Pathlag - 22 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग (भाग – २२)

दीपक बारमध्ये पोहोचला तेंव्हा बार गर्दीने भरून गेला होता. हवश्या-नवश्यांपासून ते पट्टीचे पिणार्यांपर्यंत झाडून सर्वजण हजर होते. बारच्या एका कोपऱ्यात जुगारांचा डाव रंगला होता. पूर्ण बार सिगारेटच्या धुराने भरून गेला होता.

दीपकची नजर शेखावतचा शोध घेत होती. त्याला शोधायला दीपकला फार वेळ लागला नाही. बारच्या काउंटरला लागून असलेल्या एका स्टुलावर तो आपला देह विसाउन बसला होता. हातामध्ये एक बिअरचा मोठ्ठा ग्लास होता. डोळ्यावर गॉगल होता, पण त्याची शोधक नजर बारमधून सर्वत्र फिरत होती. बारच्या दारात उभ्या असलेल्या दीपक वर काही क्षण त्याची नजर स्थिरावली. दोघांची नजरा-नजर झाली आणि मग परत तो इतरत्र बघु लागला.

अर्थातच त्याने दीपकला ह्या वेशात ओळखले नव्हते.

शेखावतला पाहताच दीपकच्या मस्तकावरच्या शिरा ताणल्या गेल्या.

“अपनी गली मै कुत्ता भी शेर होता है, आज दाखवतो तुला”, असाच काहीसा विचार दीपकच्या मनात तरळून गेला.
परंतु घाई करून चालणार नव्हती. सर्व काही प्लैन मध्ये ठरवल्याप्रमाणे व्हायला हवे होते.

शेखावतच्या शेजारची जागा रिकामी होईपर्यंत दीपक वाट बघत थांबला. व्हिस्किचा एक लार्ज ऑन-द-रॉक्स पेग त्याने मागवला आणि मग जागा रिकामी झाल्यावर दीपक त्याच्या शेजारी जाऊन बसला.

दोन तीन पेग त्याने गटागट पिउन टाकले आणि मग तो शेखावतकडे वळला

“हायलो शर”, व्हिस्की रिचवता रिचवता दीपक म्हणाला

शेखावतने एकवार त्याच्याकडे बघितले आणि मग काही न बोलता परत तो बारच्या दाराकडे पाहू लागला.

“हायलो शर, कश काय,बर हाय न?” पुन्हा दीपक म्हणाला.

शेखावतला बारच्या दरवाज्यावरून नजर हलवायची नव्हती त्यामुळे त्याने वळून न बघताच नुसता हात केला.

दिपकने अजून एक लार्ज पेग बनवला.

“शाला, इतना क्या भाव खानेका? निट बघत पण नाही.”, दीपक

शेखावत अजूनही त्याच्याकडे दुर्लक्षच करत होता.

“श्वुई श्वुई, मी तुझ्याशी बोलतोय गेंड्या”, खोट्या खोट्या झोकांड्या खात दीपक बोलला

शेखावत ने चिडून एकदा मागे वळून पहिले. काही क्षण तो चिडून पाहत राहिला आणि पुन्हा त्याने नजर दाराकडे वळवली.

“ओ तेरी… चिडला का काय?”, दीपक

“मी सांगतो… “, दीपक आता समोरच्या बारटेण्डरशी बोलू लागला, “ह्याच्यासारखी ढोली लोक जगातून कमी झाली ना, तर जागेचा सगळा प्रश्न सुटून जाइल. काल बस मधून येताना, नेमका शेजारी असच एक चिरमुऱ्याच पोत. इतकी जागा अडवली होती ना”

“नाही तर काय, आमच्या इथली स्टोर मैनेजर अशीच आहे. काम तर काही करत नाही, बडबड मात्र ऐकावी”, एव्हाना बारटेण्डर पण दीपक बरोबर चालू झाला होता.

“हो आणि असल्या लोकांना पोलिस बनवतात. तुरुंगातले कैदी पळून जाणार नाहीत तर काय? हे बसतील दोन पावला चालल्यावर हाश हुशः करत”, दिपकने मर्मावरच घाव घातला.

तुरुंगातून पळण्याचा विषय निघाल्यावर मात्र शेखावतचा पेशन्स संपला. लाथेने त्याने स्टूल मागे ढकलले आणि तो उठून उभा राहिला व दिपकने काही करायच्या आत हाताचा एक ठोसा त्याच्या चेहऱ्यावर लगावला. शेखावत कडून इतक्या चपळाईची दीपकला अपेक्षा नव्हती. त्या अनपेक्षित हल्ल्याने तो कोलमडून खाली पडला. तोंडात ठेवलेले चेंडूचे तुकडे बाहेर पडता पडता वाचले.

बार मधला गोंधळ, आवाज अचानक बंद झाला. सगळे थांबून दीपक आणि शेखावत कडे पाहू लागले.

दीपक गाल चोळत उभा राहिला. शेखावतला तेथल्या तिथे बुकलून काढायची दीपकला फार इच्छा झाली होती. पण आत्ता हातापाई वाढवून चालणार नव्ह्ते. त्याने बिलाचे पैसे दिले आणि शेखावतकडे बघत सगळ्यांना ऐकू जाईल श्या स्वरात तो म्हणाला,

“बघून घेईन तुला, भेट बाहेर… ”

चरफडत दीपक तेथून बाहेर पडला आणि पार्किंग मध्ये लपून बसला.

शेखावत सुद्धा बसून बसून कंटाळा होता. त्याने हातातल्या घड्याळात वेळ बघितली. सांगितलेल्या वेळेपेक्षा तासभर अधिक शेखावत तेथे थांबला होता. पण दीपकचा काहीच पत्ता नव्ह्ता.

बिअरचा ग्लास त्याने रिकामा केला आणि पैसे चुकते करून तो सुध्दा थोड्या वेळाने बाहेर पडला.

एका गाडीच्या आड लपलेल्या दिपकने शेखावतला बाहेर पडताना पहिले. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. रस्ता बर्यापैकी सुनसान होता. लपत छपत तो शेखावतच्या मागे जाऊन थांबला.

शेखावत चरफडत स्वतःशीच पुटपुटत चालला होता.

“शेखवत…”, दिपकने मागून आवाज दिला

शेखावतने चमकुन मागे वळून पहिले. मागे मगाच्याच त्या दारुड्याला बघून त्याला आश्चर्य वाटले.

पण त्याला जास्त आश्चर्य ह्याचे वाटले कि दोन मिनिटांपूर्वी भेटलेल्या ह्या दारुड्याला आपले नाव कसे ठाऊक?

“कोण आहेस तू? मला कसा ओळखतोस?”, शेखावत ने विचारले

दीपक छद्मी हसला. “ओळखले नाहीस?” अस म्हणून त्याने आपली खोटी दाढी आणि केसांचा विग काढून शेजारच्या गाडीवर घडी करून ठेवला. गॉगल आणि टोपी काढून शेजारी ठेवली.

दीपकला बघताच शेखावतचा संताप पुन्हा उफाळून आला. त्याने आपले सर्विस रिव्हॉल्वर काढायला हात खिश्याकडे न्हेला. परंतु दीपक तयार होता. त्याने चपळाइने शेखावतच्या अंगावर झेप घेतली. शेखावत आपले रिव्हॉल्वर काढण्यात मग्न होता. वेगाने अंगावर येणार्‍या दिपकला पाहीलेच नाही. दिपकने सर्व शक्ती एकटवुन शेखावतच्या हनुवटीखाली एक फाईट मारली. त्याची तिव्रता इतकी जोरात होती की शेखावतसारखा जाडजुड माणुस सुध्दा जमीनीपासुन काही इंच उंच उडुन मागे पडला.

त्याला सावरायची संधी न देता दिपकने बुटाच्या दोन चार लाथा शेखावतच्या गुबगुबीत पोटात लगावल्या आणि कसे बसे उठु पहात असणार्‍या शेखावतच्या तोंडावर गुडघ्याने जोरात वार केला त्याबरोबर त्याचा घोळणा फुटला आणि नाकातुन रक्त वाहु लागले.

परंतु दिपक थांबण्याच्या विचारात नव्हता. सर्व संताप त्याच्या अंगात संचारला होता. लाथा, बुक्या, गुडघा, ढोपर, डोकं जे सुचेल त्याने तो शेखावतला तुडवत होता. तुरुंगातील प्रत्येक क्षण, ती अंधारी खोली, रात्रभर उंदरांचा वावर, बेचव खाणं, मनात येईल तेंव्हा पोलिसांचं येऊन तुडवुन जाणं आणि नंतर स्टेफनीची हत्या.. सर्व काही.

१०-१५ मिनींटं चांगलं बुकलुन काढल्यावर कुठे दिपक थोडा शांत झाला. शेखावत तळमळत जमीनीवर लोळत होता. अधीक मारहाण करणं उचीत ठरलं नसतं. एक दारुड्या शेखावतसारख्या बलदंड माणसाला इतकं मारु शकेल असा उगाच कुणाला संशय यायला नको. त्याने कोपर्‍यात लपवुन ठेवलेली लोखंडी सळई बाहेर काढली. सुडाने पेटलेल्या त्याच्या चेहर्‍यावर आपला मृत्यु स्पष्ट दिसत होता. आपलं पोट हाताने दाबुन धरत तो कसा बसा उठुन बसला. त्याच्या तोंडातुन शब्द बाहेर पडत नव्हता.

दिपकने त्याच्या डोक्यात एकच जोराचा प्रहार करुन खेळ संपवायचं ठरवलं. त्याने आपली सळई हवेत उंच उगारली आणि…

“थांब..प्लिज.. एक मिनीट..”, शेखावत तडफडत म्हणाला…
….
“मला.. फक्त मला माहीती आहे तु निर्दोष आहेस. इस्माईलचा खुन तु केला नाहीस.. मला माहीती आहे.. पोलिसांची गोळी लागुन तो मेला..”

दिपकने उगारलेली सळई खाली केली.

“मी.. एकमेव पुरावा आहे दिपक.. मला संपवलस तर तु कधीच वाचु शकणार नाही. मला जिवदान दिलस तर मी वचन देतो मी कोर्टात पुरावा देईन की इस्माईल एन्काऊंटर मध्ये मारला गेला. तुझी चुक नव्हती….”

“पण त्याने मला काय फायदा.. मला पुन्हा तुरुंगात जायची इच्छा नाही. त्या दिवशी.. जेनीला वाचवताना तो माझ्या हातुन मारला गेला आणि त्याची शिक्षा भोगायला मी कदापी येणार नाही..”, दिपक

“नको येऊस.. पण निदान माफियाचा ससेमिरा तुझ्या मागुन जाईल… एक वेळ पोलिस तुझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत, पण माफिया इस्माईलच्या खुनासाठी तुला कधीच सोडनार नाहीत. आज नाहीतर उद्या ते तुझ्यापर्यंत पोहोचु शकतात. तु कधीच सुखाचं आयुष्य जगु शकणार नाहीस हे लक्षात ठेव..”, शेखावत

शेखावतच्या बोलण्यात तथ्य होते आणि दिपकलाही ते मान्य होते. माफिया त्याला कध्धीच सोडणार नव्हते. पोलिसांना चकवणं एकवेळ शक्य, पण माफिया सारखे चिकट लोकं.. जेंव्हा सर्व काही सुरळीत चालु आहे, सर्वजण विसरुन गेलं आहेत म्हणुन बेसावध होऊन, मस्त जेवणखाण करुन पोटावरुन हात फिरवत झोपावं तर कुठुनतरी कुणी तरी येऊन भोसकुन जाईल ह्याचा नेम नाही.

दिपक गोंधळुन गेला. शेखावतला उठुन उभं रहाण्यासाठी त्याने हात पुढे केला… आणि…
….


कुठुनतरी एक बंदुकीची गोळी सुss करत आली आणि तिने शेखावतच्या छातीचा वेध घेतला. काय होतेय कळेपर्य्ंत अजुन एक गोळी आली ती थेट शेखावतच्या डोक्यात घुसली.

शेखावत धाड्कन जमीनीवर कोसळला.

दिपकने आश्चर्याने मागे पाहीले. त्याच्यापासुन काही फुटांवर अंधारात हातात पिस्तोल घेऊन माया उभी होती.


दिपकने पुन्हा एकदा शेखावतकडे बघीतले. शेखावतचा निष्प्राण देह जमीनीवर निश्चेत पडला होता.

तो मायाकडे धावत गेला.. “हे.. हे सर्व…! तु इथे कशी?”

“मला वाटलंच होत शेखावत तुला फसवायचा प्रयत्न करेल आणि तु सहज त्याच्या भुलथापांना बळी पडशील… आपला प्लॅन त्याला मारण्याचा होता. त्यात कोणतीही चुक होता कामा नये…”, माया

“पण.. तो जे म्हणाला ते खरं होतं. जर त्याने साक्ष दिली असती तर निदान माफियाचा ससेमिरा तरी…”
“साक्ष !! कुणाची शेखावतची? तु त्याच्यावर विश्वास ठेवलास ह्याचंच मला आश्चर्य वाटतं दिपक. एक नंबरचा करप्ट माणुस तो. साक्ष सोडाच, इथुनच त्याने तुला जिवंत जाऊन दिलं नसतं. विसरलास, त्याच्या कमरेला भरलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आहे. इथेच तुझं लक्ष नाही असं पाहुन काटा काढला असता…”

“नाही माया.. मला वाटतं तो खरं बोलत होता…”, दिपक
“बरं ठिक आहे.. मानलं एक वेळ तो खरं बोलत होता.. पण त्याने साध्य काय होणार? तुझा लॉ अ‍ॅन्ड ऑर्डरवर अजुनही विश्वास आहे? इस्माईलच्या खुनाचा आरोप पोलिस खातं स्वतःवर कधीच घेणार नाहीत. एक तर तेच शेखावतला संपवतील नाही तर पैसे चारुन त्याची साक्ष खोटी पाडण्याचा प्रयत्न करतील.

आणि पुढे काय होईल.. आज एक दिपक निर्माण झालाय, अजुन असे अनेक दिपक निर्माण होतील. ही सिस्टीमच आपल्याला उखडुन टाकायची आहे दिपक.. विसरु नकोस…”, माया

“पण माया… ह्याचा मृत्यु.. म्हणजे आपल्याला त्याचा मृत्य हा असा.. खुन नक्कीच नव्हता भासवायचा. एक दारुड्या सेमी अ‍ॅटोमॅटीक पिस्तोल तर घेऊन फिरणार नाही. आणि फिरतच असता तर त्याने ह्याला डायरेक्टलीच उडवला असता. त्याच्याशी हाणामारी कश्याला केली असती?”

“दिपक…सगळं इथंच बोललं पाहीजे का दिपक? आपल्याला इथं कोणी पाहीलं तर पंचाइत होईल.. चल निघु इथुन..”

दिपकला अधीक बोलायची संधी न देता माया तेथुन निघुन गेली. दिपककडेही दुसरा पर्याय नव्हता. काही न बोलता तो ही तिच्या मागुन तेथुन निघुन गेला.


[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED