ना कळले कधी Season 1 - Part 12 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 12

सिध्दांतच्या मते चूक आर्याचीच होती आणि त्याला तर ऐकून घेण्याची सवयच नव्हती. 'आर्या, तुला वाटत नाही आहे तु थोडं जास्तच बोलतीये.', सिद्धांत तिला ओरडूनच म्हणाला, 'जास्त नाही योग्य तेच बोलत आहे. आणि का बोलू नये मी? आणि माझ्या कडून का  अपेक्षा ठेवताय तुम्ही? आपलं काहीही नातं नाही. तुम्ही आहातच कोण मला बोलणारे आणि विचारणारे??  माझ्या वर हक्क नाही आहे तुमचा!' सिद्धांत एकदम शांतच झाला. त्याला असं काही ऐकावं लागेल अस स्वप्नातही वाटलं नव्हतं, 'हो! बरोबर आहे मी कोण आहे तुझा?', 'कसं आहे ना सर, तुम्ही स्वतः भोवती एक कुंपण केलं आहे त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही कधी येतही नाही आणि कोणाला आत मध्ये ही येऊ देत नाही. त्यामुळे तुमच्या कडे तुमची अशी कोणी माणसंच नाही आहे.' आर्याने सिद्धांतच्या मर्मावर बोट ठेवले त्यामुळे आता तर तो रागाने लाल झाला. 'हे बघ आर्या, you are crossing your limits !तुला काहीही बोलण्याचा अधिकार नाही आहे. माझ्याकडे माणसं असतील, नाही तर नसतील, तुला काय घेणंदेणं. तू आहेस कोण मला फुकटचे सल्ले देणारी? काय संबंध तुझा? तुला माझ्या आयुष्यावर काहीही बोलण्याचा अधिकार नाही. मी असा आहे आणि असाच राहणार!समजलं? आता चालती हो, मला तुझ्यासोबत बोलण्याची इच्छाच नाही आहे .' 'मी काही फुकटचे सल्ले देत नाही आहे....' 'आर्या, just get out. मला एकही शब्द ऐकायचा नाही आहे.' 'हेच सर, तुम्ही ऐकूनच घेत नाही' 'आर्या मराठी कळतं ना. इथून निघ नाही तर, मला बाहेर काढायला लावू नको आणि मी तसं करू शकतो हे तुलाही माहिती आहे. so just get lost,' आर्या ला खूप राग आला पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण सिद्धांत जे बोलतो तेच करतो हे ही तिला माहिती होतं. ती निमूटपणे बाहेर निघाली. विक्रांत ने हे बाहेरून बघितलं आणि तो लगेच आत गेला त्याला हे कळलं होतं की काहीतरी चांगलंच बिनसलंय. 'सिद्धांत काय झालं रे? इतका का चिडलास? काही tension आहे का?',  'अरे ही काल आलेली मुलगी मला शिकवतीये की माणसं नाही आहेत तुझ्याकडे वगैरे.. अशी डोक्यात गेली ना. हिला काय माहिती आहे माझ्याबद्दल? बोलायला काय जात लोकांचं!माझं ना डोकच काम करत नाही आहे मी निघतो आता घरी, तू handle  कर आता ऑफिस मधल्या कामाचं, ठीक आहे.' असं म्हणून तो निघालाही. विक्रांत ला पण कळलं की आर्यानी सिद्धान्तला नको त्या विषयावरून छेडलं आहे. आता हा भडकलेला ज्वालामुखी शांत करणे अवघड आहे. त्याने ह्या विषयावर आर्या ला बोलायचं ठरवलं.
         आर्याला विक्रांतने त्याच्या केबिनमध्ये बोलवलं, आर्याला थोडं आश्चर्यच वाटलं की विक्रांत ने आपल्याला का बोलवलं?तिला वाटलं कदाचित सिद्धांतने आपल्या टीम मधून काढलं असेल.आणि विक्रांत च्या टीम मध्ये टाकलं असेल. 'सर काय झालं? मला बोलावलंय',  आर्या म्हणाली. 'आर्या ये बस. कस चालू आहे काम?' 'ठीक चालू आहे.'  'तुला मी कशासाठी बोलावलं माहिती आहे का?' 'नाही सर',  'हम्म.. डायरेक्ट विषयलाच हात घालतो. तू काय बोलली विक्रांत ला? तुला माहिती आहे का तो घरी निघून गेला . तो कधीही जात नाही अगं अस ऑफिस मधुन.' 'काय?? सिद्धांत सर घरी गेले.. पण मी तर फक्त त्यांना हे समजावून सांगत होते की त्यांनी अस एकटं राहू नये, माणसं लागतात सर जगण्यासाठी आणि त्यांच्याकडे ती नाही आहेत बस्स. त्याचा इतका राग ? काय चुकीचं बोलले मी? 'आर्या किती दिवसांपासून ओळखते सिद्धांत ला? ऑफिस join केल्या पासून . हो ना आणि इतक्या लवकर स्वतः च मत पण बनवलं? मी सिद्धान्त चा लहानपणापासून चा मित्र आहे.