'झालं का सिद्धांत तुझं?' 'हो आई, बस एक - दोन मिनिटे.' 'अरे बरा आहेस ना तू?' 'का गं? काय झालं?' 'अरे किती spicy बनवलंय तू जेवण. तू विसरलास का की तुला चालत नाही.' 'आई, मी माझ्या साठी साधं वेगळं बनवलं. हे तुझ्या आणि आर्या साठी बनवलंय. तिला साधं अजिबात आवडत नाही. आणि तुला ही माझ्या मुळे नेहमी साधंच खावं लागतं. so..' 'बरीच माहिती गोळा केलेली दिसतीये तू आर्याची. म्हणजे तिला काय आवडतं, काय नाही.' 'काही माहिती वगैरे नाही गोळा केली मी. हे ट्रिप मध्ये 2 दिवस सोबत होतो तर माहिती झालं thats it. बाकी मला काहीही माहिती नाही तिच्या बद्दल.' बरं बरं, कधी येणार आहे ती?' 'येईलच गं इतक्यात.' तितक्यात door bell वाजली. 'आई मी आलोच', असं म्हणून सिद्धांत दार उघडण्यासाठी गेला. 'अरे ए, तो apron काढ आणि चमचा घेऊन कुठे चालला?', त्याची आई मागून ओरडत होती. पण हे ऐकण्यासाठी सिद्धांत कुठे थांबला. तो तर केव्हाच निघून गेला होता. 'चला म्हणजे सिद्धांत बदलतोय, आता माझी काळजी कमी झाली. चला आर्या आली वाटतं, भेटू तरी तिला.' आर्या ने आज छान pink long skirt घातला होता त्यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत होती. सिद्धांत ने दरवाजा उघडला, 'welcome आर्या, looking pretty.' 'thank you!', ती म्हणाली. 'ये ना आत ये.' 'आणि हे काय सर हा चमचा, apron? तुम्ही कूकिंग पण करता?' इतक्यात सिद्धांत ची आई तिथे आली,' हो आणि आजचा तर सगळा स्वयंपाक तुमच्या सरांनी च केला आहे.' 'Ohh great!', आर्या म्हणाली. मी आलोच म्हणून सिद्धांत किचन मध्ये गेला. 'कशी आहेस आर्या? काय म्हणतो जॉब? बॉस त्रास नाही देत ना तुझा?' 'मी मस्त मजेत आणि जॉब पण छान चालू आहे. नाही, आणि माझे बॉस काही त्रास नाही देत', ती हसून म्हणाली. 'देत असेल तर सांग बरं. मी बोलेल त्याला, कारण मी ऐकलंय सिद्धांतला ऑफिस मध्ये सगळे घाबरतात तो फार रागावतो म्हणे.', त्याची आई म्हणाली. 'नाही हो काकू, खरंच सर काही इतके पण कडक नाही.', आर्या म्हणाली. 'इतके पण नाही म्हणजे थोडा आहे.' 'नाही नाही, मला असं नव्हतं बोलायचं.', आर्या म्हणाली. इतक्यात सिद्धांत आला, 'काय नव्हतं म्हणायचं आर्या तुला?', त्याने विचारलं. 'हेच की तिचा बॉस थोडा rude च आहे', सिद्धांतची आई म्हणाली. 'हो आर्या, असं बोलते तू माझ्या बद्दल आणि तेही माझ्याच घरी.' 'नाही सर, मी तेच म्हणतेय, मला असं काही म्हणायचं नाही आहे, believe me..' 'अरे हो आर्या, relax', आणि तो आणि त्याची आई हसायला लागले. 'किती टेन्शन घेते ही.', सिद्धांतची आई म्हणाली. 'ती तशीच आहे.', सिद्धांत म्हणाला. 'चला जेवायला झाली आहे सगळी तयारी.' आर्या चा चेहरा अजूनही टेन्शन मधेच होता. 'अग ए आर्या, विसर आता आम्ही अशीच तुझी मजा घेत होतो.' 'काय सर तुम्हाला प्रत्येक वेळेस मीच भेटते का? आणि काकू तुम्ही पण!' 'बर आता जेवायला चला मी वाढून ठेवलय थंड होईल नाही तर.', सिद्धांत तिला म्हणाला.
ते तिघंही जण जेवण्यासाठी टेबल वर आले. 'wow nice arrengments!!', आर्या म्हणाली. 'हो सगळं सिद्धांत ने केलंय. मुळात त्याच कामच खूप व्यवस्थित आहे. त्याला सगळं perfect लागत.', त्याची आई आर्याला सांगत होती. 'आई आता कौतुक पुरे जेवण चालू कर. आणि काही perfect वगैरे नाही मला फक्त वस्तू जागच्या जागेवर असलेल्या आवडतात.' त्यांनी जेवण चालू केले. 'अप्रतिम झालय जेवण. सर तुम्ही ना खरं तर chef व्हायला हवं होतं. काय चव आहे तुमच्या हाताला.' 'thank you! नको chef वगैरे काही नको. माझं प्रोफेशनच छान आहे. हे मी उगाच आवड म्हणून करतो.' 'तुला येतो का आर्या स्वयंपाक बनवता?', सिद्धांत च्या आई ने विचारलं. 'आर्या मॅगी आणि चहा सोडून सांग हं.', सिद्धांत मधेच बोलला. 'चहा आणि मॅगी सोडून म्हणजे?', त्याच्या आईने विचारलं. 'हे बघ आई, तू हल्ली कुठल्याही मुलींना हा प्रश्न विचार. तुला चहा आणि मॅगी हे उत्तर कॉमन मिळेल. म्हणून मी तिला आधीच सांगितलं की हे सोडुन सांग.' 'बरं, तिला बोलू देणार आहे का तू. आर्या सांग तू.' 'आई, मीच सांगतो तुला तिला नाही येत काहीही.' आर्याने एकदम आश्चर्याने सिद्धांतकडे पाहिलं, 'ह्याला कसं कळाल? मला काहीही येत नाही. मी तर कधीही सांगितलं नाही.' 'सिद्धांत काहीही काय बोलतो तू? अस म्हणत असतात का आणि तुला काय माहिती तिला काय येत ते?', त्याची आई त्याला म्हणाली. 'हे बघ तुला खोट वाटत असेल तर विचार तिला, बरोबर बोलतोय ना मी आर्या?' 'हो सर, पण तुम्हाला कस कळलं? मी तर कधी बोलले नाही.' 'कळतं मला सगळं.' 'हो, मोठा अंतरज्ञानी आहे तू.', त्याची आई म्हणाली. 'सर सांगा ना कस कळलं?', 'हे बघ मी तुला सकाळी म्हंटल की तू जेवायला ये तू म्हणाली की मी काहितरी मागवून घेईल. त्यावरून मी आपला अंदाज बांधला. आणि माझा अंदाज खरा निघाला.' 'खरं तर मला आई सारखी मागे लागते, पण मलाच वेळ नसतो. आणि मला यायला पाहिजे ही काळजी आईलाच जास्त आहे. ती सारखी म्हणत असते शिकून घे पुढे कस होणार? पण मीच मनावर नाही घेतलं कधी',आर्या बोलली. 'तू काही टेन्शन घेऊ नको आर्या. तू सिद्धांत सारखाच एखादा मुलगा शोध ज्याला सगळा स्वयंपाक येतो.' 'Hmm.. that's better', आर्या म्हणाली. आर्याला जरी त्यांच्या बोलण्याचा रोख कळाला नसला तरी सिद्धांतला कळलं. त्याने लगेच विषय बदलला, 'आई तुला काही हवंय का?' 'नको, झालं माझं तुमचं चालू द्या मी उठते.' आर्या आणि सिद्धांत ही जेवुन उठले. तिघांनीही नंतर बऱ्याच गप्पा मारल्या. 'चला आता मी निघते बराच उशीर झालाय.', आर्या म्हणाली. खरं तर मनातून तिला अजिबात निघावं वाटत नव्हतं पण वेळ होत होता तर निघावच लागणार होतं. 'तू कशी जाणार ? नाहीतर सिद्धांत येईल सोडायला.', सिद्धांत ची आई तिला म्हणाली. 'नाही नको. मी जाईल मी गाडी घेऊन आलेली आहे. आणि इतकं काही लांब पण नाही. तर जाईल मी.' 'ठीक आहे,हळू जा आणि हो पोहचल्यावर एक फोन नक्की कर, bye good night.', सिद्धांत म्हणाला. 'हो नक्की करते', असं म्हणून तिही निघाली. 'आर्या खूपच गोड मुलगी आहे ना? मला तर आवडली. मग सिद्धांत, कधी विचारणार आहे तिला?' 'ए आई, आवडली काय आवडली मी काही तिला दाखवायला नव्हतं बोलावलं. मी फक्त जेवण्यासाठी बोलावलं होतं.' 'सिद्धान्त आई आहे मी तुझी कळलं ना. तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुला.' 'बरं! आई मला झोप येतीये मी जातोय,good night', आणि तो रूम मध्ये गेला. 'किती दिवस पळ काढणार कधी ना कधी तुला accept करावच लागणार.फक्त तो दिवस लवकर यावा.', सिद्धांत ची आई स्वतः शीच म्हणाली.
सिद्धांत रूम मध्ये आला आणि त्याला आर्याचा कॉल आला. 'हा आर्या बोल, पोहोचलीस?' 'हो आत्ताच आले.' 'घरी आले का सगळे?' 'नाही, येतीलच इतक्यात.' 'ok चल भेटू उद्या. Bye' 'हो bye, good night आणि सर जेवण खरच खूप छान होत.' 'thank you चल bye', असं म्हणून त्याने फोन ठेवला. आर्याच्या मनातून सिद्धांत चे विचार काहीही केल्या जातच नव्हते. 'का मी इतका सतत त्याचाच विचार करतेय? आम्ही तर साधे friends पण नाही. पण तरीही इतकी काळजी, इतकी ओढ का? इतकं काय आहे त्याच्या मध्ये की मला त्याचा रागही हवाहवासा वाटतोय?' असे अनंत प्रश्न आर्याला त्रास देत होते. पण ह्या प्रश्नांची उत्तरे मात्र तिच्या कडे नव्हती.