Shevtach paan books and stories free download online pdf in Marathi

शेवटचं पान. - शेवटचं पान

आरोही बाळा उठ लवकर. घड्याळ बघ जरा 9 वाजुन गेले, कॉलेज जाणार आहेस का आज. वाटतंय का बरं?
आरोहीची आई सकाळी सकाळी आरोही ला उठवत होते.
आरोही ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. आणि सध्या कॉलेज करत होती. काल तिची तब्येत बिघडली होती. आणि म्हणून तिची आई तिला सकाळी उठवत होती. मग आरोही पटकन आवरून कॉलेज ला जाते. आणि आज व्हॅलेन्टाईन डे होता.
                  पण आरोही चा कोणी प्रियकर नव्हता. पण आजच्या दिवशी सगळीकडेच थोडी वेगळी परिस्थिती असते. कदाचित कोणीतरी येऊन प्रपोझ करून जातं. आणि त्यामुळे आरोही पण सावरून च होती.
मग दुपारी 2 वाजता कॉलेज संपलं तो पर्यन्त तर कोणी काही बोलले होते. आणि थोड्या वेळाने ती घरी जाण्यासाठी निघाली असते.  एक गाडी समोर तिच्या समोर येऊन थांबते.
आता तुम्हाला वाटलं असेल की तिला कोणीतरी प्रपोझ करायला आलं वाटतं. पण नाही ती एक कुरिअर वाल्याची गाडी होती. आणि आरोही साठी एक मोठं गिफ्ट आलेलं असतं व्हॅलेन्टाईन निम्मित . मग आरोही थोडी confuse झाली की कोणी दिलं असेल एवढं मोठं गिफ्ट. त्याच्यावर काही नाव पण नव्हतं. साधारणतः एका tv च्या बॉक्स एवढा मोठा बॉक्स होता. आणि वजन पण तेवढंच वाटतं होतं. मग आरोही घरी गेली नाही, तिच्या मैत्रिणीच्या रूम वर गेली. कारणं खात्री होती की याच्यातून आरोही साठी कोणीतरी प्रपोझ करण्याचा प्लॅन केलाय.
      आता रूमवर गेल्यावर आरोही गिफ्ट उघडायला उत्सुकता वाढली होती. कारण गिफ्ट काय आहे हे सुद्धा  कोणाला माहीत नाही. मग बॉक्स वरचा पहिला चमकणारा पेपर काढला.  मग आत एक बॉक्स होता. आणि तो उघडला. आरोहिची उत्सुकतेचा जिना फारच वर चढलेला. आता गंमत बघा हा. त्यात एक थोडासा लहान बॉक्स होता. आणि वजन वाटावे म्हणून लहान बॉक्स शेजारी दोन दगडं ठेवले होते. आता आरोही ची मैत्रीण हसू लागली. पण पुन्हा त्या लहान बॉक्स मध्ये काय आहे ही उत्सुकता अजून संपली नव्हती. आणि मग पुन्हा तसंच झालं दगडं आणि लहान बॉक्स. असं आणि असं आजून तीन वेळा झालं. मग आरोही च्या  चेहर्यावर गोड अशी smile☺️☺️☺️ आली होती. आता मात्र एका एका newspaper गुंडाळलेला एक बॉक्स होता. साधारण मोबाईल च्या आकाराचा बॉक्स होता. मग तोही उघडला तर. त्यात एक खेळण्यातला मोबाईल होता. ????? पण आरोही च्या मनात अजून शंका होती गिफ्ट इथेच संपलेलं नाही. मग त्याच बॉक्स मध्ये एक ग्रिटींग कार्ड होत. ते पण असं रेडीमेड नाही कोणीतरी तयार केलेलं. मग ते उघडून बघितलं त्यावर एक संदेश होता.

-------------
मोठ्या अक्षरात लिहिलं होतं

"शेवटचं पान"

आणि मागील बाजूस पत्र होतं
?????आरोही सर्व प्रथम मला माफ कर एवढ्या मोठ्या गिफ्ट साठी. पण मी जर हे केलं नसतं तर आता तुझ्या तोंडावरच smile इतकं खुलून दिसलं नसतं. मी तुझ्यावर प्रेम करतोय. अगदी आपलं कॉलेज सुरू झाल्यापासून तू मला आवडतेस पण तुझ्याशी बोलयची हिंमत केली कित्येक वेळा तुझ्या समोर यायचो प्रपोझ करायचं म्हणून पण एक भीती वाटायची नाही म्हणाली तर. मग हळूच साईट मारून जायचो परत. आणि आज व्हॅलेंटाईन डे म्हंटल आज विचारायचं पण कळत नव्हतं कसं. म्हणून ही आयडिया. आणि जर तू भेटणार असशील तर मी या पत्रात एक clue देणारं आहे. ज्याचं उत्तर तुला बरोबर तीन दिवसांनी मिळेल. ,?????

मग आरोही पण आता थोडी हवेत होती. आणि रोज विचार करू लागली की या पत्रात कोणता असा clue आहे. आणि तीन दिवसानंतर आज सुगावा लागणार होता. मग आरोही आज कॉलेज ला चालली होती. तिला अजून ही clue मिळाला नव्हता. आणि सहज ती रस्त्यावर ची झाडं बघत चालली होती. आणि एक झाड पूर्ण वळलेलं दिसत होतं. पण त्या झाडाला एकच पान होतं. मग तिच्या लक्षात आला  तो शब्द

?शेवटचं पान?

मग ते झाडावर होतं. पण काढायचं कसं मग ती एका लहान मुलाला चॉकलेट च आमिष दाखवून ते पण तोडायला सांगितलं. ते पान त्या झाडाला कोणीतरी बांधलेलं होत. मग ते खाली आणलं. आणि ते लहान पोरगं निघून गेलं.

"त्या पानावर लिहिलं होतं हे शेवटचं पान नाही अजून ही आहे."

आणि त्या पानाला एक चिठी बांधली होती. आणि त्यात लिहिलं होतं
" आज लंच ब्रेक मध्ये माझ्याशी share it ला कनेक्ट हो. त्या वेळी बोलु थोडंस.

शेवटचं पान म्हणून एक user असेल त्याला connect हो "

मग आरोही कॉलेजवर जाते. आणि लंच ब्रेक होतो आणि आरोही share it सुरू करते. तिला जेवायचं  भान पण नव्हतं.

पण शेवटचं पान असा कोणताच user तिला गावाला नाही. मग तिला वाटलं कदाचित जेवत असेल. पण ती जेवणार नव्हती करण तिला भीती होती की, आपण जेवत असताना तो ऑनलाइन असला आणि मी नसले तर.

तेवढ्यात एक तो user चालू झाला. मग ती लगेच कनेक्ट झाली. आणि शोधू लागली की कोणी मोबाईल वर बसलेलं दिसतं का. पण इथे तर सगळेच मोबाईल वर बसले होते. मग तिला कनेक्ट झाल्यावर एक मॅसेज आला

तो:- ऐ वेडा बाई जेवून घे ना पाहिलं. मी तुझ्यावर प्रेम करतोय. शिक्षा नाही.
ती:- पण तू कोण आहेस ते सांगना ना प्लीज.

तो:- ते मी सांगतो. तू पहिला जेवून घे. नाहीतर मला वाईट वाटलं.

ती: बरं

मग ती ऑफलाईन होते. आणि पटकन जेवून घेते. पण तिला बरं वाटलं कारण जो आपल्यावर प्रेम करतो. तो एवढी आपली काळजी घेतो.
आणि ते दोघे परत online येतात

ती:- कोण आहेस तू???

तेवढ्यात एका मोबाईल वर गाणं लागलं होतं

"'तेरी वजह से मिली जिने की सब ख्वाविशे,

अब तेरे दिल मे जगी है ये मेरी कोशीसे, मै तो बस तेरा बनु, बिन तेरे ना रहूं , मैने मांगी है ये दुवा, दिल है ये सोचता, फिर भी नही पता, किस हक्क से कहूं बता की मै हिरो तेरा.

तो:- ऐकलस ना, मी कोण आहे ते *मै हूं हिरो तेरा*

ती :- आता तु मला तूच नाव नाही का सांगणार
तो:- हो.

ती :- मग तू माझ्यावरच का प्रेम करतो.

परत एका वेगळ्याच मोबाईल वर गाणं वाजत असतं.

ऐसी कभी पहेले हुई ना थी ख्वाइंशे, ओ...ओ
किसीं से भी मिलने की ना थी कोशिशे. उलझन मेरी सुलझा दे चाहूं मै या ना। आंखो अंखो मे जता दे चाहूं मै या ना।

तो :- काही कळलं का.

*चाहूं मै या ना*

मी असेच उत्तर देतो. आणि प्रत्येक वेळेला वेगळ्या मोबाईल वरून गाणं वाजवल जाईल त्या मुळे तू मला शोधू शकत नाहीस

तो:- काय करतेस? मी नाही गावणार तुला.

तिच्या मोबाईल वर एक गाणं लागलं होतं.

" वो अनजाना ढुंडती हूं, वो दिवाना ढुंडती हूं, जलाकर जो छीप गया है. वो उपरवाला ढुंडती हूं।"

तो:- अरे वा तुम्ही पण पद्धत बदली वाटतं उत्तर देण्याची.

ती:- म्हणजे काय?

तो:-  तुला काय वाटतं कसा असावा तुझा जोडीदार

मग ती एक गाणं लावते.

" जिसके जीने मे मेरी ही कमी हो, राहे जो बेकरार माहिया. हो मुझपे निसार महिया.

जिस की हर बात मुझसे जुडी हो,  चाहे जो मुझे बेशुमार महिया. वफा से वफादर महिया."

तो - बरं
ती:- बरं सांगना कोण आहेस तू

तो :- हो सांगेन, पण एवढ्या सहजासहजी नाही.

ती:-  म्हणजे आणि काही  clue आहे का?

तो:- *शेवटचं पान*
          एवढाच  clue आहे. बाकी तू शोध.

मग तो offline जातो. आणि मग त्यानंतर आरोही शोधू लागते, की शेवटचं पान रस्त्यावरील प्रत्येक झाड ती बघत चालली होती पण तिला अस कोठेच सापडत नव्हतं, म्हणून तिने फक्त रस्ता च नव्हे तर विविध भागात जाऊन झाडे शोधली.

तरी पण सुगावा लागत नव्हता.

मग ती झालेली सर्व गोष्ट तिच्या मैत्रिणीला सांगते.

मैत्रीण:- किती भारी आहे यार, इतकी सुंदर लव्हस्टोरी तर मी कधीच पहिली नव्हती. पण हे कोडं सुटणार कसं?

आरोही:- बघ ना. हा जो कोणी आहे त्याला पहिला मी जाम चोप देणार आणि मग बोलायला सुरुवात करणार.

तू बघ ना काही सुचतं का.???

मग दोघीही विचार करत असतात.

तेवढ्यात मैत्रीण म्हणते मला थोडी वेगळी आयडिया आली आहे.

आरोही :- म्हणजे. सांग ना मग

मैत्रीण:- आता बघ हा पान म्हणजे फक्त झाडाचे असते असं नाही ना. एखाद्या वाहीचे पण असू शकते.

आरोही:- अरे हो । हे माझ्या लक्षात कसं नाही आलं? पण आता नेमकी कोणती वही?

मैत्रीण :- त्याने सांगितले आहे एवढ्या सहजासहजी तुला नाही कळणार याचा अर्थ तुला सगळ्याच वह्या बघायला हव्या.

आरोही एक सेकंद ही न थांबता थेट घरात गेली आणि सगळ्या वह्या शोधू लागली. पण तिला काहीच सुगावा लागत नव्हता. इथेही तिला काहीच सापडत नव्हतं.

एकेदिवशी आरोही रोजच्या दिनक्रमनुसार कॉलेज मध्ये गेली होती. आणि तिला बेंच मध्ये एक कागद दिसला. आणि तो ही सर्व पुस्तकांच्या खाली शेवट ला होते. मग तिला वाटलं की ते शेवटचं पान मिळालं.
मग तिने ते कागद वाचायला सुरुवात केला.

"Dear आरोही-
        अजून ही गोष्ट संपलेली नाही पण आज निकाल लागेल असं दिसतंय. तर ऐक आपल्या कॉलेज च्या लायब्रेरी मध्ये शेवटचं  पान म्हणून एक पुस्तक आहे. ज्याचा जवळपास 30 कॉप्या आहेत. त्यातील एका पुस्तकात एक पत्र आहे  ते तुला शोधायचं आहे. आजच ठेवलंय कोणीतरी दुसर घेण्याआधी  तुला शोधायला हवं."

आता आरोहिच्या मनात काहूर मजल होतं. आता तो मुलगा कसाही असला तरी आरोही त्याला accept करणार हे तिचं ठरलं होतं.

मग ती लायब्रेरी मध्ये जाऊन ते पत्र शोधते. आणि त्यावर लिहिलं होतं.

➖➖➖➖➖➖➖➖
Dear आरोही
         पुन्हा एकदा मला माफ कर. पण मज्जा आली हे सर्व करायला. बर ऐक
  मी हे मान्य करतो. गेल्या कित्येक महिन्यापासून मी तुझ्यावर लपूनछपून प्रेम करतो. तुझ्यावर नजर पण ठेवून होतो. कारण I Love You.
मी खूप घाबरत होतो कारण माझ्या आयुष्यतली ही एकमेव परीक्षा आहे ज्यात मला मी नापास होण्याची भीती वाटतेय. आणि माझ्या परीक्षेचा रेकॉर्ड पहिल्यापासून फारच बेकार आहे. आता मी सांगू शकलो कारण प्रश्नपत्रिका already फुटली आहे. सो मी तुझ्या उत्तराची वाट बघत आहे.
त्यासाठी मी एक प्लॅन केलाय. की आपण भेटायचं. ते ठिकाणाचा तुला एक clue देतोय. त्या ठिकाणी मंगळवारी सकाळी 10 वाजता table no - 9 वर मी तुझी वाट बघत असेन.

ठिकाण :-
         शारुख खान च्या एक फिल्म चे नाव ती गोष्ट जयच्यामुळे लोक फ्रेश होतात.

आता शोध.
➖➖➖➖➖➖➖➖

आरोही त्या ठिकाण ची माहिती काढू लागली.

टेबल म्हणजे एखाद हॉटेल असणार. आणि लोकांना फ्रेश करायला काय असेल बरं.........????

मग लगेच लक्षात येत कॉफी ☕☕☕

आणि मग ती जवळपासच्या कॉफी शॉप ची नाव शोधू लागली. त्यात एक नाव होतं

?दिल से कॉफी शॉप?

मग लगेच तिला कळलं

तो दिवस उजाडला मग दोघेही मस्त नाटून गेले होते. आणि मुलगा पहिला जाऊन बसला होता. आणि ते ही बरोबर एन्ट्री डोअर कडे पाठ करून.

मग आरोही आली. आणि तिची एन्ट्री होताच कॉफी शॉप मध्ये एक रोमँटिक गाणं लागलं.

"मुझे निंद आती नही है अकेले, ख्वाब मे आया करो.।
नहीं चल  सकुंगा  तुम्हारे बिना मै.
मेरा तुम सहारा बनो।
एक तुम्हे चाहने के अलावा,
और हमसे कुछ होगा नही।

बोल दो ना जरा.....
दिल में जो है छुपा।
मै किसींसे कहुंगा नही.

बोल दो ना जरा.....
दिल में जो है छुपा।
मै किसींसे कहुंगा नही."

आणि आरोही ची अशी एन्ट्रीने संपूर्ण कॉफी शॉप मध्ये वेगळाच वातावरण निर्माण झालं होतं. आणि मग ती त्याच्याजवळ जाते. तो मुलगा तिच्या वर्गतलाच  होता. आणि तिथे काही सवांद व्हायच्या आधीच आरोही ने स्वतः एक गुलाबाचं फुल देत त्याला होकार दिला आणि दोघेही आनंदाने इथून पुढे राहायला लागले.

अशी आहे ही एक सूंदर लोव्हस्टोरी. आणि मी तुमच्या कंमेंट्स ची वाट बघत आहे. नक्की कंमेंट्स करा.

इतर रसदार पर्याय