ना कळले कधी Season 1 - Part 20 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 20

'मी प्रत्येक वेळेस आर्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. हो मी आहे तिच्या बद्दल possessive, पण हे तिला कळत का नाही? मी तिला रागावलो हे खरं आहे. मी नव्हतं असं सगळ्यांसमोर बोलायला पण मी का बोलतो हे, त्या मागची काळजी, आपुलकी  हे तिला का कळत नाही. प्रत्येक वेळेस मी तिला हे नाही समजावून सांगू शकत. आणि जर तिला हे समजावून ही घ्यायचे नसेल तर मग काहीही फायदा नाही. ठीक आहे ती म्हणते ना आपला काहीही संबंध नाही तर मग आता नाहीच.', सिद्धांतने निश्चय केला. आर्या ऑफिस मधून काम संपवून निघाली. तिला विचार करून खूप त्रास होत होता, डोकं जाम दुखत होत, खरं तर आता घरी गाडी चालवत जाणंही जीवावर आलं होतं. पण तरीही ती निघाली. थोडसं समोर गेल्यावर अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि तिला काहीही  दिसत नव्हतं. आणि गाडीवरून तोल गेला आणि ती पडली. आज तिने विचाराविचारात हेल्मेटही नाही घातले. त्यामुळे तिच्या डोक्याला लागलं आणि तिची शुद्ध हरवली.
        सिद्धांत ऑफिस मधून निघण्याच्याच तयारीत होता इतक्यात त्याचा फोन वाजला, खरं तर आर्याचा फोन कसकाय आला ह्याच त्याला आश्चर्यच वाटलं आणि मुळात त्याची आर्याच नाव बघून फोन उचलण्याचीही इच्छा नव्हती. पण आर्या ह्या वेळेला मला कॉल का करत आहे, आताच तर गेली इथून. अस म्हणून त्याने फोन receive केला. समोरून आर्या नाही तर कुठल्यातरी अनोळखी माणसाचा आवाज ऐकून त्याला थोडं नवलच वाटलं. 'सिद्धांत, बोलताय का?' 'हो, पण आपण कोण? हा नंबर तर आर्याचा आहे.' 'हो हा ज्यांचा नंबर आहे त्यांचा इथे accident झाला आहे. त्यांची शुद्ध हरवली आहे मी मोबाईल पहिला तर last missed calls तुमचे होते म्हणून तुम्हालाच कळवलं.' हे ऐकून तर सिद्धांत उडालाच. कुठे आहात तूम्ही आणि आर्या कशी आहे? मी पोहोचलोच 2 मिनिटात आणि तो लगेच निघणार इतक्यात विक्रांत तिथे आला, 'सिद्धांत काय झालं? इतक्या tension मध्ये कुठे निघाला?' 'अरे आर्याचा accident झाला. इथेच ऑफिसच्या थोडं समोर मी निघतोय बाय.' 'ए थांब मी पण येतो एकटा नको जाऊ.', अस म्हणून विक्रांत पण त्याच्या सोबत गेला. सिद्धांत खूप tension मध्ये होता म्हणून विक्रांतने काही  त्याला गाडी चालवू दिली नाही. 'विक्रांत फास्ट चालव न थोडं, किती हळु चालवतो.' 'अरे ए, आपण already खूप स्पीड मध्ये आहोत. आणि शांत हो पोहचूच आपण एक दोन मिनिटांत.' त्यांना दुरुनच गर्दी दिसली. सिद्धांतला तर काहीही सुचत नव्हतं आणि गर्दी पाहून तो घाबरला. विक्रांत ला पण थोडसं tension आलं पण तरीही तो सिद्धांतला नॉर्मल असल्यासारखच दाखवत होता. तिथे पोहचल्यावर सिद्धांत पटकन गाडीतून उतरला आणि गर्दीतून वाट काढत समोर गेला. आणि त्याला आर्या दिसली. 'आर्या...', त्याने तिला आवाज दिला, तिच्या जवळ गेला त्याने पाहिलं तिच्या डोक्यातून थोडसं रक्त येत होत. आणि त्याच्याकडून ते अजिबात पाहावल्या जात नव्हतं. त्याने लगेचच तिला गाडीत घेतलं, तिची गाडी एका ठिकाणी पार्क करून ते लगेचच निघाले. 'आर्या please काही तरी बोल ना', तिला तो खूप बोलायचा प्रयत्न करीत होता पण आर्या कडून कसलाही प्रतिसाद त्याला मिळत नव्हता. तिची ही परिस्थिती अजिबात त्याला बघवत नव्हती. ते हॉस्पिटलमध्ये पोहचले, लगेचच डॉक्टरांनी आर्याला आत मध्ये नेलं आणि सिद्धांत ने बाकीच्या formalities complete केल्या. डॉक्टर बाहेर आले. 'Is everyting all right? आर्या कशी आहे? बरी आहे न? मी भेटू शकतो का तिला?' 'relax चला तुम्ही माझ्या सोबत. बोलू आपण.'_ अस म्हणून डॉक्टर सिद्धांतला घेऊन गेले. 'बाय द वे तुम्ही कोण त्यांचे?' 'मी मित्र आहे तिचा आम्ही सोबतच  काम करतो.' 'ok तिच्या घरचे आले नाही का?', डॉक्टरांनी विचारलं. 'येतीलच मी कळवलं त्यांना. डॉक्टर काय झालंय सांगा ना मला.' 'तस काळजी करण्यासारखं काहीही नाही. त्यांना चक्कर आली, अशक्तपणा खूप आहे.आणि डोक्यावरच पडल्या मुळे थोडा शुद्धीत यायला वेळ लागेल. पण माझ्या समाधानासाठी मला काही टेस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि सिटीस्कॅन करून घ्यायच आहे कारण डोक्याला मार आहे. आतून तर काही लागल नाही न हेच confirm करायचं. बाकी घाबरण्या सारख काहीही नाही.', डॉक्टरांनी सांगितलं. 'मग चक्कर येण्याचं कारण?', 'अस काही स्पेसिफिक मी सध्या तरी नाही सांगू शकत पण त्यांची आता जी काही तपासणी केली she is absolutely feet and fine. फक्त आज बहुतेक काहीही खाल्लेलं नाही. आणि कसल तरी जबरदस्त tension घेतलं असणार. तुम्ही त्यांचे मित्र आहात म्हणून विचारतो आज काही झालं होत का? म्हणजे होऊ शकत त्याच त्यांनी टेन्शन घेतलं असेल.', डॉक्टरांनी सिद्धांत ला विचारले. सिद्धांतकडे उत्तर च नव्हतं काय सांगणार तो. तो फक्त त्यांना नाही म्हणाला आणि बाहेर आला. 'सिद्धांत ठीक आहे सगळं काय म्हणाले डॉक्टर.', विक्रांत ने विचारलं. 'काही नाही रे. there is noting serious. पण काही टेस्ट कराव्या लागतील म्हणाले.' 'okk अरे मग तुझा चेहरा इतका का पडला? होईल सगळ नीट.' 'तस नाही विक्रांत हे सगळं माझ्याच मुळे झालं. मीच कारणीभूत आहे आहे तिच्या ह्या परिस्थितीला.', सिद्धांत म्हणाला.  'ए अस काहीही नाही आहे it was just an accident. तो कधीही होऊ शकतो.', विक्रांत म्हणाला. 'yes I know that but हा accident माझ्याच मुळे झाला.', डॉक्टर म्हणाले तिला कसल तरी tension आहे. आणि मला माहिती आहे तिने कसलं टेन्शन घेतलं असणार. मी उगाचच सकाळी बोललो आणि ते ही सगळ्यांसमोर नंतरही बरच ऐकवल तिला. आज तिने जेवणही नाही केलं आणि हे मला माहिती होत विक्रांत तरीही मी तिला तसच राहू दिल.', सिद्धांत म्हणाला. 'बर मग आता काय करणार आहे तू? जे घडायचं ते घडून गेलं, पण चांगली गोष्ट ही आहे की आर्याला जास्त लागलं नाही. तू आता मागच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तिला बर कस वाटेल ह्या कडे लक्ष दे. आणि सिद्धांत रागातून प्रेम व्यक्त नसत होत, थोडं त्या रागाला बाजूला ठेवून बघ. नाहीतर तू खरच एकदिवस आर्याला गमावून बसशील.', इतक्यात तिथे आर्याचा भाऊ आणि आई आले. 'विक्रांत तू आता निघाला तरी चालेल उशीर झाला उगाचच तुला. मी थांबतो इथे आर्याच्या घरचेही आले.', सिद्धांत त्याला म्हणाला. 'ठीक आहे बॉस निघतो मी पण काहीही लागलं की मला लगेच  कॉल कर मी येईल, ठीक आहे बाय आणि काळजी घे.', अस म्हणून विक्रांत निघाला. 'काय झालं आर्याला ? कुठे झाला accident ? लागल का खूप ?', आर्याच्या आईने  सिद्धांतला प्रश्न विचारायला सुरवात केले. 'काकू ती बरी आहे तुम्ही बसा आधी आणि शांत व्हा.', 'मला भेटायचं आहे तिला कुठे आहे ती?' 'आपण सध्या नाही भेटू शकत थोड्या वेळाने जाता येईल. तिला शुद्ध आल्यावर.' 'का नाही भेटू शकत? मी जाणार.' 'ट्रीटमेंट चालू आहे असं नाही जाता येणार आपल्याला मध्ये. तुम्ही थोड्यावेळ थांबा.', सिद्धांत त्यांना समजावून सांगत होता. 'ठीक आहे, पण तू कोण आहेस? मी आर्याच्या सगळया मित्रांना ओळखते तुला नाही पाहिलं कधी?', त्यांनी विचारलं. 'अग आई हे दीदी चे बॉस आहेत सिद्धांत सर. त्या दिवशी आपल्या घरी येऊन गेले हे पण तू नव्हती. त्यामुळे तुमची भेट नाही झाली.आणि हेच आत्ता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले.आयुष ने सिद्धांत ची ओळख करून दिली.' 'खरच खुप धन्यवाद बर झालं तुम्ही सोबत होता नाहीतर कोणी आणलं असत तिला.', आर्या ची आई म्हणाली. 'मी माझं कर्तव्य केलं बाकी काही नाही आणि please तुम्ही मला सिद्धांतच म्हणा. मी काही इतका मोठा नाही मला.' 'बर ठीक आहे  तू जा आता आम्ही आहोत खरच खूप मदत झाली तुझी. तुला वेळ होत असेल.', आर्या ची आई म्हणाली. 'मी कुठेही जाणार नाही मला काही वेळ होत नाही आहे. आर्या ला शुद्ध येऊ द्या, डॉक्टर काय म्हणतात ते बघू द्या मग ठरवू काय करायचं. आणि मी ह्या बाबतीत तुमचं अजिबात ऐकणार नाही. ते बघा डॉक्टर पण आले.' 'त्यांना शुद्ध आली आहे तुम्ही आता भेटू शकता.'
                डॉक्टर काय झाल आहे तिला. 'डॉक्टरांनी सिद्धांत ला जे सांगितलं तेच आर्याच्या आईला ही सांगितलं. फक्त तिला कुठलही टेन्शन देऊ नका. आणि ही काही औषधी आहे ही काही तरी खाल्ल्यानंतर द्या. आज रात्री observation साठी इथेच राहू देऊ उद्या तुम्ही घरी नेवू शकता.', डॉक्टर म्हणाले. सिद्धांत म्हणाला, 'मी मेडिसिन्स घेऊन येतो. तुम्ही थांबा आर्या जवळ, मी आलोच.' अस म्हणून सिद्धांत गेला. आर्याला ह्या अवस्थेत बघून आर्याच्या आईला फार वाईट वाटले. 'आर्या बर वाटतंय का आता?', तिच्या आई ने विचारले. 'हो, पण मी तर घरी येण्यासाठी निघाली होती इथे कसकाय, मला काही आठवत का नाही आहे. काय झालं होत.', आर्या अत्यंत क्षीण आवाजात म्हणली. 'अग काहीच झालं नाही तू येताना गाडीवरून पडली बस.', आयुष तिला म्हणाला. इतक्यात सिद्धांत तिथे औषधे घेऊन आला. 'सिद्धांत सर तुम्ही इथे कस काय? ह्यांना कोणी कळवलं?', आर्या ने विचारलं. 'अग दीदी तू आराम कर किती प्रश्न विचारत आहेस. आणि सिद्धांत सरांनीच तुला येथे आणलं.', आयुष तिला म्हणाला. सिद्धांत ला आर्यला काय बोलावं काहीही कळत नव्हत. त्याला ह्याच गोष्टीच वाईट होत की आर्याची ही अवस्था आपल्यामुळेच झाली आहे. 'बर वाटतंय का आता ?', त्याने फक्त इतकंच विचारलं. कारण त्याला पुढे काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तीने त्याच्या कडे न पाहताच  हो म्हंटले. सिद्धांत ला तिच्या ह्या वागण्याचं खूप वाईट वाटलं पण ती चुकीचं करत नाही आहे हे त्यालाही माहीत होतं. तो पुढे काहीच न बोलता तिथेच बाजूला सोफ्यावर बसला आणि जेवणानंतर कुठल्या गोळ्या द्यायच्या हे आयुष ला सांगितल.
क्रमशः