हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 1) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 1)




"अनामिका,इथे का बसलीस तू अशी एकटीच?"

आस्मतांच्या सानिध्यात निरभ्र काळसर ढग कुणाचा आवाज नव्हता की कुणी असण्याचा शुकशुकाट नव्हता असा तो समुद्रालगतचा किणारा होता..

पाठमोरी आकृती मागे करत आवाजाचा दिशेने अनामिका वळली...
"अं , तू इकडे छान वाटतं मला .बघं निसर्गांच्या सानिध्यात असं एकांतात बसायला.. तू हि ये बसं ना इथे दगडावर !"

"माझ्या मनात एक प्रकारचं नैराश्यच दाटलय बघं ."

"का रे ! काय झालयं असं तुला ?"
"होय गं ,मी काय विचारले तू त्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले मला?"

आलोककडे बघतं अनामिका "आलोक काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात ती शोधावी लागतात, शोधुनही ती नाही सापडली तर मिळून जातात वेळ आल्यावर , हा प्रश्नाचा उत्तराचा गुंताच असा असतो आलोक कधी कधी समजत नाही."

"नेमक तुला काय म्हणायचं आहे , अनामिका?"
"ते तू समजुनच जाशील आलोक."
"तसं नाही गं , तू सर्वांत आधी माझी एक जीवलग मैत्रीण आहेस .तरी ह्रदयात जागा केली माझ्या ."
"मला नाही ठाऊक आलोक,दृष्ट लागावी हेवा वाटावा पाण्यात बघावं माझ्या कुणी प्रेमात पडावं ,असं काय आहे रे माझ्यात? "काहीच नाही."

अनामिकाच्या डोळयात अश्रु आले ते सावरत ती म्हणाली."का येवढा प्रेम करतो तू माझ्यावर बघं ना तुला दुसरं कुणी तरी नक्किच भेटेलं...

आता आलोकला काय बोलावे ह्यावर सुचत नव्हते,कोलमडुन गेला होता तो .अनामिकाच्या अशा बोलण्याने...वातावरण स्तब्ध झाले होते भयाण शांतता होती लाटा ही निस्तेज झाल्या होत्या त्या लाटानीही संवादाच गतिशील चक्रव्यूह थांबवलं असावं..आलोकनेच आता स्मृतीभंग केला.

"अनामिका तुझ्या नकाराचं कारण मला आज तरी समजेल का, कि दूसरे कुणी तरी आहे तुझ्या मनात ज्या दुसर्यांची जागा तू मला कधीच नाही देऊ शकत, बघं असं जरी असेल ना तरी निश्चित होऊन सांग मला . मी नाही येणार तुझ्या मधात ,पण प्रेम कधी कमी होऊ देणार नाही माझं तुझ्यावरचं."
"नाही आलोक असे काहीच नाही ,तू असा विचार पण नको करू."

"मग कसा विचार करायला हवा अनामिका मी तुचं सांग,वेडा झालो मी तुझ्यासाठी."
"आय अँम सॉरी फॉर दँट,आलोक."
आलोकला कळत नव्हते काय चालले ते ."माझा आत्मविश्वास खच्ची केलाय गं तू ! आय हँड लॉस्ट माय कॉन्फिडन्स यू नो अनामिका?"

" मला आशा निराशेचे ब्लँक अँण्ड वाईट शोज नकोयत आलोक , मी आहे तिथे माझ्या एकटीच्या विश्वात खुश आहे , मला वाटतं तू परत परत ह्या विषयावरती बोलनं बंद करं परिक्षेला चार महिने रहिलेत तेव्हा पर्यत सोबत असु नाही तर एक मैत्रीण हि गमवून बसशीलं आलोक तू ."

दोघीही स्तंब्ध झाले त्याच्यातील शांतता भयाण होती .अनामिकाला आलोकला दुखवायचे नव्हते पण तिला तसे कठोर बनावे लागले आतमधून अतिव दुख:होते तिला ह्याचे..
"आपल्याला निघायला हवे अनामिका बराचं वेळ झाला तुझ्या घरचे मामा मामी तुझी तिकडे वाट बघत असतील चल जाऊयात."

