Pathlag - 10 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग – (भाग-१०)

दुसर्‍या दिवसाची सकाळ प्रसन्न होती. दिपक अगदी गाढ झोपला होता, जणु कित्तेक दिवसांची झोप तो पुर्ण करत होता. खिडकीतुन उबदार सुर्याची किरण अंगावर आली आणि खार्‍या वार्‍याचा एक झोक नाकात शिरला तसा दिपक जागा झाला.

त्याला पहील्यासारखेच फ्रेश वाटत होते. तो खोलीचे दार उघडुन बाहेर आला. हॉटेलमधील वेटर्सची नेहमीप्रमाणे लगबग चालु होती. केसांवरुन हात फिरवत तो व्हरांड्यात आला तोच थॉमसही तेथे आला. उघडाबंब आणि लाल रंगाची बर्म्युडा घातलेला थॉमस अजुनच अवाढव्य भासत होता.

“गुड मॉर्नींग दिपक, कशी झाली झोप?”, त्याने दिपकला विचारले.
“मस्त.. खुप मस्त. हवेत गारठा असुनही समुद्राच्या दमटपणामुळे मस्त उबदार वाटत होते. खुपच वेळ झोपलो खरं तर..”, खजील होत दिपक म्हणाला

“असु दे.. असु दे, अजुन फार काही उशीर नाही झाला, चल तुला गंमत दाखवतो..”,असं म्हणुन थॉमस जवळ जवळ ओढतच त्याला बाहेर घेउन गेला.

काही अंतर चालुन गेल्यावर एक बांबुचा छोटा पुल लागला आणि तेथुनच पुढे एक चौकोनी बसण्यासाठी जागा केलेली दिपकला आढळली. ती जागा थोड्या आतपर्यंत समुद्रात गेली होती, जणु पाण्यात सुर मारायला केलेली सोयच. खाली पाण्यात अनेक हिप्पी डुंबत होते.

“काय, आली का मज्जा?”, थॉमसने दिपकला डोळे मिचकावत विचारले.

दिपकला प्रथम त्याच्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही, परंतु त्याने पुन्हा एकदा पाण्यात डुंबणार्‍या त्या तरुण-तरुणींना पाहील्यावर त्याला थॉमसची ‘मज्जा’ कळाली. ते सर्व हिप्पी, विवस्त्रावस्थेमध्ये पाण्यात पोहत होते.

“इथे सर्व फ्रि आहेत.. एकदम रॉ.. नैसर्गीक. इथं कुणाला कश्याची लाज, भिती वाटत नाही. सर्वजण इथे मोकळेपणाने विवस्त्र होतात. म्हणजे तसे गोव्याला न्युड बिच आहेतच की. पण इथे मिळणार्‍या प्रायव्हसी मुळे एक प्रकारचा मोकळेपणा मिळतो..” थॉमस म्हणत होता.

आणि तो बोलत होता ते खरंच होतं. दिपक प्रथमच तेथे आला होता, पण त्याच्या तेथे असण्याची कुणीच दखल घेतली नव्हती.

दिपक थोड्यावेळ उन्हात पडुन राहीला आणि मग तो परत आतमध्ये आला. स्टेफनीने एव्हाना सगळ्यांचा ब्रेकफास्ट मांडुन ठेवला होता. दिपक आणि थॉमस टेबलावर येऊन बसले तसे स्टेफनी थॉमसला म्हणाली, “तुमचं चालु द्या.. मी थोडं स्विम करुन येते…”

आणि आपल्या कंबरेला हेलकावे देत स्टेफनी निघुन गेली.

दिपक अजुनही ती गेली त्या दिशेला पहात होता. नकळत त्याच्या मनात विचार डोकावुन गेला, “स्टेफनी सुध्दा इतरांसारखीच विवस्त्र पोहत असेल….??”

आपण उगाचच तेथुन उठायची घाई केली असे त्याला वाटुन गेले. पण थोड्याचे वेळात त्याला स्वतःचीच लाज वाटली आणि तो थॉमसशी गप्पा मारत ब्रेकफास्ट करण्यात मग्न होऊन गेला.


दिपक आंघोळ करुन त्याच्या खोलीच्या बाहेर आला तेंव्हा थॉमस हातामध्ये मोठ्ठाले रिकामे क्रेट्स घेऊन त्याच्या ट्रक्सच्या दिशेने निघाला होता.

दिपक घाई-घाईने त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या हातातील काही सामान घेऊन त्याने ट्रकच्या मागच्या बाजुला ठेवले.

“चला दिपकशेठ.. आमचा दिवस सुरु झाला.. आज कोल्हापुर, निपाणीचा दौरा आहे, यायला थोडा उशीर होईल.. तुझा कामाचा पहीला दिवस.. सो… शुभेच्छा..”

