हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 2) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 2)


प्रेमाला वय नसतं असं म्हणतात हे खरंच असावं . बालपणीच ते अल्लड वयात झालेलं प्रेम तरूण पणात मिळणं म्हणजे खरचं किती अल्हादायकच ना जणू काही सारी सृष्टी आपल्यावर प्रेम सुमनाचा वर्षाव करीत असल्याचे भाकीत ... 
जया ही आठवीत शिकणारी मुलगी ती ही ह्या तारूण्याच्या उबरंठ्यावर आपले पहिले चरण ठेवताना कुणाच्या तरी प्रेमात पडते ... कोण असावा तो खुशनशीब जयाचा राजकुमार ?? दुसरा तिसरा कुणीही नाही तो तिचा सख्खा आतेभाऊच होता दिनेश ... जयाला आईसोबत मंदिरात जाण्याची आवड ती मंदिरात जाऊन दिनेशचा नावाचा तिथे शिक्का आपल्या अंगठ्याने लावते . जेव्हा तिची ही वेडीभाबडी कृती तिचा आईला समजते तेव्हा तिची आई तिला विचारते ..
" जया हा शिक्का तू इथे कुणासाठी लावला ?" तेव्हा आईच्या ह्या बोलण्यावर जया उत्तरते ..

" मी हा शिक्का इथे का चिपकवला तुला ते काम यशस्वी झाल्यावरच सांगेल ."

आठवीत शिकणाऱ्या मुलीला प्रेमाचे ते निरागस आणि पवित्र बंधन कायमस्वरूपी जपायचे होते .

जया आपल्या इतर नातेवाईकांकडे जाण्याचे टाळत असे पण आत्याच्या घरी काही सण समारंभ असल्यास ती दोन दिवस आधी जाण्याच्या बेतात असायची . कारण तिला तिचा आतेभाऊ दिनेश हा आवडतं होता . 

जया आठवीत असताना तिच्या आत्याच्या मुलीच म्हणजे दिनेशच्या बहिणीचं लग्न होते . जयाचा मेहंदीकोन दिनेशने

लपवून ठेवला होता . दिनेश जवळ त्याची लहानशी पुतणी येऊन तिला मेहंदी काढून देण्यासाठी हट्ट करत होती . तेव्हा जया ही दिनेशकडे जाऊन तिचा हातावर त्याला मेहंदी काढून मागत होती . दिनेशने तिला मेहंदी काढून दिली सकाळी मात्र सर्व घरातील पाहुणे तिला दिनेशचा नावाने चिडवत होते . नवरी तर ती आहे तू तर नवरी सारखीच रात्रभर मेहंदी काढत बसली तेव्हा ती त्यांना म्हणाली ." मी नवरी होणारच नाही का ? "

त्या नंतर दिनेश आणि ज्याची भेट अशीच त्यांचा घरी लग्न्न समारंभात होत राहिली .

बघता बघता जया बारावी झाली आणि कॉलेज मध्ये जाऊ लागली . दिनेशने तिचा फोन नंबर मिळवला तिचा बाबांकडून म्हणजे दिनेशच्या मामाकडून.

सकाळची सांगता देत सूर्यनारायण पृथ्वीतलावर आपल्या पिवळ्या किरणांची रेशीम झालर घेऊन अवतरले . त्याचं धुंदीत वातावरणात संचारलेला गारवा मोहक आणि अंगाला थंडीचा तडाका देऊन जात होता . गुलमोर परसबागेतला आज ही त्याचं उमेदीत उभा आकाशाकडे ताठ मानेने बघतं बहरतं होता . जया तिला हा गुलमोर जणू काही जिवलग मित्रा सारखा भासायचा . ती त्या गुलमोराचं सोंजवळ रूप न्याहाळत गॅलरीच्या आडोशाखाली उभी होती . एवढ्यात जयाचा फोन वाजु लागला . फोन नंबर तसा अनोळखी वाटतं होता. जयाने फोन रिसिव्ह केला .

" हॅलो कोण ? "

जयाचा आवाज ऐकून दिनेशला एखाद्या सुरेल ताल छेडणाऱ्या दुनियेत हरवल्या सारखं वाटायचं तिचा तो आवाज ऐकण्यासाठीच त्याने कॉल केला होता .

" मी दिनेश बोलतोय , ओळखलं नाही का ?"

दिनेश म्हणजे जयाचा आतेभाऊ तोच दिनेश ज्याच्यावर जया बालपणा च्या उंबरठ्या पासून प्रेम करायची त्यांच्या सोबत आतेभावाचं नातं असूनही जया फार बोलायची नाही .तोच 

" हं बोलना.. आज बरेचं दिवसांनी आठवण केली आमची ."

" नाही गं सहज म्हणून कॉल केला . "

'' सहज... म्हणून ?? "

" हो , मी सहज म्हणून तुला कॉल नाही का करू शकतं . "

'' अवश्य करू शकते ..पण आता माझे कॉलेज आहे मी नंतर बोलते तुझ्यासोबत . "

" ओके मी कॉलची वाट पाहीन . "

" बाय ..काळजी घे."

