शिव-सिंहासन-भाग ४ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शिव-सिंहासन-भाग ४

दुसऱ्या दिवशी सकाळी मिलिंद,अमित,प्रसाद आणि भिवाजी...हत्ती तलावात उतरले...फक्त गुडघाभर पाणी होते...चुन्याची फुटलेली घोंणी पाण्यातच तरंगत होती...पण पाणी मात्र पांढरे दिसत नव्हते..पण पाऊसात काहीच समजत नव्हते..थोड्या वेळाने पाऊस थांबला...आणि तेव्हा अमितचे लक्ष तलावाच्या तळाशी असलेल्या..फरशीकडे गेले काल चुन्याची घोंणी पडली...तेव्हा तलावात पाणी नव्हते आणि त्या घोणीच्या वजनाने ती फरशी तुटली गेली होती..आणि म्हणून इथे पाणी जमा होत नाही आहे ...मिलिंद बोलून गेला.... इथे फरशी ?? तलावाच्या तळाशी फरशी?? तलाव बांधताना कोण फरशी लावेल ??.. काहीतरी नक्कीच आहे इथे...फरशी काढण्याच्या त्यांनी प्रयत्न केला... पण गाळ असल्यामुळे फरशी काही निघाली नाही... मग चौघांनीही तिथे असलेला गाळ उपसायला सुरुवात केली. १ ते २ तास गाळ उपासल्यावर ..जागा मोकळी झाली..आणि बघतात तर काय तिथे एकच नाही अजून काही फरश्या होत्या..त्यातील त्यांनी एक फरशी बाजूला केली... तिथे ५.२० मीटर खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला...गाळ काढताना चुन्याचे पाणी असे वाहून गेलं...आता समजत होते.. गाळ काढल्यानंतर सुमारे ८ मीटर लांबीचा भुयारी मार्ग दिसून आला...चौघांची मती जवळ जवळ गुंग होत आली.... या मार्गाचे प्रवेशद्वार बरेसचे मोठे होते ...

एकवेळेला चार जण सहज चालत जातील एवढे मोठे..आतील बाजूस त्याची उंची अजून वाढत गेलेली दिसली...पण पुढचा सर्व मार्ग गाळाने भरून गेलं होता त्यामुळे त्याना काही पुढे जाता येईना तो पुढे कसा वळला आहे?? हे निश्चितपणे सांगता येत नव्हते...चुन्याचे पाणी पण त्याच ठिकाणी येऊन थांबले होते..आता संध्याकाळ झाली होती...पुढे काम करणे कठीण होऊन गेले होते...काम थांबवून उद्या सुरु करणे तेवढेच हातात होते ...आणि सह्याद्रीच्या राक्षशी पावसाजवळ प्रार्थना करायची होती कि अजून काही दिवस येऊ नकोस...एवढे दमले असूनसुद्धा रात्री कोणीच झोपले नाही...सकाळ झाली...पाऊसाने प्रार्थना ऐकली होती...आकाश साफ होते...मजुरांना गाळ काढायला सांगून... चौघे सकाळीच मुबंई वरून आलेल्या ड्रोन ऑपरेटरला भेटायला गेले...थोड्या चाचण्या झाल्यावर...

ड्रोन कुठच्या दिशेला उडवून पाहायचे ते ठरले गेले...सर्वात आधी हिरकणी बुरुज.. आणि मग टकमक टोक आणि तसेच पुढे जाऊन वळसा घालत पूर्ण रायगड प्रदक्षिणा ड्रोनच्या सोबतीने करायची होती...दोन्ही ड्रोन हिरकणी बुरुजपासून सुरुवात करून...विरुद्ध दिशेला जाणार..म्हणजेच दोन्ही ड्रोन अर्धी अर्धी रायगड प्रदक्षिणा करणार होते... गाळ अजून निघतच होता...अजून २ तासांनी बरासचा गाळ उपसला गेला होता..आता काही पायऱ्या दिसत होत्या.. एव्हाना मिलिंद आणि अमितपण हेडलॅम्प लावून भुयारात उतरले होते... आता १५ ते २० किती पायऱ्या खाली उतरले ते समजत नव्हते ...पायऱ्या संपून ते आता खोलीसारख्या जागेत येऊन उभे राहिले होते....पुढे अजून एक रस्ता होता थोडे १० ते १२ पावले पुढे आल्यावर रस्ता एक ठिकाणी बंद होता... दमलेले
दोघेही...तिथल्या भिंतीच्या आधाराने उभं राहिले...पण त्यांना जाणवले कि त्या भिंतीतून थोडे थोडे पाणी येते आहे....एक थंड शिरशिरी दोघांच्या अंगातून वाहून गेली...ते भुयारी मार्गाने चालत चालत " गंगासागर" तलावाच्या बरोबर खाली आले होते...खळाळता गंगासागर बरोबर त्यांच्या डोक्यावर होता.. भुयार कुठे नेते आहे ते काहीच समजत नव्हते...

तिथे प्रसाद आणि भिवाजीला पण ड्रोन वर खास असे काही दिसले नव्हते...तिथे असणारा वारा...अस्तव्यस्त वाढलेले जंगल यामुळे ड्रोन कंट्रोल करायला थोडा त्रास होत होता...एक दोन ठिकाणी काही गुहा दिसल्या होत्या पण ... तिथे पोहंचणे सहज शक्य असल्यामुळे...तिथे कोणी काही लपवून ठेवले असण्याची शक्यता फारच कमी होती.. हिरकणी वाडी ते भवानी कडा ड्रोनच्या मदतीने कानाकोपरा तपासुन झाला होता...हवे तसे काहीच सापडले नाही... मग तिथली मोहीम आटपती घेतली ...आणि आता " मेणा दरवाजाच्या" चा पाठचा कडा तपासायचा नक्की केले गेले...मिलिंद आणि अमित सुद्धा भिवाजी आणि प्रसादला येऊन भेटले...भुयारात आता टीम मेंमबरना खोदायला सांगून तासभर उलटून गेला होता...आता मात्र भिंतीतून पाणी येत नव्हते...म्हणजे तो रस्ता आता राजवाड्याचा खाली आलं होता...पण किती खाली ?? मिलिंद पटकन जाऊन एकदा पहाणी करून आला...

एक ड्रोन वाघ दरवाज्याच्या दिशेने आणि एक काळखाईच्या दिशेने उडाले.... थोडा वेळ गेला असेल आणि काळखाईच्या दिशेने गेलेल्या ड्रोन च्या कॅमेऱ्यात एका कपारीतून काही पांढुरके दिसले...प्रसादने ड्रोन तसाच पुढे न्यायला सांगितले... जसे ड्रोन पुढे जात होते...तसे ते काही पांढुरके होते ते स्पष्ट दिसायला लागले...ते सुकलेले चुन्याच्या पाण्याचे ओघळ होते..पण ते पाणी कुठून आले होते ??

क्रमशः