"हो आलोक चल निघू."
"अनामिका मी तुला सोडुन देतो घरपर्यत."
"नको नको आलोक,असूदेत मी जाईल बरोबर."
वार्यांची झुळूक क्षणात निघून जावी तशी अनामिका अदृश्य झाली क्षणार्धातच....
अनामिका काहीकारणास्त्व मामाकडे १वर्षासाठी बी.एस.सी च शेवटच वर्ष निघेपर्यत राहायला आली होती.मामा मामीना पण प्रिय असा तो तिचा स्वभाव होता.दिसायला गोरीपान ,उंच, तिचे डोळे बघताच क्षणी कुणी तिच्या प्रेमात पडणार असे तिचे ते लाजवी रूप ..तिच्या ह्याच रुपाला आलोक हि भाळला होता.

अनामिका येव्हाना घरी पोहचली होती .तिच्या पेक्षा एक वर्षांनी लहान तिची मामे बहिण पियू ..जेवन झाले आणि दोघी निवांत गप्पा करायला माळयावर गेल्या...

" ताई ,आज तू आलोकला भेटायला गेलती ना ? काय म्हणे मग आलोक ? "
"छे गं ! मी त्याला कुठे भेटायला गेलती , समुद्र किणार्यावर एकटीच बसली होती आलोक ही आला तिथे अचानक."

" खरचं अनुताई आलोक किती जिवापाड प्रेम करतो गं तुझ्यावर ! आणि तुमचं प्रेम बघं नात्याचे ऋणानुबंध किती बांधलेले असतात ते .असे एकमेकाना ओढवून घेतात ! "
"होय गं पियु ,खरचं तू म्हणते ते खरयं पण नियती बघं ना ! किती विचित्र खेळ खेळते ते आलोक माझ्यावर प्रेम करायच्या आधीपासूनच मी खुप प्रेम करायची त्यांच्यावर.बघताच क्षणी मी त्यांच्यात हरवून जायचे.."

" ताई मग सांग न त्याला जे होईल ते बघू ."
" नाही पियू मला त्याला काहीही नाही सांगायचे कदाचित मी दिलेल्या नकाराने तो मला पाषण ह्रदयी तरी म्हणेल पण माझ्या आजाराचे त्याला कारण समजले तर तो कोलमडून जाईल तो एकटा कसा जगेल माझ्याविना मी हा विचार करून सुद्धा मनात खिन्न होते खुप.."

अनामिका आता भुतकाळात शिरली .अगदी तिला गहिवरून आले ..
" पियु काळ बघं किती मागे सरसावून गेला ते ,जेव्हा मी इथे आली कॉलेज मध्ये नाव दाखलं झाले . खरं तर बी.एस.सी चे शेवटचे वर्ष होते पण माझा आजार मला इथे घेऊन आला.कॉलेज पहिला दिवस होता तो आजही आठवते मला.उंच उंच आकाशाला टेकलेली झाडे हा निसर्गंरम्य परिसर मी ह्याला नाह्याळत जायचे.

पियु हि हरवून गेली तिच्या सांगण्यात.
"ते क्षण आजही ताजे आहेत पियु माझ्यासाठी ,तो दिवस आजही आठवतो मला ते विजाचा कडकडाट ढगाचं गर्जन आजही गुंजतो तो आवाज कानात ,ते बरसणारे मेघ मला ह्या गर्जनांची हि खुप भिती वाटायची ,वीज कडाडली कि मला नेहमी वाटे जशी ती कडाडते तशी अंगावर येउनच पडते कि काय? त्या काळोखात मीच कशी एकटी सापडली !कॉलेज सुटलं बघं माझं आणि लवकरच गेटच्या बाहेर पडले सर्व आस्मंत अंधारून गेला होता. मुली मुले सर्व निघुन गेलीत .अचानक मी छत्री घरी विसरून गेले .बस्टॉप वर येऊन अर्धा तास झाला.वाहाणाची रेलचेल थांबली .मुसळधार पाऊस पडण्याचे दाट संकेत देत होता तो मेघदूत .मी बस्टॉपचा शेडखाली बसून पाण्याच्या मंदवणार्या गतीला वेग धारण करत जोरात शिरकाव करायला सुरूवात झाली .लांबवरून पुसटस कुणी तरी छत्री घेऊन येतांना दिसलं .जवळयेताच कळले तो आलोक होता.अगदी नजरेला नजर भिडली .हवेने केस उडत होते केसाची लट सावरत मी थंडीने कुडकुडत होते .त्यावेळी आलोकला बोलायला चांगली संधी मिळाली होती आलोक अशाच संधीच्या शोधात होता..."
"छत्रीत ये तु पुर्ण भिजुन गेलीस ,का गं!काही वाहन नाही भेटले काय जायला?"
मी त्याच्या बोलण्याने भाबावून गेले ज्या मुलावर मी प्रेम करायची वर्गात चोरट्या नजरेने बघयाची .तो आलोक वास्तव्यात माझ्या अगदी समोर आहे हे बघुन माझी बोलतीच बंद झाली .त्याचा विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देताना ततततु करतं माझी गाडी मी वर येऊन थंबकली.
"तू तू मी कधीची उभी आहे इथे काहीच वाहन येऊन नाही रहाले."
आलोकलाही समजले भांबावली बोलताना..
"चल आपण चालत जाऊयात थोड्या दूर इथेच माझ्या मित्रांच्या घरी माझी बाईक ठेवली आहे."
"नको नको आलोक,मी जाईल थांबते इथेच येईलच काहीतरी."
ते आलोकचे शब्द आजही आठवतात मला...
"मिस् अनामिका अजुन रात्र व्हायची वाट बघत आहात की काय ? साडेसहा वाजायला आले ,आमच्या पेक्षा जास्त तुमची घरी वाट बघनं सुरू असते चला आता."
मला पण वाहान येण्याचे काही संकेत दिसत नव्हते कदाचित आलोक बरोबर बोलला होता....
" चल मग ,तू कुठे होता आतापर्यत ? "
" दोन दिवसांनी कॉलेज मध्ये कार्यक्रम आहे तर सरांसोबत त्याचेच नियोजन सुरू होते ."
रस्त्याने चालताना उगाच वाटतं होते आपण पावले मोजत चाललो .
" अनामिका तू रहाते कुठे? "
" मी माझ्या मामाकडे राहाते."
मी भानावर येत मग समजले तो एरिया चे नाव विचारत होता..
" अच्छा मामाकडे कुठे ?"
" प्रताप नगरला ."
" ओहहः जवळच आहे तर इथुन ."
(बोलता बोलता दोघे मित्रा च्या घराजवळ येऊन पोहचले आलोकने गाडी काढली ...अनामिकाच्या घरासमोर आलोकने गाडी थांबवली.)
" छत्री असुदे तुझ्याच जवळ अनामिका."
म्हणत आलोक तिथून लवकरच मी काही बोलायच्या आधी निघुन गेला .
पियु बघं तेव्हापासुन आमचं मैत्रीच वटवृक्ष उंभ झालं त्याला मला काहीही झाले तरी मैत्रीतच फुलवायचे होते प्रेमात नव्हते बहरू द्यायचे..
त्यानंतर आठ दिवस झाले माझे कॉलेजला जाने बंद होते .तिकडे आलोक सारखी माझी रोज वाट बघायचा .
"पियु अगं आलोक वर मी जीवापाड प्रेम जरी करत असली तरी माझ्यात त्याला नाही गुंतवू शकत .आता मी त्याच्या प्रेमाला होकार नाही दिला तर तो मला पाषणह्रदयी तरी म्हणेल .पण माझा आजार त्याला कळला तर तो कोलमडुन जाईल मी त्याला दुखी नाही बघू शकतं .माझ्या नंतर त्याच काय होईल मी विचार ही नाही करू शकत ह्या गोष्टीचा....
" चल ताई आता झोपु यात आपण ."
" हं चल उद्या लवकर उठायचे आहे. "
अनामिका मामाकडे त्यांच्या गावाला उपचार करिता आली होती .अनामिकाला ब्लड कँन्सर होता हे खुप उशिरा समजले.ती शिक्षणात खुप हुशार होती घरच्यानी ह्या आजारा दरम्यान तिला शिक्षण सोडायला सांगितले त्याच्या आग्रहाखातर ही तिने कॉलेज सुरूच ठेवले खुप म्हत्तवाआंकाक्षी विचाराची होती अनामिका दोन भावाची एकटीच लाडाची बहिण. पण असह्य त्रास वेदना सहन करत ती जगायची रात्र रात्र एकटीच रडत बसायची तिची प्रकृती ढासळत चालली होती .आठ दिवस हॉस्पिटल मध्ये गेले डॉक्टरांनी घरी घेऊन जायला सांगितले कारण आता कोणत्याही क्षणी मृत्यु तिला ओढवून घेणार होता.अनामिकाचा घरचे सर्व अस्वस्थ होते .अनामिकाला ही मृत्युची चाहुल लागली होती. दोन दिवस मामाकडे थांबू अशी तिने घरच्यांना विनंती केली .तिला शेवटच आलोक सोबत गप्पा करायच्या होत्या ..
त्यादिवशी तिने लवकर तयारी करून कॉलेज ला जायला निघाली शरिरात काहिच त्रान नव्हता ..अनामिका गेली कॉलेज मध्ये सरांचे लेकचर सुरू होते .अनामिका दिसताच आलोकची सारखी नजर अनामिकाकडे तिच्याकडे बघुन त्याच्या डोळ्यात पाणी आले किती दिवस वाट बघायला लावलीत गं इतकी का माझ्या एकतर्फि प्रेमाची परिक्षा घेते होकार तर तुझा अजुनही मी प्रतिक्षेतच आहे असं आलोक मनातच स्वत: सोबत बोलत होता सरांची तासिका सुटली.आलोक मैत्रीनिच्या घोळक्यातून अनामिकांची सुटका करत .
"अनु चलना इथेच समोर टि घ्यायला जाऊ."
"नाही आलोक बोल इथेच ."
"अनु कुठे गेलती इतके दिवस मी किती वेड्या सारखी वाट बघितली हं तुझी."
"आलोक मला पण तुझी खुप आठवण यायची .आज प्लिज मला किणाऱ्यावर भेटायला येशील ??."
"हो गं येणार पण तुझी हालत किती खराब झाली .तु खूपकाही लपवते आहे माझ्यापासून काय झाले अनु सांग मला ?"
"आलोक ,आता ठिक आहे रे मी मला कुठे काय झाले .जरा बरं नव्हते एवढेच .आलोक शंखशिपले ती पायाने मी तुडवित जाणारी वाळू माझी वाट बघतं असेल ना रे ! गेल्या वेळी तुला माहिती आहे कुणाच्या पाऊलखुणाने माझ्या पायाचे ठस्से मिटू नये म्हणून किणार्यालगत मी माझ्या पाऊलखुणा उमटवून ठेवल्यात आज मला ते बघायचं आहे .तु ही म्हणायचा ना अनु खरचं किती अल्हादायक आणि अविस्मरणीय असते सागरा सोबत केलेली मैत्री..."
" मी गेली आठ दिवस झाले अनु रोज जायचो किणाऱ्यावर .तुझ्या पाऊलखुणाकडे लक्ष नाही पण आपण बसलेल्या दगडावर बसून तुझी वाट बघायचो तिथे बसल्यावर मला तुझा हसरा चेहरा नजरेत भरायचा लाटा खळखळल्या म्हणजे तु हसती आहे असा भास व्हायचा .आणि डोळ्यात अश्रू दाटून यायचे तिथून घरी जावू नयेच असे वाटायचे गं तु येशील असचं वाटायचं .."
"आलोक आज ये मी निघते आता भेटू आपण किणाऱ्यावर ."
असं म्हणतं अनु तिथून निघून गेली खूप प्रश्न तिच्या मनात घर करून गेले .प्रेमासारखी ताकदवर गोष्ट अशी संपत नाही तर मग माझ्या मृत्यूलाही आलोकचा विचार यायला हवा मी नाही सोडून जाऊ शकत त्याला मृत्यू मला येइल घेऊन जाणार पण ह्यात आलोकचा काय दोष ?
घरी जाताच अनु फ्रेश झाली आणि सहा वाजायची वाट बघू लागली.तिकडे आलोक ही कधी निघतो तिला भेटायला असे झाले.
सहा वाजले नेहमी प्रमाणे अनु आधी जाऊन बसली पण किणार्यांवर पोहचताच ढग दाटून आले ..काळोख पसरला ..."
"अनु मला यायला जरा उशीर झाला गं."
" नाही आलोक तु बरोबर आलास पण बघ वातावरण कसे झाले."
विजाच कडाडणे सुरू झाले सोसाट्याचा वारा सुटला .
"अनु पाण्याची थेंब लागतं आहेत चल इथून ."
असं म्हणत आलोकने अनुचा हात हाती धरला .
तसेच पाणी जोरात पडायला सुरूवात झाली.आलोकचा नजरेस आँटो पडला .
"अनु अॉटो लागून आहे चल आपण जावून बसू."
"हो आलोक चल ."
अनुचा हात आताही आलोकच्या हाती होता तो अनुला ही सोडुन घ्यावस नव्हतं वाटतं आणि आलोकला सोडावा असे नव्हते वाटे.आलोक भाणावर आला त्यानेच अनुचा हात सैल केला.अनुचे घर आले."
"आलोक निघते मी."
"हो अनु संभाळुन जाशील."
कधी संभाळुन न जाशिल म्हणाऱ्या आलोकचा तोंडून हा शब्द ऐकून अनुला गहिवरून आले...घराच्या गेट जवळ येऊन आलोकचा पाठमोऱ्या औटोकडे अनुने एकदांचे बघून घेतले.पावसाच्या वेगात बरसणाऱ्या सरीत अनुचे डोळे ही अंखड बरसू लागले..
घरीआत आल्यावर अनु बिछायान्याला खिन्नली खुप थकुन गेल्यासारखे वाटत होते तिला जीव जातो कि काय असे वाटतं होते.पण आजही आलोक ला भेटून बोलु शकले नाही ह्याचे दुख:झाले..अनुने आलोक साठी पत्र लिहायला कागद घेतला..त्या पत्रात चार ओळी लिहिल्या......
पत्र लिहून ते त्या लिफाफ्यात तिचा फोटो आणि डायरी तिने पियू कडे दिली..
"पियू माझं एक काम करशील माझी ही डायरी आणि पत्र आलोकला देशील प्लिज ,एवढं करशील ना गं माझ्यासाठी...."
"हो गं ताई दे माझ्याकडे मी देईल त्याला तू झोप आता निवांत."
"पियु झोप नाही येत आहे गं मला उद्या दादा आईबाबा ह्याच्या सोबत गावाला जायचे आहेना ,आलोक इथे एकटाच कसा जगेल गं?"
"ताई तुला आरामाची गरज आहे आता तुला काहीच होणार नाही झोप निवांत..."
असं म्हणतं पियू तिथून निघून गेली.अनामिकाला खुप असह्य त्रास वेदना होतं होत्या डोळे जड झाल्यासारखे वाटतं होते .अश्रु धारा वहात होत्या सारखा आलोकचा चेहेरा नजरेसमोर येत होता.अनुचे डोळे मिटतं होते.....
सकाळ झाली सुर्यणारायनाची तांबुस पिवळी छटा सर्वांना जाग आनुन दिली .अनुला आवाज द्यायला तिची आई रूम मध्ये गेली.अनुला आवाज दिले उठवण्याचा प्रयत्न केला पण अनु आता उठणार नव्हती ती कायमस्वरूपी झोपी गेली..अनुचा कुंटूबाने दुख:चा हबंरडा फोडला सर्व अनुसाठी रडु लागले.अनुचा अंत्यसंस्कार तिचा गावी करण्यात आला..
तिकडे आलोकला ह्याची तिळमात्र खबर नव्हती .पंधरा दिवसांनी ते पत्र पियुचा हाती लागले तिला मग आठवले हे ताईची शेवटची इच्छा होती .
तिने आलोकला तसाच मँसेज केला मला आज किणाऱ्यावर सायंकाळी सहाला भेटायला ये म्हणून .आलोकने हो म्हणून रिपले दिला समोर आलोक मँसेज करू लागला पण त्याला रिप्ले मिळत नव्हते.(पियूने अनामिकाच्या फोन वरून आलोकला संदेश पाठवला .)
आजतरी अनु होकार देईल खुप दिवसांनी अनु भेटत आहे कशी असेल ती . असे एक न अनेक प्रश्न आलोकचा मनात आले .अनुसाठी जातांनी आलोक ने एक छान गिफ्ट म्हणून डायमन्ड नेक्लेस घेतला तो किणाऱ्यावर वाट बघू लागला .दुरवरून येताना त्याला एक मुलगी दिसत होती पण त्याला अनु येण्याची नेहमी आहट लागते तशी आज आहट नव्हती लागतं
ती मुलगी जवळ आली तेव्हा आलोकला समजलेच आपली अनु नाही.
"आपण आलोक ना?"
"होय मी आलोकच पण तुम्ही कोण?"
"मी अनुची मामे बहिण पियू,तिने तुम्हाला हे पत्र आणि डायरी दिली आहे."
"पण,अनु कुठे आहे मला तिला भेटायचे आहे .सांग ना अनु कुठे आहे तर?"
काहीच न बोलता डोळयातील आसवं पुसत पियू तिथून लवकरच निघून गेली.
आलोक मनात म्हणू लागला अनु आज पण आली नाही खुप अस्वस्थ होऊन त्यांनी ते पत्र खोलले आणि वाचायला लागला.
प्रिय आलोक ,
रागवलास न माझ्यावर प्लिज रे रागवशील नको,तु खुप प्रेम करतो रे माझ्यावर मला माहिती आहे .मी पण तुझ्यावर खुप प्रेम केले पण तुला दुखवायचे नव्हते मला कधीच. म्हणून मी तुला नव्हती सांगु शकली तुझी सारखी आठवण येत असते आलोक ..आज बघं पावसानेही आपली भेट होऊ दिली नाही नियतीलाही आपल्याला एक होऊ द्यायचे नसेल.एक ह्रदय दिलं त्या ह्रदयात माझं प्रेम म्हणून तुच सर्वांत आधी जागा केली .पण नियतीने माझ्यावर घावच टाकलेत रे मला ब्लड कँन्सर आहे ,तु मला कदाचित म्हणशील मला धोका देऊन कुठे तरी दुर न सांगता निघून गेली.पण खरं सांगते आलोक तुला सोडून कुठेच जायची इच्छा नव्हती.आलोक तुझ्यावर प्रेम करते म्हणायला मी खुप वेळांनी सांगितलं तुला ते ही असं वेगळया पद्धतीने पण त्या मागे कारण होते.आज मला कोणत्या क्षणी मृत्यु ओढवून घेऊन जाईल मलाच माहिती नाही . पण , आलोक एवढं सांगु शकते प्रेमात खरचं ताकद असते ते अस कुणी एक निघून गेल्यावर संपत नसते .माणसं मरतात प्रेम नसतं मरतं माझं ह्रदय तुझ्यात धडधडत आहे. माझा श्वास नेहमी तुझ्यात गुतला असायचा आता मी तुला प्रेम करते हे न सांगता निघून गेली तर आपलं प्रेम ही संपल असं कधीच नको म्हणशील . आलोक तु नेहमी हसत रहा.छान दिसतो हसतांनी माझ्या साठी रडला तर बघं मी इकडे नाराज होईल ....तू स्वतः ला कधीच दोष नको देवु मी फार नशीबवान समजतं होते स्वतःला . माझ्यावर कुणीतरी जिवापाड प्रेम करणारा तू होता म्हणून .आलोक माझ्या नावासरखं आपलं प्रेम हि अनामिक होतं असं समजून सुखाने संसार करशिल .मी तुझ्या पासुन खुप लांब आले आपली भेट कधी होईल . हे मी सांगू शकतं नाही तुझ्या पासून मी दूर जाऊच शकतं नाही आलोक तू आणि मी सदैव प्रत्येक क्षणाला जवळ असावं असच मला वाटतं . आता तू सारखा नजरेसमोर येतो .
आज आर्तह्रदय रडते
माझे शब्द मी हूंदक्यात गिळते......

तुझीच,
अनामिका
पत्र वाचुन आलोक खुप रडु लागला .अनामिका आपल्याला कायमची सोडुन गेली हे समजल्यावर अनामिकासाठी तो तडफत होता आजही आलोक त्या किणाऱ्यालगतच्या कातरवेळी एकटांच त्या दगडावर बसुन अनामिका सोबत गप्पा करत बसला असतो........



____________