स्त्री जन्माची सांगता ( भाग -11) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्त्री जन्माची सांगता ( भाग -11)




देवाचा आणि पाळीचा तीळमात्र सबंध नाही . पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . वयात आल्यावर ती प्रत्येक मुलीला येणारच . म्हणून देवाला तिचा विटाळ होतो , असे आपले म्हणणे असेलं तर ते खोडसाळ वृत्तीचे आणि चुकीचे आहे . प्रत्येकाने जन्म हा आईच्या उदरातूनच घेतला आहे . देवाच्या मुखातून नाही . मासिक पाळीचा त्रास एका नव्या बाळाला जन्माला घालण्यासाठी तिला वयाच्या चौदा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत सोसावा लागतो . नऊ महिने उदरात मासाचा गोळा तिलाच जपावा लागतो . नवजात शिशूला जन्माला घालतानी कळांचा त्रास तिचं सहन करते ना ! ह्याला देव कुठे जबाबदार आहे ??

मुली आजही मासिक पाळी किंवा mc म्हणजे पिरेड म्हणायला चक्क घाबरतात . पाळीला प्रॉब्लेम आले म्हणून मोकळ्या होतात . ज्या मुळे तुम्ही एका संतानाला जन्म देऊ शकता ते प्रॉब्लेम कसे काय होऊ शकतात ? एक निगेटिव ऊर्जा आपल्या या वाक्यासोबत संचार करते . आणि पाळीत प्रॉब्लेम वाढत जातात . कारण हा प्रॉब्लेम आपणच निर्माण करतो ... 

**********************************



नुकत्याच एका महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला मला आमंत्रित करण्यात आले होते . ते एक भव्य मोठी इमारत असलेले अभियांत्रिकी कॉलेज होते . महाविद्यालयाच्या संस्थापकाची पुण्यतिथीचा तो कार्यक्रम होता . आपल्या संस्कृतीत असे काही नियम आखलेच असतात . कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते मंचावरील फोटोचे पूजन केले जाते . मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे मंडळी उठली . माझ्या सोबत एक वकत्या म्हणून इंजिनियरिंग कॉलेजच्या शिक्षिका बसल्या होत्या त्या माझ्या पेक्ष्या वयाने ज्येष्ठ होत्या . त्यांच्या सोबत पहिल्यांदाच भेटीचा योग जुळून आला होता . फोटोचे पूजन करताना त्या माझ्या लांब लांब राहायच्या . अगरबत्ती लाऊन मी madam च्या हातात मेणबत्ती देत होते . तेव्हा प्रतिकार करत त्या मला म्हणाल्या , “ तुम्हीच लावा madam . “ मी न राहून त्यांना विचारले , “ काय झालं madam पुजा न करायला ? “ तेव्हा त्या कुणालाही ऐकायला येणारं नाही एवढ्या हळू आवाजात कानात कुजबुजल्या , “ अहो madam , मला जमत नाही ना ! “ मला त्याचं बोलण समजूनही मी त्यांना खट्याळपणे मोठ्यानेच म्हटले , “ सरस्वती मातेची पूजा करन जमत नाही का तुम्हाला ? “ त्या परत कानात हळू आवाजात बोलल्या , “ एमसीला आहे मी . “ कॅण्डल पेटवत मी म्हटलं , “ तर काय झालं ? “ त्यावर madam उद्गारल्या , “ सरस्वती देवता आहे ना ! “

हातबोट लावणे जमत नाही . आपण ह्या दिवसात देवाला शिवायला नको . ते आपल्यामुळे अपवित्र होतील . मी प्रतिउत्तर न देता मंचाकडे वळले . madam माझ्यासोबत मंचाकडे चालू लागल्या . चालताना कपाळावर आठ्या आणत त्या मला म्हणाल्या , “ madam तुम्ही सरस्वतीला मातेला नमस्कार नाही केला . माझा स्पर्श्य झाला का तुम्हाला ?? “ कार्यक्रमाच्या वेळात मंचकावर आपसात संवाद करणे योग्य नव्हते म्हणून ह्या विषयावर मी काहीच बोलली नाही . कार्यक्रम आटोपला त्यांची आणि माझी चांगलीच ओळख झाली .

आमच्यात गप्पा रंगल्या . नंतर madm म्हणाल्या , “ चला जरा वाशरूमला जाऊन येऊ . “ चेहऱ्यावर पाणी मारले . दुपट्ट्याने चेहरा पुसतच असताना एका कोपऱ्यात लावलेल्या व्हेंडिंग मशीनकडे माझ लक्ष गेलं . म्हटलं जरा कसा उपयोग आहे पडताळून पाहवं . तर , त्यावर काही टिप्स लिहून होत्या . एक सेनेटरी pad साठी त्यात दहाचा कॉईन टाकायचा होता . मनात म्हटले मासिक पाळी महागली . मला आधी वाटले महाविद्यालयाच्या लेडीज वाशरूम मध्ये ही मशीन लावली तर मुलीना मोफत सुविधा असेलं . पण नाही ! बाजूला येऊन बर झालं madam मुलीना तात्पुर्त हे कॉलेजला दांडी मारून घरी जाण्यापेक्षा . मी म्हटलं , “ हो ना madam , स्टेशनवर कंडोम मशीन लावतात लोकात जनजागृती व्हावी म्हणून up सरकारने एक मोहीम ही राबवले घरी जाऊन कंडोम देण्यात आले त्याचा योग्य वापर समजवून सांगण्यात आला . आणि ही मशीन कॉलेज च्या बंद खोलीत का ? आणि देशात एवढी भिकार्तेची दैनीय अवस्था आहे की pad वर GST लावला . “ ह्यावर माझ बोलण पूर्ण व्हायच्या आधीच madam म्हणाल्या , “ madam अहो , आपण भारतात जगतो इथले लोक अजून पुढारलेले नाहीत . “

बरोबर बोल्यात , “ madam नियम आणि खुळचट चाली रूढी आपणच पाळतो ना एक शिक्षिका अभियंता असूनही ! “ त्यांना माझ बोलण जरा लागलच त्या लगेच बोलल्या , “ हो देवदेवता संबधी हे नियम पाळ्वेच लागतात काटेकोरपणे . “ मी म्हटल का पण ? “ त्या म्हणाल्या , “ कारण आपली संस्कृती आपल्याला सांगते . “

“ नाही madam , आपले हे मत फसवे आणि चुकीचे आहे . आपणच हे नियम स्वतःवर लादून घेतलेत , कुणीच अमुकतमुक करायला सांगत नाही . “ कीव आली मला अशा विचारांची आणि कीव येते अश्या मागासलेपणाची . कसलीही तमा न बाळगता मी त्यांना प्रतिउत्तर दिले . “ देवाचा आणि पाळीचा तीळमात्र सबंध नाही . पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . वयात आल्यावर ती प्रत्येक मुलीला येणारच . म्हणून देवाला तिचा विटाळ होतो , असे आपले म्हणणे असेलं तर ते खोडसाळ वृत्तीचे आणि चुकीचे आहे . प्रत्येकाने जन्म हा आईच्या उदरातूनच घेतला आहे . देवाच्या मुखातून नाही . “

ह्यावर madam चूप होत्या . “ madam तुम्ही ज्या सरस्वतीबद्दल बोलत होतात ती ही एक स्त्रीच आहे तिच्या फोटोवर तुम्ही आपली सावली पडू देत नव्हत्या आणि शक्य असल्यास मला पुढच्या भेटीत सरस्वतीचे गाव जन्म आईवडिलांचे नाव सरस्वतीने स्त्रीच्या शिक्षणासाठी कोणते महान कार्य केले त्या कार्याची पोह्चपावती द्या ! मी नक्कीच तेव्हा सरस्वती समोर नतमस्तक होईल . महाविद्यालयाच्या संस्थापकानी हे ज्ञानकेंद्र उभारून खूप मोठ कार्य केलं म्हणून त्यांना मी अगरबत्ती लावली .. त्यांच्या कार्याचा सुगंध बघा दरवळतच आहे ....

तुम्हाला पाळी आली आहे म्हणून तुमचा मला स्पर्श्य झाला आणि सरस्वतीला वंदन नाही केलं अस काही नाही . शिकल्या सवर्ल्यानी पाळीमुळे विटाळ होतो स्त्री अपवित्र होते हे माननच मुळात माझ्या स्वभावाला पटतं नाही .

एकदा एका कंपनीत गेले असता तिथे काही महिला कामगार कामे करीत होत्या एक दुसरीला सांगत होत्या . ताई काल रात्री तर मी कामावरून गेल्यावर अंघोळ केली तेव्हा कुठे घरात प्रवेश केला . सासूने तावातावात चहा समोर आणून आपटला मुलगा माझ्या जवळ रडत म्हणाला आई मला भूक लागली तू जेवण बनव न ग ! चहाचा घोट घशाखाली उत्तरत नाही तर सासू किचन मध्ये भांड्याचा आवाज करीत होती . ह्यात माझा काय दोष बर ! आपण जावं स्वयंपाक करायला तर उलट ह्याच सटवी म्हणून बोलतात . दुसरी म्हणाली बरोबर आहे ताई तुमचं मी तर घरी गेल्यावर अंघोळ करतच नाही दोनदा पाण्याचा निचरा करन काय परवडत हो , स्वयंपाक काम करते फक्त देवावर सावली पडू देत नाही . कारण अपशकून व्हायची भीती असते .

ह्या स्त्रिया कोण कुठल्या मला ह्यांच्याबद्दल जाणून घ्यायची ओढ लागली . खरं तर दुसऱ्याच्या मध्ये बोलण बर नाही ! पण , तरीही मी म्हणाले , पालीविषयी तुम्ही एवढ्या वाईट भावना का निर्माण करून घेतल्यात ? “ त्यांनी चटकन मागे वळून बघितलं मी विचारलेला प्रश्न त्यांना आवडलेला नसावा . असं मला वाटलं ह्याबद्दल त्यांना दोष देण्यातही अर्थ नव्हता . काही झालं तरी मी आगतुकपणे त्यांच्या संभाषनात भाग घेतला होता . पण तुम्ही कोण आहात madam ? त्यांनी विचारलं . मी माझा परिचय देत म्हणाले , “ खरतर तुमच्या दैनदिन जीवनात ढवळाढवळ करण्याची मला गरज नाही पण एक स्त्री म्हणून ... तुमचे संभाषण ऐकले मी तुम्ही पाळीविषयी एवढ्या खुळचट बंधनात का जगता आहात ??? त्या म्हणाल्या घरात सासू असते त्या असं वागायला आम्हाला भाग पडतात . त्यांना विटाळ होतो ताई एवढच काय त्या चार दिवसातले आमचे कपडे पिण्याच्या पाण्याचे ग्लास तरी एखाद्या रोग्यासारखे अलग ठेवतात चार दिवस संपले की ते सर्व कपडे भांडे एका अलमारीत ठेवायला सांगतात . त्याचं हे बोलण ऐकून मला तर धक्काच बसला . नुकतच लग्न झालेली नवतरुणी त्या घोळक्यातली बोलत होती . madam गेल्या तीन महिन्यापूर्वी माझ लग्न झालं ह्यांच्या गावला खेड्यात काकाकडे कार्यक्रम होत्या म्हणून जाच्यादिव्शीच मी सासूना सागितलं तर त्यांनी मला पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आणून दिल्या . मग पुढच्या महिन्यात तीव्र वेदना झाल्या सासू त्या घरात कार्यक्रम असला आणि माझी तारीख जवळ आली की मला ह्या गोळ्या आणून देतात आणि घ्याला सांगतात पण आता मी त्यांचा विरोध करते त्यांना म्हणते मी ह्या गोळ्या खाणार नाही तुम्ही वाटल्यास सणसाजरे करन बंद करा ! मला त्यांचा खरच अभिमान वाटू लागला .. माणसांनी देवाच्या नावाखाली पाळी सबंधी स्वतः नियम आखून ठेवले हे सर्व रडगाण त्यांना समजवून सांगण्यात एक तास गेला तेव्हा त्या म्हणाल्या ... आता आम्ही कधीच ह्या दिवसात अलग बसणार नाही आणि देव हातबोट ह्यावर विश्वास ही ठेवणार नाही . त्यांच्या चेहऱ्यावरच नैराश्य दूर झालं होतं त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित बघून मलाही हायस वाटलं ...

मासिकपाळी विषयी आजही आपल्या समाजात खूप विचित्र भावना आहे . हा विषय उच्चशिक्षित समाजही चारचौघात बोलण्याचे टाळतो . तुम्हाला कधी आठवत तुमच्या बारावीत आणि दहावीत पाठ्यपुस्तकात हा विषय असताना विज्ञान शिक्षकांनी योग्य प्रकारे समजून दिल्याचं ?? आम्हालाही वर्गात आमच्या शिक्षकांनी हा विषय कधी समजवून दिलाच नाही .. हा बहुतेकांचा अनुभव ही असेलं नाही का ?? 



· मासिक पाळी म्हणजे अडचण

- आजही आपल्या भारतात मासिक पाळी बद्दल जनजागृती करायची म्हणता ना हा विषय फक्त मुलीना एका बंद खोलीत नेऊन समजवल्या जातो .... हे फार चुकीचे आहे .


· मुलानाही असू देत ना माहिती !

मुलीना मासिक पाळी आली तेव्हा पासून तिला आई आजी सांगत असते हे बघ तुझ्या वडिलाना सांगायचं नाही पण जेष्ठ भावासोबत ही त्यांना आपल दुख त्रास शेअर करता येत नाही आपल्या समाजाची खूप मोठी शोकांतिका . घरातल्या पुरुषांना ह्या गोष्टीची भनक पण लागता कामा नये . पाळी बदलचा न्युग्न्ड तिचा मनात दिवसेंदिवस वाढत जातो . पाळीची आईकडून मिळणारी वरवर माहिती . मग पाळीत होणारा रक्त्स्त्राव ही तिला न भरून निघणाऱ्या जखमेसारखा वाटतो . आई पाळी आली आहे हे सांगायलाही मुली संकोचत असतात . हे भीष्ण वास्तविकता आहे .

मुले घरी याबाबत विचारतात पण त्यांना तुला काय करायचय म्हणून चूप केल्या जातं . कुटुंबातच मुलांना पाळीबद्दल सांगितल्या गेले पाहिजे . कारण मुलांना आईचाच होणारा त्रास समजला नाही तर समोर जाऊन ते बायकोचा त्रास कसा समजून घेतील ..



· पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या नकोतच !

मासिक पाळीच्या वेदना त्रास सहन होत नाही किवा पेपर आहेत म्हणून अनेक तरुणी स्त्रिया पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खातात हे चुकीचे आहे . ह्याने तुमच्या ओवरी निकाम्या होऊन भविष्यात गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते .



· पाळीत आरामाची गरज असते .

पाळीत स्त्रियांना आरामाची गरज असते , वाळीत टाकण्याची नव्हे .



· काळ्या पिशवीतील बॉम्ब .

मुली २० , २१ वर्षाच्या होईपर्यंत pad आणायचं आईलाच सांगतात पण जेव्हा त्या स्वतः बाहेर medical store मध्ये जातात तेव्हा . दुकानदार तिला न्याहाळतो मग विचारतो विस्पर देऊ की अल्ट्रा की नाईट pad ? त्याचे प्रश्न संपतच नाही ती तिला काय पाहिजे हे कधीचीच सांगून मोकळी झाली असते .



· समाजात बद्दल हळूहळू होतो आहे .

समाजात बदल होतो आहे काही घरात पाळी हा विषय नवा नाही पण काही घरात ह्या संबंधी स्त्रिया बंधनात जगतात . पाळी शाप नाहीच आहे पाळी स्त्रियांसाठी वरदान आहे .