ना कळले कधी Season 1 - Part 16 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 16

   तो काहीच न बोलता समोर निघाला, ती ही त्याच्या मागे मागे गेली. 'सर मी काहीतरी विचारलं आहे?', त्याचं उत्तर नाही मिळालं मला. सिद्धांत काहीही उत्तर देत नव्हता. आर्याने त्याचा हात पकडला आणि थांबवलं, 'मी तुमच्याशी बोलतीये ना. मूर्ख आहे का मी एकटीच बडबड करायला.' 'आर्या, हे बघ काही प्रश्नांना उत्तरे नसतात त्यातलाच हा समज.', असं म्हणून तो चालू लागला. आर्याला काय बोलावं कळलंच नाही. तिने पटकन विषय बदलला, 'तुम्हाला नाही घ्यायचं काही?' 'काय?', सिद्धांत म्हणाला. त्याला आर्या इतक्या लवकर हा विषय सोडेल असं त्याला वाटलंच नव्हतं. बर झालं हिने दुसरा विषय काढला. तो मनातच म्हणाला. 'नाही मला काही विशेष आवड नाही खरेदी करण्याची. त्यापेक्षा काही खायचं का?भूक पण लागलीये.' 'हो खाऊया ना. मला पण actully खूप भूक लागली आहे.', आर्या म्हणाली.
      'आर्या काय खाणार तू?' 'मी काहीतरी spicy घेणार, तुम्ही काय घेणार?' 'मी साधच आपलं घेईल काही तरी.' 'कसं साधं खाणं जातं. चव तरी येते का जेवण्याची?', आर्या ने विचारलं. 'खरं तर मी म्हणायला हवं की तुम्ही लोकं इतकं तिखट कसं खाऊ शकता. मी तर अजिबात खाउच शकत नाही.', सिद्धांत म्हणाला. 'काय तुम्ही अजिबातच तिखट खात नाही मग तरीही तुमचा स्वभाव रागीट कसा.?' आर्या म्हणाली आणि आणि तिने एकदम जीभ चावली. 'काय बोलून गेले हे!' 'काय म्हणाली आर्या परत बोल', 'नाही नाही काही नाही ते चुकून निघून गेलं तोंडातून' आर्या म्हणली. 'अच्छा म्हणजे मी रागीट आहे असं म्हणायचं आहे तर तुला.' 'नाही अजिबात नाही. sleep of tongue बस्स!' 'आणि तुला ह्या गोष्टी शिकवतं कोण ग कि तिखट खाल्ल्याने रागीट स्वभाव होतो वगैरे.' 'ते मी वाचलं होतं कुठे तरी', आर्या म्हणाली. 'हा आता मला कळालं की तुझा स्वभाव इतका तापट का.' 'काहीही हा सर! मला काही राग वगैरे येत नाही'. 'Look who is talking नाक बघ अजूनही लाल आहे.' आणि सिद्धांत तिच्या कडे बघून हसू लागला.
'चला ऑर्डर आली, आधी खाऊन घेऊया', आर्या म्हणाली. आणि दोघांनी मस्त ताव मारला जेवणावर. आर्याने सिद्धांतला तिच्या डिश मधील खाण्याचा खूप आग्रह केला. 'हे बघ आर्या, मला spicy खाल्ल्याने त्रास होतो. म्हणून मी नाही खात.' 'थोडंस खाल्ल्याने नाही होणार. please माझ्यासाठी!' आता मात्र सिद्धांत चा नाईलाज झाला त्याने खाल्लच. एक दोन घास खाल्ल्यानंतर त्याला खूप जोराचा ठसका लागला. 'सर are you ok? काय होतंय तुम्हाला?, पाणी घ्या.' तिने त्याला पाणी दिल तरीही त्याचा त्रास कमी होतच नव्हता. त्याला खूप बेचैन होत होतं. आर्याला काहीच सुचत नव्हतं काय करावं. माझ्यामुळेच झालं हे सगळं मी उगाचच आग्रह केला. तो तर नाहीच म्हणत होता. 'बरं वाटतय का आता?' 'feeling better', तो म्हणाला. आर्याला स्वतःचाच खूप राग येत होता. ती म्हणाली, 'Sorry सर! मला खरच वाटलं नव्हतं की तुम्हाला इतका त्रास होईल. माझ्या मुळेच झालं हे सगळं.' 'ए आर्या, वेडी आहेस का? तुझ्यामुळे काही नाही झालं, माझा लहानपणीपासूनचाच problem आहे . तुझ्यामुळे काहीही नाही झाल, so don't worry. आणि आता बरा आहे ना मी.', सिद्धांत ने तिला समजावलं.
                इतक्यात आर्याला कॉल आला आणि तिला आवाज ऐकू येत नव्हता म्हणून ती बाजूला गेली. सिद्धांत तिथेच होता मग तो बिल paid करायला गेला. आर्याचा फोन झाला आणि ती जागेवर आली. तिला सिद्धांत दिसलाच नाही आणि तिथे बरीच गर्दी होती. तिने आजूबाजूला पाहिलं पण सिद्धांत कुठेच दिसेना. तिने फोन लावून बघितला पण त्याचा फोनही बंद येत होता. आर्या खूप बेचैन झाली.पण सिद्धांत काही तिला दिसेना. सिद्धांतने पाहिलं होतं की आर्या त्याला शोधतीये पण त्याने तिची थोडी मजा घेण्याचं ठरवलं. तो काही समोर गेलाच नाही. तो एका आडोश्याला थांबला जिथून त्याला आर्या सहज दिसत होती. पण आर्याला तो नव्हता दिसत. आर्या सतत फोन try करत होती, सिद्धांत ने आपला फोन चेक केला 'अरे network च नाही बरंच झालं'. असं म्हणून त्याने आपला फोन परत खिशात ठेवला आणि पुन्हा आर्या वर लक्ष केंद्रित केलं. 'कुठे गेला असेल हा?मला एकटीला सोडून. आणि मला तर इथलं काहीही माहिती नाही. काय करू आता. त्याला मी जबरदस्तीने खायला लावलं तर राग तर नाही ना आला? पण मी मुद्दामून नाही केलं! काय करू कुठे शोधू? इथे कोणाला विचारू का? छे!! इतक्या गर्दीत कोणाच्या लक्षात राहणार. पुन्हा एकदा फोन लावून बघते लागला तर बरच आहे. अरे यार.. ह्याचा फोन पण बंद. कसं शोधणार आता?' ती अगदी रडकुंडीला आली होती. सिद्धांतला खरं तर आर्याची ही अवस्था पाहून खूप हसायला येत होतं. 'चला आता जावं तिच्या पुढे नाहीतर रडतीलच मॅडम'. तो थोडा पुढे आला  आणि  तिला आवाज दिला 'आर्या'! आर्या ने लगेच बघितलं आणि सिद्धांत ला बघितल्यावर तिच्या डोळ्यात पाणीच आलं. 'कुठे गेला होतात?किती शोधलं मी!' 'हो आर्या relax! रडत का आहे.' त्याने तिच्या डोळ्यातील पाणी पुसलं, 'बघ मी तुझ्या समोर उभा आहे.' 'किती घाबरले होते मी. असं जातात का सोडून? किती काळजी वाटत होती मला.' 'का काळजी वाटत होती?', सिद्धांत ने प्रतिप्रश्न केला. आता ह्या 'का'च उत्तर आर्या कडे नव्हतं. 'सर तुम्हीच म्हणाले होते ना की काही प्रश्नांची उत्तरे नसतात, त्यातलंच हे समजा.' 'पण मला मात्र अनुत्तरीत प्रश्नच सोडवायला आवडतात', सिद्धांत म्हणाला. 'आणि ह्या प्रश्नाचं उत्तर ही मी घेईनच तुझ्याकडून.' 'ते बघूया पुढे. आता खूप उशीर झाला आहे. आपण निघायचं का? मला रेवाचाच फोन होता लवकर या म्हणून.' 'हो चल निघुया.' आणि दोघेही निघाले.
         'काय रे कुठे भटकत होतात दोघंही जणं? आणि तुझा फोन का बंद येतोय?', आल्या आल्या विक्रांत ने प्रश्नांची सरबत्तीच चालू केली. 'अरे हो! दम तर घेऊ दे. सांगतो ना. माझा फोन बंद आहे कारण network च नाही. आणि तुम्हीच पुढे निघून गेले होते सगळे so आम्ही फक्त route change केला. कारण तुम्हाला follow करूनही काही फायदा नव्हताच. आणि काय रे मी एकटाच मागे राहिलो तर आला नाही तू माझ्या सोबत. एरवी तर बोंबलत असतो ना मी तुझ्या सोबत फिरत नाही म्हणून, मग आज काय झालं? ती बिचारी आर्या बरी ती आली पण तू नाही आलास', सिद्धांत म्हणाला. 'मी मुद्दामूनच नाही आलो कारण मी आलो असतो तर ती नसती ना आली. आणि तुम्हाला सोबत वेळ नसता घालवता आला. बस्स.. बाकी काही नाही, आधी कधी सोडलं का मी एकटं तुला?' 'तुला बरं माहिती असतं रे सगळं. म्हणजे मी मागे राहिल्यावर आर्या येईलच तिथे.' 'मला सगळं कळतं रे.. असतं एखाद्या मध्ये टॅलेंट तुझ्या मध्ये नाही. सोड तू.' 'बरं मग कसं झालं तुमची एकंदरीत ट्रिप? नीट वागला ना बाबा तिच्या सोबत की रागावला तिच्यावर', विक्रांत ने विचारलं. 'गप्प रे!काहीही काय बडबड करतोय उगाचच. का रागवेल मी काहीही आपलं,बरं किती वेळ पासून मलाच विचारतोय तुझं काय तू काय केलं?', सिद्धांत ने विक्रांत ला विचारलं. 'काही विशेष नाही रे फिरलो सगळ्यांसोबत.माझ्याकडे काही special नसतं बाबा तुझ्यासारख.' 'अरे विक्रांत काय लावलंय तू, रोजचच होत आहे हल्ली तुझं हे. खूप ऐकून घेतलं हा आता आवर घाल.', सिद्धांत चिडलाच त्याच्यावर. 'बरं चुकलं माझं. चल निघायचं आहे.' विक्रांतला माहिती होत आता काही बोललो तर सिद्धांत आणखीनच चिडेल त्यापेक्षा विषय बंद केलेला बरा. निघायची वेळ झाली होती सगळे जण गाडीत बसले होते. आर्या आणि सिद्धांत शेवटी आले त्यामुळे त्यांना येतानाच्याच जागा मिळाल्या. खरं तर ती जागा मिळावी म्हणूनच ते उशिरा आले होते. आणि हे काही विक्रांत च्या नजरेतून सुटलं नाही.