" हो तू पण..ठेवतो फोन ."

जया आणि दिनेश असेच अधून मधून बोलतं राहायचे . जया ही बीकॉमची विद्यार्थिनी होती . आणि दिनेश ह्याच शिक्षण जवळपास आटोपलं होतं .

दोघांना एकमेकाचा स्वभाव आवडायला लागला . जया तिला तर दिनेश सोबत सारखं बोलतं रहावं वाटायचं . त्याला ही तिच्याविना जग म्हणजे निरर्थक वाटे . दोघांच्याही मनात प्रेमाचं बीज अंकुरत होतं . पण त्याची भनक मात्र त्यांना कुणाला लागू द्यायची नव्हती . प्रेम असच अबोल किती दिवस राहणार बरं . एकतर्फी प्रेमाचं गणित इथे लागूच होतं नाही प्रेम हे दोघांनाही एकदुसाऱ्यावर होते . पण ते व्यक्त झाले नव्हते . जयाला तिचा मनातल्या भावना दिनेश जवळ व्यक्त करायचा होत्या पण प्रेम म्हटलं कि मनात काहूर ही माजत असंख्य अगणिक विचाराने आणि भीती दाटली असते समोरच्याला काय वाटेल ? हा आवासुन पुढे आलेला मोठा प्रश्न . पण दिनेशला आपण तिच्यावर प्रेम करतो हे गुलगस्त्यात नव्हते ठेवायचे . त्याने ठरवलं तिला सांगून द्यायचं . ती प्रेमाचा आपल्या स्वीकार करेल हे त्याला मनातून वाटतं होतेच. .. 

तो दिवस उजळला त्या दिवशी दिनेशने तिला एका गार्डन मध्ये भेटायला बोलवले..ती कॉलेज मध्ये होती रिक्षातून दिनेशने

तिला ड्रॉप केले . आता कुठे चालायचं हा प्रश्न दिनेश चा ..

" मला तर इथलं काहीच ठाऊक नाही , तू वाटेल तिथे चाल . "

" का ? तू तर इथे दोन वर्षा पासून कॉलेजला येतेना ! "

" हो , तू चाल तुला वाटेल तिथं घेऊन ."

तो तिला घेऊन एका गार्डन मध्ये गेला . आंब्याला मोहर आला होता . वातावरणात एक अलाहदायक रोमांच विस्तारला होता . दोघेही एका झाडाला पाठ टेकून बसले .

" जया , हे सृष्टीचं मादक रूप किती लोभस असतना ! "

" हं.. "

" तुला एक बोलू ?"

" हो त्यात काय बोलना . "

" मी तुझ्यावर खूप प्रेम करतो , आय लव्ह यु जया . "

ती काहीच नबोलता गालातल्या गालात लाजत हसतं होती . दिनेशला तिच्या त्या लाजण्यातच होकार दिसला .

" तुझा हाथ देशील . "

तिने आपला हाथ दिनेशला दिला .

"मी तुझ्या तळहाताचे चुंबन घेऊ शकतो का ?"

जयाने नजरेनेच होकार दिला . दिनेशने आपले हलकेच ओठ तिचा तळ हाताला टेकवून अलगत चुंबन घेतले . जया चक्क शाहारलीच .

" तुझे हाथ किती नाजूक आहेना ! "

" हो ..."

आजूबाजूला उगवलेलं तृण त्या तृणातील एक हळूच तोडलेलं कोवळं रोपटं दिनेशने जयाचा गालावर फिरवत ....

" हे सौन्दर्यवती तुझ्या रुपाला भाळलेला प्रियकर मी , तुझी साथ अशीच जन्मोजन्मी देशील ना मला . "

" हो ना रे ..."

तिचा होकारार्थी स्वभाव ..आणि दिनेशसाठी जगणारं हृदय . अक्षरशः झोपेत ही ती दिनेश सोबत एकटीच बडबडायची . हे दिनेशला तिच्या हॉस्टेल वरच्या मैत्रिणीकडून कळले . कॉलेज मध्ये असताना अधूनमधून भेटणं दोघचं कुठेतरी फिरायला जाणं . हे दोन वर्ष कसे निघून गेले ते दोघांनाही स्वप्नातल्या प्रेमपाखंरासारखे दिवस होते . पण ह्या दोन वर्षयांनी दोघांची ताटातूट होणार होती .

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन प्रेमीयुगलांना प्रेमात किती काही सहन करावं लागतं . हे प्रेम केल्यावरच कळतं . प्रेम असं सहज सोप्या रींगणात बांधल्या जाईल ते सर्व काही सहज स्वीकारेल अशी नियती नसतेना . ती प्रत्येक हवी असणारी गोष्ट घाव घालूनच बहाल करते. प्रेम हे अंतःकरणातून केलं असेल तर नियतीचे वार सोसतही ते सांध्य करता येते . जयाच कॉलेज संपलं ती घरी गेली आठ महिने होऊन गेले दिवसामागे दिवस लोटले . जयाचा कॉल नाही तिचा सोबत भेटणं नाही . सर्व संपर्कच तुटल्या सारखा झाला होता . जया कॉल करू शकतं नव्हती कारण घरच्यांची नजर सतत तिच्यावर खिळली असायची . दिनेश तिच्या आठवणीत जीवाचा आकांत करतं रडायचा तिला कॉल करायचा पण तिचा भाऊ उचलायचा . जयाच प्रेम प्रकरण घरी समजलं . तिचे बाबा आई भाऊ सर्व घरातील मंडळी तिचा विरोधात होती .

दिनेशला समजले जया एका शॉप मध्ये जॉब करते आहे म्हणनू तो तिचा शोधार्थ गेला पण जया त्याला मिळालीच नाही तो परत परत तिथे जाऊन बघायचा . ह्या दिवसात त्याचे खूप वाईट हाल झाले होते दाढी वाढलेली पायात चपल . अन्नाचा पोटात कण नाही . तो रस्त्याने तिच्यासाठी फिरायचा . एकदा बाहेर रात्रीचा वेळेला काळोख दाटलेला होता आकाशात मेघ जमा झाले होते विजांचा कडकडाट होत होता घरातही अंधार लाईट गेलेली . अशा परिस्थितीत दिनेश एकटाच भर पावसात रस्त्याने भटकत असायचा . जया बोलतं नाही म्हणून तो किती तरी दिवस उपाशीच राहिला . दीड वर्ष त्यांच्यात बोलणंच झालं नाही . जया मंजबूर होती घरच्यांसमोर . दिनेशला उन्हाळा संपल्यावर मुंबई वरून एका शाळेतून कॉल आला . दिनेश तिकडे शिक्षक म्हणून रुजुही झाला. पण दूर जाऊनही मन त्याच जया मधेच तिथे किरायाची रूम घेऊन तो राहू लागला . तिची आठवण जरी आली तरी त्याचा डोळ्यात अश्रूचा तुडुंब बांध धरलेला . कधी सकाळी शाळेतून आल्यावर जेवायचं नाही रात्र त्याची पाव भाजीवर जायची . एवढ्यात गावावरून त्याला कॉल आला जयाच तिचे वडील लग्न करीत आहेत . रविवारला येत्या मुलगा बघून गेला . हे ऐकून जगावं असा त्राण दिनेश मध्ये राहिला नव्हता तरी तो जगत होता . आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती मिळवायला एवढे कष्ट घ्यावे लागतात . दिनेश तिचा घरी जाऊन मामामामीला विनंती करू लागला पण ते ऐकायला तयार नव्हते . कारण जयाचा हात तिचा आईवडिलांना दिनेशच्या हातात द्यायचा नव्हता . दिनेशने खूप प्रयत्न केले जयाला काही बोलता यायचं नाही घरचांसमोर . दिनेशने जयाचा आणि त्याचा एक फोटो तिचा घरच्याना दाखवला आणि म्हणाला . " ह्या फोटोवर पण तुमचा विश्वास नाही का जयावर मी खूप प्रेम करतो आणि जयाही माझ्यावर तेवढंच प्रेम करते . " पण , तरी घरचे त्याला उलटं रागवतात म्हणतात ." तू आमच्या साध्या भोळ्या मुलीला फसवलं तिला कुठे कळतं एवढं प्रेमाचं . "

दिनेश मुंबईला निघून गेला . त्या नंतर काही दिवसांनीच जायचा वडिलांनी त्याला कॉल केला आणि म्हटले . " ह्या रविवारला तू पाहुणे घेऊन साक्ष्यगन्धासाठी घरी ये . " हे शब्द ऐकून दिनेशला विश्वासच बसतं नव्हता . दिनेश खूप खुश झाला काही दैवी चमत्कार नव्हता घडला तर जया चार चार दिवस उपाशी राहायची शेवटी मुलांचा खुशीतच आईबाबांना स्वतःची ख़ुशी शोधायची असते . प्रेमाला विरोध करून कोणतं असं नवं विश्व् उभारायचं आहे . ताटातूट मानपमानः सहन करून दिनेशला त्याचं प्रेम मिळालं सगाई ही रितीरिवाजाने पार पडली . लग्न लवकरच उरकेल दोन प्रेमींचा नवा संसार एका आनंदचावटवृक्षात बहरून येईल ...

प्रत्येकाला वाटतं आपलं प्रेम यशस्वी वाहवं ..जया आणि दिनेशच्या यशस्वी प्रेमाचा सक्सेस पासवर्ड काय होता माहिती आहे ...#प्रियतमा ...

प्रिय तुझ्यातच माझा जीव .....