त्याला खुप जवळून ओळखतो मी . कुठलाही माणूस आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून घडत असतो. कळलं का?' 'म्हणजे मला कळत नाही आहे तुम्हाला exactly काय म्हणायचं आहे.' हे बघ आर्या आपलं घरच वातावरण फार नॉर्मल असतं म्हणजे खूप प्रेमळ. सिद्धांतच तस नाही झालं गं. म्हणजे त्याच्या घरचं वातावरण तस नव्हतं.' 'म्हणजे???', आर्या ने विचारलं. 'सिद्धांत आणि त्याची आई दोघंच जण राहतात . त्याच्या वडिलांनी तो लहान असतानाच त्याला आणि त्याच्या आईला सोडून दिले, आणि जवळचे असे कोणीही नव्हते तेव्हा पासून त्याला त्याच्या आईनेच वाढवले, लहानाचे मोठे केले, आणि  जवळपासच्या कुठल्याही नातेवाईकांनी अशी मदत नाही केली, त्याला वडिलांचे प्रेम कधी मिळालेलंच नाही किंवा तू असही म्हणू शकते की त्याच्या आई शिवाय त्याला कुणाचेही प्रेम मिळाले नाही.वडील जिवंत असूनही कधी त्यांनी ह्यांना विचारले नाही. आता सांग इतक्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिल्यानंतर नात्यांवर आणि माणुसकीवर त्याचा विश्वास कसा असेल???' विक्रांत तिला म्हणाला. आर्याच्या समोर एक अनपेक्षित सत्य आले होते. ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. आता तिला कळून चुकले होते की आपण काय करून बसलो. 'बापरे!!विक्रांत सर मी फार मोठी चूक केली. मी असं नव्हतं बोलायला पाहिजे.' 'आर्या,  तसं पाहिलं तर तू काही चुकीचं बोलली नाही, पण सिद्धांत हे नाही समजू शकत. जाऊ दे तू आता ह्या गोष्टीचा विचार नको करू. पण ह्यानंतर बोलताना लक्ष्यात ठेव. परत हा विषय नको.आणि सिद्धांतच tension नको घेऊ तो होईल उद्या  सकाळ पर्यंत नॉर्मल.' आर्या त्याला ठीक आहे म्हणून बाहेर आली. पण तीचं लक्ष पुर्णपणे उडालं होत. 'काय बोलून बसले मी हे? किती त्रास होत असेल सिद्धांतला? ते काही नाही मला माफी मागायलाच हवी.'
      दुसऱ्या दिवशी आर्या ऑफिसला आली. तिने सिद्धांत च्या केबिनकडे पाहिलं, तो आलेला होता. आर्या लगेच त्याला sorry म्हणायला गेली. 'good morning सर, actully मी काल जे काही बोलले त्याबद्दल खरचं sorry. मला असं नव्हतं बोलायला पाहिजे.' आर्या बोलतच होती पण सिद्धांतने तिच्याकडे पाहिलं देखील नाही. तो ऐकत होता पण तिला ignore करत होता. 'झालं असेल तर निघू शकते आर्या', सिद्धांत तिला म्हणाला. 'सर मला समजू शकतं तुम्हाला काय वाटतं असेल', सिद्धांत एकदम उठुन तिच्या जवळ आला, आर्या घाबरलीच . 'काय समजू शकते तु? ज्यांना लहानपणापासून वडिलांचं प्रेम नाही मिळू शकत त्यांच्या भावना तुला काय कळणार? लोक नेहमी सहानुभूतीनेच वागणार? ह्या गोष्टींचा किती त्रास होतो माहिती आहे तुला? सगळे फक्त हेच म्हणतात आम्ही समजू शकतो पण कोणीही काहीही समजू शकत नाही.  ह्या फक्त बोलायच्याच गोष्टी असतात आर्या!' आर्याच्या डोळ्यात एकदम पाणीच आले, 'माझ्यापेक्षा जास्त हे दुःख कोणीही नाही समजू शकत' अस म्हणली आणि ती बाहेर पडली. 'आर्या, थांब..', सिद्धांत तिला थांबवण्याचा प्रयत्न करीत होता पण ती निघून गेली. 'हिला काय झालं? आणि ही अशी का बोलत होती? हे दुःख माझ्या पेक्षा जास्त कोणाला नाही समजू शकत म्हणजे?' त्याला आर्या काय बोलली ह्याचा काही उलगडच होत नव्हता. त्याला एक शंका आली आणि लगेच त्याने एक call लावला, आता त्याला आर्याच सगळं family background  कळलं होतं. 'अरे बापरे! म्हणजे आर्याला पण वडील नाही आहेत! बापरे काय वाटलं असेल तिला. म्हणून ती रडत बाहेर गेली.' तो तिला शोधत बाहेर गेला आर्या त्याला canteen मध्ये भेटली. 'आर्या सॉरी, मला नव्हतं माहिती.' तिने डोळे पुसले आणि ठीक आहे एवढंच म्हणाली. 'तू पण कधी काही बोलली नाही?' आर्या काहीही बोलत नव्हती. तिच्या आयुष्यातील ही एकच पोकळी होती. तीही कधीही भरून न निघणारी.