हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 8) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 8)

>
मी स्विमिंगसाठी पाच महिने घराच्या बाहेर पडले . कारण आता मॉम एकटी नव्हतीच गिटो सोबत होता आधी सारखं आता दोघांच नातं रुळावर आलं होतं .. मला माझ्या ध्येयाने झपाटून टाकलं होतं दोन वर्षात ऑलम्पिक मध्ये मला सुवर्णपदक मिळवायचं होतं ... हे माझं स्वप्न नाही तर जगणं होतं त्या स्वप्नाचा मी उठता बसता खाता पिता पाठलाग करायची .

जॉन देखील एक महिना आमच्या सोबत वेळ घालवून लंडनला निघून गेला आता तो एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचा मुख्य झाला होता . जॉन नेहमीच घरी पैसे पाठवायला लागला होता आता गिटो आणि मॉमला पैशाची अजिबात काळजी नव्हती त्यांची आर्थिक मदत जॉन भागवायचा .

माझं जॉन सोबत शेवटच बोलनं पाच महिन्यापूर्वी झालं होतं , ऑलम्पिकच्या तयारीसाठी इथे येऊन मी प्रचंड मेहनत घेतं होते . काही सहा महिन्यापूर्वी माझा फोन हरवला तो माझ्याहातून न कळत कसा हरवल्या गेला हेच मला कळत नाही . मॉमकडून जॉनच्या कंपनीचा पत्ता घेतं मी त्याला माझा फोन हरवल्याच पत्र लिहून पाठवलं जॉनला ते मिळालं की नाही हे अद्याप मलाही त्याच्या कडून समजलं नाही .. मी एक महिना जॉनच्या पत्राची वाट बघतं राहिली मग पत्र काही आलच नाही मी आशा सोडून दिली ... मॉमला म्हणावं वाटलं की जॉन ब्रदरला माझ्यासाठी फोन घायायला पैसे मागून पाठव पण वाटलं उगाच नको कुणाला आपल्याने त्रागा . म्हणून मी दोन महिने पार्टटाईम जॉब केला . मॉम गिटो सोबत पत्रातून संवाद व्हायचा पण ब्रदरची खूप आठवण यायची . त्याला हेच वाटतं असावं मी इकडे आली आणि त्याला विसरून गेली .

माझा दोन महिन्याचा पगार मिळताच मी फोन घेतला त्याचा नंबर डायरीत लिहून ठेवला होता नंबर धुंडाळतच मी त्याला माझ्या नवीन नंबर वरून दोनदा तीनदा आणि दिवसभर फोन वर फोन करतं होती . पण जॉन ब्रदर माझा फोन रिसीव नव्हता करतं . आता मी समजून गेली ब्रदर माझ्यावर खूप रागवलेला आहे . दोन दिवस झाले काही कॉल आलाच नाही मी तिसऱ्यादिवशी पुन्हा कॉल केला ..... फोन रिसिव्ह तर केला

‘ हेल्लो ‘ पण हा आवाज मला अनोळखीच वाटला .

मी फोन काटला आणि नंबर तर नाही चुकला म्हणून पुन्हा पडताळून बघितला .. नंबर बरोबरच होता

मी पुन्हा फोन लावला ...

‘ हेल्लो कोण तुम्ही ?? ‘

मी म्हटलं , ‘ जॉन ब्रदर आहे का ? ‘

माझ्या ह्या वाक्यावरच ते म्हणाले , ‘ नाही , पण तुम्ही जॉनच्या कोण ? ‘

म्हणजे हे ब्रदरचे कोणी मित्र असणार ह्याची मला जाणीव झाली .

‘ मी त्यांची सिस्टर , लुसिआ ‘

‘ ओह्ह्ह्ह तू जॉनची सिस्टर आहे , जॉन बद्दल तुला काही कळले नसावे जॉन नेहमी तुझ्या बद्ल मला सांगत राहायचा ..’

मला त्याचं बोलण जरा पेचात पडणार वाटलं ब्रदर बद्दल काय नाही कळले मला , ‘ मी तुम्हाला ओळखत नाही प्लीज मला सांगा ब्रदर कुठे आहे ? ‘

‘ तो अपघातात जागीच दगावल्या गेला ...’

हे ऐकताच माझा माझ्या कानावर आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता मला दुखद धक्काच बसला मी त्यांना म्हटलं , ‘ हे हे ह काय बोलून काय राहिलेत तुम्ही माझा भाऊ कुठे गेला ? ‘

माझ्या डोळ्यातून अश्रुधारांची गळती सुरु झाली आणि त्यांच्याकडून ब्रदरच्या मृत्युच गूढ उलगडत गेलं सार काही संपल्यासारखं वाटतं होतं ..

‘ तुमच्या ब्रदरचा अपघात झाला पंधरा दिवसापूर्वी तो जागीच ठार झाला अपघातात आम्ही त्याची डेंड बॉडी घेऊन तुमच्या घरीही गेलो , तुम्हाला खूप कळवण्याचा प्रयत्न केला तुमच्या मॉमने फादरने पण तुमच्यासोबत संपर्क झाला नाही .. ‘

‘ मला कोणीच कसं नाही सांगितलं त्याच्या बद्ल जॉन ब्रदर मला सोडून नाही जाऊ शकत तुम्ही काय सांगत आहात हे ... ‘

‘ मी खरच सांगतोय , तुम्ही स्वतःला सावरा तुमच्या मॉम तुमच्या प्रतिक्षेत आहेत तुम्हाला पत्र अजून पोहचलेल दिसतं नाही .. ‘

‘ मॉमने मला पत्र पाठवलं होतं ? कधी अजून मला मिळालं कसं नाही , जॉन ब्रदर मला सोडून नाही जाऊ शकत पण ..’

‘ जॉनच्या मरणाची बातमीही पेपरात आली आहे मी खरं तेच बोलतोय , पण ... ‘

‘ पण .... काय ? ‘

‘ जॉनचा मृत्यूदेह खूप भयाण होता त्याला तो जॉनच आहे म्हणून ओळखण कठीण होतं खूप विद्रूप अवस्था झाली होती त्याची ..’

‘ मग मृत्युदेहा वरून तुम्ही त्याला ओळखू शकलात नाही तर तुम्ही कसं काय म्हणू शकता जो माझा भाऊ जॉनच होता ..’

‘ जॉन त्याचं रस्त्याने त्याचं वेळेच्या दरम्यान पायी निघाला होता भरधाव वेगात येणाऱ्या सुमोने त्याला चीरगळले .. आम्ही जॉनची रूम वर रात्रभर तो येईल म्हणून वाट बघू लागलो दुसऱ्या दिवशी समजले आमच्या एरियात एका तरुण युवकाचा अपघात झालय . ‘

‘ पण तो जॉन ब्रदर नसून दुसरे कोणी तरी असेलं . ‘

‘ तो जॉन नाही तर मग दुसर कोण आहे त्या मुलाच्या छातीवर जॉन हे अक्षर कोरलेलं होतं बस्स तेवढच ओळखता आले आम्हाला आणि आम्ही हॉस्पिटल मधून त्याची बॉडी आमच्या ताब्यात घेतली . तो जॉन नाही तर जॉन गेला कुठे मग आम्ही खूप शोधलं जॉनला मग तो कुठेच कसा मिळाला नाही ..’

‘ तुम्ही म्हणता जॉनच्या हार्टवर काही जॉन नाव कोरलेलं होतं ? जॉनला असं काही कोरून घेन कधीच आवडत नव्हतं .. आणि हे गिटोला नक्की माहिती असेलं त्यांनी काय सांगितलं ? ‘

‘ फादर म्हणालेत जॉनने असं नाव कधी कोरलेलं नव्हत पण तिकडे गेल्यावर कधी कोरलं असेलं त्याची कल्पना आम्हाला नाही . ‘

मी फोन ठेवला आणि घरी जायला निघाली मॉमच पत्र ही मला मिळालेलं नव्हतच . जॉन ब्रदरची डेंथ तू मला सोडून जाने शक्यचं नव्हते कारण खूप दिवसाच खूप काही बोलायचं राहून गेलं त्याच्या तोंडून खूप दिवस झाले सिस्टर हा शब्द मी ऐकला नव्हता तो मला न सांगता माझ्या सोबत शेवटच काहीच न बोलता असा अबोला धरून नाही जाऊ शकतं .. मग ते वर्तमानपत्रात आलेली बातमीही खोटीच होती जॉनच्या अपघाताची जॉन ... जॉन आपले स्वप्न त्याचं लिखाण त्याने डायरीत लिहून ठेवलेल्या प्रत्येक कविता लेख प्रेरणा देणारी भावस्पंदने माझ्या भावाला कधी हरू देणार नव्हती ... खूप काही करण्याचे स्वप्न मागे सारून तो त्या मृत्यूच्या श्येला खिळला असेलं छे छे ! कसं शक्य आहे ?

माझ मन सांगत होते त्या वेळेला माझा भाऊ आहे इथेच कुठे तरी तो आहे तो मला सोडून कुठेच नाही गेला त्या मृत्यूला तरी मी ओरडू ओरडू त्या क्षणाला म्हटलं , माझ्या भावाचा ह्या धर्तीवर जन्म झाला तो फार पुण्यवान होता त्याने किती वेद्नाचे व्याप सोसले तरी तो ह्या जिंद्गी सोबत लढतच राहिला आजही तो लढतच असावा ..... कुठे असेलं माझ्या भावा तू काय करत अशील अरे तू जाताना कुठे निघून गेला माहिती नाही रे पण हे जग मला काळजाला रुतेल असं बोलू लागलं माझी बहिण होण्याची लायकी काढत माझ्या पवित्र्यावर जाऊ लागलं कवितेसारख माझं पवित्र बंध नव्हतं म्हणे तुझा मित्र मी तुझ्या मयतीला नाही आली तर ... अररे तू मला सोडून कुठे जाऊच शकतं नाही तर ही लोक तुझ्या प्रेतयात्रेसाठी मला अनापशनाप बोलत होती . असख्य विचार घुटमळतात मनात . तू आल्यावर सांगशील तुझ्या त्या मित्राला लायकी ते माझ्या लायकीवर गेलेत ह्याच दुख नाही रे तू परत ये जॉन तू परत ये माझ्या भावा जगाला ह्या बहीणभावाच्या नात्याची तू किंमत कळू दे आणि तुला माझ्यासाठी यावच लागेल .

तुझा तो मित्र मला सांगत होता तू माझ्या वाढदिवसाची कविता आधीच आपल्या डायरीत लिहून ठेवली होती म्हणून ..माझा वाढदिवस असला की नेहमी तू नेहमी बारा पर्यंत जागून राहायचा ना तुला माझी जन्म तारीख ठाव होती . इथून ब्रदर माझा वाढदिवस दोन दिवसावर येऊन ठेपला आहे ..

तू परत येशील ही आशा वृद्धिंगत मनाशी खुणगाठ बांधत मी घराकडे निघाली ...

दोन दिवसाचा माझा प्रवास सुखर झाला मॉमला आणि गिटोला कधी भेटते असं झालय विचाराची कालवाकालव आणि जॉन ब्रदरचे विचार अजूनही रेंगाळतच होते .

मी घराच्या गेट जवळ पोहचताच मॉम माझ्या जवळ येत तिने मला घट्ट पकडून घेतले ती अश्रू ढाळत होती . माझ्याही डोळ्यातन आसवं गळत होती . मॉम माझ्या पासून दूर होतं म्हणाली , “ बेटा लुसिआ , आपला जॉन आपल्याला सोडून निघून गेला ग मी त्याच्या अंतिमसंस्कारला तुला बोलवून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण गिटो आणि मी असफल झालोत .. “

मी मॉमला सावरत म्हटल , ‘ मॉम प्लीज अशी दुखी नको होऊ मला सर्व त्याच्या मित्रांनी फोन वर सांगितलं गिटोचाच मृत्यूदेह होता हा तुम्ही सर्वांनी खोडसाळ दावा कसा तरी केलाय ग ? ‘

मी आत जात गिटो ही हंबरडा फोडू लागला , ‘ जॉन आपल्याला सोडून कायमचा निघून गेला म्हणून .’

दोन दिवस घरात नीरव शांततेची भयाणता जळत असल्या सारखं वाटतं होतं आज माझा वाढदिवस होता हे देखील मॉम आणि गिटो विसरलेत .. मी त्या सायंकाळी किनारपट्टीवर जाऊन बसली 

लाटा डोळ्यासमोर उसळताना पहिल्यांदाच ते दृश्य निरखून बघतं होती .. जॉनचा सारखा चेहरा त्याचे विचार त्याचा आवाज लाटांच्या उसळत्या गर्दी समवेत मला खुनावत होत्या ..

जॉनची आणि माझी आयुष्यात झालेली ती शेवटची आणि अखेरची भेट असावी का ?

माझं मन का नाही मानत आहे , माझं मन आजही सख्या माझ्या त्या भावासाठी वेड आहे . ह्याच किनारपट्टीवर मला मरणाच्या दारातून बाहेर काढलं होतं . तेव्हा मला वाचवायला तुझ्याशिवाय कोणीच नाही आलं . तुझं निस्वार्थ प्रेम होतं ..मला जीवनदान देणारा माझा भाऊ तो च मला एकटीला टाकून निघून जाऊ शकतो .. जॉन प्रेम तर खूप करायचा न रे तू आपल्या ह्या बहिणीवर एकदा माझा जुना फोन असतानी त्या फोन वर तू आय लव यु सिस्टर म्हणून एक संदेश पाठवला .. किती प्रेम करायचा तू आपल्या बहिणीवर आतोनात तो तुझा संदेश बघून मी काहीच रिप्ले न देता कानाडोळा केला . आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो हे त्याच्या समोर व्यक्त होणं किती गरजेच असतना ! तू मात्र माझ्या समोर बोलून गेला मला तुला ल्व यु टू ब्रदर म्हणायचं आहे जॉन ब्रदर ... जॉन ब्रदर आपल्या बहीण भावाच्या नात्यात कमालीची आपुलकी आणि जिव्हाळा भरभरून त्या परमेश्वराने ओतला .

मी एकटीच काही तरी बडबडत होती मध्यंतरी सूर्य क्षितिजाच्या पल्याड गेला . पक्षी घरट्याकडे जायला रवाना झाले होते .. काळोख विळखा घालत होता . त्या नावेच्या दिशेने मला कोणी तरी मुलगा येताना दिसला पण आता जॉन सोडून माझ्या मनात कोणताच विचार नव्हता त्या अंधारत ती आकृती काही पुसटशी माझ्याकडे येताना दिसत होती . मी खवळनाऱ्या लाटेत जॉनचा ब्रदरचा चेहरा धुंडाळत होती . एवढ्यात मागून आवाज आला , “ लुसिआ सिस्टर , मी आलोय बघं आजही ह्या लाटांच्या गर्दीत आपल्या भावलाच शोधते आहे न ! “ माझ्या अंगावर शहारे आले गतकाळच आठवणीच वलय उभरत होतं ... ब्रदरचा तो ओळखीचा आवाज कानाला स्पर्श करून गेला मी उठली बघते तर जॉन ..... माझा जॉन ब्रदर उभा होता माझ्याकडे बघत डोळ्यातली आसवं पुसत मी क्षनभराचा विलंब न करता धावत त्याला जाऊन आपल्या कवेत घट्ट पकडून घेतलं , “ माझ्या भावा कुठे गेला होता तू मला अचानक असा एकटीला टाकून माझा कुणावरच विश्वास नव्हता मला वाटलच तू येशील माझ्यासाठी तरी .....”

माझी आसवं पुसत तो म्हणाला , “ लुसिआ , माझी लाडकी सिस्टर तुला सोडून मी कुठे जाईल बरं परमेश्वर सुद्धा आणि मृत्यू सुद्धा त्या दिवशी आपलं प्रेम बघून ह्ळहळला ग आणि त्यांनी तुझ्या ह्या भावाला तुझ्या पर्यंत पोहचतं केलय बघ ....” 

“ ब्रदर तू कुठे एवढे दिवस होतास ? “

ह्या वर जॉन ब्रदर मला हसतच म्हणाला , “ आधी घरी चल बघू मग सर्व सांगतो तुला त्या दिवशी माझ्यासोबत काय घडलं ते . “

ब्रदर आणि मी घराच्या दिशेने निघालो तो मला सोडून कुठेच जाणार नव्हता हा माझा आत्मविश्वासच त्याला माझ्या पर्यंत पोहचवायला पुरेसा होता मन जे मानतं न शेवटी तेच घडतं ... जॉन ब्रदर च्या परत येण्याने माझ्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहात होता .. जॉन माझ्या सोबत होता हिच गोष्ट मनाला सुखद धक्का देऊन जात होती ...

मी आणि जॉन ब्रदर आम्ही घरात शिरतच होतो मॉम आणि गिटो चेहऱ्यावर काळजी च सावट घेऊन विचारात मग्न बसलेले होते . मी मॉम आणि गिटोला आवाज देत म्हटलं , “ मॉम फादर , जॉन ब्रदर परत आलाय बघं .....! “