स्त्री जन्माची सांगता (भाग -9) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

स्त्री जन्माची सांगता (भाग -9)

_____________________


आई म्हणजे आई असते



आई म्हणजे आई असते , 

भिरभिरत्या नजरेची ती वनराई असते ...

गोठ्यात वासरांना चाटणारी ,

चिमणीच्या चोचीत चारा आणून भरवणारी 

ठेच लागतास बाळाला धावत जाऊन 

कडेवर घेतं गोजरनारी ती माय माऊली असते ....


तिच्यामुळेच सुंदर सृष्टी आमच्या लोचनी पडते , आई काय असतेना ! तळघरात आपल्या साचलेला मळभ .... तिच्या भोवती रेंगाळतो सुखावतो 

गोठयात खुंट्याला बांधून ठेवलेलं पाडस ते गाईचं आईच्या आठवणीत रवंथ गाळत फिरतो ... आपली ही त्या मुक्या जीवासारखीच गत होते 

त्या पाडसाला हंबरून ओरडता येते आपण न हंबरडा फोडता ठेच लागल्यावर निदान आई गं .... तरी म्हणतो . 

आईची कुशी साऱ्या सजीवसृष्टीची उशी ..! तिच्या कुशीत शिरताच सारी दुख: काळजी क्षणभरात वजा होते . तिच्या प्रेमाची महती कोणत्याच नात्याने भरून निघत नाही निघणारही नाही ... तिचं निस्वार्थ प्रेम तिला लाभलेली मातृत्वाची देणगी आणि त्याचं मातृ प्रेमाची जवळीक असलेलं आई लेकराच नातं . आजकाल आईच्या ह्या नात्याला तिच्याच लेकरांनी तिच्या अस्तित्वाला वेगळंच वळणं दिलंय .... 

ह्या डिजिटल काळा सोबत आम्ही देखील किती डिजिटल झालोय ना हे हल्लीच्या पिढीला सांगायलाच नको .. आम्ही आईला मातृ दिनाच्या दिवशी तरी वेळ देऊ शकतो का ? नाही .... फेसबुक वॉट्सअप च्या जमान्यात धावतं पळत तिच्या सोबत एक सेल्फी काढायची आणि तिचं फेसबुकवर अपलोड करायची झाला आमचा मातृ दिन साजरा , नाहीतर वॉट्सअप वर मातृदिनाचं काहीबाही स्टेट्स ठेऊन द्यायचं ही आजच्या जनरेशनची क्रेज . मातृ दिन म्हणजे अलीकडच्या पिढीचा आईसाठी असलेला खास दिवस झाला खरंय पण जरा भन्नाट वेगवान झाली तरुणाई . 

मदर्स डे ची सुरुवात कशी आणि कोणी केली ते ही आपण जाणून घेऊ या .... आपल्यापैकी किती जणांना ‘मदर्स डे’चा इतिहास माहिती असेल ! ग्राफ्टन हे शहर राष्ट्र वेस्ट व्हर्जिनिया हे शहर पहिल्यादाच एक स्मरणीय दिवस म्हणून बघण्यात आले . ज्या ‘अॅना जार्विस’ या महिलेने अमेरिकेत 1908 साली सर्वप्रथम हा ‘मदर्स डे’ साजरा केला .

तिने स्वत:च नंतर, 1923 च्या सुमारास त्याविरुद्ध मोहीम उघडली. कारण असं की, 1920 र्पयत हा ‘मदर्स डे’ इतका पसरला की, हॉलमार्क सारख्या कंपन्यांनी ‘मदर्स डे’ची शेकडो प्रकारची शुभेच्छा पत्रे, भेटवस्तू बाजारात आणल्या ही नफेखोरी, हे व्यापारीकरण बघून अॅना उद्विग झाली. तिचं म्हणणं होतं, की मी या प्रथेला सुरुवात केली, ती कौटुंबिक स्नेहबंध टिकून रहावेत य उद्देशाने. तिचा आग्रह होता की तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात एक साधी चिठ्ठी तुमच्या आईला लिहा पण स्वत: लिहा. विकत आणू नका. 

या प्रथेचं खाजगी स्वरूप अधोरेखित व्हावं म्हणून अॅनाने चक्क ‘मदर्स डे’ या नावाचा स्वामित्त्व हक्क मिळवला होता. त्यात तिने ‘मदर्स’ लिहिताना षष्ठीवाचक चिन्ह आधी टाकलं (अॅपॉस्ट्रॉफी एस) ते मुद्दाम तसं टाकलं. तिच्या म्हणण्यानुसार हा उत्सव, प्रथा आपल्या घरातल्या, आपल्या आईच्या सन्मानासाठी आहे एकटीच्या सन्मानासाठी. 

मातृ दिनाच्या ह्या दिवशी आईला ग्रीटिंग देणं , आईसोबत एक सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करणं म्हणजे मातृ दिन का ??? 

आई जवळ आपल्याला व्यक्त व्हायला असं उसनं बाहेरचं काहीतरी तरी तिला बहाल करून मातृ दिन साजरं करणं म्हणजे तिच्या मातृत्वाची टवाळकी करणंच होय ! तिला काही द्यायचंच आहे ना तर मनातून द्या स्वतःच्या सुंदर हस्तक्षरांनी तिच्या साठी तिच्यावर काही लिहा ... शेवटी तिने आपल्याला हे सुंदर जग दाखवलं असते ... 

तुमचा जन्म नव्याने होत असला तरी एखादं बाळ जन्माला येताना तो आईचा पुनर्जन्मच असतो .... तिच्यासाठी आपण काहीही केलं तरी तिच्या उपकाराची परतफेड कधी होतं नसते ... आणि ती तर आई ना ! तुम्ही तिच्यासोबत कसंही वागा ती तुमच्या सोबत अखेरचा श्वास घेत पर्यंत नम्रतेनेच वागणार पण , आपणच आईला कधी समजून घेतलं नसतं . प्रेम आपल्या वरचं तिच्या हृदयात ओसरून वहात असतं ते प्रेम आंधळं ही नसतं चिरकाल त्या प्रेमाला कुणाची नजर जरी लागणं अशक्यचं . 

आई तिचं हृदयच करुणेने व्याप्त असतं म्हणूनच म्हणतात ना ! " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी . " माणसाजवळ शान शौकत धन दौलत सारं काही असेल पण आई नसेल तर त्याचं जगणं कसं होऊन जातं तो आईच्या मातृप्रेमासाठी तरसत राहतो व्याकुळ होतो पण पैशाने त्याला आईच प्रेम खरीदता येतं का ?? नाही ... 

माझ्या जवळ आई आहे , 

आणि तिच्या असण्यातचं माझी 

सर्व श्रीमंती आहे .. 

मला नको पैसा नको घर दार 

आई तू सदैव माझ्या सोबत राहा ... 

तिचं माझी जन्मोजन्मीची कमाई तुझ्याच ठायी ...