SHIV SIHASAN PART 5 LAST PART books and stories free download online pdf in Marathi

शिव-सिंहासन-भाग ५ (अंतिम भाग)

चौघेही आता समोरच्या मॉनिटरवर टक लावून पाहत होते..जसे जसे ड्रोन अजून जवळ जात होते तसे तसे ते चुन्याच्या पाण्याचे ओघळ स्पष्ट दिसत होते...सर्वांची उत्सुकता वाढली होती...मिलिंद बोलला " १०० टक्के हे पाणी काल तलावात पडलेल्या चुन्याचे होते " प्रसादने हि त्याला दुजोरा दिला... म्हणजे नक्कीच एखादा भुयारी मार्ग होता किंवा एखादी गुहा तरी होती...अमित बोलला...आणि तेवढ्यात भिवाजी धावत आला भुयारात जे खोदकाम चालले होते... त्याचीच त्याला बातमी द्यायची होती...त्याचा श्वास फुलला होता..छाती धपापत होती ...धावत येताना फक्त पडायचा बाकी होता...त्याने काहीतरी तिघांना सांगितले आणि ते तिघेही हातातले काम सोडून धावतच निघाले.... भुयारातुन जवळ जवळ सर्व मजूर बाहेर आले होते ... प्रचंड गोंगाट चालला होता... खोदकाम करणारे मजूर थरथरत होते....कोणीही आता जायला तयार होईना....असे काय पहिले त्या सर्वांनी... काहीच कळायाला मार्ग नव्हता...स्वतः आत गेले तरच कळणार होते...काल जिथं मिलिंद आणि अमित जिथे अडकले होते... त्या जागी चौघेही आले होते... मजुरांनी आपले काम चोख केले होते...त्या जागी मोठमोठाल्या पायऱ्या दिसत होत्या...१० ते १२ पायऱ्या खाली उतरून सर्व खाली आले...प्रकाश जवळ जवळ अंधुक झाला होता...आणी प्रसाद तिथे कशालातरी अडखळला ...चुन्याचे पाणी पण काही ठिकाणी वळून लुप्त झाले होते... पुरेशा प्रकाशाअभावी नीट काही दिसत नव्हते...पायाखाली काय आले आहे ते बघण्यासाठी सर्वांनी आपले हेड लॅम्प चालू केले....

आणि हेड-लॅम्पच्या प्रकाशात जे काही दिसले ते बघून...सगळे जागच्या जागी थिजून गेले...काळजाचा ठोका चुकला...कोणाच्या तोंडून शब्दच फुटेना...२ मानवी सांगाडे तिथे पडलेले होते..सांगाडे ते प्रथम पाहत होते असे नाही..अश्या कित्येक मोहिमा करताना त्यांनी पहिले होते...पण भुयारात सापडलेले आणि तेही रायगडाच्या पोटात...आता थोडेफार ते सावरले होते..जवळ जाऊन त्यांनी पाहणी केली...बाजूलाच दोन तलवारी पण पडल्या होत्या...अंगावरच्या कापडाच्या तर चिंध्या चिंध्या झाल्या होत्या...ज्या दगडावर सांगाडे होते .. तिथेच एक पगडी पण पडली होती..जरीपटक्याची पगडी होती...म्हणजे कोणीतरी एखादा सरदार असावा...म्हणजे त्यांनी जी शेडगे कुटुंबाकडून जी दंतकथा ऐकली होती ..ती खरी होती का ??? खरी होती तर...मग बाकीचे सहा ते सात जण कुठे गेले...त्यांचे पण सांगाडे सापडायला पाहिजे होते ?? अजून काही सापडते का ते पाहयाला सर्व जण इथे तिथे शोधू लागले...काळोखात नीट काहीच दिसत नव्हते...हेड लॅम्प होते पण त्याचा प्रकाश पुरेसा नव्हता...एक गोष्ट मात्र प्रसादला कळत नव्हती ..डोंगरायाच्या एवढ्या आत येऊन सुद्धा कोणालाही श्वास घेताना त्रास होत नव्हता..म्हणजे तिथे अजून एखादा रस्ता किंवा कपार नक्की असावी जिथुन वारा वाहतो आहे...असा विचार करत असतानाच...मिलिंदच्या हेड लॅम्पचा प्रकाश त्या पगडीवर पडला... आणि त्याच्या एक लक्षात आले..त्या जुनाट पगडीचा फाटलेला फडका..हळू हळू फडकतो आहे...मग प्रसाद जिथे पगडी पडली होती त्या जागी जाऊन पाहणी करू लागला...तेव्हा तिथे त्याला जवळ जवळ २ फूट रुंद एक भोगदा दिसला आणि तिथेच चुन्याचे पाणी हि आले होते...अमितने हाताने थोडे त्या जागची माती काढून पहिली आणि तिथला अडसर होत असलेला दगड जोर लावून काढला...आणि काय होते ते कळायच्या आत...धडाम धूड आवाज करत ती भिंत कोसळली...

