Stree Janmachi Sangata - 4 books and stories free download online pdf in Marathi

स्त्री जन्माची सांगता ( भाग -4)
" ती " हा सन्मान मिळण्यासाठी धडपड

शब्दवेडी दिशाच ती

शब्दवेडी दिशा अस मी का म्हटलं असावं तिला ??

तुम्ही जाणू शकता तिच्या शब्दला आणि जगू शकता तिच्या अर्थबोध करणाऱ्या

वाक्य अन वाक्याला !

मी सलाम करते दिशा ताईच्या लेखणीला ...

तिला जाणून घ्यायचा योग आला मला तिच्या लेखणीतून

तिच्यातली स्त्री जळकत होती तिच्या बोलण्यातून . आवाजच काय तो तिचा

बाईपणा मिरवत नव्हता पण तिच्या बोलण्यातून स्त्री जीवनच काय ते

अंतर्मुख होत होतं ......

दिशा स्त्रीपरिवर्तनासाठी खरचं धगधगती ज्वाला आहे .

आणि माझ्या हृदयात खोलवर तिच्यासाठी प्रचंड आदर ......

तिची आणि माझी ओळख झाली ती तिच्या मुलाखतीतून ..... नाहीतर हे

दिशा नावच महान व्यक्तिमत्त्व मला कधी कळलंच नसतं ...

➡ जाणून घ्या दिशा कोण आहे ?

दिशा ..... ना तिला जात ना धर्म ना आपल्या सारखं विशिष्ट माणूस म्हणून तिला

कधी मिरवता आलं .

असचं भटक्या विमुक्त असलेल्या जातीत तिचा जन्म झाला आणि

पंधरा सकेंद ही लागले नाही तिच्या जन्मानंतर कळायला ती कोण आहे ?

आपल्याकडे मुलं जन्मला आल्यावर त्याचा चेहरा कसा दिसतो तो बघायला

कसा आहे हे काहीच न बघता त्याच्या कम्बरें खालचा भाग बघितल्या

जातो ....

Gender male or female .... आणि त्याही पेक्षा वेगळे पण

एक अलौकिक शरीररचनेत अडकलेली दिशा .

आई बाबांना ती जन्मतःच डॉक्टर कडून समजली पण तिच्या

आईच्या मातृत्वानेही तिच्या भावनांना ओळखलं नाही .

तीच शिक्षण सर्वसामान्य सारख होत गेलं पण मूल मुली तिला चिडवायचे

ती घरी सांगत यायची तर घरचे तिलाच ओरडायचे . वय वाढत गेल तस दिशाचा

आवडी निवडी बदलू लागल्या तिला कानातले आवडू लागले स्त्रियान सारख नटण

सवर्ण आवडू लागलं .

पण घरून तिच्या अश्या वागण्याला विरोध व्हायचा ...

पक्या ,मक्या , छक्या .... एक ना अनेक नावाची संबोधने तिला घरच्यांकडून

लावण्यात आली सख्या चुलत भावाकडून आई बाबांकडून .

घालमेल होणारच तिच्या मनातली .

घुसमट व्हायची दिशाची . तेराव्या वर्षी दिशाने घर सोडले आणि इथून

सुरुवात झाली तिच्या प्रवासाला .

दिशा हे ही नाव तिने स्वतःच दिले स्वतःला ...

एका सामाजिक संस्थेचे नावाची पाठी तिने बघितली अकरावी दिशा ....

अकरावी दिशा कशी काय ?

दिशा तर दहाच असताना ?

अकरावी दिशा ही परिवर्तनाची वाट .... आहे !

परिवर्तनवादी आहे . ते नाव दिशाने स्वतःला जोडून घेतले .

दिशा बस मधला प्रसंग सांगते . जेव्हा ती बस मध्ये बसून असते तेव्हा एखादी

स्त्री तिच्या जवळ येऊन बसते . आणि जेव्हा ती तिकीट काढायला आपला हात

टीसी मास्टर समोर करून आवाज देते तेव्हा तिचा पुरुषी आवाज ऐकून

ती बाजूला बसलेली स्त्री तिथून उठून दुसऱ्या सीटवर जाऊन बसते .

? कविता लिहिणारे दिशांचे हात जेव्हा आठवडी बाजारात जाऊन टाळ्या वाजवतात

तेव्हा तिला कसं वाटते ?

अतिशय कधी कधी वाईट प्रसंगाचा तिला सामना करावा लागतो . हातात पैसे

ठेवताना पुरुषी अहंकार तिच्या हाताच्या तळव्यांना घासतो रंगडतो .

तर कधी बाजारातून जाताना वेगवेगळी आवाज देऊन बोलावतो . पण

ह्याच आठवडी बाजारात तिला मायेने जवळ घेऊन गालावर हात फिरवत माझी

लेक म्हणून गोजरणाऱ्या आज्या ही मिळाल्या .

दिशाने सांगितलेला एक प्रसंग जेव्हा ती ट्रेन मध्ये बसते तेव्हा एक

उच्चवर्णीय स्त्री तिच्या बर्थ जवळ येऊन तिच्या जवळ येत म्हणते , "

कहा कहा से नही आते ये लोग ...." तिचे हे बोलणे ऐकून दिशा तिला तेव्हाच

ठणकावत म्हणते . " मॅडम , माईंड युअर लँग्वेज ...." 

तेव्हा ती म्हणाली ," ये 1st क्लास का डब्बा है ! "

दिशाने तिला उत्तर दिले

" आपल्या देशात क्लास पैशा वरून ठरवतो ज्याच्या जवळ जास्त पैसा तो 1st क्लास

मध्ये मोडतो ज्याच्या जवळ नाहीये तो खालचा . जेव्हा एखाद्याच्या माईंड वरून

तो कुठे मोडतो हे ठरवल्या जाईल ना तेव्हा तुम्ही ह्या डब्यात कुठेच नसणार . "

दिशा एवढी बेधडक कधीच नव्हती पण जेव्हा ती अन्यायाची वाचा

फोडून परिवर्तन स्वीकारू लागली तेव्हा दिशा आज इतरांच्या नजरेत भरते .

दिशाह्या नावा मागचा इतिहास आपण बघितलाच आता दिशा पिंकी शेख हे

तीच सम्पूर्ण नाव कसं काय पडलं ?

तर पिंकी शेख ह्या दिशांच्या गुरू आहेत आणि वडिलांच्या ठिकानी त्यांचं

नाव आहे . 

तिच्या लिंगाविषयी काहीच अंदाज बांधू नका, असे म्हटले तर? मुद्दा असा की आपण

जजमेंटल बनलोय कारण 'दिशा' हि स्त्री किंवा पुरुष नसून, ती एक तृतीयपंथी आहे.

फर्गेट अबाउट जेंडर ! दिशाच्याच शब्दात सांगायचं झालं, तर ती एक व्यक्ती आहे!

बाजारात मागतांना येणारे अनुभव दिशाच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा येतो. जेव्हा

कुणी बाई तिला पैसे देताना, 'थांब ना, घाई काय करतेस? तुला थोडीच घरी जाऊन

संसार करायचाय?' किंवा कुणी एक बाई 'तुला थोडीच घरी जाऊन लेकरं पाजायची

आहेत?' असा प्रश्न करते, तेव्हा दिशा त्यांना हसत हसत 'मलाही संसार आहे. माझ्या घरी चल, तुला माझा संसार दाखवते' आणि 'लेकरं पाजणं म्हणजेच सगळं काही नाही' अशी अगदी सहज उत्तरं देते!

दिशा एक 'कवयित्री' आहे! हो, जेव्हा समाजात वावरताना अपमान, लाचारी, उपेक्षा सहन करावी लागते, तेव्हा कुणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेऊन सगळं शेअर करावं असा वाटतं!

आणि याचवेळी शब्द तिच्या मदतीला धावून येतात. दिशाच्या कविता ऐकताना/वाचताना अंगावर काटा, डोळ्यात पाणी, अंतरात एक शल्य आणि मनात एक चळवळ जन्म घेत असते!

दिशा सातवीपर्यंत शाळेत गेली पण ती वाचायला खरंतर सातवी नंतर शिकली! दिशाला वाचनाचा छंद आहे. तिच्या बऱ्याच कविता प्रवासात जन्मतात. दिशा जरी

एका बाळाला जन्म देऊ शकत नसली, तरी कवितांच्या रूपाने तिची 'बाळंतपणं' होत असतात!

दिशा एक भावनिक व्यक्तिमत्त्व आहे! दिशा एक भाषा आहे! दिशा एक अभिनेत्री

आहे! मुलाखतीत बोलतानाची दिशा आणि सिग्नल वर मागणारी दिशा यांच्या

भूमिका, पेहराव जसे वेगळे तशीच त्यांची भाषाही वेगळी - शिवराळ भाषा! आणि

आपण जर त्या शिवराळ भाषेवरून दिशाला जज (judge) करत असू, तर त्यांची

भाषा चांगली व्हावी म्हणून आपण पर्सनली किती प्रयत्न केले, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारावा असं दिशा म्हणते!

दिशा एक समानतावादी व्यक्तिमत्त्व आहे! दिशाचे विचार ऐकल्यानंतर मनात वणवा

पेटल्याखेरीज राहत नाही! बऱ्याचदा आपण सहजच 'हिजडेकी औलाद' असं शिवी

म्हणून बोलून जातो. पण उद्या एखाद्या तृतीयपंथीयाने एक अपत्य दत्तक घेतलं, तर काय बिघडलं?

तेव्हाही तुम्ही-आम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखवत त्यांची उपेक्षाच करणार का? या आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या समाजात निर्मिल्या गेल्या आहेत जेणेकरून अशा हजारो 'दिशांना' दिशाहीन ठेवलं जावं!

त्यांच्यावर अनेक अत्याचारही होतात. बलात्कार, मारहाण, खून, रोजचे शाब्दिक बलात्कार इ. अनेक अत्याचारांना सामोरं जाऊनही आज अनेक 'दिशा' खंबीर उभ्या आहेत! आणि या हजारो दिशांना प्रकाशमान करण्याचं काम 'शब्दवेडी दिशा' ऊर्फ 'दिशा शेख' या करत आहेत. दिशाच्या कविता ती फेसबुक वर अपलोड करत असते, तिथे आपण त्या वाचू शकतो.

तर अशा अनेक भूमिका निभावणारी दिशा एक खरीखुरी 'अभिनेत्री' आहे! आपल्याला लाजवणारे तिचे विचार आहेत! आपल्यापेक्षा हजार पटीने जास्त तिचा संघर्ष आहे! तरीही आपल्यापेक्षा सुंदर तिचं हास्य आहे! दिशापासून प्रेरणा घेऊन आता जेव्हा तुम्हांला कुणी 'दिशा' दिसेल, तेव्हा आपुलकीने तिची चौकशी करा, तिची विचारपूस करा, तिच्याशी संवाद साधा! त्यानंतर मग तुम्हीच इतरांना 'दिशा' द्याल, हे सांगणे न लगे!

दिशा मी तिच्याकडे सामान्य म्हणून आणि एक विशिष्ट माणूस म्हणून

कधीच नाही बघू शकत . माझ्यासाठी माणुसकीच्या नात्यापलीकडे जाऊन एक

रोल मॉडेल आहे दिशा माझी काय आहेना हे शब्दात मला व्यक्त

करता येत नाही ती क्रांतिज्वाला ती म्हणजे माझ्या हृदयात तेवत ठेवलेली

प्रेरणेची मशाल आहे .

तिच्याच ह्या स्त्रियांवर लिहिलेल्या काव्यपंक्ती ज्या तिने शब्दबंध केल्या ...

" ती जन्माला यायची पापाची फळे चाखण्यासाठी .... पण , ते पाप त्याचं ती

स्वतःच्या भळावर घेऊन जगत होती .... आज मात्र चित्र बदलय .... तिचे नाही तिच्या

शोषण पद्धतीचे .... कोणीतरी तिचा खून केला देह गटारात टाकून खाडीत तर कधी

त्याचं अंथरुणावर सोडून दिला .... परवा भीक मागणारी ती चालती ट्रेन ओलांडताना

कमरेतून दोन हीश्यात विभागली ... समज आली तिला ती शिक्षित ही झाली .... पण

शोषण अटळ म्हणून मानसिक रित्या हरली आणि फासावर मेली ....

उमेदीच्या पहाटेसाठी स्वतंत्रतेच्या क्षितिजासाठी परत ती नव्याने जन्माला

आली आहे पण , आता ती सहस्रावधी वर्षाच्या शोषणाविरुद्ध यज्ञात स्वतःची

आहुती द्यायला नकार देते ... आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाहीत स्वाहा ....

ह्या दिशा ला मी मॅडम हेच संबोधन देईल .....

कारण ,

माझ्यासाठी दिशा गुरुच स्थान आहे

तिच्यातली स्त्री .... आतला आवाज

डांबून न ठेवता स्त्री हक्काच्या अस्तित्वासाठी लढते

आणि मरते .... ह्याच समाजाने परिवर्तनाचा हिशोब न

लावता सरळ घोषित केलेली तिची वागणूक झिडकाढतं

ती बाजारात टाळ्या ही वाजवत असली तरी अभिमान वाटावा मला

तिचा .... जगण्याचा नवा आलेखही योजत तीच त्याचा आराखडा होतं

आपली कूस उगवत नसली तरी नवी कविता ती जन्माला घालते .....

मी दिशाला जाणलं मानलं .... तुम्ही ही शोध घ्या अशा दिशाचा

आणि त्याच दिशेने चला जी तुम्हाला योग्य मार्गाने मार्गक्रमण करते .....


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED