स्त्री जन्माची सांगता ( भाग -6) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्त्री जन्माची सांगता ( भाग -6)

नादिया मुराद(Female)आणि देनिस मुक्वैगी(Male)ह्यांना संयुक्तपणे २०१८चा नोबेल शांतता-पुरस्कार जाहीर झाला आहे.नादिया मुराद (जन्म १९९३,age-25) ह्या इराकमधील यझिदी समाजातील मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या २०१६ पासून मानवी तस्करीतील बचावलेल्यांच्या सन्मासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छादूत आहेत.नादिया मुराद ह्या इराकमधील कोचो ह्या गावात जन्मल्या. त्यांचे कुटुंब शेतकरी होते. त्या उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत होत्या आणि इतिहास ह्या विषयाचे शिक्षक बनण्याची आणि रंगभूषाकार बनण्याची त्यांची इच्छा होती. ३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांच्या गावावर आयसिसने हल्ला केला. नादिया ह्यांच्या ९ भावांपैकी ६ जण जागच्या जागी मारले गेले. हजारो महिला आणि मुले ह्यांसह नादिया आणि त्यांच्या दोन बहिणींना गुलाम म्हणून कैद करण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतर लादण्यात आले. त्यांना लैंगिक छळ सहन करावा लागला आणि गुलाम म्हणून विकण्यात आले. त्यांच्या आईला ठार मारण्यात आले. अनेक पाशवी अत्याचार सहन केल्यावर त्यांना निसटण्यात यश मिळाले. त्यांनी जर्मनीत आश्रय घेतला..नादिया मुरादमुळे याझिदी या लहानशा जनसमुदायाची हकिगत तेवढय़ाच ताकदीने जगापुढे येऊ शकली. ‘दी लास्ट गर्ल’ हे नादियाचे आत्मवृत्त, त्यात इस्लामी जुलूमशहाने चालविलेली दहशत आणि तेवढीच तिच्या स्फूर्तीदायी लढय़ाची कथा सांगितली आहे. ती केवळ तिचीच कथा नाही तर एक छोटासा समाज, देश तुटून इतरांच्या आश्रयाला आलेला असताना काय यातना भोगतो, नामशेष होण्याच्या काठावर पोहोचतो, याचेही चित्तथरारक कथानक त्यात आहे. शेतकरी, मेंढपाळांच्या कोचो या उत्तर इराकमधील दुर्गम खेडय़ात नादिया मुरादचा जन्म झाला आणि ती वाढली. निसर्गाच्या सान्निध्यात, धकाधकीपासून दूर. यामुळे त्यांचे जीवनही शांत होते. नादियाने इतिहासाची शिक्षिका व्हायचे किंवा सौंदर्यप्रसाधनगृह सुरू करायचे स्वप्न बाळगले होते. नादिया मुरादला १२ भाऊ-बहिणी. २००३ मध्ये तिचे वडील निवर्तले. तिच्या भावांनी काबाडकष्ट केल्यानंतर त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारली. चांगले घर व मोठा गोठा त्यांनी बांधला. ती नववीपर्यंत शिकली. तिला इतिहासाची आवड होती. परंतु, १५ ऑगस्ट २०१४ रोजी- ती केवळ २१ वर्षाची असताना तिच्या आयुष्याला प्रचंड वादळाचा सामना करावा लागला. ती उद्ध्वस्त होता होता वाचली. तिने जे काही भोगले, सोसले ते नरकयातनांनाही लाजविणारे होते. इस्लामी राष्ट्राच्या अतिरेक्यांनी या गावावर हल्ला करून त्यांच्या बुरसटलेल्या धर्मात प्रवेश करण्याची अट न स्वीकारणा-या पुरुषांचे शिरकाण केलेच; परंतु वृद्ध महिला व मुलांचीही गय केली नाही. नादियाच्या समोरच त्यांनी ३१२ पुरुषांची हत्या केली. तिच्या भावांना मारले. त्यानंतर आईलाही मारताना तिने पाहिले. सामूहिक दफनभूमीत ही सर्व प्रेते नंतर गाडून टाकण्यात आली. त्यानंतर तेथे पकडलेल्या मुलींना मोसूल येथे नेण्यात आले व सैनिकांनी त्यांना आपापसांत वाटून घेतले. एक बायको व मुलगी असलेल्या पुरुषाने नादियाला गुलाम बनविले. तिला एका स्वतंत्र खोलीत डांबण्यात आले. पळून जाण्याच्या एका फसलेल्या प्रयत्नानंतर शिक्षा म्हणून सहा पिसाळलेल्या सैनिकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती बेशुद्ध होईपर्यंत ते तिच्यावर जबरदस्ती करीत होते. तीन महिन्यांचे बलात्कार आणि नरकयातना यातून शेवटी नोव्हेंबर २०१४ मध्ये पळून जाण्यात नादिया यशस्वी ठरली. इराकच्या निर्वासितांचे आश्रयस्थान असलेल्या कुर्दिस्थानाच्या निकटचे शहर डुहोक इथल्या अनेक निर्वासित छावण्यांपैकी एका छावणीत तिने आश्रय घेतला..  नादियाचे आत्मचरित्र या धार्मिक दहशतवादावर कठोर प्रहार करते. नादियावर सशस्त्र सैनिकांचा अहोरात्र पहारा असे व दिसेल तो तिच्यावर जबरदस्ती, मारहाण, बलात्कार करीत असे. नादिया म्हणते, आमच्यावर झालेले अत्याचार शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. हे सैनिक आम्हाला अमानुष मारहाण करीत. त्यानंतर, कोणी दिसेल तो आमचा क्रूर उपभोग घेत असे. आमच्या शरीरांची त्या क्रूर राक्षसांनी केलेली विटंबना भयकारक आणि तिरस्कृतही आहे. त्या लांडग्यांच्या नजरेतून कोणी सुटत नसे. त्यांनी आमच्या भावांची, नातेवाईकांची क्रूर कत्तल तर केलीच; परंतु महिला व बालिकांचेही शारीरिक हाल आणि लचके तोडताना माणुसकीची कोणती शरमही बाळगली नाही. एवढे ते नराधम आहेत. नादियाने आपल्यावर झालेल्या या अत्याचारांची हकिगत कोणताही आडपडदा न ठेवता सांगितली हे अशा यातनांमधून जाणा-या महिलांसाठीही एक पथदर्शक उदाहरण ठरतेनादिया मुराद ह्यांचे आयसिसच्या छळछावणीतील अनुभवांविषयीचे अनुभवकथन दि लास्ट गर्ल ह्या नावाने प्रकाशित झाले आहे.

एखाद्या स्त्री वरती इतका अन्याय कसा होऊ शकतो फक्त ती एक स्त्री आहे म्हणून का ??