ना कळले कधी Season 1 - Part 23 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 23

'ok then, मी तुम्हाला घरी सोडतो आणि घरी जाऊन माझा लॅपटॉप घेऊन येतो चालेल ना?', 'हो चालेल. तू ये जाऊन.', आर्याची आई म्हणाली. आर्याला तर आजचा सिद्धांत फार आवडत होता. 'किती भारी दिसतोय हा. एकदम भारी! casulas मध्ये खरच किती छान दिसतो हा!' 'काय आर्या काय विचार करतीये? उतर घर आलं' सिद्धांतच्या बोलण्याने तिची तंद्री भंगली. आर्या आणि तिच्या आईला सोडून सिद्धांत त्याच्या घरी गेला. 'आर्या सिद्धांत किती चांगला मुलगा आहे न! किती निःस्वार्थी आहे तो. आणि किती शांत आहे. खुप कमी वयात किती जास्त mature  झाला आहे तो. आर्या असे लोक खूप कमी असतात ग ह्या जगात.', आर्याची आई म्हणाली. 'हो आई, बाकीच्या मुलांसारखा नाही आहे तो', आर्या म्हणली. आर्याला तिच्या आईने रूम मध्ये आराम करायला सांगितलं. आर्या सिद्धांतच्याच विचारांमध्ये हरवून गेली. तिला सिद्धांत केव्हा येतो आणि केव्हा नाही असं झालं होतं. ती त्याचीच वाट बघत होती. सिद्धांतने तिच्या समोर चुटकी वाजवली, 'काय आर्या कुठे हरवली? माझाच  विचार करत होती का?' 'नाही नाही. तुमचा विचार मी का करू?' 'आर्या अग खोटं बोलता येत नाही तुला. प्रयत्न करत जाऊ नको.', सिद्धांत तिच्या डोक्यात एक टपली मारून म्हणाला. 'चल कर तू आराम. मी करतो माझं काम. काही लागलं तर आवाज दे.' आर्याची आई बँकेमध्ये जाण्यासाठी निघाली आणि जाताना तिला भरमसाठ सूचना देऊन गेली. सिद्धांत त्या गेल्यावर हसू लागला, 'काय झालं हसायला?' 'काही नाही. सगळ्यांच्या आया सारख्याच असतात. माझी आई पण अशाच सूचना देत राहते. तिला वाटत अजूनही लहानच आहे.', सिद्धांत म्हणाला. 'माझी आई पण अशीच आहे त्याचा प्रत्येय आलाच असेन तुम्हाला आता.' आणि दोघेही हसू लागले. 'आर्या तू झोप थोडा वेळ. तुला आरामाची गरज आहे.' सिद्धांत ने तिला आराम करायला सांगितले आणि तो त्याचं काम करत बसला.
         बराच वेळ तो काम करत बसला होता. थोडा वेळ relax होण्यासाठी त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला. आणि त्याने तिच्या रूम मध्ये सहज एक चक्कर मारली त्याच लक्ष तिच्या स्टडी टेबल वर गेलं. तिथे बरीच पुस्तके दिसली म्हणून तो सहज बघायला गेला. 'बापरे कुठल्या कुठल्या विषयांवरची पुस्तके दिसतं आहेत ही. great आर्या! चांगलं collection आहे यार तुझं!' तो आर्याकडे बघून म्हणाला. पण ती गाढ झोपलेली होती. तो परत हातातलं पुस्तक ठेवायला गेला इतक्यात त्याला एक डायरी दिसली. त्यानी ती वाचण्यासाठी हातात घेतली. 'आर्याची दिसतेय वाचू का? नको असं पर्सनल कोणाचं वाचू नये', तो डायरी ठेवणार इतक्यात त्याला त्याच एका पेज वर नाव दिसल्या सारख झालं. 'आर्याने काय लिहिलं असेल माझ्याबद्दल? नाही नाही ती कशाला काही लिहिलं मलाच भ्रम झाला असेल. बघू का? हा बघतोच म्हणजे माझं नाव असेल तर वाचेल नाही तर मग नाही वाचणार हे ठीक आहे.' त्याने एकदा आर्याकडे बघितलं आणि डायरी परत हातात घेतली. 'sorry आर्या without your परमिशन मी read करणार.', अस म्हणून तो pages उलटू लागला. आणि त्याच्या हातात नेमकं त्याच्या नावाचं page आलं जो ते शोधत होता. ती आर्या आणि सिद्धांतची पहिली भेट वजा भांडण होत ते आर्या ने लिहिलेलं वाचून सिद्धांतला हसायलाच आलं. त्यात तिने सिद्धांत चा उल्लेख 'devil'  म्हणून केला होता. माझ्या जीवनात सिद्धांत रुपी राक्षसाच आगमन, अक्षरशः ह्या शब्दांत तिच्या डायरी मध्ये सिद्धांतची ओळख होती. त्याची उत्सुकता ताणली पुढे काय लिहिलं असेल हिने म्हणून तो पूढे वाचत गेला. आता सिद्धांत बद्दल आर्याने बरच काही चांगलं लिहिलं होतं त्याच आजारपणात भेटायला येणं तिची काळजी घेणं तिला घरी सोडणं ह्या गोष्टी आर्याने खूप छान पध्दतिने मांडल्या होत्या आणि त्यात सिद्धांतच्या looks चं ही भरभरून कौतुक केलं होतं. आणि विशेष म्हणजे तिने त्याचा एकेरीच उल्लेख केलेला होता हेही सिद्धांतने हेरलं, पण त्याने तिला रागवल्यावर ती किती दुखावली गेली होती हे काही तिच्या लिहण्यातून सुटलं नव्हतं हे वाचून मात्र सिद्धांतला वाईट वाटलं पण आर्याच्याही मनात त्याच्या बद्दल soft corner आहे हे एव्हाना त्याला कळून चुकलं होत. त्याने पुढचं वाचलं आणि डायरी बंद केली. डायरी वाचून त्याची द्विधा मनस्थिती झाली होती. तो मनातून आर्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होता. पण नकळतपणे तो आर्याच्या तितकाच जवळ येत होता. तो आर्या जवळ येऊन बसला तिला शांत झोपलेलं पाहून त्याला फार समाधान वाटलं. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, 'आर्या माझ्या आयुष्यात आल्यावर मी तुला हे समाधान हीच शांती देऊ शकेल की नाही मला माहिती नाही म्हणूनच मी तुला माझ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तुझ्या आयुष्यात तुला जे काही मिळालं नाही त्याची कमी मी भरून काढण्याचा प्रयत्न नक्की करेल, तू माझ्या आयुष्यात असली तरीही आणि नसली तरीही.' तो तिच्या जवळून उठला आणि परत कामाला लागला. थोड्या वेळाने आर्याचा घसा एकदम कोरडा पडला तिला खूप तहान लागली होती. तिला वाटलं सिद्धांतला मागावं पण तो त्याच्या कामात व्यस्त होता. म्हणून तिला काही त्याला disturb करावे वाटले नाही. म्हणून तीच बाजूच्या table  वरून घेण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या हातातून नेमका ग्लास पडला.आणि सिद्धांतच लक्ष एकदम तिच्या कडे गेलं. 'काय झालं आर्या? काही हवं आहे का तुला?' 'नाही काही नाही. पाणी घ्यायचं होतं. घेते मी.' 'अगं मी आहे ना इथे',  'नाही तुमचं काम चालू आहे न, तुम्ही करा continue.' सिद्धांत जागेवरून उठला तिला पाणी दिल. 'तू पण ना आर्या किती फॉर्मलिटीज करते गं. मला जर फक्त कामच करायचं असत तर मी ऑफिसला नसतो जाऊन बसलो. तुला नसेलच घ्यायची माझी मदत तर तस सांग', सिद्धांत म्हणाला. 'नाही सर अस काही बोलले का मी? ते तुम्ही कामात होतात म्हणून. बाकी काही नाही.' 'बरं बरं. चल ठीक आहे, by the way आर्या हे सगळे बुक्स तुझे आहेत का? म्हणजे मी मगाशी त्या टेबल वर पाहिले.' 'हो माझेच आहेत.' 'वा!! म्हणजे वाचन चांगलं आहे तर तुझं, पण वेळ मिळतो का?' 'तसा वेळ मिळत नाही, पण काढते मी माझ्या छंदांसाठी. आणि काढायलाच हवा कारण तेच आपल्याला जगवतात.' 'हो बरोबर आहे', सिद्धांत म्हणाला. आर्याच्या एकदम लक्षात आलं तिथे डायरी पण होती. 'सर तुम्ही फक्त books च बघितले न ?', आर्याने  विचारलं. 'हो, का तिथे अजूनही काही होत का बघण्यासारख?', सिद्धांत ने विचारलं . 'छे छे! तिथे आणखीन काय असणार मी आपलं सहज म्हणून गेले.' बर झालं ह्याने ती डायरी नाही पहिली. नाहीतर माझं काही खर नव्हतं. नसेलच पाहिली ह्याने नाहीतर आधी डायरी बद्दल विचारलं असत. 'ए आर्या कुठे हरवली, काय झालं?' 'काही नाही.' 'मी आज सकाळ पासून पाहतोय तू कुठे हरवतेस ग सारखी? माणसाचं मन स्थिर नसलं न की असे प्रकार होत असतात.', सिद्धांत तिला म्हणाला. 'मला कुठे काय झालंय मी आपला दुसरा विचार करत होते.', आर्या म्हणाली. 'बर काय विचार करत होती सांग बर?' 'घ्या आता. काय सांगू ह्याला की तुझाच विचार चालू होता.', आर्या मनातच म्हणाली. 'काही नाही आपलं हेच, आयुष नाही आला ना अजून. बराच वेळ झाला.यायला हवा होता इतक्या वेळेत', आर्याने काहीतरी कारण सांगून दिल आणि ती मोकळी झाली. 'सुटलो बाबा एकदाच!' तिने मनातच म्हंटल. 'ह्या वेळेस कारण भेटलं तुला पुढच्या वेळेस बघू ना!', सिद्धांत मनातच म्हणाला.
क्रमशः