आणि वाऱ्याच्या प्रचंड झोत त्यांच्या अंगावर आला...डाव्या हाताला एक कपार दिसत होती...थोडे पुढे गेल्यावर चुन्याचे पाणी पण दिसत होते...२ बाय ३ च्या रुंद कपारींतून पुरेसा सूर्यप्रकाश आणि वारा येत होता...थोडे वाकून पाहिले असता...कपार पुढे डाव्या बाजूला वळून मोठी झाली होती...म्हणजे ते
काळखाईच्या खळग्याजवळ आले होते...पण भुयारी मार्गाने... कपारीत अजून शोधले असता काही सापडले नाही... आणि २ बाय ३ च्या रुंद कपारींतून एखादा पूर्ण वाढीचा पुरुष जाऊ शकेल एवढी जागाही नव्हती...मग ते बाकीचे ६ ते ७ जण गेले कुठे ?? आणि ते २ सरदार तिथेच का राहिले?? बाहेर का नाही आले ?? का त्यांनीच सर्व मार्ग बंद करून टाकले होते??...ते विचार करत तिथेच बसून राहिले...आता वॉकीटॉकी ला पुरेसा सिग्नल येतो आहे पाहून भिवाजी ने... आपल्या बाकी टीम मेंबर ला आपण सुखरूप आहोत ते कळवून टाकले...थोड्या वेळाने मोहीम आटोपती घेऊन निघावे आणि भुयाराच्या बाहेर यावे असे ठरले....
उठता उठता ते ज्या दगडाच्या भिंतीला टेकुन बसले होते...तो दगड थोडा करकरल्या सारखा वाटला...दगड आणि करकरणार ??? सगळ्यांनी आपले हेड लॅम्प चालू केले आणि त्याचा झोत... त्या भिंतीवर स्थिर केला...आणि त्यांच्या आश्चर्यला पारावर राहिला नाही.. ते इतका वेळ त्याला टेकून बसले होते..तो सागवानी लाकडाचा भरभक्कम दरवाजा होता...पुरुषभर उंचीचा तो दरवाजा महादरवाजाची प्रतिकृतीच होता...चौघांनीही जोर लावून त्या दरवाजावरचे आडवे टाकलेले लाकूड हटवले...इतके वर्षे त्या दरवाजाच्या खाली जमा झालेली माती त्यांनी बाजूला केली...आणि जोरात दरवाजा आतल्या बाजूला ढकलला...आणि आत बघतात तर काय आत ते शोधत असलेले.... बाकीचे ६ ते ७ जण सांगाडे सापडले...म्हणजे सिहांसन कुठंतरी आसपास असलंच पाहिजे...नीट मोजले असता ते ६ मानवी सांगाडे होते... आणि त्या सांगाडयांपासून काही अंतरावर...दगडाचा मोठा ढीग च्या ढीग होता...चौघांनीही एक एक करून दगड काढायला सुरुवात केली....पूर्ण ढीग बाजूला केल्यावर...कापडाचा एक ढीग होता...पण ते कापड त्या वस्तू भोवती करकचून गुंडाळलं होते...

हळू हळू एक एक कापड बाजूला होते गेले तसे काही वस्तू बाहेर आल्या...चामड्यच्या पिशव्यात असलेली नाणी..हार..बाजूबंद..जिरेटोप...एक अजून कवड्यांची माळ...आणि तेवढ्यात मिलिंद आणि अमित ने जोर लावून ते दगड आणि कापड तिथून बाजूला केले... आणि तिथे बघतात तर काय...काही लाकडी फळ्या होत्या...बापरे ह्या रायगडाने अजून आपल्या पोटात काय काय दडवले होते ??? लाकडी फळ्या बाजूला केल्या आणि त्यांचा त्यांच्या डोळयांवर विश्वास बसेना...नकळतच चौघांचे हात जोडले गेले ...ज्यासाठी गेले ३ ते ४ वर्षे एवढा त्यांनी आटापिटा केला होता...ते शिवसिहांसन रायगडाने इथे काळखाईच्या खळग्यात सुखरूप लपवून ठेवले होते... एवढ्या वर्षांची मेहनत सफल झाली होती...भारतवर्षातील सर्वात पवित्र सिहांसन रायगडाने आज समोर उभे केले होते.....

हि कथा पुर्णपणे काल्पनिक आहे...राजांचे सिंहासन कुठे आहे..हे कोणालाच माहिती नाही..फक्त काही संदर्भ आणि निवडक संदर्भ सोडल्यास कथा माझ्या कल्पना शक्ती वर लिहिली आहे...हि कथा प्रमाण मानू नये...मात्र दिलेले संदर्भ इंटरनेट वरून जरूर पडताळुन पाहावेत हि विनंति..कदाचित माझे संदर्भ चुकीचे असतील मला जसे मिळत गेले तसे मी वाचत गेलो..लिखाणात अनेक चुका असतील तरी त्या समजून घ्यावात आणि कथा लिहिताना कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही...तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी.. आणि रायगडचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर खाली दिलेली ३ पुस्तके आवर्जून वाचावीत.

दुर्गेदुर्गेश्वर रायगड - लेखक : प्र. के . घाणेकर

रायगडची जीवनकथा- लेखक शांताराम आवळसकर

दुर्गभ्रमणगाथा- गो.नी.दांडेकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED