पाठलाग (भाग – २०) Aniket Samudra द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाठलाग (भाग – २०)

“सो… हे अस आहे सगळ.!!” गाडीच्या बॉनेटवरून उतरत दीपक म्हणाला.

माया अजूनही गाडीच्या बॉनेटवरच बसून होती.

दिपकने घड्याळात वेळ बघितली. ३.३० वाजून गेले होते. गावातील रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु झाली होती. दुधाच्या व्हैंस, दैनिक पेपर वाहतूक करणारे टेम्पो रस्त्यावरून धावत होते. शहराला हळू हळू जाग येत होती.

“आय गेस, वुई शुड लिव्ह नाऊ. साडे तीन वाजून गेले आहेत. उद्या ऑफिसला काही महत्वाच्या मिटींग्स आहेत न?”

“लिव्ह द मिटींग्स.. “, माया थंड स्वरात म्हणाली

मायाच्या त्या अनपेक्षित उत्तराने दीपक चमकला आणि त्याने मागे वळून पहिले.

माया एकदा त्याच्याकडे बघून हसली आणि उजव्या हाताने तिने आपला काळ्या रंगाचा पार्टी गाऊन वरती घ्यायला सुरुवात केली. काय होतेय हे न समजून दीपक स्तंभित होऊन तिच्याकडे बघत उभा होता.

मायाने तिचा पार्टी गाऊन मांडीपर्यंत वर घेतला आणि दीपकला तिचा उद्देश लक्षात आला. तिच्या गोऱ्यापान मांडीवर काळ्या स्ट्रापमध्ये पॉइन्ट थर्टी टू चे रिव्होल्व्हर लटकवलेले होते. दिपकने काही हालचाल करायच्या आत तिने ते पिस्तोल काढून दीपकवर रोखले.

“फुल्ली लोडेड आहे… “, माया
“व्हाय?” आपले हात हवेत उंचावत दीपक म्हणाला …. “मला पोलिसांकडे देऊन तुला काय मिळेल?”

“पोलिस?”…… मायाला पोलिसांचे नाव ऐकून हसू आले “पोलिसांची कोण गोष्ट करतेय?”
“मग ?”, दीपक
“माफिया ….. माफियाकडे देईन मी तुला “, माया

“पण का?” दीपक
“कदाचित तुझ्या बदल्यात मी माझ्या मुलीच्या सुखरुपतेची हमी घेऊ शकेन?” माया

“तुला …. तुला मुलगी आहे?”, आश्चर्यचकित होऊन दीपक म्हणाला

“हो आणि माफियापासून तिच्या जीवाला धोका आहे. कदाचित मी तुला पकडून दिले तर माझी मुलगी सुरक्षित राहील”, माया

दिपक स्वतःशीच हसला.

“का? काय झाल हसायला?”, माया
“नाही तू पकडून देणार म्हणालीस म्हणून हसू आल”, दीपक, “मला वाटते तू विसरती आहेस माझ्या सॉक्स मध्ये एक सुरा आहे”, दिपक

“देन ट्राय इट, टेक इट आउट. त्याआधी बंदुकीतून सुटलेल्या गोळीने तू ठार झाला असशील”, माया

“कुणाला मूर्ख बनवतेस? मला? मी मिलिटरी मध्ये होतो, हे जे काही तुझ्या हातात खेळण आहे ना, तसलं फार पूर्वीपासून मी वापरतोय. पॉइंट थर्टी टू , सेमी-ऑटोमैटिक, १९९५ एट शॉट मॉडेल. सगळ्यात पहिले तुला त्याचे सेफ्टी लॉक काढावे लागेल आणि समजा तू ते आधीच काढून ठेवले असशील तरी, ट्रिगर ओढण्यापूर्वी तुला त्याची स्प्रिंग एकदा मागे ओढून घ्यावी लागते. मे बी एक सेकंद पण सॉक्स मधला सुरा काढायला मला तेवढा पुरेसा आहे”, दीपक

मायाने एकदा त्याच्याकडे निरखून पहिले आणि म्हणाली, “यु आर राईट. बस मला तुझ्याशी बोलायचे आहे”

तिने आपले रिव्होल्व्हर पुन्हा मांडीवरच्या स्ट्रीप मध्ये अडकवून ठेवले.

“इट्स लॉंग नाईट, इजंट इट?”, मायाने व्हिस्कीचे दोन पेग बनवले आणि एक दिपककडे देत म्हणाली
“येस इट इज”, दिपकने मान डोलावून होकार दिला

“टू इयर्स बँक, दे किल्ड माय हजबंड… “, मायाने ग्लास एका घोटात फिनिश केला.

“दे?”, दीपक
“दे ! आय मीन.. माफिया. “, माया

“पण का?”

“माय हजबंड रिफुस्ड टू डू देअर वर्क. दमण एक पोर्ट बंदर आहे. मुंबई पासून काही तासाच्या अंतरावर, पण तरीही इथे फारशी सेक्युरिटी नाही. माल स्मगल करून इझिली इथे आणता येतो. माझ्या नवऱ्याने त्यांचा माल आमच्या कंपनीचा भासवून उतरवून घ्यायला नकार दिला”, माया

“नवऱ्याच्या मृत्युनंतर कंपनीचे काम मी बघायला लागले. दे थ्रेटण्ड टू किल माय डॉटर. मी घाबरून तिला शिक्षणासाठी युक़े. ला पाठवून दिले. पण यु नो, आज नाही तर उद्या ते तिच्यापर्यंत पोचलेच असते. सो आय ऐग्रीड.

आज इथल्या बंदरावर आमच्या कंपनीचा जो माल बंदरावर येतो त्यातला निम्म्याहून अधिक माफियाचा स्मगल्ड माल असतो. ”

“पण मग तु पोलिसांकडे का नाही जात?”, दिपक
“हम्म.. पोलिस..!! तु हे बोलतो आहेस दिपक? तु? मला वाटतं पोलिस किती बायस्ड असतात आणि पोलिसांचं वागणं कसं असते हे तु सुध्दा जाणतोस. म्हणुनच तर पळुन आलास ना पोलिसांच्या तुरुंगातुन?”, माया

……..

“बरं मग आता काय? तु हे सगळं मला का सांगते आहेस?”, दिपक
“मला तुझी मदत हवी आहे…”
“कश्यासाठी?”
“माफियाला संपवायला…”

दिपक स्वतःशीच हसला.

“का? हसायला काय झालं?”, माया
“तु आणि मी… दोघं मिळुन माफियाला संपवणार??? काहीतरी काय? स्टेट पोलिसांना जे शक्य असुनही जमलं नाही ते तु आणि मी.. कसं करु शकणार?”

“तुला माहीते दिपक.. आमच्या बोटी फिशींगसाठी समुद्रात जातात ना… भलामोठ्ठा शार्क सुध्दा एका गळाला बांधलेल्या फुटकळ बेट ला बळी पडुन अडकतो…”

मायाने काही क्षण थांबुन दिपककडे पाहीले आणि म्हणाली.. “तुच आहेस ती बेट.. तुला पकडायला ते येतील आणि आपल्या जाळ्यात अडकतील..”

“पण मीच का? आणि मी का तुझ्या भानगडीत पडु?”, दिपक

“का? तुला तुझा जीव प्रिय नाही? तुला स्टेफनी प्रिय नव्हती?”, माया

स्टेफनीचे नाव ऐकल्यावर दिपक चमकुन मायाकडे बघायला लागला.

“स्टेफनीचा इथे काय संबंध..?”, दिपक
“स्टेफनीला कुणी मारलं दिपक?”
“अर्थात पोलिसांनी.. तो साला गिड्डा…”, हाताच्या मुठी आवळत दिपक म्हणाला

“वेडा आहेस.. पोलिसांची तर केवळ एक गोळी तिला लागली होती. वाचु शकली असती ती. पण जॉनी चिकनाने तिला मारला.. जॉनी चिकना, माफीया भाईचा शार्प शुटर..”

दिपक ऐकत होता

“जॉनीनेच स्टेफनीचा नवरा, थॉमसला संपवला.. त्यानेच त्या इंन्शोरन्स एजंट मोहित्याला खल्लास केला आणि त्यानेच पोलिसांना तुझा पत्ता दिला…”.. माया..

“पण का?”, दिपक
“कारण तु भाईच्या भावाला मारलास..”. माया
“नाही.. ते खोटं आहे.. पोलिसांच्या हातुन तो मेला…”, दिपक
“हे तुला माहीती आहे, त्यांना नाही..”, माया

“पण मग हा सगळा खटाटोप का? जर तो त्या हॉटेलमध्ये येऊन थॉमसला मारु शकत होता तर मला ही मारु शकत होता. मग त्याने तसं का… हा..हा सगळा पाठलाग कश्यासाठी?”, दिपक

“तु भाईच्या भावाला मारलंस दिपक. इतक्या सहजी ते तुला मारणार नव्हते. पळवुन पळवुन, दमवुन मारणार होते तुला..”, माया

स्टेफनीचा चेहरा दिपकच्या समोर उभा राहीला. काय चुक होती तिची? इतका निर्घुणपणे गळा कापुन मारायची काय गरज होती??

दिपक संतापाने थरथरत होता. त्याच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या.

मायाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

“डोन्ट गेट अ‍ॅन्ग्री. डोन्ट लुज युअर पेशन्स. दॅट इज द लास्ट थिंग यु शुड डु. तुला.. आपल्याला जिंकायचे असेल तर, शांत राहुन सगळा प्लॅन केला पाहीजे…”, माया

“काय आहे तुझ्या डोक्यात?”, दिपक

“आपण तुझ्या लाडक्या गिड्या पोलिसापासुन सुरुवात करु. आत्ता परिस्थीती अशी आहे की पोलिस आणि माफिय़ा दोघंही तुझ्या मागावर आहेत. आपण त्या पोलिसाला संपवला की नविन पोलिस त्याच्या जागी रुजु होऊन, केस समजुन घेऊन पुन्हा नव्या जोमाने तुझ्या मागावर येईपर्यंत मध्ये वेळ जाईल. निदान काही काळापुरता तरी पोलिसांचा ससेमिरा मागे पडेल तो वर आपण मग माफियाकडे वळु”, माया

दिपक स्तंभीत होऊन मायाकडे बघत होता. मायाचा हा प्लॅन जबरदस्त होता आणि योग्यही.

“अ‍ॅग्रीड.. कसं करायचं?”, दिपक
“मला एक दिवस दे, परवा आपण ह्यावर बोलु. आय एम टु टायर्ड टु थिंक एनीथिंग नाऊ..”, माया

“यु बेटर प्लॅन फ़ास्ट, त्या गिड्याच्या नरडीचा घोट घ्यायला माझ्या हाताची बोटं शिवशिवत आहेत”, दिपक

“येस्स.. लेट्स स्टार्ट दॅट पाठलाग अगेन.. पण ह्यावेळेस शिकार ते असतील…”, माया बॉनेटवरुन खाली उतरुन आपला पार्टी गाऊन सरळ करत म्हणाली.

रस्त्यावरुन जाणार्‍या ट्रकच्या प्रकाशात दिपकचा चेहरा काही काळ उजळुन निघाला.

“अ‍ॅन्ड येस, वन मोअर थिंग. डोन्ट फॉल इन लव्ह विथ मी. आय हॅव सीन ईट इन युअर आईज बिफ़ोर. आय एम विदाऊट अ मॅन फ़ॉर लॉग टाईम नाऊ, आय विल इझीली फॉल फॉर यु…”, माया गाडीच्या मागच्या सिटवर जाऊन बसली.

दिपकने गाडी वळवली आणि तो माघारी बंगल्याकडे वळला.