Naa kavle kadhi - 1-24 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 1 - Part 24

     'अच्छा येईल न, किंवा फोन करून बघ त्याला.', सिद्धांत ने तिला सुचवलं. 'हा फोन करते better idea.' तिने फोन हातात घेतला, 'अरे आयुष चाच message, sorry didi,  today I have to attend extra class after exam. So today I would be late and will come at 5:00pm,  I am going to attend that class bye!' तिने त्याचा message वाचला, 'अरे काय!! ह्याचा class ही आजच व्हायचा होता.', 'ठीक आहे न आर्या तो थोडीच मुद्दामून करत आहे.', सिद्धांत तिला म्हणाला. 'आधीच ना मला एकाजागी बसून जाम बोर झालय, किती झोपणार झोपून झोपून.', आर्या चिडून म्हणाली. 'ए आर्या, अगं चिडतेस काय! उलट किती छान संधी मिळाली आहे तुला, बघ तुला पुस्तके वाचायला आवडतात हो की नाही', 'हो आवडतात', 'हा मग बघ आता किती वेळ आहे तुझ्या कडे वाचण्यासाठी. तुझे पुस्तक वाचून पण होतील आणि बोर पण होणार नाही.' 'wow brilliant idea !! सिद्धांत सर you are really great! perfect solution असत तुमच्या कडे.', आर्या उत्साहित होऊन म्हणाली. 'असतात एकेकाकडे skill', सिद्धांत तिला मस्करीने म्हणाला. 'तुमचं बर असत बाबा म्हणजे वाचनाची आवड आहे तर वाचायचं. मग काय बोलताना त्यातले मोठे मोठे dialogues म्हणायचे.आणि मग लिहिताही येत, नाही तर मला बघ मला तर साधी डायरी ही लिहिता येत नाही!', सिद्धांत ने अचूक निशाणा साधला. 'असं काही नसतं असे पुस्तकातले dialogues काही पाठ होत नाही, आणि वाचून काही लिहिता येत नसत आणि राहिला प्रश्न डायरीचा त्यासाठी काही वाचन किंवा writing skills असणं आवश्यक नाही. ते तर आपल्या मनाला जे वाटलं जे अनुभवलं ते लिहायचं असत.',आर्या म्हणली. 'म्हणजे मला ही डायरी लिहिता येऊ शकते?', सिद्धांत ने विचारलं. 'हो, का नाही. कुणीही लिहू शकतं आपल्या मनात जे आहे ते लिहायचं. डायरी म्हणजे आपल्या मनाचा आरसा असतो. त्यात आपले मन जसे आहे तसे दिसते',आर्या ने सांगितलं. 'wow!! आर्या great यार, मला पण करावी वाटतेय सुरवात, बाय द वे तु लिहिते का?', सिद्धांतने तिला विचारलं. 'हो लिहिते न. आणि खर लिहिते. मी सांगितल ना जे मनात असेल ते.' 'आता फक्त माझी डायरी वाचायला नको मागा म्हणजे झालं', आर्या मनातच म्हणाली. 'टेन्शन नको घेऊ आर्या, मी काही लगेच तुला डायरी वाचायला नाही मागणार', सिद्धांत तिच्या कडे बघून म्हणाला. 'आणि मागितली असती तरिही मी दिली नसती',आर्या म्हणली. 'अच्छा म्हणजे नक्कीच काहीतरी secret असणार तुझ्या डायरीत.' 'secret असं काहीही नाही my life is like open book.', आर्या म्हणली. 'and I would like to read that book', सिद्धांत म्हणाला. आता मात्र आर्या निरुत्तर झाली, 'but now I'm going to read this book. so please don't disturb me',  ती हातातलं पुस्तक त्याला दाखवत म्हणाली. 'okk ह्या वेळेस नाही नेक्स्ट time नक्की वाचेल.', सिद्धांत तिला चिडवत म्हणाला. 'किती दिवस पळणार आहे आर्या, एक ना एक दिवस जे लिहिलं ते बोलूनही दाखवशील.', तो मनातच म्हणाला आणि त्याचं काम करत बसला. '
          थोड्या वेळाने आर्याची आई घरी आली. अरे वा काकू तुम्ही आलात पण.हो झालं बाबा ऑफिस एकदाच इतक्यात सिद्धांत चा फोन वाजला हा आई तू कुठे आहे तिथेच थांब मी तुला address message करतो तिथे पोहोच, की मी येऊ घ्यायला ! ठीक आहे नाही सापडलं तर कॉल कर बाय अस म्हणून त्याने फोन ठेवला. आई येतीये माझी तिला कालच हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचं होत पण मीच म्हंटल की घरी आल्यावरच भेट.सिद्धांत म्हणाला. wow काकू येत आहेत आई सरांची आई फार great आहे तूला पण भेटून खूप मस्त वाटेल त्यांना,इतक्या वेळ शांत असलेली आर्या मधेच बोलली.'hmm आहेच ती great येईलच इतक्यात जवळच आहे'.सिद्धांत म्हणाला. 'कोणीतरी आलय मी बघते' अस म्हणून आर्याची आई दार उघडण्यासाठी गेली. आईच असेल मी आलोच म्हणून सिद्धांत पण गेला. 'किती प्रेम करतो हा त्याच्या आईवर त्याच्या आईला तर हा इतका चिडका आहे हे ही माहिती नसेल कदाचित!इतकंच चांगलं सगळ्यांसोबत वागायला काय जात ह्याच.' आर्या कशी आहेस बाळा? सिद्धांत च्या आई च्या आवाजाने आर्याची तंद्री भंगली.'आता ठीक आहे'. बर वाटतंय का आता? हो कालच्या पेक्षा आज खूप बरं वाटतय, 'चला चांगलं आहेपटकन बरी हो ग तुला अस पाहावं वाटत नाही', सिद्धांत ची आई तिला म्हणाली.हो एक दोन दिवसांत मी ऑफीस करेन जॉईन.आर्या त्यांना म्हणाली. नाही हा आर्या अजिबात नाही मी सिद्धांत समोरच तुला सांगते की मी तुला पूर्णपणे बरी झाल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही. आर्या ची आई तिला रागावून म्हणाली. मी पण तुमच्या मताशी सहमत आहे काकू सिद्धांत त्यांना दुजोरा देत म्हणाला. घे आता boss ने permission  दिली म्हंटल्यावर काय! इति आर्याची आई. काय लावलं तुम्ही मी नाही थांबणार घरी एकटी किती बोर होईल मी आणि काय करणार? मी नाही ऐकणार हं तुमचं कोणाचेच.आर्या ठामपणे म्हणाली. अग पुस्तके आहेत ना तुझी ती वाच सिद्धांत तिला मिश्कीलपणे म्हणाला. ऐ सिद्धांत का छळतोस रे तिला इतका, आज तरी सोड आजारी आहे ती! तू लक्ष नको देऊ ग आर्या ह्याच्याकडे तुला जेव्हा बर वाटेल तेव्हा तू जा ऑफिस ला.सिद्धांत ची आई तिला म्हणाली. हो मी काही ह्यांच कुणाचं ऐकणार नाही आहे.आर्या म्हणाली. आई तू काय तिला support करत आहे तिला डॉक्टरांनी आराम करायला सांगितल आहे, पडेल परत कुठे रस्त्यात चक्कर येऊन. सिद्धांत म्हणाला. नाहीतर काय! असंही तिने कितीही बडबड केली तरी तिचं कोण ऐकणार आहे. आर्या ची आई म्हणाली. अरे काकू तुमची आणि आईची ओळख करून द्यायची राहिली.आणि सिद्धांत ने त्याच्या आईची आणि आर्याची ओळख करून दिली.  तुमच्या बद्दल बरंच ऐकलं आहे आर्या कडून, समाजाला गरज आहे तुमच्या सारख्या लोकांची छान वाटलं तुम्हाला भेटून आर्याची आई म्हणाली. मी अस काही वेगळं नाही करत मला आवडत हे काम करायला बस आवड म्हणून करते. सिद्धांत ची आई बोलली. सिद्धांत तुमचा मुलगा शोभतो,आम्हाला सिद्धांत ची पण  खरच खूप मदत झाली म्हणजे विचार आज काल कोणी अस दुसऱ्यांच्या मदतीला येत नाही. आर्याची आई म्हणाली. हो सिद्धांत चांगला आहे पण माझं ऐकतच नाही तो, काय ऐकलं नाही आई मी तुझं? उगाचच काय आपलं? हो ऐकतो तू माझं मग लग्नाचं का मनावर घेत नाही? बघ आर्या सांग तुमच्या सरांना बघ म्हणावं एखादी मुलगी. आर्याचा चेहराच एकदम पडला. सिद्धांत ने ते हेरलं. आई ने आज चुकीचा विषय योग्य ठिकाणी काढला.सिद्धांत ला खर तर आर्या चा चेहरा पाहून हसायला आलं. आता त्याने ह्यावरून आर्याची आणखीन घ्यायची ठरवलं.
क्रमशः
         


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED