Stree Janmachi Sangata - 5 books and stories free download online pdf in Marathi

स्त्री जन्माची सांगता ( भाग -5)

      पँडमँनचे कार्य :-      

     आपण सर्वांनी पँडमँन बघितला ??  नसेलही बघितला तरी बघाच एकदा ....

      त्या पँडमँनमुळे तरी बहुतेकांना हा विषय चांगला समजून घेता आला असेल ....

  पँडमँनचा प्रमोशन वेळी  अक्षय कुमारने एक किस्सा सांगितला होता ....

       त्यांच्या मित्राच्या मुलीला रात्री हा त्रास अचानक सुरू झाला ही तिची पहिली वेळ

असेल तिने आपल्या आईला सांगितलं ... तिला उठवलं पण त्या रात्री दोघीच कुजबुजत होत्या 

एवढ्या रात्री तुला पँड कुठून आणून देऊ म्हणनू .... ही गोष्ट घरातल्या त्या माणसाच्या कानी पडली 

तो घराच्या बाहेर पडला तेवढ्या रात्री केमिस्टला झोपेतून जाग केलं आणि मेडीकलशॉप मधून 

पँड घेऊन आले .... हा प्रसंग स्वतः अक्षय कुमारने शेअर केलेला आहे ...

     आजही खेड्यापाड्यातील मुलींना स्त्रीयांना पँडही परवडणारी गोष्ट नसतेच  म्हणून त्या 

कापड वापरतात ... ही शोकांतिका आहे हा त्रास सुरू झाला की खेड्यात मुलींचे लग्न 

लाऊन देण्याचे प्रमाणही आता कमी झाले असले तरी हरीयाणा सारख्या राज्यात जनजागृती 

झालेली दिसत नाही ... 


पँडमँन मधूनही विचार केला तर खुप काही घेण्यासारखं आहे ....


   विटाळ समजल्या जाणारी पाळी :- 



     
आधीच्या काळात चारदिवस 


    स्त्रीयांना  एका खोलीत डाबून ठेवल्या जायचं ....
  
  परिस्थितित थोडा फार बद्दल झाला ....तरी पुढारलेपणा आमच्यात तो  अजूनही आलेला नाही 


मासिक पाळी म्हणजे चार-चौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चाच होत

नाही.   

केमिस्टकडे सॅनिटरी नॅपकिन दबक्या आवाजात मागितला जातो. केमिस्टवालाही अगदी

सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून देणार. कशाला हवी एवढी लपवा-छपवी? आपण सर्वजण

जन्माला आलो आहोत ते या अस्तराच्या कृपेमुळेच. आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध आणि विटाळ मानतो. नैसर्गिक क्रियेचा एवढा बाऊ का करावा?

देवाला हात लाऊ नये .... लोणचे खाऊ नये ह्यांची सक्त ताकीद  ..


पुरुषांना सांगण्यासारखा विषय नाही :- 


       मुलगी बाराव्या वर्षी ह्या त्रासातून जायला लागते तेव्हा तिला घरून आई आजीकडून 

सांगण्यात येते  घरातील पुरुषांना हे सांगू नको म्हणून ..... का ? तर त्या का ह्या प्रश्नाच उत्तर 

त्यांच्याकडे नसतेच .... पाळी वयात आल्यावर प्रत्येक स्त्रीला येणारच  तिच्या नाजूक कोवळ्या 

वयात तिला समजून घेण्याची गरज कुटूंबातील वडीलधार्यांची  असते ... पाळी आली म्हणजे ती

खुप 

शहाणी झाली समजूतदार झाली असं तर नसतेच उलट ह्या वयात तिच्यावर दडपण असते .. त्या

दडपणाखाली ती वावरतांना  तिला समजून घेण्याची गरज आई तेवढीच वडीलानांही असते .

जन्माला दोघेही घालतात पण पाळी हा विषय मुलगी बाबाला सांगू शकत नाही .... किंवा घरातील 

आपलेच भाऊ ह्या काळात आपल्याला मदत का नाही करू शकतं एवढ वाईट काय आहे त्या 

मध्ये ..... स्त्री पुरूष समानता म्हटल्यावर आई ह्या दिवसात मुलीचे काम मुलाकडून करून घेऊ 


शकते ना  ! पण समाजानेच तिच्यावर बंधने लादली की ती आपला होणारा त्रासही घरातील भावाला

नाही सांगू  शकत ... 
वर्गात दहावीत जनरल सायन्सच्या पुस्तकात भावालाही हा विषय कानावरून

गेलाच 

असतो .... बारावीत बॉयलॉजीला संपुर्ण अख्खा लेसनच ह्यावर दिला आहे ... तरी व्यर्थ संकोच 

का वाटावा ? 

       घरात मुलींना होणार्या त्रासाची खबर आई आपल्या मुलाला नाही देऊ शकली हा विषय मुलांना 

नाही समजला तर समोर जाऊन कितीही  मोठी झालीत ही मुलं तरी मासिक पाळीकडे 

वासना म्हणून बघू लागतात .... त्यांना  स्त्रीच्या वेदनेत ही वासना दिसायला लागते ही खरी 

अडचण आहे कारण तो त्रास त्यांना घरातून कधी समजला नसतो ना कोणी घरातील स्त्रीने समोर 

येऊन समजावून सांगितला असतो .  तू मुलगा आहे ह्याकडे लक्ष नको देऊ म्हणार्यां  आया 

समाजात आहे तर त्या कोणत्या समाजाची निर्मिती करीत आहे ? हीच त्यांची मुलं 

मोठी झाल्यावर स्त्रीयांचा अनादर करायला लागतात .... भर रस्त्यात तिला छळतात ..

पाळी विषय समोर जाऊन समाजलाच ह्यांना तरी खिल्ली उडवतात ....

*एका सहावीत शिकणार्या मुलीला  वर्गात पाळी सुरू झाली आणि तिच्या शिक्षकांनाही गोष्ट

समजताच तिला समजूण घेण्याऐवजी रागवण्यात आले शिक्षक ओरडले तिच्यावर म्हणून 

त्या मुलीने शाळेच्या वरच्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली .*


  मासिक पाळी आणि मुलीच्या मनातली भिती :-


        ज्या वयात मुलीला हा त्रास होते त्या वयात कोणतीच आई मुलीला ती का येते  नेमके 

कारण काय हे कधीच सांगत नाही .... तिच्या हातात कापडाची घडी ठेऊन मोकळ होणं 

कोणत्याही आईला एवढ सहज सोपं असतं तर मुलगी कॉलेज मध्ये गेल्यावर कोणत्या मुलाच्या 

प्रेमात पडून तोंड काळ करून घरी येईल  ह्यांची  भिती का असावी ??      

     पाळी आल्यानंतर जर मुलांसोबत शारीरक संबंध आले तर ती एका मुलांची आई होऊ शकते हे 

साध्या सोप्या भाषेत तिला सांगितल्या जात नाही ...

       दरम्यानच्या काळात  तिला  स्त्राव व्हायला लागला तर तिला असं वाटतं खुप काही घाणेरडं 

किंवा किळसवाणी आहे ही गोष्ट म्हणून ती कापड लपवून ते वापरायला लागते स्वतः च्या आईलाही 

मुली सांगू शकतं नाही की तिला पाळी आली ...


         पाळी जेव्हा येते तेव्हा ती आपल्या सोबत शारीरीक आणि माणसिक त्रास घेऊनच येत 


असते चिडचिडणं मनात वैताग अस्वस्थ वाटणं .... डोकं  पोट आणि सर्वांग दुखण ह्या स्थितीत 

स्त्रीयांना मायेची आणि आरामाची गरज असते ... वाळीत टाकण्याची किंवा रूममध्ये कोंडून 

ठेवण्याची नाही .....     तिला समजून घेता आलं पाहिजे आई नंतर आणि मुलीची आधी जिवलग 

मैत्रीण एका आईला होता यायला पाहिजे ...



