमी आहात .. “

पण त्यांची प्रेम कहाणी आजही माझ्यासाठी अनोन होती ..गिटो सत्तर वर्षाचा आणि मार्टिना मॉम पन्नास वर्षाची ह्याची प्रेम गाथा ही रहस्यमय असावी नाही !
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED