ना कळले कधी Season 1 - Part 28 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 28

     Hey सिद्धांत बघ आर्या आली.....!!! विक्रांत जवळजवळ ओरडलाच, हे  बघ विक्रांत माझा अजिबात मूड नाही आहे आणि ती येणार नाही उगाचच माझी घेऊ नको. अरे ऐ मूर्खा बघ तर मागे एकदा. नंतर बोलविक्रांत म्हणाला. सिद्धांत ने मागे पाहिलं आणि तो पाहतच राहिला त्याच्या मागे चक्क आर्याच उभी होती आणि तीही  one piece त्यावर तिचे मोकळे केस, त्यात  तर ती  आणखीन उठून दिसत होते. सिद्धांत फक्त आता आनंदाने वेडा व्हायचाच बाकी होता. त्याला पटकन जाऊन तिला मिठीच मारावी वाटली पण त्याने कंट्रोल केलं. आज ही मेनका ह्या विषमित्रा ची तपस्या भंग करणार विक्रांत सिद्धांत कडे पाहून म्हणाला. इतक सोपं नाही ते सिद्धांत त्याला म्हणाला. hii सिद्धांत सर, विक्रांत सर आर्या त्यांच्या जवळ येऊन म्हणाली. काय ग तू तर येणार नव्हती अस मला सिद्धांत सांगत होता. मी try करेल सांगितल होत हो की सिद्धांत सर! हो पण मला खरच वाटलं नव्हतं तू येशील म्हणून. सिद्धांत तिला म्हणाला. मला तिथे खर तर जाण्याची ईच्छा च नव्हती पण जावं लागणार होतं आणि असही मला फार बोर झालं तिथे मग निघून आले. तुला तिथे बोर झालं आणि सिद्धांत इथे बोर होत होता. विक्रांत म्हणाला.सिद्धांत ने त्याच्या कडे थोडस रागानेच पाहिलं. अरे विक्रांत थोडयावेळापूर्वी बॉस तुला शोधत होते, भेटून घे एकदा काय म्हणतात बघ. कटवू नको सरळ जा म्हणून सांग न जातो मी! आता आर्या आली तर तुला माझी काय गरज मी कशाला थांबू इथे मी येतो! विक्रांत सर थांबा अस काहीही नाही आहे आर्या म्हणाली पण हे ऐकायला तो कुठे थांबला होता. सर अस का केलं तुम्ही त्यांना कस वाटलं असेन त्यांना. आर्या सिद्धांत ला म्हणाली. अग एक नंबरचा नौटंकी आहे तो त्याला मी काय आजपासून नाही ओळखत  लहानपापासून चा मित्र आहे तो माझा! बर चल आपण बसूया कुठेतरी. मग दोघेही एका टेबल जवळ येऊन बसले. आर्या काहितरी घे न सिद्धांत तिला म्हणाला. i don't drink  ती म्हणाली. dont worry, मी सुद्धा  घेत नाही हे soft drink आहेत you can. सिद्धांत म्हणाला. फार मजा येते आहे न पार्टी मध्ये सगळे किती enjoy करत आहेत. आर्या म्हणाली.हो तुला जायचं तर तू जाऊ शकतेस हा सिद्धांत तिला म्हणाला. नाही मी ईथेच ठीक आहे. ती म्हणाली. इतक्यात इथे विक्रांत आला काय यार सिद्धांत एकटे एकटे काय बसले आहात इकडे चला  सगळ्यांसोबत. तू आहे ना तिथे कर enjoy त्यांच्या  सोबत.मी बरा आहे इकडेच.  तो ही त्यांच्या बाजूलाच बसला. आता हा कशाला बसला इथे परत बडबड चालू करणार.सिद्धांत मनातच म्हणाला. आर्या तुला माहिती आहे का ? विक्रांत ने तिला विचारले. काय?, हा सिद्धांत तुला घाबरतो बर!!! विक्रांत म्हणाला. आर्या तू ह्याच्या कडे लक्ष नको देऊ ह्याने खूप घेतलीये चढली आहे दुसरं काही नाही. सिद्धांत म्हणाला. अरे मी खरच बोलतोय . विक्रांत म्हणाला.विक्रांत तू उठ बर इथुन काहीही बडबड करतोय . विक्रांत सर तुम्ही बोला काय म्हणत होता  आर्या सिद्धांत ला थांबवत म्हणाली. अग ऐ ! तू काय बोला म्हणत आहेस शुद्धीत आहे का तो काहीही बोलतोय जाऊ दे त्याला. सिद्धांत तिला म्हणाला. सिद्धांत ने त्याला काढूनच दिले. बर झाला गेला आज तर हा आर्यसमोरच बोलला असता. की हा तुला सांगायला घाबरतो. ह्या च्या पासून जपूनच राहावं लागेल. आर्या काही बोललीच नाही. तिला खर तर ऐकायचं होत की विक्रांत काय बोलतो पण सिद्धांत ने त्याला कटवल्यामुळे तिला काही ऐकता नाही आलं.
     आर्या!!!अग इकडे काय करत आहेस चल ना तिकडे  dance floor वर . ऐ please नाही ह मी नाही करणार काही dance वगैरे तुम्ही करा  आर्या म्हणाली. ऐ तू काय इथे बसण्यासाठी आली आहे काय.चल तिला त्यांनी ओढतच  नेलं. सिद्धांत सर तुम्ही पण चला आर्या म्हणाली ना नाही तू जा तो म्हणाला. काय ग तो खरच येणार आहे का काहीही आपलं, हिला ना फारच पुळका आहे त्या सिध्दांत चा, तरी बर कधी एक शब्दही प्रेमाने बोलत नाही तो! तिच्या बाकीच्या  फ्रेंड्स च्या अश्या कंमेंट्स पास करणं चालू होतं. अरे यार इतका वाईट नाही आहे खरच तो मनाने फार चांगला आहे. आर्या त्यांना म्हणाली, आणि मी आली आहे ना आता तुमच्या सोबत तर झालं ना , उगाच कशाला त्यांच्या बद्दल वाईट बोलायचं !आर्या त्यांना म्हणाली. चलो dont west time here आपण  dance floor वर जाऊया आणि ते सगळे तिकडे गेले. आर्या ला dance floor वरून सिद्धांत अगदी सहज दिसत होता. आणि त्याच लक्ष तर तिच्या कडेच होत.तिने बऱ्याच वेळा त्याला बोलावले पण तो नाहीच म्हणाला. सिद्धांत फक्त बाजूला बसून आर्याला अस मुक्त dance करताना पाहत होता. ती आर्या त्याला अधिकच आवडत होती. त्याने खूप ठरवल होत की dance करायचा नाही पण शेवटी तो उठलाच आणि तिकडे गेला. सिद्धांत ला dance floor वर पाहून आर्याचा आनंद गगनात मावेना त्याने तिला डान्स साठी ऑफर केले आणि लगेचच आर्याने आपला हात त्याच्या हातात दिला.ती त्याच्या प्रत्येक स्टेप वर त्याला साथ देत होती . दोघे अगदी बेधुंद होऊन नाचत होते त्यांना आता आजूबाजूचे काहीही भान उरलेच नव्हते. एका स्टेप ला तर ते खूप जवळ होते, दोघेही कितीतरी वेळ एकमेकांच्या नजरेत स्वतःला शोधत होते.शेवटी आर्या थोडी मागे गेली त्याने लगेचच तिला जवळ ओढले.हलकेच तिच्या मानेवरचे केस बाजूला केले ती थोडी शहारली, पण त्याच्या करारी डोळ्यांमध्ये मात्र हरवून गेली.सिद्धांत तिच्या आणखीन जवळ जाणार इतक्यात त्याला आपला फोन viabrat होतोय हे जाणवलं आणि तो भानावर आला त्याने लगेच आर्याला बाजूला केलं आणि तडक खाली निघून आला.
          आज असा कसा वागू शकतो मी, शी..... माझा किती कंट्रोल केलं होत मी, काय विचार करत असेल आर्या माझ्या बद्दल. मला तर आता तिच्या समोरही जावं नाही वाटत आहे. किती मोठी चूक करणार होतो मी shut काय अधिकार आहे मला आर्या सोबत अस वागण्याचा. कस सामोरं जाणार तिला! बापरे आता जाताना आर्याला सोडायच परत तीच सोबत.! सिद्धांत ला स्वतःचाच खूप राग येत होता. मी इतकी कशी काय वाहवत जाऊ शकते, का मी सिद्धांत ला नाही नाही म्हंटल. काय विचार करत असेल तो आणि आता त्याच्याच सोबत घरी जायचं, नाही!!!! पण इतक्या रात्री कस जाणार . मला तर आता सिध्दांत च्या समोर जाण्याची ही हिम्मत नाही आहे.
                  ती गाडी जवळ येऊन थांबली तो आला फक्त चल म्हणाला. बाहेर खूप थंडी होती .सिद्धांत ला कळाल त्याने आपल जॅकेट काढून तिच्या कडे न पाहताच ती नको म्हणत असतानाही तिला दिल.तीनेही ते घेतलं आणि दोघंही गाडीत बसले. कोणीही काहीही बोलत नव्हते. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं सुध्दा नाही. दोघांनाही खूप awkward feel होत होतं. दोघांच्याही मनात एकच विचार चालू होते पण बोलण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती होत. शेवटी सिद्धांत तच हिम्मत करून बोलला 'सॉरी', अस नव्हतं वागायला पाहिजे मी. चुकी एकाचीच न
नाही आहे माझही चुकलंच ती म्हणाली. आणिकोणीही पुढे काहीही बोललं नाही. इतक्यात तीच घर आलं . त्याने गाडी थांबवली, ती उतरली. आज सिद्धांत ने तिला बाय सुद्धा केले नाही आणि तो निघून गेला.
क्रमशः