ना कळले कधी Season 1 - Part 19 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 19

      आर्या ने आज सकाळी सकाळी उठून लवकर आवरलं. तिला आज सिद्धांतच्या भेटीची खूप ओढ लागली होती. केव्हा एकदा सिद्धांतला भेटेल अस झालं होतं. तिला सतत सिद्धांत बरोबर घालवलेले क्षण आठवत होते. कुठेतरी सिद्धांत तिला आवडत होता हे आता तिच्या मनालाही पटत होत. ती ऑफिस साठी निघाली तिने नेहमीसारखाच फोन silent करून बॅग मध्ये टाकला आणि निघाली. इकडे सिद्धांत पण आवरून निघाला. त्याला वेळेत पोहचायचं होत कारण त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती. पण ऑफिसच्या जवळपासच संपूर्ण रस्ता ब्लॉक केला होता. त्याने गाडीतून खाली उतरून चौकशी केली तर त्याला कळलं की कुठल्यातरी मुलीचा accident झाला आहे. आणि तिला बरच लागलं तर पोलीस केस ह्या सगळ्या गोष्टींमुळे रस्ता ब्लॉक झालाय. सिद्धांतला मनात उगाचच शंका आली आली आणि तो accident स्पॉट कडे गेला. त्याने ती गाडी पहिली आणि त्याला धक्काच बसला ती गाडी  सेम आर्याच्या गाडीसारखीच होती. अरे यार! आर्या तर नसेल, नाही आर्या नसणार ती मुलगी. पण ही गाडी तर सेम तिच्या गाडीसारखीच आहे. अरे यार! मला आर्याच्या गाडीचा नंबर पण माहिती नाही. त्याने बऱ्याच जणांना त्या मुलीचं वर्णन विचारलं, ते बरचंस आर्या सोबत जुळत होत. आता सिद्धांतला काहीही सुचत नव्हतं त्याने लगेच फोन काढला आणि आर्या ला फोन केला तिने receive नाही केला. तो सतत फोन करत होता पण फोन कुणीही उचलत नव्हते. आणि हे सिद्धांत च्या काळजीत अजूनच भर घालत होते. काय करु आता कुठे असेल आर्या? नाही ती मुलगी आर्या नसणार मी आधी ऑफिसला जातो म्हणजे कळेल की आर्या ऑफिस ला आली की नाही, पण जर ती आलीच नसेल तर? म्हणजे आर्याचाच accident...... नाही मी इथुन काहीही अंदाज बांधण्या पूर्वी आधी ऑफिस ला गेलं पाहिजे. तो तिथून मिळेल त्या रस्त्याने ऑफिसला गेला. हया क्षणी त्याच्या मनात प्रचंड भीती आणि राग होता. आर्याला काही झालं असेल का ही सतत भीती त्याला वाटत होती. पण जर आर्या ठीक आहे तर ती कॉल का नाही उचलत आहे. तो ऑफिस ला पोहचला. त्याने वॉचमन ला च गाडी पार्क करायला सांगितली आणि तो तडक ऑफीस मध्ये  गेला. त्याची नजर आर्यालाच शोधत होती. आणि त्याला ती तिच्या friends सोबत बोलताना  दिसली. खरं तर ती खूप खुश दिसत होती. तिला पाहून सिद्धांतच्या जिवात जीव आला. पण त्याला रागही प्रचंड आलेला होता. तो जोरात ओरडला, 'आर्या.....' सगळ्यांना कळलं की नक्की हा खूप रागात आहे. त्याच्या आवाजवरूनच सगळ्यांनी ओळखले आणि आपापल्या कामाला लागले. विक्रांत पण त्याचा आवाज ऐकून लगेच त्याच्या केबिन मधून बाहेर आला. 'आर्या  फोन कुठे आहे तुझा?' ह्याला काय झालं अचानक हे आर्याला कळतच नव्हतं. काल रात्रीपर्यंत तर किती चांगला वागला हा. 'माझा फोन बॅग मध्ये आहे, काय झालं सर तुम्ही इतकं का चिडला आहात. Is everyting ok?' आर्याने थोडं घाबरतच विचारलं. 'तू काही डोक्यावर पडली आहेस का गं? फोन बॅग मध्ये ठेवण्यासाठी असतो का? मी किती फोन केलेत तुला. तुला एकही उचलता नाही आला का?' 'सर, actully...' 'हे बघ आर्या, माझं बोलणं झालं नाही आणि तुझी फालतू कारणं मला नको आहे', तिला मध्येच थांबवत सिद्धांत बोलला, 'मी मूर्ख आहे का तुला इतके कॉल करायला? अश्या कुठल्या कामामध्ये busy होती की तुला ऐकूही नाही आलं?' आर्याला खूप awkward feel होत होतं. कारण सिद्धांत तिला सगळ्यांसमोर बोलत होता. आणि तीचं नेमकं काय चुकलं हेही सांगत नव्हता. पण सिद्धांतला मात्र आपण सगळ्यांसमोर बोलतोय ह्याच भानही नव्हतं. 