ना कळले कधी Season 1 - Part 17 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 17

सगळे  गाडीत बसले. आणि आणि एकदाचा प्रवास सुरू झाला. आर्या आणि सिद्धांत एकमेकांच्या बाजूला जागा मिळाली म्हणून खूप खुश होते.छान गेला ना आजचा दिवस! खूप मस्त वाटलं कितीतरी दिवसांनी इतकं  enjoy केलं, हो ना सर...अगं आपले HR वाले करतच असतात अश्या ट्रिप वगैरे अरेंज...खूप ट्रिप केल्या पण ही काहीतरी वेगळीच होती म्हणजे somthing special सिद्धांत म्हणाला.. काय होतं असं ह्या ट्रिप मध्ये special ?? आर्याने लगेच विचारलं..तुला म्हटलंना आर्या काही प्रश्नांची उत्तरे नसतात त्यातलाच हा समज.. सर मला तर वाटतंय की फक्त माझ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात तुमच्याकडे..ठीक आहे! तिने कानामध्ये headphones टाकले आणि गाणे ऐकत बसली. खर तर सिद्धांत बाजूला असताना तिला गाणे ऐकण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिला त्याच्या सोबत बऱ्याच गप्पा मारायच्या होत्या पण तिने ते टाळलं ह्या वेळी तिला सिद्धांतचा प्रचंड राग आला होता. सिद्धांतला ही आर्या सोबत खूप काही बोलायचं होतं पण आता काही स्कोपच उरला नव्हता.. आर्या काहीही चुकीचं विचारत नव्हती, तिला काय सांगू तू ज्या प्रश्नांची उत्तरे विचारत आहेस त्याची उत्तरे माझ्या कडेच नाहीयेत ..आर्या, तुला काहीच बोलायचं नाही आहे का? काय बोलू मी  माझ्या कुठल्याही प्रश्नाला तुमच्या कडे उत्तरच नसतात आणि मला नाही शोधता येत उत्तर.. त्यापेक्षा न बोललेलंच बर..आर्या sorry अगं मी नक्की देईल तुला हव्या असलेल्या   सगळ्या प्रश्नांची उत्तरे,पण ही ती वेळ नाही .. योग्य वेळ येऊ दे...ठीक आहे, मी वाट बघेल त्या वेळेची.
   थोड्या वेळाने सगळं सुरळीत झालं आणि दोघांच्या ही मस्त गप्पा रंगल्या. आर्याला गप्पा मारता मारता केव्हा झोप लागली कळलंही नाही.. हॅलो आर्या मी तुझ्याशी बोलतोय असं म्हणून त्याने आर्याकडे पाहिलं. अरेच्चा ही झोपली पण!काय कमाल आहे आता तर मस्त गप्पा मारत होती. त्याला आर्याचं आश्चर्यच वाटलं. तेवढ्यात तिचं डोकं सिद्धांताच्या खांद्यावर नकळत पडलं.. सिद्धांत ला तिला उठवण्याची इच्छा झाली नाही तिला खूप गाढ झोप लागली होती..आर्याला इतकं निश्चिंत झोपलेलं पाहून सिद्धांत ला खूप बरं वाटलं, किती वेगळी आहे ना आर्या सगळ्यांपेक्षा वेगळी.!तिला स्वतः साठी जगणंच माहिती नाही.. किती कमी वयात जास्त समजदार झाली आहे, तिचा आनंद हा दुसऱ्यांच्या आनंदातच आहे.कधी कधी करते वेंधळ्यासारखी पण ठीक आहे, त्याने तिच्या कडे पाहिलं एक छान smile दिली आणि डोळे मिटले.
        सिद्धांत आणि आर्यालाच सुरवातीला उतरायचं होत.. सिद्धांतला जाग आली ,त्याने पाहिलं आर्या अजूनही झोपेलेलीच होती खरं तर तिची साखर झोप मोडण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती पण ऑपशन नव्हता.. त्याने हळूच आवाज दिला 'आर्या'ss आर्याला काहीही फरक पडला नाही.आर्या उठ उतरायचं आहे आपल्याला.. 'ये यार 5 मिनटं थांब बरं!'आर्या स्टॉप आहे आता आपला उठss काय कटकट आहे यार सकाळी सकाळी असं म्हणत तिने डोळे उघडले. अरे सिद्धांत सर!! Sorry हा मला वाटलं मी घरीच आहे. .तुला कळतं का तू काय बोलत होतीस? असं बोलत का कुणी आपल्या बॉस सोबत?. sorry sir, मला खरचं कळलं नाही मी काय बोलून गेले ते.. प्लीज मी काही चुकीचं बोलले असेल तर ignore करा प्लीज. सिद्धांत तिच्या कडे पाहून हसायला लागला.. काय आर्या किती घाबरते तू मला ?आर्याला कळून चुकले की हा फक्त आपली मजा घेतोय..काय इतक्या सकाळी सकाळी तुम्हाला मीच भेटले का?हो अर्थातच सिद्धांत म्हणाला..बर चल उतरायचं आहे आपल्याला, दोघेही जण उतरले कशी जाणार आहेस?आयुष येणार आहे का तुला घ्यायला ? नाही तो आणि आई एका लग्नासाठी बाहेर गावी जाणार होते म्हणजे आज रात्री पर्यंत येतील तर मला आता कॅब वगैरे करूनच जावं लागणार! चल मग सोबतच जाऊया, तू तुझं घर आलं की उतरुन जा मी पुढे जाईल. ok चालेल, असं म्हणून दोघेही taxi मध्ये बसले. आज एकटीच मग  घरी, भीती नाही वाटणार ना? सिद्धांतने तिला विचारलं..