असं म्हणुन थॉमसने ट्रक सुरु केला आणि काही वेळातच धुळ उडवत त्याचा ट्रक वळणावरुन दिसेनासा झाला. धुळ खाली बसेपर्यंत दिपक ट्रकच्या दिशेने पहात राहीला आणि मग तो पुन्हा हॉटेलमध्ये परतला.

दिपक आतमध्ये आला तेंव्हा स्टेफनी स्वयंपाकघरात काम करत होती. दिपक क्षणभर दरवाजात घुटमळला. शेवटी विचार करुन तो माघारी वळला तोच स्टेफनीने विचारले,

“काही हवे होते का?”

दिपक माघारी वळला तेंव्हा स्टेफनी त्याच्याकडे निरखुन बघत होती. तिचे निळसर डोळे त्याला आकर्षीत करत होते. दिपकचा श्वास क्षणभर अडकला.

स्वतःला सावरत तो म्हणाला, “काही काम आहे का विचारायचे होते”
“अं..म्हणजे थॉमसने तसं सगळं हॉटेल काल दाखवलेले आहेच, पण तरी एकदा मला वाटतं तु सर्व पुन्हा फिरुन ये. प्रत्येक सेक्शनमध्ये काम करणार्‍या लोकांना भेट, त्यांची ओळख करुन घे. तुला काही हवं असेल तर बिंधास्त मागुन घे.. आपलंच हॉटेल आहे.. फिल फ्रि..”

स्टेफनीने त्याचा एकेरी केलेला उल्लेख दिपकला नकळत सुखावुन गेला. मान डोलावुन तो निघुन गेला.


दिपक दुपारच्या जेवणाच्या वेळापर्यंत हॉटेलमध्येच फिरत होता. तेथील वेटर्स, सुपरव्हायझर्स, इतर स्टाफ ह्यांच्याशी त्याने ओळखी करुन घेतल्या. हॉटेलच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने काही किरकोळ बाबी त्याने नोंदवुन ठेवल्या. खरं तर त्या त्रुटींशिवायही इतके दिवस हॉटेल चालु होतेच. परंतु काही तरी काम केले हे दाखवण्यासाठी का होईना त्या गोष्टी त्याने थॉमसशी बोलण्याचे ठरवले.

दुपारच्या उन्हाच्या प्रकाशात समुद्राचे पाणी चमकत होते. सकाळी थंडगार पडलेली पांढरी शुभ्र वाळु आता पाय भाजवत होती. दिपक भरभर चालत पुन्हा स्वयंपाकघरापाशी आला. त्याने हळुच आत डोकावुन पाहीले. आत स्टेफनी नव्हती.

दिपक पुन्हा माघारी वळला आणि आपल्या खोलीत आला.

“ह्या थॉमसने स्टेफनीला कसं काय गटवलं असेल?”, राहुन राहुन एकच विचार दिपकच्या डोक्यात येत होता.

थॉमस कुठे आणि स्टेफनी कुठे. दोघांमध्ये काहीच साम्य नाही. बरं म्हणावं तर बक्कळ पैसाही नाही. म्हणायला हे हॉटेल आहे, पण तेवढ्यावरुन स्टेफनीला त्याची भुरळ पडली असेल असं वाटत नाही.

काही वेळांतच तळलेल्या माश्यांचा वास दिपकच्या नाकात शिरला तसा दिपक खोलीच्या बाहेर आला. स्टेफनी टेबलावर डीश लावतच होती.

दिपक काही न बोलता टेबलावर जावुन बसला.

स्टेफनीने काही न बोलता दोघांच्या प्लेट्स भरल्या आणि त्याच्या समोर येऊन बसली.

दोघंही काही न बोलता जेवले. जेवतांना अनेक वेळा स्टेफनीची आणि दिपकची नजरानजर झाली. पण तेवढ्यापुरतीच.

जेवणं उरकल्यावर दिपकने प्लेट्स उचलुन स्वयंपाकघरात न्हेऊन ठेवल्या आणि तो पुन्हा आपल्या खोलीत परतला.

दिपकने स्टेफनीचा विचार पुन्हा काढुन टाकायचा प्रयत्न केला. त्याने जेनी बरोबर घालवलेले शेवटचे काही दिवस आठवले. जेनी.. आज जेनी असती तर कदाचीत त्यांचे बाळ एव्हाना ह्या जगात आले असते. जेनी दिवसरात्र त्या बाळाचे करण्यात बुडुन गेली असती. त्याचे रडणे, त्याचे हसणे, त्याचे गुरगुटी मारुन झोपणे, जेनीच्या चेहर्‍यावरील बाळंतपणानंतरचे थकवा असुनही असलेले प्रसन्न हास्य.. सारे काही त्याने अनुभवण्याचा प्रयत्न केला.

स्टेफनी त्याच्या मनातुन गेलीच होती तोच खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला.

दिपक उठुन बसला. दरवाज्यामध्ये स्टेफनी होती.

“पोलिस अजुनही तुला शोधत आहेत दिपक..”, थंड आवाजात स्टेफनी म्हणाली.

दिपकच्या डोळ्यांवर हळुवार उतरणारी झोप खाड्कन उतरली.

“पोलिस?? मला समजलं नाही!”, दिपक म्हणाला.

स्टेफनी खोलीमध्ये आली आणि तिने दरवाजा बंद केला.

“यु आर ए सेलेब्रेटी दिपक. मी पाहीलं तुला टी.व्ही. वर. काय आहे ना, थॉमस दिवसभर बाहेर असतो. मला टि.व्ही बघण्याशिवाय वेळ घालवण्याचा पर्यायही नाही. खुप टी.व्ही बघते मी..”, चेहर्‍यावर मिस्कील हास्य आणत स्टेफनी म्हणाली.

“हे बघ.. माझ्यावर विश्वास ठेव, तो खुन माझ्याहातुन नकळत घडला आहे… मी.. सगळं सांगतो तुला.. प्लिज.. ऐक माझं..”, दिपक म्हणाला..

“त्याची काही आवश्यकता नाही. आय डोन्ट केअर तु तो मर्डर खरंच केला होतास का नाही. अ‍ॅन्ड डोन्ट वरी, मी पोलिसांनासुध्दा फोन करणार नाही जोपर्यंत….”

“जोपर्यंत?? जोपर्यंत काय?”, दिपक म्हणाला…

“सोड ना ते.. कामाचं नंतर बोलता येईल. बट बिफ़ोर दॅट, आय निड अ मॅन.. आय एम अ हंन्ग्री टायग्रेस यु सी. थॉमस कान्ट प्लिज मी…. लेट्स मेक लव्ह आणि मग बोलु..”, स्वतःच्या शर्टाची बटणं काढत स्टेफनी म्हणाली…


दिपकला जाग आली तेंव्हा स्टेफनी खोलीत नव्हती. दिपकने कपडे घातले आणि तो बाहेर आला. स्टेफनी लाऊंज मध्ये हेड शेफशी काहीतरी बोलत होती. दिपक तेथेच घुटमळत उभा राहीला. स्टेफनीने त्याला पाहुन न पाहील्यासारखे केले.

शेफला काही सुचना दिल्यावर तो निघुन गेला तसा दिपक तिच्या जवळ गेला.

“तु कामाचं काही तरी बोलत होतीस..”, दिपक म्हणाला..

“अरे हो..हो.. सांगते.. घाई काय आहे? तु ही इथेच आहेस, मी सुध्दा इथेच आहे.. डोन्ट वरी. योग्य वेळ आली की मी सांगेनच.. आणि हो, प्लिज डोन्ट ट्राय टु रन अवे. निदान सध्या पोलिसांना नक्की तु कुठे आहेस हे माहीत नाही. मी एक फोन केला तर तुला ह्या भागात पकडायला फारसा वेळ लागणार नाही..” असं म्हणुन स्टेफनी तेथुन निघुन गेली.

अनपेक्षीतरित्या दिपक अडकला होता. असं काही होईल ह्याचा त्याने विचारसुध्दा केला नव्हता. तो स्टेफनीच्या हातातील खेळणं बनला होता आणि स्टेफनीचे जे काही काम होते त्यासाठी ती दिपकचा वापर करुन घेणार होती. आणि दिपकची इच्छा असो किंवा नसो, दिपक ते काम करण्यास बांधील होता.

दिपकला हे असं स्वतःचे आयुष्य दुसर्‍याच्या मर्जीवर जगणं मान्य नव्हते. कसंही करुन ह्यातुन बाहेर पडणं महत्वाचे होते आणि त्यासाठी त्याने स्टेफनीची पाळं-मुळं खणुन काढायचे ठरवले. जसा दिपकला काही इतिहास होता, तसाच काहीसा इतिहास स्टेफनीचा असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तसं नसतं तर ती ह्या गचाळ थॉमसबरोबर कश्याला राहीली असती.

स्टेफनी दिपकला काही करायला भाग पाडायच्या आधीच स्टेफनीला जाळ्यात पकडण्याचे दिपकने ठरवले. आणि त्यासाठी मुख्य दुवा होता थॉमस.

दिपकने खुप वेळ विचार केला आणि शेवटी त्याच्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला …...

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED