शिव-सिंहासन-भाग २ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शिव-सिंहासन-भाग २

मिलिंद बोलू लागला

१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना नेण्याची व्यवस्था २ नेक सरदारांनी स्विकारली खंडोजी आणि यशवंता...त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे गडावरील एक न एक कुटुंब खाली उतरल्यावर आपल्या सर्वात महत्वाच्या कामाला सुरवात केली...प्रथम रायगडाचे महादरवाजे आतून बंद करण्यात आले...आपल्या सोबतीला आणखी ७ जणांना थांबवून घेतले...आणि ते ९ हि सरदार राजसभेत आले...सर्वानी प्रथम सिहांसनाला मुजरा केला...कोणाला माहित होते हा आपला शेवटचा मुजरा आहे...आणि नंतर त्या ९ सरदारांनी ते ३२ मण सोन्याचे सिहांसन उचलून लाकडी तराफ्यावर ठेवले...आणि पाठी ४ आणि पुढे ४ असे राहून...मेणा दरवाजा पर्यत आणले...आणि मजबूत दोरखंडाच्या मदतीने ९ पैकी ७ सरदार ऱायगडच्या काळकाई खळग्यातील वाघ जबड्यांत उतरले.. आणि तिथेच पुरून टाकले...आणि काम फत्ते झाल्याचा पुकारा करत ते ७ सरदार दोरखंडाच्या साहाय्याने वर येत असताना..खंडोजी आणि यशवंता.या दोघांनी ते सातही सरदार नजरेच्या टप्प्यात आल्यावर सातही दोर एकामागून एक करून कापून टाकले... कारण फांदफितुरी होण्याच्या धोका जास्त होता..उद्या कोणीही सोन्याच्या लालसेपायी...त्या सिहांसनाची जागा दाखवून ते लुटू शकला असता...आणि खंडोजी आणि यशवंता या सरदारांनी सुद्धा तिथून उड्या टाकून जीव दिला...अश्या प्रकारे त्या ९ जणांनीच ते शिवसिहांसन शेवटचे पाहिले होते...

प्रसाद , भिवाजी आणि अमित ऐकतच राहिले...अमित बोलला हि एक शक्यता होऊ शकते...आणि मी रिसर्च केल्याप्रमाणे दुसरी शक्यता अशी गड मोघलांकडे देण्यापुर्वी (१६८९) महारानी येसुबाईंनी रायगडाची दोन सश्रध्द दैवते तेथुन हलविली..प्रथम शिवछञपतींचे ३२ मणाचे सिंहासन...द्वितीय जगदिश्वराचे शिवलिंग..जगदिश्वरास ऱायगडच्या रहाळातील वारंगी गावात हलवले असे आप्पा परब लिहीतात.

आणि सर्वात तिसरी आणि भयानक शक्यता भिवाजी बोलला प्र के घाणेकर सरांच्या मते १६८९ ला रायगड जिंकल्यावर येथील ३२ मण सोन्याचे सिहांसन इतिकादखानाने फोडले .त्याचे तुकडे करुन, त्यातील सोने ईथेच आगीच्या भट्टीत वितळवुन त्याचे गोळा करुन नेले असावेत..!

पण प्रसाद बोलला जर का १६८९ ला सिहांसन जरा का तोडले गेलं असेल तर मग १८१८ पर्यंत त्याचा उल्लेख येतो कसा?? का ते सिहांसन पुन्हा तयार करण्यात आले ?? ह्या इतिकादखानाच्या वेढ्यातुनच छत्रपती राजाराम महाराज निसटले होते...मग ते कसे शक्य आहे.. इतिकादखानाने त्यांना जाऊ कसे दिले?? का कुठे इतिकादखानाच्या नकळत मोघली सरदाराला फितूर करून राजाराम महाराज सिहांसनासकट निसटले का ?? किंवा जर का ते सिहांसन "गंगासागर तलावात टाकले असेल तर...तो हि तलाव २४ मे १९७१ ते २८ मे १९७१ ह्या ५ दिवसात उपसला गेला होता...तेव्हा तिथे दगडी गणेश मूर्ती आणि काही छोट्या वस्तुंशिवाय काही जास्त सापडले गेले नाही...

शेवटी चौघांनी मिळून ठरवले कि रायगडावरतीच काही ठिकाणे निवडून शोधायचे...१) सर्वप्रथम होळीचा माळ २) बाजारपेठेतील मार्ग ३) वाघ्या कुत्र्याचा पुतळ्या पलीकडे जे पठार आहे तिथे ४) वाघ-दरवाजा आणि आसपासचा परिसर बस्स.... त्यांनी शोधासाठी मागविलेल्या मशिनरी आणि ड्रोन शिवाय उच्चप्रतीचे कॅमेरे सर्व काही रायगडाच्या पायथ्याशी आले होते...फक्त आजची रात्र आणि उद्यापासुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार होती....

आता रात्रीचे ८ वाजले होते...बोलता बोलता कधी येवढा वेळ गेला ते चौघांना हि कळलेच नाही...सर्वजण राजसभेतील राजांना पाया पडून...मेणा दरवाजाजवळ असलेल्या M.T.D.C च्या बंगल्यांमध्ये आराम करायला आले...गडाच्या एका बाजूला असल्यामुळे तिथे शांतता होती...आणि एक फायदा असाही होता..तिथून काही अंतरावर रोपे वे होता ...त्यामुळे जे काही गडाखाली आलेले सामान आहे ते पटकन उतरवता येणार होते...जेवण आटपून त्यांची बाकीची टीम लवकर झोपी गेली होती....अमित, मिलिंद, प्रसाद आणि भिवाजी....तिथेच बंगल्यांच्या दरवाजात खुर्च्या टाकून बसले होते..कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हते...चौघांशिवाय गडावर आता कोणीच जागे नव्हते...गेल्या जन्मीचे मावळे नव्हतेना ते?? रायगड उशाशी सह्याद्रीला आणि आपल्या पोटात कित्येक गुपित घेऊन शांत झोपला होता..आकाशात लाखो चांदण्या लकाकत होत्या...मध्येच एखादा ढग चंद्राला झाकोळून टाकत होते.. वाहणारी थंड हवा अंगात एक शिरशीरी सोडत होती... अजून रायगडाने आपली गुपित कोणाला सांगितली नव्हती...ती फक्त त्यांनी शिवाजी राजालाच सांगितली होती...त्यांच्याच अंगा-खांद्यांवर आपला राजा लहानाचा मोठा झालं होता...