AGENT - X (9) Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

AGENT - X (9)

९.

"तुम्ही त्या बिल्डिंगमधे काय फेकलंत?" मी विचारलं.
या सलग घडणाऱ्या आणि विलक्षण घटना ऐकून माझा श्वास रोखला गेला होता. रिलीफ मिळावा म्हणून मी मिस्टर वाघला प्रश्न केला. मला जाणून पण घ्यायचं होतंच, की त्यानं काय कारभार केलाय...
"त्यांना नर्व 'व्हिएक्स' हवं होतं. ते दिलं!" तो सहज म्हणाला.
"म्हणजे? आणि हे व्हिएक्स, हे नर्व एजंट्स... काय भानगड काय आहेत?" मी कापाळावर आठ्या आणत विचारलं.
"नर्व एजंट्स आर केमिकल वेपन्स!" त्यानं शाब्दिक बॉम्ब फोडला,
"व्हिएक्स हा त्यातील एक अत्यंत विषारी प्रकार! शॉर्टफॉर्म फॉर 'वेनमस एजंट एक्स' केमिकल फॉर्म्युला C11H26NO2PS! लिक्विड, क्रीम व गॅस फॉर्म्समध्ये हे आढळतं. हे एक अत्यंत प्राणघातक असं नर्व एजंन्ट आहे. संयुक्त राष्ट्रानं मोठ्या प्रमाणावर विनाश करण्यारं शस्त्र म्हणून याचं वर्गीकरण केलंय!
"हे केमिकल नर्व्हस सिस्टीमवर अटॅक करतं आणि ते बंद पाडतं. ज्यामुळं मृत्यू होतो. सुरूवातीला मळमळ होते, चक्कर येते. आणि लगेच व्यक्ती आचके देऊ लागते आणि श्वास बंद होतो आणि पंधरा मिनिटांतच मृत्यू होतो!"
"हे किती भयानक आहे... आणि तुम्ही ते घरी बनवलंत?" मी घाबरून विचारलं.
"मग काय झालं त्यात!" तो स्माईल करत म्हणाला.
मी लगेच नाक आणि तोंड दाबून धरलं. यावर तो मोठ्यानं हसला. म्हणाला,
"अरे! ते काय इथं पसरलेलं नाही! नाही तर मी इथं तुझ्याशी बोलत बसलो असतो का?"
मी रिलॅक्स होत नाकाचा हात हळूहळू बाजूला घेतला.
"यू नो व्हॉट? यू आर इनोसेंट! म्हणूनच मला तू आवडतोस!" तो मोहक स्मित करत माझ्याकडं पाहत मला म्हणाला.
"तुला माहितीय हे कुणी बनवलंय?"
मी नकारार्थी मान हलवली. हे काय आहे हेच माहीत नाही, तर हे कोणी बनवलंय हे काय माहीत असणार मला? पण काही तरी सांगण्याची सुरवात मिस्टर वाघ या प्रश्नानं करतो.
"याचा शोध एका यूके बेस्ड् इंडियन केमिस्ट रणजित घोष यांनी लावलाय!"
"काय एक भारतीय? पण आपण तर विश्व शांततेवर विश्वास ठेवतो. मग?" मी गोंधळलो होतो.
"त्यांनी डिस्ट्रक्शनसाठी हे बनवलंच नाही. नोव्हेंबर नाइंटिन फिफ्टी टूला इम्पीरियल केमिकल इंडस्ट्रीज मध्ये काम करत जे. एफ. न्यूमनसह त्यांनी व्ही-सिरीज नर्व एजंट डिस्कव्हर केला, पण पेस्टींसाईड म्हणून. पण मानवासाठी हे घातक आहे असं समोर आल्यावर नाइंटिन फिफ्टी फाईव्हला या सिमिलर कम्पाऊंडवर कमर्शिअल रिसर्च सील करण्यात आला होता.
"पुढं सिक्सटी वनला अमेरिकेनं न्यूपोर्ट केमिकल डेपो अंतर्गत व्हिएक्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती चालू केली. एटी एटला यूएनच्या तपासात क्युबाने अंगोलन गृहयुद्धात याचा वापर केल्याचं आढळून आलं. त्याच वर्षी सोळा मार्चला इराण-इराक युद्धात इराकने कुर्ड्सवर सद्दाम हुसेनच्या नेतृत्वाखाली केमिकल एजंट्सचा वापर केल्याचे पुरावे आहेत. कुर्डिस्तान हा पश्चिम आशियातला इराणीयन वंशीय देश आहे. या हल्ल्याला हलाबजा केमिकल अटॅक, हलाबजा मॅसेकर किंवा ब्लडी फ्रायडे ही म्हणतात.
"अजून बऱ्याच अशा घटना आहेत. रिसेन्ट इन्सिडेंट सांगायचा झालाच, तर तेरा फेब्रुवारी दोन हजार सतराला नॉर्थ कोरियाचा लीडर किम जॉन्ग-उनचा सावत्र भाऊ किम जॉन्ग-नामला मलेशियाच्या क्वालालांपूर एअरपोर्टवर व्हिएक्सचा वापर करून मारण्यात आलं!"
व्हिएक्सचा सगळा इतिहास सांगून तो बोलायचा थांबला.
"मग त्या बिल्डिंग मधले सगळे मेले असतील?"
माझ्या प्रश्नावर तो पुन्हा हसला,
"दुसरा त्यांच्याकडं काही पर्याय होता का?" तो म्हणाला आणि त्यानं पुढं सांगायला सुरुवात केली...

"मिस्टर वाघ! ऐनवेळेला तुम्ही सांगितलं म्हणून. नाही तर मी याच्या डोक्यावरच नेम धरला होता!" गाडी चालवत हजारे बाजूच्या पॅसेंजर सीटवर बेशुद्ध पडलेल्या त्या व्यक्तीकडं पाहत मिस्टर वाघला म्हणाला.
मिस्टर वाघ हजारेच्या 'पॉईंट ऑफ व्ह्यू'नं त्या व्यक्तीला त्याच्या गाडीच्या स्क्रिनवर पाहत होता.
"त्याला पोलीस स्टेशनला नेऊ नका." म्हणत मिस्टर वाघनं भेटण्याचं ठिकाण हजारेला वायरलेसच्या माध्यमातून सांगितलं.

ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटले.
"सीन्स यू गॉट युअर क्रिमिनल, नाऊ पे माय रिमेनिंग अमाऊंट!" मिस्टर वाघनं हसत आपल्या पैशांची मागणी केली.
"मला वाटलेलं तुम्ही काही मदत करत नाही आहात! बट यू रिअल वर्क्ड् वेल! नाईस! म्हणत त्यानं उरलेली रक्कम लगेच मिस्टर वाघच्या अकाऊंटला जमा करायला सुरुवात केली...
"निशांत, त्याची बायको आणि नोकर यांचे साठ लाख एड करायला विसरू नका... आणि मिथिलचे पन्नास पण." चेहऱ्यावर हावरेपणा दाखवत मिस्टर वाघ हसत म्हणाला.
"मिथिल भारद्वाज? का?" हजारेनं थांबून विचारलं.
"तोच तर खरा सुत्रधार आहे या सगळ्याचा!"
"मग चला तर. लगेच पकडूया त्याला!"
"नाही नको! आधी या माणसाला शुद्धीवर येऊ देत. याची जबानी घेतली, की आपल्याकडे ठोस पुरावा असेल मिथिलला आत घ्यायला!" मिस्टर वाघनं त्याला पटवलं.
"तुम्ही ठीक बोलताय! तसंच करू मग." हजारे मंजूर झाला.
"पण मिथिलचे पैसे मात्र आत्ताच हवेत!" मिस्टर वाघ हावरट हसला.
"तुमची भूक काही संपत नाही!" हजारेही हसून म्हणाला.
"इफ यू गुड ऍट समथिंग, नेव्हर डू इट फॉर फ्री! असं ख्रिस्तोफर नोलान यांनी म्हंटलच आहे!" मिस्टर वाघ परत लोभी हसला.
"द डार्क नाईट. जोकरचं वाक्य आहे ना? माझीही आवडती फिल्म आहे. म्हणूनच मी पण कोणाचं काम फुकट करत नाही." हजारे पण हसून म्हणाला.
म्हणत हजारेनं पैशांचं ट्रांजेक्शन पूर्ण केलं.
"ऑन लाईन पेयमेंट करताय भीती नाही वाटत?" मिस्टर वाघनं विचारलं.
"आता तुम्ही लगेच पैसे मागताय म्हणून केलं ऑनलाईन. याच्या आधी ऑनहॅन्ड दिलेच की!"
"तरी?" मिस्टर वाघनं खोटी भीती दाखवली.
"तुम्ही काळजी करू नका ओ! एन्जॉय! माझं अकाऊंट स्टेटमेंट होम मिनिस्टर सोडले, तर कोण चेक करणार आहे? मी सांभाळून घेईन!" हजारे मिस्टर वाघला खात्री देत म्हणाला.
"होम मिनिस्टर?" मिस्टर वाघनं खोटं घाबरून प्रश्न केला.
"आमची बायको ओ!" हजारे हसत म्हणाला.
हे ऐकून मिस्टर वाघ देखील हसू लागला.
"मग पार्टी?" मिस्टर वाघनं विचारलं.
"हो चला ना! कोणत्या बारला?" हजारेनं विचारलं.
"बारला कशाला येताना घेऊनच आलोय." म्हणत मिस्टर वाघ त्याच्या कारकडं गेला.
हाताला ग्लव्ह्ज् घालून त्यानं आतील बर्फनं भरलेल्या स्टायरोफोम् कंटेनर मधील एक शॅम्पेनची बाटली व दोन ग्लास काढले.
ते तो हजारेकडं घेऊन आला.
"शॅम्पेन?" म्हणत हजारेनं तोंड वाकडं केलं.
"का? आवडत नाही?" मिस्टर वाघनं विचारलं,
"मोवेट्ट अँड् शेंडॉन! बेस्ट इन द वर्ल्ड्! एडिशन, डॉम पेरिनीऑन् चार्ल्स अँड डायना नाइंटिन सिक्सटीवन. चार हजार सातशे शान्नव यूएसडी! जून दोन हजार एकोणीसच्या डॉलर रेट नुसार अराऊंड तीन लाख पस्तीस हजार सातशे वीस रुपये!
"खास तुमच्यासाठी आणली आहे. पण ठिकाय! आवडत नसेल, तर फोर्स नाही करणार!" मिस्टर वाघ त्याला म्हणाला.
"तुम्ही आग्रह करताय तर घेतो थोडी." हजारे संकोचत म्हणाला.
"ये हुई ना बात!" म्हणत खूष होऊन लगबगीनं मिस्टर वाघनं बाटली फोडली.
"ग्लव्ह्ज् का घातलेत?" हजारेनं विचारलं.
"शॅम्पेन थंड आहे ना..." मिस्टर वाघनं हजारेचं शंका निरसन केलं.
आणि त्यानं ग्लास भरून हजारेच्या हातात दिला.
ग्लास घेत हजारे,
"त्या डॅनियलच्या शॉपवर पण छान क्वॉलिटीची शॅम्पेन मिळते म्हणे. मी बिअर तिथंच घेतो." म्हणत हजारेनं मिस्टर वाघ कडून ग्लास घेतला आणि तोंडाला लावला.
"माहिती आहे. ही बाटली तिथूनच आणली आहे..."
हजारेनं घोट घेतला,
"तुमच्या नांवावर!" मिस्टर वाघनं वाक्य पूर्ण केलं.
तसा हजारेला ठसका लागला. आणि शॅम्पेन फवाऱ्या सारखी सगळीकडं उडाली...
"अहो शिस्तीत!" मिस्टर वाघ त्याला म्हणाला.
हजारेच्या नाकातूनही काही थेंब खाली आले. थोडावेळ स्वतःला सावरून तो मोठ्यानं हसू लागला...
"तुमचा काही नेम नाही!" तो हसत म्हणाला,
"मला वाटायचं मीच एकटा सर्वांत मोठा नीच आहे! पण तुम्ही माझ्यापेक्षाही काकणभर ज्यादाच निघालात!"
"तुम्हाला कळलं हे बरं झालं!" मिस्टर वाघ पण हसत म्हणला.
आणि त्यानं तिरकं पाहत ग्लास ओठांना लावला. हजारेनंही त्याचा ग्लास रिकामा केला. मिस्टर वाघनं पुन्हा तो भरत विचारलं,
"मी तुमची सर्व्हिस पिस्टल बघू शकतो? मला गन्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे!"
"एका अटीवर!" हजारे म्हणला.
"बोला."
"माझ्याबद्दलचे पुरावे तुम्ही नष्ट कराल!"
"हो. का नाही?!"
मिस्टर वाघनं सहमती दाखवल्यावर हजारेनं त्याची पिस्टल मिस्टर वाघ समोर धरली,
" 'ऑटो नाईन एमएम वन ए' मेड इन नाइंटिन एटीवन. इंडियन मेड सेमी ऑटोमॅटिक. थर्टीन राऊंड. नाईन एमएम कॅलिबर." मिस्टर वाघकडं ती देत हजारे म्हणाला.
मिस्टर वाघनं ती लोड केली.
"चालू नका. मला एका एका राऊंडचा रिपोर्ट द्यावा लागतो!" हजारे हसत म्हणाला.
"माहितेय! मी नाही चालवणार..." मिस्टर वाघही हसून म्हणत तो हजारेच्या गाडीत बेशुद्धावस्थेत पडलेल्या त्या व्यक्तीकडं गेला. हजारे त्याच्या मागून गेला.
"काय करताय काय?" अजूनही हजारे हसतच होता.
पण त्याचं हे हसू लवकरच गायब होणार होतं.
हजारेनं जेव्हा पाहिलं, तेव्हा मिस्टर वाघनं ती पिस्टल त्या बेशुद्ध व्यक्तीच्या हातात ठेवली होती.
हजारेच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो गंभीर झाला.
"मिस्टर वाघ... हे... हे काय करताय!" म्हणत तो मागं मागं सरकू लागला.
पण त्याला पळून जाण्याचा संधी न देता मिस्टर वाघनं त्या व्यक्तीच्या बोटावर आपल्या बोटानं दाब देऊन ट्रिगर ओढला.
"हा चालवणार आहे!" मिस्टर वाघनं त्याचं वाक्य पूर्ण केलं.
गोळी निघाली; ती सरळ हजारेच्या छातीत घुसली. तोल जाऊन हजारे मागे कोसळला आणि त्याचं डोकं जमिनीवर जोरात आढळलं. त्यामुळं डोक्यातूनही रक्तस्राव चालू झाला.
मिस्टर वाघनं त्याच्याकडं लक्ष न देता त्याच्या हातून पडून फुटलेल्या शॅम्पेनच्या ग्लासचे तुकडे गोळा केले. त्याच्यावर इंप्लान्ट केलेले सगळी डिव्हाइसेस काढून घेतली. शॅम्पेनची बाटली, त्याचा स्वतःचा ग्लास सगळं काही स्वतःच्या गाडीत ठेवले. हजारेची पिस्टल पण रिकाम्या होलस्टरला खोचली.
आणि त्याच सोबत त्या बेशुद्ध व्यक्तीला सुद्धा त्यानं त्याच्या गाडीत हलवलं. तिथले पुरावे नष्ट करून तो त्याच्या घराकडं निघाला...