Gullak books and stories free download online pdf in Marathi

गुल्लक - गुल्लक...

स्पृहा… एक बारा तेरा वर्षांची मुलगी. आठव्या वर्गात शिकते. बाबा नोकरी करतात. आई गृहिणी आहे…स्पृहा अगदी सालस मुलगी. थोडी हट्टी आहे पण गुणी आहे. 
शर्मिष्ठा...शर्मिष्ठा म्हणजे स्पृहाची आई. शर्मिष्ठाने स्पृहाला चांगले वळण लावले आहे. चांगले संस्कार, चांगली शिकवण दिली आहे.
एकदा स्पृहा शाळेत जाण्याची तयारी करत असताना पैसे मागण्याचा हट्ट धरला….. ती शर्मिष्ठाला म्हणाली….
स्पृहा :- आई मला १०० रुपये दे ना... शाळेत द्यायचे आहेत...
शर्मिष्ठा( स्पृहाचि आई) :- अग पण परवाच दिले ना स्पृहा मी तुला पैसे, काय केलंस तू त्याच..?? तू शाळेत दिले नाहीस का ते..??
( स्पृहा खाली मान घालून उभी होती). 
अग काय विचारतेय मी..??
स्पृहा :- ते खर्च झाले माझ्या कडूंन...
शर्मिष्ठा :- काय केलंस त्याच..? असे कसे खर्च झाले..?? नेमकं काय घेतलंस तू…?
स्पृहा:- मला मोरपिसांचा पंखा खूप आवडला, मी तो विकत घेतला, म्हणून खर्च झाले... तुला माहितीये ना आई मला मोरपीस किती आवडतात ते…!
शर्मिष्ठा:- अग पण आता ती वस्तू घेणं गरजेचं नव्हत.. आधीच तुझ्याकडे खूप आहेत… मृआ मान्य आहे तुला मोरपीस खूप आवडतात, पण शाळेत द्यायचे पैसे शाळेतच द्यायला हवे होते. प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं महत्व असतं, आणि हे तुला आता कळायला हवं स्पृहा…! तू मोठी झालीय आता.
स्पृहा:- काय ग आई सतत पैशांसाठी कुरबुर करत असतेस. माझ्या मैत्रिणीच्या आई बघ कशा पैसे देतात त्यांना हवे तेव्हढे.
शर्मिष्ठा:- अग मग मी काय तुला कमी करते का…? सगळच मिळत ना तुला ही... तुझ्या सगळ्या इच्छा, सगळे हट्ट पूर्ण होतातच की इथे. 
स्पृहा :- हो पण तरीही किती ओरडतेस . आणि आता देतेय ना मला पैसे. 
शर्मिष्ठा:- नाही. वायफळ खर्च करायला मी अजिबात पैसे देणार नाही. तुला पैशांची किंमत कळायलाच हवी. तुला महिन्याची pocket money सुद्धा मिळते. आमच्या वेळी आम्हाला ते ही नाही ग मिळायचे.. पण आम्ही योग्य ठिकाणी, हवे तिथेच पैसे खर्च करायचो बाळा...
स्पृहा:- आई please मला उगाच तुझं भाषण नकोय. तुमच्या वेळेस नव्हते पैसे आजी आजोबांकडे, म्हणून तुम्हाला नाही मिळायची pocket money.
( शर्मिष्ठा ला जरा वाईटच वाटतं होत स्पृहाच्या वागण्याचं. आणि आश्चर्य ही….कारण तिने आजवर स्पृहाला असं उलट बोलतांना बघितलंच नव्हतं. तिने शब्द कंठात गिळत शांतपणे स्पृहाला पैसे देण्याचं ठरवलं. कारण शाळेत पैसे देणं महत्त्वाचं होतं.)
( शर्मिष्ठा मनातच म्हणाली, संध्याकाळी समज द्यावीच लागणार).
शर्मिष्ठा :- बरं बाई, चिडू नकोस. देते मी तुला १०० रुपये. मग तर झालं. 
शर्मिष्ठा :- ( स्पृहाला पैसे देत म्हणाली) खुश..?? वेडाबाई. आणि आता तरी हे पैसे शाळेतच दे. ( आणि गोड हसली)
स्पृहा:- हो. Thank u आई. (थोडा वेळ विचार करून स्पृहाने आईला प्रेमळ हाक दिली) 
आईssss.. ऐक ना. मी काय म्हणते. 
( तेवढ्यात आई स्पृहाला थांबवत म्हणाली)
शर्मिष्ठा :- पुरे हा स्पृहा. तुला परत काहीही पैसे मिळणार नाही आणि हे दिलेले पैसे ही शाळेतच दे. दुसरीकडे कुठेही खर्च करू नकोस.
स्पृहा:- नाही ग आई. मला दुसर काही बोलायचं आहे. 
शर्मिष्ठा :- बर बोल.
स्पृहा:- आई,  माझी मैत्रीण आहे ना ती पल्लवी, ती तिच्या बाबांना वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देणार आहे. आपल्याकडे पण बाबांचा वाढदिवस येतोय, मलाही बाबांना गिफ्ट द्यायचं आहे.
शर्मिष्ठा:- पण यासाठी तुला पैसे मिळणार नाहीत. तुला जसं manage करायचं आहे तू कर.कारण मी पैसे देणं, याला काय अर्थ आहे. तुझ्या हक्काचे पैसे तू कसे आणि कुठे खर्च करायचे ते तू ठरवायला हवंस आता. कारण तू मोठी झालीयेस. आणि तुला तुझी pocket money ही मिळते. पण बघू काहीतरी मदत करता आली तर. पण एक अट आहे.
स्पृहा:- ( आनंदाने म्हणाली) तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत.
शर्मिष्ठा:- ठीक आहे तू शाळेतून ये. मी तोवर काही विचार करून ठेवते. आणि अट ही सांगेन.
स्पृहा:- (आईच बोलणं ऐकून आनंदाने आईला म्हणाली) आई तू जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस. ( असं म्हणत स्पृहा शाळेच्या रस्त्याला लागली).
Bye आई.
शर्मिष्ठा:- bye..
(दार बंद करत शर्मिष्ठा स्वतःशीच विचार करू लागली. काय करावं म्हणजे स्पृहाची ही निर्मळ इच्छा पूर्ण करता येईल आणि तिला पैशाचं महत्त्व ही समजावून देता येईल. याच विचारात असताना शर्मिष्ठा ला तिच्या आईची आठवण झाली. आणि तिने लगबगीने सगळी कामं आवरली आणि आईला फोन केला)
शर्मिष्ठा ची आई :- hello. 
शर्मिष्ठा :-  hello आई.
आई :- हा बोल ग. कसा काय फोन केलास. आवरलीत का सगळी काम तुझी..?
शर्मिष्ठा :-  आई थोड बोलायचं होत.
आई:- हो बोल ना. काय झालं. सगळं ठीक आहे ना. तुझा आवाज असा का येतोय.??
शर्मिष्ठा :- हो आई, सगळं ठीक आहे. मला दुसरच काही बोलायचं आहे.
आई:- बर बोल.
शर्मिष्ठा:- आई, स्पृहा आजकाल वायफळ खर्च करायला लागलीय. काही आवडलं की विकत आणते. परवा शाळेत १०० रुपये द्यायचे म्हणून तिच्याकडे १०० रुपये पाठवले तर तिने ते मोरपिसाच्या बंच वर खर्च केलेत. आज परत १०० रुपये शाळेत द्यायचे म्हणून घेऊन गेलीय.
आई:- अग मग तिला समजावून सांग ना. पैशाचं महत्त्व पटवून दे. 
शर्मिष्ठा:- अग पण…. आणि आता तर तिला तिच्या बाबांना गिफ्ट द्यायचं आहे वाढदिवसाला. एकिकडे वायफळ खर्च आणि दुसरीकडे निर्मळ इच्छा…!! काय करावं सूचना झालंय. आणि मला वाटतं, त्यासाठी मी तिला पैसे देण्यापेक्षा तिने तिच्या pocket money तून बचत करून मग गिफ्ट द्यावे तिच्या बाबांना. 
पण नेमक मी ते तिला कसं पटवून द्यावं हे कळत नाहीये. आणि वाढदिवस एक महिन्यावर आलाय. एका महिन्यात ती काय आणि कशी बचत करेल पैशांची. परत तिची चिडचिड होईल. आजकाल उलट बोलायला लागलीय ती. 
Please आई सांग गं काही तरी.
आई:- अगं सोप्पं आहे. आणि तू का अशी वैतागल्यासारखी बोलतेस. जरा शांत हो. वय वाढत असलं तरी अजून लहान आहे ती. वायफळ खर्च करत असली तरी खोटं नाही ना बोलत तुझ्याशी.. तु ही होतीसच की हट्टी, तुझ्या लहानपणी. तुझीच मुलगी ना… गुणं नकोत का उतरायला…
( असं म्हणत आई हसते, त्यावर शर्मिष्ठालाही हसू येतं…)
आई:- शांत हो… आणि ऐक आता मी काय सांगते ते. एक काम कर. तुझं कपाट उघड आणि बघ तुला काय सापडतं ते…तुझं उत्तर तुलाच सापडेल.
शर्मिष्ठा:- कपाट…? पण तिथे काय मिळेल..?
आई:- प्रश्न नको विचारुस. जे सांगितलंय ते कर.  मिळेल तुझं उत्तर तुला.
शर्मिष्ठा:- hmmm.. बरं. ठेवते मी फोन. तू काळजी घे. Bye.
(  phone ठेवल्यावर शर्मिष्ठा रूममध्ये गेली आणि तिने कपाट उघडून बघितले, आणि तिच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. ती स्वतःशीच हसली. आणि आठवत बसली सगळं.
तिला आठवल. ती लहान असताना तिच्या आईने तिच्या हातात मातीच गुल्लक देत तिला पैशांची बचत कशी करायची हे समजावून दिले होते. त्याच गुल्लक मध्ये पैसे जमवून तिने आईला तिच्या आजारात केलेली मदत ही तिला आठवून गेली.  बदली रद्द व्हावी म्हणून ३ महिने आई घरीच असताना तिच्या वाढदिवसाच्या वेळेस एक ही रुपया शिल्लक नव्हता घरात आणि मामा येऊन थट्टा करून गेला की आज वाढदिवस शिऱ्यावर होतो की काय…? तेव्हा असेच गुल्लकातले पैसे कामी आले होते. अशा एक ना अनेक गोष्टी आठवून गेल्या. अचानक तिच्या डोळ्यात पाणी तरळल.) 
( या सगळ्यात कधी संध्याकाळ झाली तिला काही कळलच नाही. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडलं तर स्पृहा होती. )
शर्मिष्ठा:- आलीस…? कशी राहिली शाळा…? 
स्पृहा:- हो आई. शाळा मस्त. आज खूप मज्जा आली शाळेत. 
शर्मिष्ठा:- बर चल, हात पाय धुवून घे. मी काही खायला देते.
स्पृहा:- हो.
( एका तासानंतर स्पृहा शर्मिष्ठाला विचारते.)
स्पृहा:- आई, तुला काही idea सुचली का ग. सांग ना बाबांच्या वाढदिवसाचं काय करू.
शर्मिष्ठा:- hmmm… आहे एक आयडिया.तू मला promise केलं होत मी जे सांगेन ते ऐकशील अस. 
स्पृहा :- हो आई माझ्या लक्षात आहे ते.
शर्मिष्ठा :- आणि तू आज पैसे दिलेस का शाळेत…? Teacher काही म्हणाल्या का..?
स्पृहा:- हो आई दिले. Teacher का काही म्हणतील मला..? आणि आता आधी आयडिया सांग काय करायचं बाबांच्या वाढदिवसाला.
शर्मिष्ठा:- आलेच.. एक मिनिट थांब फक्त.
( शर्मिष्ठा रूममध्ये जाते आणि कापटातल गुल्लक घेऊन येते.)
शर्मिष्ठा:- ( गूल्लक देत)  हे घे. 
स्पृहा:- हे काय आहे..?
शर्मिष्ठा:- ही खरं तर गम्मत आहे एक.
स्पृहा:- गम्मत..??
शर्मिष्ठा:- hmm…हे गुल्लक आहे.. आम्ही लहानपणी याला मातीच गाडगं म्हणायचो. आई आम्हाला जे पैसे देईल कामासाठी, त्यातले उरलेले पैसे यात जमा करायचे. आणि मग ते दुसऱ्या कमी उपयोगी आणायचे.
स्पृहा:- wowww….
शर्मिष्ठा:- आहे की नाही गंमत…??
स्पृहा:- हो..
शर्मिष्ठा:- आता तुलाही या गुल्लक मध्ये पैसे जमा करायचे आहेत. तुझ्या pocket money मधून उरवायचे आणि यात जमा करायचे. गाडगे भरले की ते फोडायचे आणि मग ते पैसे चांगल्या कामी उपयोगी आणायचे.
पण ते कसे कमवायचे हे तुझं तुला ठरवायचं आहे.
स्पृहा:- पण आई, वाढदिवसाला फक्त एक महिना उरलाय. मग माझ्याकडे कसे जमतील पैसे.?
शर्मिष्ठा:- एक आयडिया आहे. 
स्पृहा:- काय..? सांग ना पटकन?
शर्मिष्ठा:- अग हो हो..
ऐक, आता लगेच जमणार नाहीत ना पैसे म्हणून तुझ्या जवळ असलेल्या pocket money मधला रोज एक रुपया या गुल्लक मध्ये टाकायचा.. किंवा तुला जेवढे जमेल तेवढे टाक, पण रोज टाक….मग बघ कसे जमतात तुझ्याकडे पैसे ते.
स्पृहा :- पण आई, माझ्याकडे नाहीत गं पुरेसे पैसे, जमा करण्यासारखे..
शर्मिष्ठा :- बरं मग, मी रोज एक नाणं तुझ्या हातात देईन, ते जमा कर. मग तर झालं…? 
स्पृहा :- thank u आई.
शर्मिष्ठा :- पण हे फक्त आतापुरतेच. पुढल्या महिन्यापासून तुलाच जमा करावे लागतील.
स्पृहा:- हो आई, promise. ( आनंदाने) खूप मस्त आयडिया आहे आई. मी नक्की करेन अस.
 आई, किती मजा येईल ना हे सगळं करताना. तुला ही यायची ना.?
शर्मिष्ठा:- हो अग. खूप मज्जा यायची. तू एकदा सुरवात कर मग तुलाही मज्जा येईल. आणि तुला स्वतःलाच कळेल, पैसे खर्च करायचे की जमवायचे ते.
स्पृहा:- hmmm..
शर्मिष्ठा:- आणि हे जमलेले पैसे तू कुठे कुठे उपयोगी आणू शकतेस हे ही मी सांगेन तुला हळूहळू.
स्पृहा:- हो आई, नक्कीच. मला ही आवडेल. आता तर मी खूप excited आहे.आणि खूप खूप thank u आई. तू खूप छान आहेस.
आणि sorry सुद्धा. मी सकाळी उगाच बोलले तुला. पण आता कळलय की तू मला चांगलच सांगत होतीस. यापुढे नाही करणार मी असा खर्च. Promise.
शर्मिष्ठा:- that's like my good girl. वेडाबाई. 
स्पृहा:- ( थोडा वेळ विचार थांबून)
आई…..एक विचारू..?
शर्मिष्ठा:- हो बाळा बोल ना.
स्पृहा:- तुला हे आजी ने शिकवलं होत ना.
शर्मिष्ठा:- हो.
स्पृहा:-  मग मी आजीला पण thank u म्हणेन.
शर्मिष्ठा:- नक्की म्हण. मला ही तिला thank u म्हणायचं आहे. तिने ही शिकवण दिली नसती तर मी तुला समजावू शकले नसते. 
So thank u so much आई
स्पृहा:- thank u so much आजी.
शर्मिष्ठा:- उद्या फोन करू आजीला, मग दोघी फोन वर thank u म्हणू.
( दोघीही मनमोकळ हसतात)




सुविधा.......?




 
 

इतर रसदार पर्याय