'आर्या मी तुझ्याशी बोलतोय मूर्ख आहे का मी तुला इतके कॉल करायला सांग ना?' आर्यानी काहीही उत्तर दिले नाही ती फक्त उभी होती. खरं तर तिच्याकडे उत्तरे पण नव्हती. आणि त्यात सगळ्यांसमोर आपण बोलणे खातोय ह्याचाच जास्त त्रास होत होता. आणि ती काहीही बोलत नाही आहे ह्याचा सिद्धांतला आणखीन राग येत होता. 'हे बघ सिद्धांत, इथे सगळे काम करत आहेत तुझ्या आवाजमुळे त्यांना disturb होत असेल. तू तुझ्या केबिन मध्ये जा.', विक्रांत त्याला म्हणाला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण बाहेरच आहोत. तो त्याच्या केबिन मध्ये गेला आणि आर्याला म्हणाला, 'तुझा मोबाइल घेऊन ये.' ती ही लगेचच मोबाईल घेऊन त्याच्या मागे गेली. 'आर्या बघ एकदा फोन किती missed कॉल्स आहेत.' तिने फोन चेक केला 25 मिस्ड कॉल्स. 'इतके का कॉल केले काय झालं नेमकं? मला सांगितल्या शिवाय कस कळणार?' 'म्हणजे अजूनही तू सॉरी म्हणणारच नाही की आपलं चुकलं आपण माफी मागावी साधं इतकं पण नाही कळत का गं तुला. तिथे तुझ्या काळजीने माझा जीव जाण्याची वेळ आली तरीही तुला काहीही फरक नाही पडत. मी रस्त्यावर एक accident झालेला पहिला मला वाटलं तुझाच झाला कारण ती गाडीही सेम तुझ्या गाडीसारखीच होती. आणि त्या मुलीचं सांगितलेलं वर्णननही जवळपास तुझ्यासारखच होत. माझ्या पायाखालची जमीनच सरकली माहिती आहे. वेड्या सारखे फोन करत होतो मी तुला. पण तुला काय त्याच तू बस तुझ्या friends सोबतच गप्पा मारत.', सिद्धांत तिला हे खूप रागातच बोलला. 'मला कस कळणार हे सर. मान्य आहे मी फोन नाही receive केला. मला नाही लक्षात राहीलं बॅग मधून काढायचा, आणि तो silent वर आहे. so मला नाही कळालं.  मला तर वाटतंय की त्या मुलीच्या जागी मी असते तर बरंच झालं असत, निदान माझा सगळ्यांसमोर अपमान तरी नसता झाला.', आर्या पण चिडूनच म्हणाली. 'आर्या अग काय बोलतेय तू, अस काहीही बोलू नको.', सिद्धांत तिला समजावण्याचा सुरात म्हणाला. 'काय नको बोलू आणि तुम्हाला फरक काय पडतो? त्या मुलीच्या जागी मी असेल ह्या कल्पनेनेच तुमच्या पायाखालची जमीन सरकली अस तुम्ही म्हणत आहात ना? मग जर मी इथे तुमच्यासमोर धडधाकट उभी आहे तर तुम्हाला आनंद व्हायला हवा. तुम्ही तर उलट मला रागवत आहात. हेच कळत नाही मला, आणि काय फरक पडतो मी असण्याचा किंवा नसण्याचा?' 'आर्या, please असं नको बोलू.' 'हे बघा आपला काहीही संबंध नाही, आणि माझी काळजी तर अजिबात करत जाऊ नका, त्रास होतोय त्याचा मला. मला ह्या काळजीचं कारणही कळत नाही.', आर्या बोलली. 'हो आपला खरच काहीही संबंध नाही. नाही करणार ह्या नंतर तुझी काळजी. तू जाऊ शकतेस.', सिद्धांत म्हणाला. आर्या पण तिथून निघाली. खरं तर तिला खुप त्रास होत होता सिद्धांत सोबत असं बोलून. पण तिलाही अपेक्षा होती की तो सॉरी म्हणेल कारण सगळ्यांसमोर बोलला तो तिला. ती प्रचंड तनावामधे होती. राग, दुःख, चिडचिड, प्रेम ह्या सगळ्या भावना एकत्र झाल्या होत्या त्यामुळे तिचं डोकं जाम जड पडलं होतं.
        सिद्धांतच ही मन कशातच लागत नव्हत. त्याला ही वाईट वाटत होतं की उगाचच बोलून गेलो तिला. पण रागही तितकाच होता मनात. त्यात आपला काहीही संबंध नाही हे आर्याचं statement त्याला आणखीनच त्रास देत होत.