मासिक पाळी आणि अंधश्रद्धा :- 



- पाळी आली आहे ना? मग मंदिरात नको जाऊ, देवघरात नको जाऊ, प्रसाद नको खाऊ, कोणाला

शिवायचं नाही, स्वयंपाक घरात शिरायचं नाही, चार-पाच दिवस वेगळं राहायचं...आणि खूप

महत्त्वाचं म्हणजे लोणच्याच्या बरणीला हात लावायचा नाही. कारण ते नासेल (बाकी काही नाही,

पण लोकांचे विचार नासलेत). पाचव्या दिवशी पाळी थांबली की आंघोळ करायची आणि शुद्ध

व्हायचं. ओ गॉड...बस, बस, बस...वैताग आलाय या त्याच त्याच रटाळवाण्या गोष्टी ऐकून. कमाल

वाटते या सगळ्याची!  

21 व्या शतकात वावरताना आजही हे सर्रास चालतं. 

गावांमध्ये तर हे चालतंच. पण शहरातल्या वन-रूम किचनमध्येही असे प्रकार घडतात. 

अस्पृश्य असल्यासारखी वागणूक दिली जाते. त्यात दुर्दैवं म्हणजे, अगदी उच्च शिक्षित महिलाही हे

सारं खपवून घेतात. सणवार आणि समारंभाच्या टाइमटेबलनुसार शरीराचंही टाइमटेबल अॅडजस्ट

केलं जातं. समजा नसेलच होत अॅडजस्ट तर लग्न, समारंभांना जाणं म्हणजे गैर. मला आजही

आठवतंय, लग्न कार्यासाठी मैत्रिणीच्या गावी गेले होते. पण लग्नाच्या सकाळीच पाळी आली.

त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना मी केला आहे. राहण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व वेगळं. पहिलाच

अनुभव असा होता. दुसऱ्याच्या घरी जाऊन विरोध करावा तरी कसा करणार? हे सुद्धा कळत

नव्हतं. ही वेळ अनेक महिलांवर येते. पण अशी वेळ महिलांवर का यावी? याचा विचार केला

पाहिजे.


मासिक पाळी म्हणजे चार-चौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चाच होत

नाही. केमिस्टकडे सॅनिटरी नॅपकिन दबक्या आवाजात मागितला जातो. केमिस्टवालाही अगदी

सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून देणार. कशाला हवी एवढी लपवा-छपवी? मुंबईसारख्या शहरात

ही परिस्थिती म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मासिक पाळी सुरू होणं म्हणजे दर महिन्याला

महिलांच्या गर्भाशयात पेशी आणि रक्तवाहिन्यांचं एक अस्तर तयार होणं. आपण सर्वजण जन्माला

आलो आहोत ते या अस्तराच्या कृपेमुळेच. आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध आणि विटाळ

मानतो. नैसर्गिक क्रियेचा एवढा बाऊ का करावा? ज्या क्रियेमुळे स्त्रीला मातृत्व लाभलं, त्याच

काळात तिला अशी वागणूक का द्यावी? परमेश्वरानंच जग निर्माण केलं म्हणता, मग त्याच जगाचा

इतका महत्त्वाचा भाग अस्पृश्य कसा ठरेल? देव जर सर्वव्यापी असेल तर त्याला महिलांचा स्पर्श


कसा टाळता येऊ शकतो? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.


मासिक पाळीदरम्यान मंदिरात जाण्यास बंदी घातली जाते. पण केरळमधील पार्वती देवीच्या मासिक

धर्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवीच्या मासिक धर्माला प्रारंभ झाल्यानंतर

पार्वती देवीची मूर्ती दुसऱ्या खोलीत नेली जाते. त्यानंतर हे मंदिर तीन दिवसांसाठी बंद ठेवलं जातं.

मासिक पाळीच्या काळात देवीच्या मूर्तीमधून रक्तस्त्राव होतो, असा समज आहे. अनेक जण तर ते

रक्त घरी नेतात. ते खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चार दिवस

या विशेष महोत्सवाचं आयोजन केलं जातं. उत्सवाच्या चौथ्या दिवशी देवीच्या मूर्तीला नवे कपडे

घातले जातात. त्यानंतर तिची हत्तीणीवरून मिरवणूक काढली जाते. अशाच प्रकारच्या उत्सवाचं

आयोजन आसाममधील गुवाहाटी इथल्या कामाख्या मातेच्या मंदिरात केलं जातं. याला योनी-पीठ

असेही म्हणतात.
ज्याप्रमाणे सामान्य स्त्रीला तीन दिवस मासिक पाळी येते, त्याप्रमाणे देवीच्या योनीतून रक्तस्त्राव सुरू

होतो. या दरम्यान मंदिरात साधना केली जाते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. तसंच आंध्र प्रदेशातील देवीपूरमधील मंदिरात सुद्धा मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो. काही राज्यांमध्ये

मुलगी वयात आली (मासिक पाळी सुरू झाली) की मोठ्या उत्साहात तो दिवस साजरा केला जातो.


खेडेगावांमध्ये तर याहून भयानक परिस्थिती आहे. आधीच पाळीसंदर्भात बुरसटलेले विचार, त्यात

स्वच्छतेचा तर खूप मोठा प्रश्न. मासिक पाळी विषयातलं अज्ञान आणि स्वच्छतेसंदर्भात माहिती

नसल्यानं अनेक महिलांना इन्फेक्शन होतं. अनेक महिलांना योनीमध्ये जंतुसंसर्ग, गर्भाशयाचे आजार

झाल्याचं औसा तालुक्यातील पारधेवाडी येथील विचारधारा महिला बचतगटानं केलेल्या

सर्वेक्षणातून समोर आलं आहे ...



एवढंच नाही, तर महिला बचत गटातर्फे त्यांनी गावात सॅनिटरी नॅपकिन्सचा प्रकल्प उभारला. गावातल्या महिलांना यामुळे रोजगारही उपलब्ध झाला. 'रिफ्रेश' नावानं हे सॅनिटरी नॅपकिन्स इतर गावांमध्ये तर जातातच, पण सातासमुद्रापारसुद्धा हे नॅपकिन्स पोहोचले आहेत. लवकरच मुंबईतही 'रिफ्रेश सॅनटरी नॅपकिन्स'चा पुरवठा केला जाणार आहे.


सती, केशवपन, बालविवाह, हुंडा अशा बुरसटलेल्या रुढी-परंपरांना आपण फाटा दिला. त्या बंद करायला भाग पाडलं. मग मासिक पाळीच्या विषयावरच आपण अजूनही मागासलेले विचार घेऊन का जगत आहोत? पाळी संदर्भातल्या त्या जुनाट रुढी-परंपरांच्या बेड्या खरंतर कधीच मोडून टाकण्याची गरज होती. पण संधी आणि वेळ अजूनही गेलेली नाही. या! उद्याचं भविष्य जन्माला घालणाऱ्या आजच्या वर्तमानाला तितक्याचं पवित्रतेने स्वीकारुयात...त्याचा सन्मान करुयात!


मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील फार महत्वाचा भाग आहे. जोवर स्त्रीला पाळी येत नाही,

तोवर तिला पूर्णत्व नाही, अशी समाजात धारणा आहे. त्यामागील कारण म्हणजे पाळी आल्याशिवाय

स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नाही. इतकी महत्वाची असलेली ही मासिक पाळी आजही अंधश्रद्धेने

ग्रासलेली दिसते. मासिक पाळी म्हणजे काहीतरी घाण अशी भावना खेड्यापासून शहरापर्यंत सहज

आढळून येते. पाळी आली की घराच्या बाहेर राहणं हे दृश्य ग्रामीण भागात सहज दिसतं. त्यातच त्या स्त्रीचा कुठे चुकून स्पर्श झालाच, तर ती जागा पाणी टाकून धुतली जाते किंवा त्यावर गोमूत्

र टाकण्यात येते. म्हणजे गाईचे मूत्र पवित्र आणि आईला, बहिणीला येणारी पाळी अपवित्र, याचं

काय लॉजिक आहे तेच कळत नाही.

मासिक पाळी हा एका स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. एक नैसर्गिक क्रिया आहे. या

क्रियेमुळे स्त्रीला मातृत्व लाभतं. मग या क्रियेला अशुभ आणि पाप मानणं योग्य नाही. अशा रुढी

-परंपरांच्या नावाखाली स्त्रीयांची कुचंबना केली जाते. आपण आज खऱ्या अर्थानं स्त्री-पुरुष

समानता मानतो, तर या चुकीच्या समजुतीतून बाहेर येणं गरजेचं आहे.

मासिक पाळीबद्दल चारचौघात कधीच कोणी बोलत नाही. अजूनही ग्रामीण भागात एखाद्या

महिलेला पाळी आली तर तिला बाहेर बसावं लागतं. ग्रामीण भागातच काय, मुंबईसारख्या

शहरातही हे काटेकोरपणे पाळलं जातं. या काळात देवाला हात नाही लावायचा, कोणाला शिवायचं

नाही अशा गोष्टी महिलांना कराव्या लागतात. या सर्व गोष्टी महिलेला देवानंच दिल्या आहेत. मग देवाला हात लावण्यापासून किंवा मंदिरात जाण्यापासून का रोखलं जातं?
खेड्यांमध्ये हा प्रश्न खूपच मोठा आहे. ग्रामीण भागात आजही महिला त्या चार दिवसात कापडच

वापरतात. एकच कापड धुवून पुन्हा पुन्हा वापरलं जातं. ते कापड कुठे तरी मग अंधारात किंवा

कपड्याच्या आत दडवून ठेवलं जातं. तेच कापड पुन्हा वापरुन वापरुन त्यातून महिलांना जंतूसंसर्ग

होतो. अखेर हे सर्व टाळण्यासाठी महिलांनी सॅनिटरी नॅपकिन वापरायला हवेत. ते कसं वापरायचं?

त्याची गरज का आहे? हे पटवून देण्यासाठी घरा-घरात जाऊन महिलांशी चर्चा केली. या विषयावर

चर्चा करणं म्हणजे जणू पापच. सुरुवातीला महिला तयार व्हायच्या नाहीत. पण हळूहळू त्यांना बोलतं केलं. सॅनिटरी नॅपकिन वापरायला सांगणं सोपं होतं. पण ग्रामीण भागातल्या महिलांना

60-70 रुपयांचे सॅनिटरी नॅपकिन कसे परवडणार? त्यात आता तर जीएसटीमुळे सॅनिटरी नॅपकिन्स

आणखी महाग होणार आहेत. म्हणून विचारधारा महिला गटातर्फे सॅनिटरी नॅपकिन्स बनवायचा

प्रकल्प गावात सुरू केला. यासाठी अनेकांनी सहकार्यही केलं. गावातल्या महिलांनाही येथे काम

करण्यासाठी तयार केलं.


     पँडमँनने समाजाला ह्या विषयावर बोलतं केलं त्या मधूनच ह्या चित्रपटाच्या सह्याने मागसलेल्या 

राज्या पर्यत अनेक टिमवर्क पोहचत आहे .... समाजात ह्या विषयी जनजागृती होणे खरचं 

खुप गरजेचे आहे .....


     

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED