Pathlag - 17 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग – (भाग-१७)

मोहिते निघून गेला, पण जाताना तो जे बोलला ते दोघांच्या डोक्यात घर करून गेले. मोहिते म्हणाला होता, “डोंट ट्राय टू ओव्हरस्मार्ट मी. हे सगळे फोटो आणि माझा पूर्ण रीपोर्ट मी टाईप करून ऑफिसच्या मेल-बॉक्स मध्ये ठेवला आहे. माझ काही बर वाईट झाल तर तो रिपोर्ट कुणाकडे द्यायचा ह्याच्या सुचना ही मी देऊन ठेवलेल्या आहेत. सो टेक केअर… ”


दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहिते कुठेतरी निघून गेला होता. स्टेफनी आणि दीपक रूम-मध्ये व्हिस्की घेऊन बसले होते. दोघांनाही काही सुचत नव्हते.

“सध्या तरी आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नहिए…”, दीपक म्हणाला, “मोहिते जे म्हणतो आहे तेच करावे. निदान ह्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडू शिवाय काहीच नसण्यापेक्षा ५० लाख मिळत आहेत ते हि काही कमी नाहित… ”

“अरे पण तेव्हढे पैसे पुरेसे नाहीत. आपला दोघांचा पासपोर्ट, व्हिसा बनवायचा आहे. शिवाय तिकडे गेल्यावर थोडे फार पैसे नको का हातात?”, स्टेफनी

“अग हो मान्य आहे, पण दुसरा कुठला पर्याय आहे का? सांग असेल तर. ”
“आणि समजा आपण मोहितेला पैसे दिले आणि तरीही त्याने सगळे पुरावे आणि त्याचा रिपोर्ट दिला तर?”
“कसा देईल? तो आपल्याला क्लीन-चिट देणार, त्यानंतर तो अस करूच नाही शकणार त्याच्या अंगावर येईल सगळ. उलट त्याचे पैसे मिळाले कि त्याचा रिपोर्ट कुणाला चुकून सुध्दा मिळू नये ह्यासाठी तो लगेच सगळे नष्ट करून टाकेल. ”

“दीपक, मी किती स्वप्न बघितली होती माहीत आहे? थॉमसबरोबरचे माझे लग्न कसे झाले तुला माहीतच आहे. खर सांगायचे तर इथे असताना मी नरक यातनाच भोगल्यात. परत माझ्या देशात सोडाच पण दुसऱ्या कुठल्या गावी जाऊ शकेन ह्याची आशा मी सोडून दिली होती.

पण आता पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला होता. वाटत होत आपण जाऊ परत, शिवाय तू असशील बरोबर. खऱ्या अर्थाने आयुष्य सुरळीत होइल. पण हा नालायक मोहिते.…. ” स्टेफनी

“मला एक सांग, तुला खरच वाटते त्याने त्याचा रिपोर्ट असा टाईप वगैरे करून ठेवला असेल ऑफिस मध्ये?”, अचानक काहीतरी आठवल्यासारखे स्टेफनी म्हणाली.

“हो अर्थात. का? तुला नाही तस वाटत?”, दीपक
“नाही म्हणजे असा त्याने गोपनीय रिपोर्ट ठेवला असेल तर तो कोणी कशावरून उघडून बघणार नाही आधीच? मग त्यात मोहितेला धोका नाही का?”

“पण त्याने त्याच्या माहितीतल्या माणसाकडेच तो रिपोर्ट देऊन ठेवला असणार. हे बघ उगाच नको त्या गोष्टींवर कश्याला विचार करायचा? उगाच फालतू रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही. मिळतात ते पैसे घ्यावे आणि गप्पा बसावे असे मला वाटत आहे. तसही अकलेचे तारे तोडायला आपल्याकडे फार वेळ नाही. मोहिते दुपारी येईल तेंव्हा त्याला आपला निर्णय सांगायचा आहे. ” दीपक

रिसेप्शनला कोणी तरी नवीन टुरिस्ट आले आणि दोघांचा तो विषय तिथेच तात्पुरता थांबला.


सुट्टीचा मौसम असल्याने नंतर एकामागोमाग एक अजून दोन-चार टुरिस्ट आले. स्टेफनी सगळ्यांची सोय पाहण्यात मग्न होऊन गेली. दोघांना पुन्हा एकत्र वेळ जेवण उरकल्यानंतर साधारणपणे ४ च्या सुमारास मिळाला.

स्टेफनीने घड्याळाकडे पाहिले आणि तिने एका प्रश्नार्थक नजरेने ‘मोहीते अजून कसा आला नाही?’ असं दीपकला विचारले.

दिपकनेही खांदे उडवून आश्चर्य व्यक्त केले.

संध्याकाळ उलटून रात्र उजाडली. नवीन आलेले प्रवासी समुद्रावर नाच-गाण्यात मग्न होते.

“कुठे गेला हा मोहिते? दुपारी येतो म्हणाला होता…”, स्टेफनी हळूच दीपकला म्हणाली
“काय माहित कुठे गेला.”, दीपक
“कुठे मेला-बिला तर नसेल ना?”, स्टेफनी
“मुर्खासारखे काही बोलू नकोस…” काहीसा चिडून दीपक म्हणाला
“अरे पण ह्याला कोणी ट्रक ने वगैरे उडवले असेल तर? आपली काय चूक आहे त्यात? तो तर मरेलच पण आपण सुध्दा नाहक मरू…”, स्टेफनी

“लेट्स वेट…. कदाचित येईल उशिरा…. ” दीपक

रात्र उलटून दुसरा दिवस उजाडला तरीही मोहितेचा काही पत्ता नव्हता. ती रात्र दोघांनी अक्षरशः जागून काढली. उलटणारा प्रत्येक तास दोघांची घालमेल वाढवत होता.

मोहितेचे काही बरे वाईट तर नसेल ना हा एकच विचार राहून राहून दोघांच्या डोक्यात थैमान घालत होता. ज्या माणसाचा त्यांनी इतके दिवस द्वेष केला त्याच माणसाच्या जीवाची चिंता त्याना लागून राहिली होती. कारण त्याच्या जीवाला काही झाले असते तर मोहिते ने जसे सांगितले होते तसे ते इंव्हलोप उघडले गेले असते.

दुसरा दिवसही सरला पण मोहितेचा काहिच पत्ता नव्हता.

स्टेफनीचा संयम सुटत चालला होता.

“आपण त्याची रूम उघडून बघुयात का? काही तरी क्लू सापडेल, तो कुठे गेला आहे, कश्यासाठी गेला आहे। काहीतरी कळेल….”, स्टेफनी दीपकला म्हणाली

“गुड आयडिया, तू हो पुढे मी एव्हढे काम संपवून येतो लगेच तिकडे”, दीपक
“प्लीज लवकर ये, मला त्याच्या खोलीत एकटीला नाही जायचेय”, अस म्हणून स्टेफनी निघून गेली

दिपकने हातातले काम पटकन संपवले आणि तो मोहित्याच्या रुम मध्ये गेला.

त्या गबाळ्या मोहित्याप्रमाणेच त्याची रूम होती. सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलेले, कपडे घडी न करता तसेच कपाटात लोंबत पडलेले होते.

स्टेफनी आणि दिपकने त्याची पूर्ण खोली धुंडाळली, पण म्हणावे तसे काही हाती लागले नाही.

निराश होऊन दोघ बाहेर आले.


दोन दिवस उलटून गेले पण त्याचा काहीच पत्ता नव्ह्ता.

“मला एक कळत नाही, तो असा अचानक गायब झालाच कसा? त्याने आपल्याला पूर्ण कॉर्नर केले होते. सुटण्याच्या कुठलाच मार्ग आपल्याकडे नव्हता. आपल्याला त्याला साडे-चार करोड द्यावेच लागले असते. मग अस असताना तो न सांगता गेला कुठे?”, दीपक

दोघ जण बोलत होते तेवढ्यात एक सर्व्हंट आतमध्ये आला.

“बोल, काय झाल?”, स्टेफनी
“बाहेर पोलिस आले आहेत त्यांना तुम्हाला भेटायचे आहे…. ”

स्टेफनी आणि दिपकने एकमेकांकडे बघितले.

“ठीक आहे, तू जा, मी आलेच म्हणून सांग…”

सर्व्हंट निघून गेला.

“पोलिस? कश्याला आले असतील?”, स्टेफनी म्हणाली
“ते तुला बाहेर गेल्यावरच कळेल”, दीपक
“म्हणजे, तू नाही येणार बाहेर?”, स्टेफनी
“वेडी आहेस का? मी आणि पोलिसांसमोर? उगाच त्यांनी ओळखले तर? नको, तू जा, आधी बघ तर काय म्हणतात ते”

स्टेफनी नाईलाजाने एकटीच बाहेर गेली

लॉबीमध्ये एक इन्स्पेक्टर आणि एक हवालदार उभे होते

“नमस्कार इन्स्पेक्टर, मी स्टेफनी, ह्या हॉटेलची ओनर”, आपल्या चेहऱ्यावर शक्य तेव्हढे हास्य आणत स्टेफनी म्हणाली
“नमस्कार. मी तुमच्या हॉटेल मध्ये उतरलेल्या एका इसमाची चौकशी करायला आलोय”, इन्स्पेक्टर म्हणाले

“हो जरुर. बोला कुणाची माहिती हवीय?”, स्टेफनी

इन्स्पेक्टर ने हवालदार कडून एक फोटो घेतला आणि तो स्टेफनी समोर धरला.

“आपण ह्यांना ओळखता?”

स्टेफनीने तो फोटो निट पाहीला.

“नो इन्स्पेक्टर, मी ह्यांना आधी कधीच बघितले नाही. कोण आहेत हे?”, स्टेफनी

स्टेफनी च्या ह्या अनपेक्षित उत्तराने इन्स्पेक्टर काही क्षण गोंधळून गेले. मग ते म्हणाले, “आर यु शुअर? पाहिजे तर परत एकदा फोटो बघा”

“आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर इन्स्पेक्टर मी खरच ह्यांना ओळखत नाही. ह्यांना कधी पाहिले पण नाही. कोण आहेत हे?” स्टेफनी

“हे मोहिते, केशव मोहिते. लाइफ़-लाइन इन्शुरन्स कंपनीचे एजंट”, इन्स्पेक्टर

“काय? हे केशव मोहिते?”, स्टेफनी जवळ जवळ ओरडलीच

“हो… का? काय झाल?”, इन्स्पेक्टर
“अहो पण हे कसे केशव मोहीते असु शकतील?”, स्टेफनी

स्टेफनी ने मागे वळून पाहिले. जवळूनच एका दार आडून दीपक त्यांचे बोलणे ऐकत होता. स्टेफनीची आणि त्याची नजरा-नजर झाली. त्याने हातानेच हळूच खूण करून तिला शांत राहायला सांगितले.

“नाही काही नाही, मी खरंच ओळखत नाही ह्यांना, का काय झाल?”, स्टेफनी शक्यतो नॉर्मल रहात म्हणाली

“ह्यांचा खून झालाय, साधारण चार दिवसांपूर्वीच, त्यांची डेड बॉडी सापडली आम्हाला. ओळख पटवताना कळले. बॉडीच्या खिश्यात ड्रायव्हींग लायसंन्स आणि कंपनीचे व्हिजीटींग कार्ड मिळाले त्या नावाचे. शिवाय कंपनीच्या हेड ऑफीसमधुन आम्ही खात्री करुन घेतली आहे.. म्हणून आम्ही त्यांच्या हेड ऑफिसला फोन केला तेंव्हा कळाले की केशव मोहिते तुमच्याच हॉटेलवर उतरले आहेत एका तुमच्याच एका क्लेमच्या तपासणी संदर्भात… “, इन्स्पेक्टर

“नाही इन्स्पेक्टर तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. हि व्यक्ती नक्की आमच्या हॉटेल वर उरली नव्हती. पाहिजे तर तुम्ही हा फोटो सपोर्ट स्टाफला दाखवून खात्री करू शकता.”, स्टेफनी

“नाही ठीक आहे, त्याची तशी काही आत्ता आवश्यकता नाही. कदाचित मोहित्यांनी ऐन वेळी विचार बदलून दुसऱ्या कुठल्या हॉटेल मध्ये खोली घेतली असेल… एनीवेज मी बाकीच्या हॉटेल्स मध्ये चौकशी करतो. काही लागले तर मात्र पुन्हा तुम्हाला थोडा त्रास द्यायला येइन…”, इन्स्पेक्टर

“माय प्लेझर सर….” अस म्हणून स्टेफनी निघून गेली


“हा काय प्रकार आहे दीपक?” स्टेफनी म्हणाली
“तू तो फोटो नक्की निट बघितलास? नक्की तो मोहिते नव्हता?”, दीपक
“अरे नक्की काय? अर्थात त्याचा चेहरा कसा विसरीन मी?”, स्टेफनी

“पण मग हा मेलेला मोहिते होता, तर मग तो आपल्याकडे येउन राहिला होता तो कोण?”, दीपक
“दीपक, अरे मोहिते तर मेला, मग तो रिपोर्ट आणि ते इंव्हलोप? ते जर का कोणी बघितले तर?”, स्टेफनी
“अग तो मोहितेच जर फेक होता तर कसला रिपोर्ट आणि कसल काय?”, स्टेफनी

दोघ बोलत असतानाच परत एक नोकर फोन घेऊन आला

“मैडम, बैकेतून फोन आहे तुमच्यासाठी… “, स्टेफनीला म्हणाला
“सांग त्यांना आत्ता कामात आहे, नंतर फोन करा”, स्टेफनी
“सांगितले, आधीच सांगितले मी पण त्यांना तुमच्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे”, नोकर

“ठीक आहे, आण इकडे” अस म्हणून स्टेफनीने तो फोन घेतला

“बोला मैनेजर साहेब”, शक्य तितका आवाजात गोडवा आणत स्टेफनी म्हणाली

“सॉरी तुम्हाला थोडा त्रास द्यायला फोन केला, पण काम तास महत्वाचे होते”
“अरे त्रास कसला त्यात, काम महत्वाचे असल्याशिवाय तुम्ही फोन करणार नाही माहित आहे मला. बोला काय काम काढलेत?”, स्टेफनी
“तुमचा दोन लाखाचा चेक बाउन्स झालाय, आधीच करंट अकाऊंटवर झिरो बॅलन्स असल्याने हेव्ही इंटरेस्ट पडतोय, त्यात हा चेक रिटर्न. काही प्रॉब्लेम झालाय का?”, मैनजर

“आय एम सॉरी? तुम्ही कश्याबद्दल बोलत आहात?”, स्टेफनी
“अर्थात तुमच्या अकाऊंटबद्दल…. ”
“अहो पण अकाऊंटला झिरो बॅलन्स होईलच कसा? आम्ही किमान १० लाख तरी ठेवतो खात्यात. आणि आज पर्यंत त्यात कधीच बदल झाला नाही. ”
“हो म्हणूनच फोन केला काही प्रॉब्लेम झालाय का… ”
“नाही प्रॉब्लेम काही नाही पण खाते रिकामेच असू शकत नाही “, स्टेफनी

“अहो मी काय खोट सांगतोय का? एक काम करा एकदा तुमच्या अकांऊंटंटशी बोलून बघा”

मैनेजरने फोन ठेवून दिला

“काय झाल स्टेफनी?”, स्टेफनी चा चिंतीत चेहरा बघून दीपक म्हणाला
“अरे, मैनेजर चा फोन होता, आपले करंट अकौंट रिकामे आहे म्हणे”, स्टेफनी
“कस शक्य आहे? आणि इतक्यात आपण कुठला मोठा चेक पण दिला नाहीये”
“तेच तर म्हणाले मी, मला काहीच काळात नाहीये…. ”

“ओह माय गॉड..”, दिपक काही क्षणांनंतर म्हणाला

“काय झालं?”, स्टेफ़नी
“मोहीते… तु.. तु बॅंक अकांऊंट आपल्या कंप्युटरवरुन ओपन करतेस ना?”, दिपक
“हो.. कित्तीवेळा.. असं अचानक पेमेंट कुणाचे करायचे असले तर ऑनलाईन ट्रान्स्फरला वापरते..”, स्टेफनी
“बरोबर.. पण पासवर्ड?”, दिपक
“पासवर्ड मला पण माहीत नाही.. पण थॉमसने सेव्ह पासवर्ड करुन ठेवला होता त्यामुळे मला लॉगीन करता यायचे..”, स्टेफनी

“देअर यु गो.. त्या दिवशी मोहीते आपला कंम्प्युटर वापरत होता आठवतं.. मुर्ख आहोत आपण स्टेफनी त्याने इथुनच लॉगीन केले आणि पैसे ट्रांन्स्फर केले असणार.. चल पटकन आपण ऑनलाईन स्टेटमेंट बघु..”

दिपक आणि स्टेफनी पळत पळत खोलीत गेले.

त्याच दिवशीची सकाळची ऑनलाईन ट्रान्स्फरची एक एन्ट्री दिसत होती. भल्या सकाळीच मोहीतेने सर्व पैसे हॉटेलच्या खात्यातुन दुसर्‍या कुठल्यातरी खात्यात ट्रान्स्फर केले होते…

“ओह शिट्ट…”, स्टेफनी डोक्याला हात लावत म्हणाली
“हा मोहीते नक्कीच कोणीतरी फ्रॉड आहे.. आणि अर्थात अजुनही जिवंत आहे. आज सकाळीच त्याने पैसे ट्रान्स्फर केले आहेत…”, दिपक

“आता? पोलिसांकडे जायचे?”, स्टेफनी
“वेडी आहेस का? आधीच आपण पोलिसांपासुन कसं पळायचं ह्याचे मार्ग शोधतो आहो आणि तो पोलिसांकडे जायचं म्हणतेस? त्यात तु सकाळीच मोहीते इथे रहात नव्हता म्हणुन सांगीतले आहेस..”, दिपक

“मग? काय चुकीचं सांगीतलं? पोलिसांनी जो फोटो दाखवला तो आपल्याकडे रहातच नव्हता.”, स्टेफनी
“मला वाटतं कोणीतरी हे जाणुन बुजुन करत आहे. आधी थॉमस सरांचा खुन, नंतर हा फ्रॉड केशव मोहीते, मग कळतं खरा मोहीते कोणी दुसराच होता.. त्याचा खुन होतो आणि लक्षात येईपर्यंत हा फ्रॉड मोहीते आपल्याला गंडवुन आपल्या खात्यातील सर्व पैसे घेउन फरार होतो…”, दिपक

“दिपक.. आपण कंगाल झालोय… पुर्ण अडकलो आहोत आपण. पळुन जायचं म्हणलं तरी आपल्याकडे पैसे नाहीत. खात्यात शुन्य पैसे आहेत. हे हॉटेल दोन दिवसांपेक्षा अधीक काळ आपण चालु ठेवु शकणार नाही…”, स्टेफनी..

“हे बघ, हायपर होऊ नकोस, आपण काढु काही तरी मार्ग..”, दिपक
“काय मार्ग काढणार आपण?”
“हे बघ.. आपण थोडं लोन काढु बॅंकेतुन, सध्या सिझन चांगला आहे, हळु का होईना, पैसे होतील रिकव्हर..”, दिपक

“वेडा आहेस तु.. आत्तापर्यंत थॉमसच्या क्रेडीबिलीटीवर चालु होते सगळे. थॉमस नाही म्हणल्यावर कोण लोन देईल आपल्याला? मागच्या महीन्यात एक तरी चेक जमा केला आहे का आपण बॅंकेत.. फक्त पैसे विड्रॉ चालु आहे…”, स्टेफनी

दोघजणं बोलत खोलीतुन बाहेर आले आणि समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीला पाहुन दोघं जणं जागेवरच थबकले. दिपकच्या पायाखालची तर जमीनच सरकली.

दिपकवर पिस्तुल रोखुन दारामध्ये तो तुरुंगातला गिड्डा पोलिस इन्स्पेक्टर उभा होता.. त्याच्या भल्या मोठ्ठ्या देहाच्या पार्श्वभुमीवर ती रिव्हॉल्व्हर खेळण्यातली भासत होती.

त्याला बघताच दिपक पळुन जाण्यासाठी मागे वळला तसा तो पोलिस म्हणाला, “पळुन जायचा विचार सुध्दा करु नकोस.. तुला गोळी घालायला मला जरा सुध्दा कष्ट पडणार नाहीत..”

त्याच्या आवाजातली जरब दिपकला खात्री देत होती की तो इन्स्पेक्टर खरं बोलतो आहे.

दिपक शांतपणे माघारी वळला…

“बर्‍याच दिवसांनी भेटलो नाही?”, इन्स्पेक्टर..
“हे बघा इन्स्पेक्टर.. मी निर्दोष होतो आणि निर्दोष आहे. मी माझं आयुष्य नव्याने सुरु केलं आहे.. प्लिज..प्लिज मला जाऊ द्या..”

इन्स्पेक्टरने मागे उभ्या असलेल्या हवालदाराकडे एक हास्य फेकले आणि म्हणाला.. “जाऊ द्या म्हणे.. साला माझा तुरुंग फोडुन पळालेला कुत्रा.. इतके दिवस कसे काढलेत मला माहीत.. शरमेने मान झुकली होती.. ह्याला असा फरफटत न्हेऊन कोंबणार परत तुरुंगात तेंव्हा कुठे माझी हरवलेली इभ्रत परत येईल.. आणि हा म्हणे.. जाऊ द्या..”

तो हवालदार सुध्दा त्याच्या हसण्यात सामील झाला.

स्टेफनीचे लक्ष शेजारच्या टेबलावर असलेल्या फ्राईंग पॅन कडे गेली. तिने हळुच तो पॅन उचलला आणि क्षणाचाही विलंब न करता त्या इन्स्पेक्टरच्या डोक्यात घातला.

थड्ड आवाज करतो तो पॅन त्या गिड्याच्या वर्मी बसला. पॅनचे हॅंडल तुटुन स्टेफनीच्या हातात आले. तो गिड्डा धाड्कन मागच्या हवालदारावर कोसळला पण कोसळताना त्याने आपल्या पिस्तूलातुन गोळी झाडली..

“रऩ दिपक.. मागे एक स्पिड बोट आहे ती घे आणि पळ..”, स्टेफनी विव्हळत म्हणाली..

इन्स्पेक्टरने झाडलेली गोळी तिच्या पोटात घुसली होती..

“नाही स्टेफनी तुला सोडुन नाही.. तु चल..”, दिपक स्टेफनीच्या दंडाला धरुन ओढत म्हणाला..
“मुर्ख पणा करु नकोस.. ते शक्य नाही.. तु जाsssss”

दिपक क्षणाचाही वेळ न दवडता मागच्या दाराकडे धावत सुटला..

गोळीबाराचा आवाज ऐकुन बाहेर जिपपाशी थांबलेले दोन हवालदार धावत आत आले.

“पकडा त्याला..” तो गिड्डा इन्स्पेक्टर सावरुन उठुन बसत तो म्हणाला.. त्याच्या डोक्यातुन रक्ता्चा एक बारीक ओव्हळ गालावर आला होता. संतापाने त्याचा चेहरा लालबुंद झाला होता.

ते तिन हवालदार दिपक ज्या दिशेने पळाला होता तिकडे धावले.

स्टेफनी पोटावर हात धरुन जमीनीवर कोसळली होती. त्या गिड्याने एकवार तिच्याकडे तुच्छतेने पाहीले बुटाची एक लाथ तिच्या पोटात घातली आणि तो सुध्दा त्या हवालदारांच्या मागे गेला.

वेदनेची एक सणसणीत कळ स्टेफनीच्या डोक्यात गेली. पोटातुन रक्ताची धार वहात होती. क्षणार्धात तिचा चेहरा पांढरा-फटक पडला. समोरचे दृष्य तिला अंधुक दिसु लागले. त्या अंधुक प्रकाशात तिला समोर तिन व्यक्ती उभ्या असलेल्या दिसल्या.

कोण होत्या त्या व्यक्ती. पाठीमागची, डावीकडची ती व्यक्ती.. ती.. हो.. ती व्यक्ती मोहीतेच होती. अंगात तो कळकट सफारी नव्हता तर एक गडद लाल रंगाचा फुलाफुलांचा शर्ट होता. मागे उजवीकडची व्यक्ती.. तिला स्टेफनीने कुठेतरी पाहीले होते.. कुठे बरं…??

हं.. तो युसुफ.. दिपकचा मित्र.. ज्याने थॉमसची डेड बॉडी आपल्या ट्रकमधुन न्हेउन त्यांची मदत केली होती.

पुढची मध्ये असलेल्या त्या व्यक्तीला मात्र स्टेफनीने कधी पाहीले नव्हते. त्या अवस्थेतही स्टेफनीला ती व्यक्ती एकदम चिकनी वाटली. एक हॅंड्सम तरुण खांद्याला एक गिटारसारखी बॅंग लावुन उभा होता.

ते तिघेही स्टेफनीकडे बघुन खदा-खदा हसत होते.

तो चिकना तरुण स्टेफनीच्या जवळ आला आणि खाली बसला व मोहीतेकडे बोट दाखवत म्हणाला, “ह्याला ओळखतेस ना? मोहीते हा.. आठवला? आपलाच माणुस आहे हा.. आपला म्हणजे.. माफीया..”

स्टेफनी अंधुक होणार्‍या नजरेतुन डोळे विस्फारुन बघण्याचा प्रयत्न करत होती. तिची शक्ती कमी कमी होत चालली होती.

आणि हा .. हा युसुफ..”, युसुफकडे बोट दाखवत तो म्हणाला..”ह्याला आधी आपण टपकवणारच होतो, पण ऐन वेळी हा म्हणाला की त्याला दिपक कुठे आहे ते माहीत आहे.. वाचला साला…”

“हरामखोर..”, स्टेफनी स्वतःशीच पुटपुटली. क्षणभर धावत जावं आणि दिपकला युसुफ बद्दल सांगावं असं वाटुन तिने उठण्याचा प्रयत्न केला तसा पोटातुन अजुन एक वेदनेची तिव्र लहर तिच्या अंगभर पसरली.

“..आणि तुझा नवरा.. थॉमस.. आम्हीच मारला त्याला…”, तो चिकणा अजुनही बोलत होता.

स्टेफनीला एकावर एक धक्के बसत होते…

“आता तु बोलशील का? का केलं असं आम्ही..? साला त्या दिपकमुळे, बॉसच्या भावाला मारलांऩ त्यानं.. मग त्याला जिता सोडायचा? नाय… मंग? असा डायरेक्टली मारायचा? नाय.. असा पळवुन पळवुन मारणार.. जो पर्यंत तो पळायचं सोडुन आमच्याकडे मरणाची भिक मागत नाय तो पर्यंत पळवणार त्याला… हा ‘पाठलाग’ सुरुच रहाणार त्याच्या मृत्युपर्यंत…”

स्टेफनीला निम्मे अर्धे त्यातले कळतच नव्हते. क्षीण होऊन ती पडली होती.

त्या चिकण्या तरुणाने खिश्यातुन एक मोठ्ठा सुरा काढला आणि स्टेफनीच्या नाजुन गळ्यावरुन सर्रकन फिरवला.

स्टेफनीला हा त्रास मात्र काहीच जाणवला नाही.. क्षणार्धात तिचा देह निष्प्राण झाला होता…….

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED