हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 9) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 9)



“Knock, And He'll open the door Vanish, And He'll make you shine like the sun Fall, And He'll raise you to the heavens Become nothing, And He'll turn you into everything.” ― Rumi also said


the long डार्क - माझ्या प्रिय वाचकांना समर्पित

_________________________________




तरुणपणात घडलेला अपराध त्याला नाबालिक ( juvenile ) म्हणून त्याच्यावर लादलेले सर्व गुन्हे माफ करतो .

त्या झालेल्या किरकोळ घटनेला विसरून तो पुढे जातो त्याच्या आयुष्याच्या वळणावर तो एक रोमंकित द मॅन

ऑफ डेस्टिनी म्हणून गाजलेला नावाजलेला तरुण ... त्याला नियती आणि नशिबानेच तर शेवटी घडवले होते ...

@@@


रात्रीचे बारा वाजले होते .... सर्वदूर काळोखाने विळखा घातलेला .... भयाण शांततेचं साम्राज्य ....

हिमवर्षा होण्याचे संकेत मेघ देतं होता .... थंडीने कुडकुडतं फेलिक्स अंगात मऊ ऊब 

देणारं जॅकेट घालून हॉस्पिटलच्या बाहेर पडतं होता ... कोणीतरी मागून त्याला आवाज दिला ... 

डॉक्टर फेलिक्स ब्राईम प्लिज स्टॉप इट वॉल्क आय वॉन्ट टॉक टू यू .... तो तसाच आवाजाच्या दिशेने

मागे वळला ... 

आवाज तसा अनोळखीच होता .... कोणी तरी त्यांच्याच वयाचा तरुण नोकरीच्या शोधार्थ त्याच्या 

जवळ आलेला होता .... मदतीचा हात मागायला ....

" तुमच्या ह्या हॉस्पिटल मध्ये मला नोकरी मिळेल काय ? " अडखळतचं त्या तरुणाने आपला आर्थिक 

प्रश्न फेलिक्स समोर मांडला ...

" व्हॉट टाईप ऑफ वर्क यू लाईक टू डू .... " त्या तरुणाची कशात काम करायची रुची आहे हे फेलिक्स

सर्वप्रथम जाणून घेतं होता ..

" एनी वर्क ... डॉक्टर .... "

गळ्यातला स्टेथ्सकोप त्याच्या हातात ठेवतं फेलिक्स त्या तरुणाला हसतच म्हणाला , " ह्याचा भार सांभाळू शकशील मित्रा ?? "

हात मागे सारत तो तरुण उद्गारला .....

" ह्याच शिक्षण आम्हाला नाही .... त्याला तुम्हीच पात्र ठरू शकता ... लहान मोठं वेटरच काम असल्यास द्या ! "

" डू यू नो हॉउ टू कूक ?? "

असा प्रश्न फेनिक्सने त्याला का केला असावा .... कारण तो गेली एक आठवडा कूकिंग मास्टर बॉयच्या शोधात होता ..

" एस आय कॅन कूक ....लॉट्स ऑफ फिश , फ्रेश वेगीस , पास्ता , लेंगुम्स , ब्रेड्स अँड आय अल्सो लर्न सम ट्रॅडिशनल ग्रीक डिशेश .... "

त्याला मधातच थांबवत फेलिक्स म्हणाला ,

" ओह्ह्हह्ह गुड जॉब फॉर यू ..... उद्या पासून माझ्या घरी ये . "

तो तरुण आनंदाने चक्क उड्या मारू लागला ... 

" थँक यू डॉक्टर ..... थँक यू सो मच .... "

समोरच्या रूम मधून फेनिक्सला तो चेहरा दृष्टीस पडला क्षणभर तो घामाने चिंब ओलाच झाला त्याच्या समोर उभा असलेला तो 

तरुण म्हणाला , 

" काय झालं डॉक्टर ?? " जाकेट मधला स्कार्प काढत फेनिक्सने आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला ... आणि त्या तरुणाला

म्हणाला , 

" तू निघ आता उद्या भेट घरी ... " त्याच्या हातात आपलं कार्ड ठेवतं फेनिक्स त्या रूमकडे निघाला ... पण तिथे पोहचताच

तो चेहरा अदृश्य झाला होता ... त्या रूम मध्ये प्रवेश करताच तो सारखा कुणाचा तरी शोध घेत होता पण कुणाचा ?? 

" सिस्टर .... सिस्टर यू लुक वन यन्गर गर्ल ?? " तो त्या रूम मधल्या नर्सला विचारता झाला ....

" नो ... डॉक्टर . " ती पेशंटला उठवत म्हणाली ...

तो झपाझप पाऊले टाकतं बाहेर पडला ... कारच्या दिशेने ... कारचा दरवाजा उघडतं तो आत बसला .... पण , त्याचे दोन्ही हात

कारच्या विलवर थरथर कापत होते ... बाहेर अति मंदधारेने स्नो पडतं होता ... 

" माझ्या बालपणातला तो चेहरा माझ्या अल्लड चुकांच्या विळख्यात अडकलेला बालिश पण , तोच तो चेहरा आज माझ्या

तारुण्यात आला .... नाही ... तिचं अस्तित्वच असणं शक्य नाही ... पण तिची चूक काय होती ?

माझी शिकार झाली होती ती ...

माझ्या थैमान घातलेल्या मेंदूच्या जभळ्यात वाईनच्या नशेची प्याला बनली होती ती .... त्या दिवसापासून .... त्या दिवसापासून

मी आजतागायत वाईनच्या बाटलीला साधा हाताचा तळवा लागू दिला नाही .... एक एक घोटासाठी वाईनच्या तरस्त राहिलो मी ... तिला पुन्हा पुन्हा

उपभोगण्यासाठी दहादिवस सारखा झुरत होतो कैदी बनून ... पण , त्या कैदीवासातून माझी सुटका झाली माझ्यातल्या 

नाबालिकाने मला मुक्त केलं ... आणि त्या तिच्यातल्या देहाने मला वासनेपासून कायमचं परावृत्त केलं .... एखादी व्यक्ती अनैतिक जीवन शैली

आचरत होती तर अशावेळी पश्चात्ताप करणे अगदी उचित ठरेल परंतु एखादी व्यक्ती नैतिकरीत्या शुद्ध जीवन जगत असली तरीसुद्धा तिने पश्चात्ताप केला

पाहिजे हे माझ्या मनाला तिने पटवून दिलं ... आजही ती माझ्यासमोर आली तरी मी तिला स्पर्श्य करू शकणार नाही ... माझे हात कोणत्याही 

स्त्री देहाला स्पर्श्य करण्याधी थरकपाचा तांडव करेलं .... तिला कसं सांगू मी ह्याचं तर माझ्या हाताने तिला उध्वस्त केलं जगण्यातून आणि आज 

मी जगतो आहे जगजेता म्हणून .... 

एका तेरा वर्षीय चिमुरडीचा गळा घोटून .... मला डॉक्टर , जग विख्यात ... डेस्टिनी म्हणून नावं कमवायचं होतं .. छे छे छे !

तिच्या माफीच्या लायकही नसेल मी ... पण , त्या घनघोर अंधारात मी तिला एकटीला टाकून का निघून आलो त्या रात्री ? ?

माझी माणुसकी मला छळत होती .... माझ्यातला माणूस मेला होता तेव्हा आणि आज मी स्वतःलाच विचारतो ...

आजचा हा फेनिक्स कोण ?? नरपशू की जगातल्या मला जाणाऱ्या लाखो लोकांच्या त्या भोळ्याभाबड्या हृदयावर राज करणारा फेनिक्स ....

पण आज अठरा वर्षा नंतर तो निरागस चेहरा माझ्या दृष्टीस का पडावा ? ती माझा पाठलाग तर करतं नाही ना ! माझा सूड घ्यायचा

असेल तिला .... नाही सूड घ्यायचा असता तिला तर एवढे दिवस तिने मला जगू नसतं दिल पण मी .... त्या काळ्याकुट्ट 

काळोखात तिला जंगली जनावरांना खाण्यासाठी मृतावस्थेत सोडून आलो तिथून ती येणे शक्य नाही ... त्या रात्री मी तिच्या प्रेमात तल्लीन झालो

होतो की वासनेच्या अग्नीत स्वतःला जाळून घेतं होतो ? " फेनिक्सच्या मनात विचारांची कालवाकालव सुरु झाली .... 

तो कारचा दरवाजा उघडून पुन्हा एक एक पायरी चढतं त्या रूमच्या दिशेने जातं होता ... जिथे तिची आकृती त्याला झळकली होती ...

तो ज्या वेगात तिला शोधायला निघाला तेवढ्याच वेगाने ती त्याच्या जवळ येतं होती ...

ब्लँक स्कर्ट आणि व्हाईट फॉर्मल घालून ती त्याच्या अगदी नजरेसमोर आली .... फेनिक्सचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसतं नव्हता

ती आणि त्याच्या समोर साक्षात उभी ... पण , ती त्याच्या पासून दूर दूर जातं होती .. दहा पाऊल ती मागे सरसावतच तर भीतीला टकरावली

....

( मागे होता तो भूतकाळ फेनिक्सने दिलेल्या यातनांचा ... )

फेनिक्स जागेवरच त्या चाबकाचा मार आठवतं विव्हळत होता ... स्वतःशीच तो पुटपुटला ह्या चाबकाच्या मारापेक्षाही मी तुला यातना दिल्या

ना ! 

" कोण तू माझी त्या रात्री वाटेत का आली माझ्या तुझं नावं ही मी जाणत नाही ?? "

तिच्याकडे बघतं फेनिक्स म्हणाला .... 

" रोझा माय नेम .... "

तिचं नाव ऐकून फेनिक्स म्हणाला , " यू रोझा .... त्या रात्री वाचली माझ्याहातून आणि मी तेच पाप घेऊन स्वतःला तुझा गुन्हेगार

समजतं आजवर जगतं आलो .... " 

" तू जगण्यातून त्याचं रात्री मला मारलं .... खूप सोपं होतं ना तुझ्यासाठी एका तरुणपणाच्या उंबरठा ओलांडणाऱ्या माझ्या सारख्या मुलीला

जगण्यातून निलाम करतं स्वःत मात्र डॉक्टर होऊन इतरांना वाचवणं .... "

" रोझा .... मी तुझा गुन्हेगार आहे .... " 

दोन्ही गुडघे टेकत दोन्ही हात एकमेकांना जोडून घेतं तिला जणू शरण जावं या कृतघन्यतेत फेनिक्स तिची माफी मागत म्हणाला ... 


" मला माफ कर ..... चॅम्प त्या रात्री तू रोझाला नाही एका मॅडजिनिअसला छळलं त्या घटनेनेच तुला जगणं शिकवलं तो तू माझ्यावर केलेला बलात्कार होता कि प्रेमाच्या आवेगात येऊन तुझ्या हातून घडलेला गुन्हा .... "


असं म्हणतच रोझा तिथून निघून गेली ......


तिच्या जणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे फेनिक्स बघतच राहिला .....