हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 7) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 7)



आम्ही तिघांनी अर्धी रात्र त्या किनारपट्टीवरच घालवली . मी मॉमच्या खांद्यावर डोकं ठेऊन बसलेली होती माझ्या बाजूला जॉन ..तो खोड्या करतं होता त्या बालपणीच्या खोड्या आमच्या आज पूर्ण होत होत्या आणि मी मॉमला सांगत होती मॉम बघ ना ब्रदरला . गिटो काहीच न बोलता हसतं होता आमच्याकडे बघून . जवळ जवळ मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही किनारपट्टीवरून घरी परतलो ते पाऊस आल्यामुळे . मला पावसात भिजायचं होतं आणि जॉन म्हणतं होता , " आता कुठे पाऊस पडायला सुरवात झाली अन घामाच्या धारा ओघळून निघू लागल्या ये तू चल हा लवकर इथून लुसिआ पावसात भिजायचं नाही अजिबात ... " मी त्याच्याकडे बघतं मॉमला आणि गिटोला म्हटलं , " हे मॉम गिटो , सांगना ह्या माझ्या भावाला काही मला पाऊस किती आवडतो ते हा आहे कि मला पावसात नको भिजू म्हणतं आहे . "

ह्या माझ्या बोलण्यावर जरा माझ्यावर रागवण्याचा आव आणत गिटो म्हणाला , " अरे तो अगदी बरोबर बोलतं आहे लुसिआ तुला पावसात भिजायला नको हा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस आहे .. " 

ओह्ह्ह गिटो ... तू पण ना ब्रदर कडूनच बोलशील . चला इथून लवकर पाऊस मोठ्यांनी पडायला सुरुवात होण्याच्या आधी आपल्याला इथून घरी जायला पाहिजे असं म्हणतं मॉम निघाली घराच्या दिशेने आम्ही तिच्या मागे निघालो . 

मौज मज्जा करून आम्ही थकून गेलो निवांतपणाची चादर ओढत सर्व झोपी गेलो . 

आज जॉन त्याच्या नव्या कंपनीच्या कामासाठी जाणार होता . माझी आणि जॉन ची भेट वर्षभर तरी होणे आता शक्य नव्हते .

दिवस उजाडला तो नैराश्याच मातंग घेऊनच .. जॉन निरोप घ्यायला माझ्या रूम मध्ये आला .

" हे डियर नाराज आहेस माझ्यावर ? तुझ्या नाराजी मागचं कारण सहाजीकच आहे . "

" जॉन ब्रदर , भेट कशी घडवून आणते ना ही नियती आणि दुरावा ही हिच ओढवून आणते आता बघं ना तुचं पहिल्यांदा आपली भेट झाली , मी तुझ्यावर नाराज नाही रे ब्रदर मला पण स्विमिंग क्लाससाठी जायचे आहे पण आपली वर्षभर भेट होणार नाही ह्याच दुख वाटते . " 

" हो लुसिआ , दुख मनात बोचतच पण तुला स्वतःची वेगळी अशी इमेज निर्माण करायची आहे , मी तुझ्या निर्णयाशी सहमत आहे . आणि मला ठाऊक आहे तू घेतलेला निर्णय योग्यच आहे . ज्या कर्तुत्वाने आपली मान गर्वाने उंचावणार असेलं ते कार्य करावं . पण गर्वाच्या मोहपाशात न अडकता पाय खोलवर जमीनत रुजवावे . म्हणजे आपण उंच भरारी घेतली तरी गर्व शिवणार नाही .. आणि तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे . " 

" हो जॉन ब्रदर मी तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही . "

" काळजी घे स्वतःची निघतो मी .. " 

माझा निरोप घेत जॉन बाहेर पडला मी ही मॉम गिटो सोबत त्याला निरोप द्याला गेट पर्यंत गेली , जॉन निघून गेला घरात पाय ठेवल्यावर घरात अगदी शांतता पोखरत होती . मला घरात उदासवाणे वाटू लागले अख्खा दिवस मी चित्र रेखाटत बसली . 

सूर्य क्षितिजाच्या पल्याड गेला होता . पक्षी घरट्याकडे रवाना होत होते .. मॉम चा आजच्या डिनरला चिकनफ्राय बनवण्याचा बेत होता . मी किनार्यावरून येते अस तिला सांगत घराच्या बाहेर पडली ..

किनाऱ्यावरची वाळू मऊ भुसभुशीत तळपायाला दाह देऊन जात होती ... कानाभोवती घोगावणारा वारा अलगद अंगाला शिवत गारवा देऊन जात होता . माझ्या मनातली भयाण काळेलोट ही समुद्राची लाटच वाहून नेत होती ... मी त्या सृष्टीच्या सानिध्यात स्वतःला भाग्यवान समजायची . ह्या निसर्गानेच मानवाची निर्मिती केली ... 

दोन बघायला सुंदर डोळे ह्या समुद्राच्या निळ्याशार पाण्याचा बंध आपल्या केमेऱ्यात कैद करून घेऊ शकणारे , त्या खळखळाटाचा ध्वनी आपल्या कानांनी ऐकत त्या सप्तसुरात स्वतःला मंत्रमुग्ध करून घेणार हे मन .. निसर्गातील प्रत्येक घटकांची निर्मिती किती रहस्यमय आणि अल्हादायी आहे नाही !

मी उंच फेकणाऱ्या लाटाना न्याहाळत बसली . एवढ्यात खडकावर माझ्या बाजूला गिटो येऊन बसला . 

आज मला गिटोकडून त्याची आणि मार्टिना मॉमची प्रेमकहाणी जाणून घायची होती . गिटो मला म्हणाला , " जॉन गेला तर तुला उदास वाटत असेलं घरात हो ना ? " 

" हो गिटो पण माझी उदासी आता तू दूर करणार .."

" मी तुझी उदासी नेहमीच दूर करायला मदत करीत असतो .. "

" गिटो मला तुझी आणि मॉमची ल्व स्टोरी जाणून घायायची आहे सांग ना आज .. "

" आज नाही नंतर कधी तरी सांगतो ... "

" गिटो आज सांगायला काय झालं तुला ? " 

गिटो त्याच्या भूतकाळात हरवला तो आपला गेलेला काळ उघडकीस आणून देत मला म्हणाला 

" बर बर सांगतो ऐक ... मी जवळ जवळ वीस वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट , आम्ही टूरीस्म म्हणून southern वर फिरायला आलो माझी मॉम मी आणि फादर तुझी आत्या लेझी , लेझी फादर सोबत खाण्याचे जीन्स घ्यायला गेली . मी मॉम सोबत किनारपटीवर समुद्राला न्याहाळत उभा होतो ...ती एकटीच येत होती मर्मिट असतेना अगदी तशीच ती मला दुरून येताना दिसत होती माझ्या काही अंतरावर दूर ती येऊन उभी , समुद्राच्या लाटा न्याहाळत होती . 

मी तिला बघातच क्षणी भांबावून गेलो . मॉम मला म्हणाली , " बेटा गिटो मी लेझी कडे जात आहे तू थांबत असेलं इथे तर थांब नाही तर चल माझ्यासोबत ." मॉमला मी म्हणालो , " नाही तू जा मी येतो मॉम तुझ्या मागेच .. " मॉम मला एकट्याला टाकून निघून गेली . मी त्याचं क्षणी तिच्याजवळ जाऊन उभा राहात आपला मैत्रीचा हात समोर ठेवत म्हणालो , " हे मी गिटो , तू माझी फ्रेन्ड होशील ? " त्यावर ती मला म्हणाली , " ,मी तुला ओळखत पण नाही ? " पण तिने तिचा मैत्रीचा हात मला दिला नाही मी म्हणालो , " काही हरकत नाही मी तुझ्या फ्रेन्डशिपसाठी वाट बघीन .. " दुरून तिची आई येताना दिसली दूरवर तिच्याकडे बघत ती म्हणाली , " मला आवडेल तुझ्यासोबत मैत्रीचे नाते प्रस्थापित करायला .. " तिची आई जवळ येतच म्हणाली , " मार्टिना चल इथून आपल्याला निघायचे आहे . " ती मॉम थांबना म्हणाली , एवढ्यातच तिच्या आईने तिचा हात धरला आणि तिथून तिला घेऊन गेली . मार्टिना तिचे नाव माझ्या कानावर पडले जातांना ती सारखी मागे वळून माझ्याकडे बघत होती . त्या नंतर मार्टिना मला भेटायला त्या किनारपट्टीवर परत येईल म्हणून सारखा तिथे जाऊन तिची वाट बघायचो पण ती मला भेटायला नाही आली . एक महिन्यातच माझ्या फादरची ह्या गावातून बदली झाली . आम्हाला हे शहर सोडावे लागले . " मधातच त्याला थांबवत मी म्हणाली , " गिटो मग मार्टिना मॉम तुला कधी भेटली आणि कुठे ? "

काही क्षणाचा आढावा घेत गिटो पुन्हा सांगायला लागला , " भेटली ना ती फादरची ज्या शहरात बदली झाली ती काही योगायोगानेच म्हणावं लागेल नियतीला मला आणि मार्टिनाला एकत्र आणायचे होते . आपल्या पेक्ष्या येणारा काळ आणि वेळ चतुर असते .. त्या शहरात जाऊन मला एखाद्या भरकटलेल्या रस्ता भुललेल्या वेड्यागत वाटत असे . तिथे जाऊन मला अजूनही मार्टिना नजरेसमोर दिसत होती . एक दिवस मी बाकड्यावर बसून तिच्याच विचारात गुंतलो होतो ... मार्टिना आता कुठे असेलं बर ? ती कशी असेलं ? एवढ्यातच फुलपाखरू कस हवेत उडतं तशीच ती एखाद्या फुलपाखरा प्रमाणे बागडत आली .. माझी आणि तिची नजर नजरेला भिडली आणि चेहऱ्यावर हास्य फुलवत आनंदाने बागडत ती माझ्याकडे झेपावत म्हणाली , " गिटो ......... तू इथे कसा काय ? इथे काय करत आहे ? आपण त्या दिवशी किनारपट्टीवर भेटलो ना सॉरी मला तुझी फ्रेन्ड व्हायचं त्या दिवशी पासून तुझी खूप आठवण येत आहे , आता म्हटल तू मला आयुष्यात कधी भेटशील की नाही .. " ती क्षणभरात किती काही बोलून गेली आपल्या मनातली अडगळ पुसून टाकली तिने माझ्यासमोर असं व्यक्त होऊन ... 

मी तिला म्हणालो , " अंग हो हो जरा मला पण बोलू देशील कि नाही ....कळतंय मला तुझ्या मनातल्या भावना माझ्या मनाशी सांगड घालतंय त्या काय जणू तारकांच्या हव्यासात मैत्री चा बंध विसरतील ??... "

" नाही नाही रे गिटो आता माझ्यासोबत बेस्ट फ्रेंडच नातं तू निभवशील ??"

आणि मी तिच्याकडे बघत म्हणालो , " तू म्हणशील तर आजन्म तुझा जीवनसाथी बनून राहील .." आमची ही दुसरीच भेट आणि तिला वाटलं मी काहीही वायफळा सारखं बोलतं आहो म्हणून ती म्हणाली , " मैत्रीचं नातं पुरे आहे ... " ती आता रोज मला त्या गार्डन मध्ये भेटायला येऊ लागली . 

एक दिवस ती आणि मी southern च्या ओशेन वर जायचं ठरवलं त्याचं किनारपट्टीवर जिथे आमची पहिली भेट झाली होती . 

आमची मैत्री होऊन एक वर्ष झालं , सायंकाळच्या कातरवेळी त्या किनारपट्टीवर दोघही प्रेमपाखर जाऊन हितगुज साधू लागलो तेव्हा मनाला जाणवत होत आमच्यात मैत्रीचं नात आहे की प्रेमाचं ?? प्रेमाचं नातं असावं तर एकदुसऱ्याला बोलूनही न दाखवलेलं .. आज मी ठरवलं तिला प्रपोज करायचं .