भीती काय आली त्यात मला सवय आहे.! वाह चांगलं आहे... बर आर्या तू आज एकटीच आहेस ना मग एक काम कर तू माझ्या घरी ये जेवायला संध्याकाळी..नाही सर काहीही काय  मी मागवेल काहीतरी आणि रात्री तर आई येणारच आहे ..अगं नाही काय म्हणतेय खरंच ये आज माझ्या आईलाही सुट्टीच असते छान काहीतरी बेत करू, आणि नाही नको म्हणू हा please .. ok okठीक आहे येईल मी.. आर्या म्हणाली. इतक्यात आर्याचं घर आलं ती उतरली,चलो bye.. सर भेटू संध्याकाळी.! Bye..ये नक्की .. सिद्धांत खूप खुश होता कारण तो आर्याला संध्याकाळी परत भेटणार होता.
               सिद्धांतने दुपारीच आर्याला मेसेज करून ठेवला.. संध्याकाळची आठवण देण्यासाठी,पण आर्या मात्र मस्त झोपली होती. तिने ठरवूनच टाकलं होत आज छान झोप घ्यायची. 'सिद्धांत अरे आज तू कुठलंच काम काढायच नाही हं!' त्याची आई  त्याला म्हणाली.. का गं आई काही स्पेशल आहे का? आज मी श्रावणी सोबत संध्याकाळी मिटिंग फिक्स केली आहे,तेव्हा संध्याकाळी तुला तिला भेटायला जायचं आहे. आणि ह्या वेळेस मी कुठलंही कारण ऐकणार नाही, खुप चांगली मुलगी आहे तू एकदा भेटून तर घे तुलाही आवडेल. आई थांब!! आता श्रावणी कोण आणि तू अशी मला न विचारताच कस काय परस्पर मीटिंग फिक्स केली ग?आणि आज संध्याकाळी तर अजिबातच नाही,आणि मुळात मला लग्न वगैरे ह्या भानगडीत पडायचं नाही आहे तिला काही तरी कारण सांग माझं नाही जमणार!!हे बघ सिद्धांत मी काहीही ऐकणार नाहीये तुझं !तुला भेटायला काय प्रॉब्लेम आहे रे??आणि आज तर सुट्टीच आहे ना!आज संध्याकाळी काय काम आहे तुझं अस महत्वाचं? अगं आज संध्याकाळी आर्या येणार आहे आपल्याकडे जेवायला! मी बोलावलंय तिला..अरे बापरे!सिद्धांत तू चक्क तिला आपल्या घरी जेवायला बोलावलंस?!? माझा तर विश्वासच बसत नाहीये! बरा आहेस ना तू!ए आई तू आता त्या विक्रांत सारखं over react नको करू,तिच्या घरी कोणी नव्हतं तर ये म्हटलं जेवायला thats it इतकं काय आहे त्यात.? नाही ते बर केलं तू करते मी संध्याकाळची मीटिंग "cancel"..आणि हो आई, पुढे मला विचारल्याशिवाय असं काही करत जाऊ नको'. नाही आता मला काही शोधण्याची गरजच उरली नाही!! त्याची आई म्हणाली.. झालं का तुझं मला संध्याकाळच्या जेवणाची  तयारी करायची आहे.. काय ?आज जेवण पण तूच बनवणार का?बापरे! आई विसरली आहे का आज रविवार आहे आणि रविवारी मीच बनवतो जेवण, same आज पण बनवणार. !!कर, तुला काय गोंधळ घालायचा तो घाल तसाही तू उत्तम cook आहेस माझी काही गरज पडणार नाही... आणि जर पडलीच तर आवाज दे.. मी आत पुस्तक वाचते तोपर्यंत. सिद्धांत च्या आईला खरंतर मनातून खूप आनंद झाला आर्या येणारे कळल्यावरआणि त्याही पेक्षा जास्त सिद्धांतने स्वतःहून तिला बोलावलं ह्याचा.!