Mohabbat ek shayar ki books and stories free download online pdf in Marathi

मोहबबत एक शायर की

नमस्कार मित्रहो,

आज पुन्हा एक लव्ह स्टोरी घेऊन आलोय पुन्हा एकदा नव्या ट्विस्ट सोबत नव्या रंजक गोष्टीसोबत.

श्रेयस ह्या स्टोरीचा हिरो सध्या कॉलेज ला आहे. आपल्या सारखाच मुलगी पटवायची इच्छा असणारा पण कधी धाडस करू न शकणारा. पण त्याला शायरी चा छंद होता.
राहुल(श्रेयस चा मित्र): अरे चल ना काय करतोयस.
श्रेयस :- नाही रे आज नाही,
राहुल:- का ??
श्रेयस: करायचं काय आत जाऊन कॉलेज मध्ये आपलं कोण नाही. आणि गेलोच आत तर आपण कोणालाही काहीही बोलतो आणि मग लोक बोलतात. ??


लोग केहेते है भावनाओ की किंमत नाही है हमे.
क्या करे भावना तो वही समजा सकती है, जो करती है प्यार हमे.
हे भगवान उसी प्यारवाली का इंतझार है हमे.


राहूल :- मग काय मत आहे तुझं

श्रेयस :- मिळेल रे एक दिवस चल आपण भेळ खाऊन येऊया,

(मग ते दोघे भेळ च्या गाडीवर जातात.)

आणि भेळ ची ऑर्डर देतात. आणि गप्पा मारत असतात . आणि मग ते नेहमी प्रमाणे भेळ खात असतात. आणि तिथे बाकी ही मुले होती. आणि तिथे २ मुली पण होत्या.

अणि त्यात एक मुलगी होती?. अणि श्रेयस नजर पुन्हा पुन्हा तिच्यावर जात होती. दिसायला cute, मागे केस बांधलेले. उभा चेहरा लांबलचक नाक. खर तर तीच सौन्दर्य हे तिच्या हसत्या smile मुळे शोभत होत. अणि तिचे डोळे पण खुपच आकर्षक होते. थोडक्यात म्हनायच तर साधी सिंपल कपडे घालणारी, अणि त्यामुलेच शोभून दिसणारी. मग श्रेयस च्या मनात एक शायरी आली.


अस्मान खाली खाली सा दिख रहा है.

कुछ तो खो बैठा है शायद !

अस्मान भी उसी को धुंद रहा है,

कोई बता दो उसे,

तेरा चाँद तो जमीन पर आया है! ?


पण ही शायरी तो बोलू शकत नव्हता कारण. मुलींच्या बाबतीत श्रेयस फारच भित्रा आहे. मग काय नेहमी प्रमाने तो आवरून निघणार आणि पैसे देत होते. भेळवाला बोलला दादा थाम्बा जरा पैसे सुट्टे नाहीत. आणि तेवढ्यात ती मुलगी ही पैसे देते आणि त्यांच्याकडे पण सुट्टे नव्हते. आणि भेलवाल्याने दोघंच्यात १०० रुपये दिले अणि वाटुन घ्या म्हणून सागितले.

मग राहुल भांडू लागला.

राहुल:- ते काही नाही तुम्ही आमच आमच पैसे परत दया आता ही नोट काय अर्धी फाडून घ्यायची का???

श्रेयस:- अरे असू दे घे. बघुया आपण. मी आहे ना तु थांब जरा.

आणि श्रेयस सगलेच पैसे तिला देतो.

पुनम:- अरे नको राहुदे तुझ्याकडे. नंतर दे कधीतरी.

श्रेयस:- हो पण नको तस. कारण नंतर मी तुला कुठे शोधु? (श्रेयस ने तिच्याशी मैत्री करन्यासाठी एक idea केली होती.)

पूनम :- ठीक आहे. नंतर मी नक्की देईन.

श्रेयस:- ok नावं नाही सांगितलं तुझं. नाही म्हणजे तसं तुला हाक मारायची असेल तर कसं म्हणून विचारलं.

पुनम :- हा . मी पुनम. आणि तुझं नावं ?

श्रेयस:- मी श्रेयस. इथेच आहे कॉलेज ला. आणि अधून मधून भेळ खायला नेहमी येतो.

आणि मग ते निघतात पण या सगळ्या गोष्टीत श्रेयस हरवला होता. जाताना ही तिच्याकडे बघतच जात होता.

राहुल:- काय रे. तुला ती जामच आवडलेली दिसते.

श्रेयस:- हो. फार चांगली वाटली रे बोलताना

राहुल :- का नाय रे प्रत्येकाला असच वाटतं असतं.

श्रेयस:- नाही यार खरंच चांगली आहे ती.

राहुल:- तुला कसं माहित. १० मिनिटात कोणाचाच स्वभाव ओळखता ये नाही.

श्रेयस:-


जिंदगी में बार बार सहारा नही मिलता,

बार-बार कोई प्यार से प्यारा नाही मिलता,

जो है उसे सांभाल रखना,

खो दिया उसको तो उसके जैसा

दुबारा नहीं मिलता !


राहुल :- पण तू इतका sure कसा आहेस की तुला तीच आवडते.

श्रेयस :- कारण आता मला नेहमी तिचा भास होतोय.

राहुल:- मग आता काय प्लान आहे.

श्रेयस:- काहीच नाही फक्त पैस्याच्या निम्मिताने थोडीशी ओळख करून घ्यायची.

(मग श्रेयस रोज तिला बघायला भेळ च्या गाड्डयावर जाऊन तिची वाट बघायचा पण ती काय ये नव्हती. पण श्रेयस शांत बसणार नव्हता. तसं त्याला मुलीशी बोलायची नेहमीच भीती वाटते पण यावेळी त्याने ठरवलं होत कि धाडस करायचं.

मग एकेदिवशी ती सहज तिच्या मैत्रिणीच्या कामासाठी श्रेयस शिकत असलेल्या कॉलेज मध्ये गेली.)

राहुल :- अरे भावड्या ती पोरगी आपल्या कॉलेज मध्ये आल्या.

श्रेयस:- (उत्साहाने )काय ? ????

एका सेकंदाचा ही वेळ न घालवता तिला बघायला गेला. आणि मग एका झाडाच्या आडोश्याला राहून तिला बघत होता फार नटून आली होती. आणि तिच्या सौन्दर्य बघून तिच्याशी बोलायचं सुद्धा धाडस होईना. बोलायचं सोडा हा तिच्या समोर सुद्धा जायला तयार नाही.

राहुल :- का रे का झालं ?

श्रेयस :- नाही भावा जमणार मला तिच्या समोर राहून तिला नजर देत बोलायला. आणि मग मला तिला बघायला पण मिळणार नाही त्यापेक्षा हे बरं. लांबून तीच हसरा खुललेला चेहरा तरी बघू शकतो.

राहुल :- अरे येड्या तुझे पैसे आहेत तिच्या कडे ते तरी घे जा.

श्रेयस:- नाही रे नंतर बघू.

राहुल शेवटी त्याला स्वतः ओढून नेतो.

श्रेयस :- राहुल्या गप्प सोड नाहीतर लय मारीन हा तुला.

राहुल :- भावा तुझ्यासाठी मार पण खायला तयार आहे. पण तू चल

या आणि सगळ्या गोंधळाकडे पूनमची नजर पडली. आणि ती स्वतः त्यांच्या कडे गेली. मग ते दोघे लगेच सावरले. आणि श्रेयसने हळूच राहुल्या इशारा करून घालवलं.

पुनम :- hi

श्रेयस :- hi तू इथं कशी काय.

पुनम :- मैत्रिणीकडे आले होते. तु या कॉलेज ला आहेस का ?

श्रेयस :- हो. बर चलना ice-cream खाऊया if you don't mind.

पुनम :- चालेल मला पण सोबत माझी मैत्रीण पण आहे. तुला काही प्रॉब्लेम..................

श्रेयस :- काही अडचण नाही.

मग राहुल, श्रेयस, पुनम आणि तिची मैत्रीण असे सगळे जातात कॉलेज कॅन्टीन मध्ये व आईस्क्रिम घेतात मग यांचं बोलणं सुरु

होतं.

पुनम :- मग काहीतरी सांगा तुमच्या बद्दल.

राहुल :- श्रेयस नाही बोलणार मी सांगतो. श्रेयस ची खासियत म्हणजे तो फार सुंदर शायरी करतो. ✒️✒️✒️

पुनम :- अरे वा मग आम्हाला पण एखादी बोलून दाखव ना.

श्रेयस :- नको पुन्हा कधी तरी प्लीज

पुनम :- (थोडी नाराज होऊन) बर ............ पण याचा अर्थ आपल्याला पुन्हा भेटायला हवं अशी इच्छा आहे का तुझी.?

श्रेयस थोडा घाबरला त्याला पकडला गेल्याची भीती वाटत होती.

श्रेयस :- नाही तस काही नाही.

पुनम :- ठीक आहे म्हणजे आपण friends. आपण पुन्हा भेटूया.

श्रेयस :-


ए यार 'तेरी यारी पर हम गर्व करते है,

हर समय मिलने की तलब करते है,

ऐसे दोस्त बहुत काम मिलते है,

जो हमसे दोस्ती करने की चाहत करते है !


पूनम :- अरे वा सुंदर शायरी बोलतोस तू. बरं ऐक ना मी तुझे पैसे आणलेले नाहीत. मी नंतर देते तू please तुझा नंबर देतोस का ?

श्रेयस :- हो घे ना. ९८४xxxxx१८

मग श्रेयस नंबर देतो आणि ते निघून जातात. आणि या सगळ्या प्रकरात दोघांचं चॅटिंग चालू असंत आणि हळू हळु आता पूनम ला पण श्रेयस आवडत असतो. त्यात पण अधून मधून शायरी बोलत असतो.

राहुल :- भावा काय मग हल्ली लक्ष नाही तुमच कशातच?

श्रेयस :- काय सांगायचं ? ती आता मनात बसलीये.


आग सुरज में होती है,

जलना जमीन को पडता है l

मोहब्बत निगाहे करती है,

तडपना दिल को पडता है l


राहुल :- काय मज्जा बाबा तुझी. शायर की शायरी मिल गई. हमे भूल mat जाना

श्रेयस :- नाही रे भावा तुला कसं विसरु.

अचानक पुनमचा मेसेज येतो. (थोडं महत्वाच बोलायच होतं कधी भेटणार.)??

श्रेयस :- अरे राहुल्या तिचा मेसेज आलाय. की महत्वाच बोलायच आहे. काय बोलणार असेल रे ती.

राहुल :- अरे वा ! जे तुला नाही जमल बोलायला ते बोलणार आहे ती. भावा आता लागली तुजी बरोबर. जा आता पटकन. ✌️✌️?

मग ते श्रेयस मस्तपैकी नटून जातो. कारण आज प्रेमाचा उस्तव साजरा करायचा होता त्याला. मग ते भेटतात

श्रेयस :- बोल ना काय झाल? काय बोलणार होतीस?

पुनम :- अरे यार मी आता पुण्याला चाललीये कायमची?

थोड्या वेळासाठी श्रेयस ला झटका बसला होता. ☹️☹️???? अणि त्याचा मनाने बघितलेल्या स्वप्नाचा ??चक्का चुर झाला होता. शेवटी श्रेयस बोलला.

श्रेयस :- ठीक आहे. मग आता काय?

पुनम :- Please मला माफ़ कर? पण तुला न सांगता गेले तर मला नसत आवडलं .

पुनमला वाटत होत की त्याने आता शेवट म्हणून तरी प्रपोज करावा पण तशी काहीच चिन्ह दिसत नव्हती.

??

श्रेयस :- आता फक्त शेवट आपण भेळ खावुन करुया. जिथे आपल्या मैत्रीची सुरवात झाली. तिथेच शेवट करुया.

मग दोघे भेळ खातात. जाताना दोघे विरुद्ध दिशेने जातात अणि तेवढ्यात श्रेयस एक शायरी बोलतो. अणि पुनम मागे वळून बघते.

श्रेयस :-

किस्मत पर ऐतबार किसको है,

मिल जाए खुशी तो इनकार किसको है !

कुछ तो मजबुरिया होगी तेरी,

वरना जुदाई प्यार किसको है !
??

पुनमला कळून चुकलं होत की आता तो आपल्यावर जिवापाड प्रेम करतोय अणि आता जर मी थांबले तर कधीच मन नाही होणार इथून जायच अस म्हणत ती इछा नसताना ही निघून जाते.

श्रेयस मात्र पूर्ण बिखरून गेला होता. पण थोडसं मनाची समजूत घालून तिला विसरायचं ठरवलं. पण त्याच्यासाठी ते एवढं सोपं नव्हतं. पण एक सहारा होता त्याला तो म्हणजे whatsapp. रोज अधून मधून मेसेज करायचा.

श्रेयस :- कायपण बोल भावा प्रेमात पडू नये

राहुल :- का रे ?

श्रेयस :- प्रेमाची गोष्टच वेगळी आहे.


मोहब्बत का कोई रंग नही,

फिर भी वो रंगीन है l

प्यार का कोई चेहरा नही,

फिर भी वो हसीन है l


राहुल :- वाह वाह l मग तिचा मेसेज वैगेरे येतो का नाही ?

श्रेयस :- हो. म्हणत होती की


वो पुछ रही थी,

क्यों नाराज हो. क्या हुआ हैl

कैसे बताऊ उन्हे की

उन्ही से इश्क हुआ है l ♥️♥️


राहुल :- असुदे ते आता पण काही विचार केलाय का ?

श्रेयस :- नाही रे करमत तिच्या शिवाय. आपण जायचं पुण्याला. आता नाही थांबायचं शेवटपर्यंत.


आंखो के है वो सपने जबतक

सच ना होगे उठना ना.

ये ना सही दो जान है पर,

केहेते हमको थकना ना.

है सारी यादी कल की वो

मेहफूस दिल के कोने में

वो छोटीशी दुनिया है l

कब लौत आएगी l

तरसे - तरसे आँखे देखने को l


मग ठरतं आणि ते दोघे निघतात. आणि प्रपोस करायचं ठरतं. आणि मस्त पैकी letter लिहितो. मग तिच्या कॉलेज जवळ जातात. आणि सकाळी कॉलेज सुरु होण्यापूर्वी तिच्या बेंच मध्ये letter ठेवून येतात.

आणि मग नेहमी प्रमाणे कॉलेज भरते आणि तिला ती चिट्ठी मिळते. आणि वाचू लागते.

???
my dear punam,

मी तुला भेटल्यापासून मी फार आनंदात जगतोय. तुझ्यामुळे माझ्या शायरी ला थोडी सुंदरता आली. कारण या पूर्वी मी शायरी करायचो पण चेहरा माहित नव्हता कोण आहे. जसं दागिना हा सुंदर मुलगीलाच शोभतो. तशी माझं शायरी ही तुझ्यावर असलेल्या प्रेमालाच शोभते. मी तुला भेटलेल्या क्षणापासुन तुझ्यावर प्रेम करतोय. पण माझ्यात धाडसं नव्हतं बोलयचं. म्हणतात कि आयुष्य फार सुंदर आहे. पण माझं आयुष्य तुझ्याशिवाय अंधार आहे. कारण शेवटी तेज तुज्या चेहऱयात आहे.


अंधेरे को सिर्फ रोशनी मिटा सकती है अंधेरा नही.

नफरत सिर्फ प्यार मिटा सकता है नफरत नही l

अपने प्यार कि नफरत को तुम्हारे प्यार से मिटाना चाहता हूँ l


जर मी तुला आवडत असेल तर तुमच्या college च्या ground डाव्यांबाजूला एक गुलाबाचं ठेवलं ?? आणि ते घेऊन gate वर ये मी आहे तिथे. आणि नसेल आवडत मी तर रिकाम्या हाताने ये पुन्हा भेळ खाऊया.

मग पूनम खुश होऊन पळत जाते gate वर. आणि आनंदाच्या भरात गुलाबाचे फुल विसरून जाते. मग gate वर गेल्यावर तो रस्त्याच्या पलीकडे उभा होता. आणि तो अचानक नाराज झाला. मग पूनम च्या लक्षात आलं कि फुल विसरलय आणि पुन्हा ती आत पळत जाऊन ते फुल घेऊन येते. आणि मग श्रेयस तिच्याकडे बघतच पळत तिच्यापाशी जात होता. आणि अचानक एका गाडी समोर येऊन अपघात होतो. मग श्रेयस बेशुद्ध होतो. मग राहुल आणि पूनम लगेच त्याला दवाखान्यात घेऊन जातात. आणि दवाखान्यात त्याला ऍडमिट करतात.??

राहुल :- डॉक्टर कसा आहे आता श्रेयस . बर आहे का त्याला ?

डॉक्टर :- त्याला दुखापत काही नाही झालेली पण शुद्धीवर आल्याशिवाय काय सांगता येणार नाही.

पुनम :- राहुल काय यार असच का होत नेहमी.

राहुल :- म्हणजे.

पुनम :- ज्यदिवशी मी इकडे येणार होतो. त्या दिवशी मी prapose करणार होते. पण नाही जमलं. आणि आज बोलणार होते पण हे असं. मी ही त्याच्यावर मनापासून प्रेम करते.

मग हेंच बोलणं चालू असतं आणि श्रेयस शुद्धीवर येतो. मग

राहुल :- काय र बरं वाटतंय का? डोकं वैगेरे दुखत नाही ना.

श्रेयस :- नाही पण ही कोण? आणि मी इथं कसा ?

हे बोलणं ऐकताच ती बाहेर निघून गेली.

राहुल :- तुला काहीच नाही आठवत.

श्रेयस :- मज्जा केली रे. काय नाही ठीक आहे मी फक्त थोडस हाताला खरचटलंय ते दुखतंय.

राहुल :- मग मी बाहेर थांबतो. आणि तिला आत पाठवतो.

पूनम :- काय रे श्रेयस अशी चेष्टा नको करत जाऊ. केवढी घाबरले मी . तुझ्याशिवाय विचारही करू शकत नाही आयुष्याचा


रब से आप की ख़ुशी मांगते हैं,
दुआओं में आपकी हंसी मांगते हैं,
सोचते हैं आपसे क्या मांगे
चलो आप से उमर भर कि मोहब्बत मांगते हैं !


श्रेयस :- अरे वा आता तु पण शायरी म्हणतेस.

पूनम :- म्हणजे काय ऑफकोर्स...


अपनी सारी यादे कैद रहें

इसलिये डायरी लिखते है हम .


श्रेयस :- वा वा.

पूनम :- बोलू तर दे.


अपनी सारी यादे कैद रहें

इसलिये डायरी लिखते है हम l

अब मुकाबला आपसे है ,

इसलिये शायरी लिखते है हम l


श्रेयस :- अस्पताल इन्सान को जिंदा रखने की लिये होते. मगर अब तुम शायरी सुना के मार दोगी.

पूनम :- असुदे आता. पण मला वाटलं नव्हतं रे तू माझ्यासाठी एवढ्या लांब येशील प्रपोस करायला. पण तुला मीच का आवडते रे.

श्रेयस :-


रोशनी चांद से होती है,

सितारो से नहीं l

मोहब्बत सिर्फ आप से होती है ,

हजारो से नहीं.


मग ते दोघे तेव्हा पासून love birds म्हणून जगत राहिले आणि काही दिवसांनी love marrige ही करणार

असा happy end आहे या स्टोरीचा लवकरच पुन्हा एका नवीन वेगळ्या स्टोरी तयार रहा.

तुम्ही नक्की कॉमेंट्स करा कशी वाटली स्टोरी ते.


इतर रसदार पर्याय