निशब्द - भाग 1

लोक अस म्हणतात की आयुष्यात प्रेम एकदाच होत पण 11 वीच्या पहिल्याच दिवशी मला अगदी उलट अनुभव आला ..कोण त्या इना , मीना , सोना समोरून जाव्या आणि मी पुढच्याच क्षणी प्रेमात पडावं अशी माझी स्थिती ..अशीच दोन वर्षे एन्जॉयमेंट या नावाखाली काढली ..12 विचा निकाल आला तेव्हा मिळालं ते अपयश फक्त अपयश ..
   बी.ए . पहिल्या वर्षाचा तो पहिला दिवस होता ..घरची परिस्थिती त्यावेळी बेताची असल्याने मला तेव्हा कामाला जावं लागलं होत ..वर्गाच्या उंबरठ्यावर उभा झालो आणि सरांना आत येऊ का असा प्रश्न विचारला ..तसा प्रश्न सोपाच होता पण सर आणि विद्यार्थी जणू असे पाहत होते की काही क्षणांसाठी इतरांशी नजर मिळविण देखील कठीण होऊन बसल शेवटी सरानी आत येण्याची  परवानगी दिली आणि तिथून सुटल्याचा आनंद झाला ..तो वर्ग होता अर्थशास्त्राचा पण त्या क्षणाने मात्र एवढं नक्कीच कळलं होत की आपला प्रवास मात्र खूप कठीण जाणार आहे ..मी सर्वांचे चेहरे न्याहाळतच शेवटच्या बाकावर जाऊन बसलो आणि त्या दिवसापासून माझ्या त्या कॉलेजमयीन जीवनाचा अविस्मरणीय प्रवास सुरु झाला ..
   मी पार्ट टाइम काम करत असल्याने दिसायला अगदी काळाकुट्ट आणि फाटका दिसत होतो हे म्हणायला काहीच हरकत नाही व हेच कारण होत की वर्गातील प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत बोलणे टाळत असे ..सुरुवातीला या सर्व गोष्टींचा त्रास व्हायचा पण हळूहळू त्या गोष्टींची सवय देखील होऊ लागली होती ..या सर्व गोष्टी घडत असताना एक गोष्ट मला सतत आनंद देऊन जायची आणि त्याचसाठी जणू मी दररोज कॉलेजला जाऊ लागलो ..आमच्या कलासची सुरुवात अर्थशास्त्राच्या वर्गाने व्हायची ..सर वर्ग सुरू असताना मुलांना नेहमीच प्रश्न विचारायचे ..या स्थितीत संपूर्ण वर्ग शांत होऊन बसायचा मात्र दूरवरून मधातून एक आवाज वर्गात गुंजला जायचा आणि आम्हा सर्वांचं लक्ष त्या आवाजाकडे वेधलं जायचं ..तो आवाज होता श्रेयसीचा ..सर्व तिला मिस एटिट्युड या नावाने हाक मारायचे ..ती आमच्या वर्गातील सर्वात हुशार मुलगी ..जेव्हा कुणालाच एकाही प्रश्नाचं उत्तर येत नसे त्यावेळी उत्तर देण्यासाठी  नेहमीच सज्ज असे हे विशेष ..हाच तो क्षण आणि ती व्यक्ती जी माझ्या आयुष्यात आनंदाच एकमेव कारण बनून आली पण ती यापासून मात्र अनाभिज्ञ होती ..
    श्रेयसी ..दिसायला गोरी गोरी ..उंच उंच सॅंडल आणि आधुनिक पेहरावमध्ये ती एखाद्या राजकुमारी पेक्षा कमी दिसत नव्हती ..तशी ती विचाराने आणि स्वभावाने शांत होती पण कुणाशीच बोलत नसल्याने तीच नामकरण मिस एटीट्युड अस करण्यात आलं ..मात्र ती बोलायला लागली की वर्गात पिन ड्रॉप सायलन्स असायचा ..ती अभ्यासात हुशार असल्याने सर्वच मुलांमध्ये चर्चा घडून यायच्या..सर्वानाच ती आवडत असे मग त्यातून मी कसा सुटणार ?? ..हा ..पण तिला सांगण्याची हिम्मत मात्र कुणीच करू शकल नव्हतं ..कारणही तसंच होत ..स्वताची जेव्हा तिच्याशी तुलना करायचो तेव्हा गप्प बसनच योग्य वाटू लागलं आणि मी माझ्या भावना मनातच साठवुन दिवस काढू लागलो ..
   आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरच मला अपयश मिळालं होतं त्यामुळे त्या सर्वातून स्वताला बाहेर काढण्यासाठी हवे ते प्रयत्न करू लागलो..त्या सर्वात मी माझी पुस्तक वाचण्याची आवड मात्र नेहमीच जपत होतो ..पुस्तकांनी ज्ञान मिळत होत पण कितीही पैसे कमावले तरी कमीच पडू लागले..घरच्यांना सांभाळणं आणि त्यातून स्वतासाठी पण खर्च करावा लागत असे त्यामुळे जीव अगदी रडकुंडीला यायचा ..पण त्या काळात काही मित्रांची साथ लाभली ज्यांनी जीवनाला एक योग्य दिशा दिली ..ज्ञान तर सोबत होतच मग आता त्याच ज्ञानाचा फायदा करून घेण्याचा निर्णय घेतला आणि वक्तृत्व , वादविवाद स्पर्धा देऊ लागलो ..सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे अपयशच हाती लागल परंतु प्रत्येक वेळेला येणारे अनुभव आणि होणाऱ्या चूका टाळत गेलो तेव्हा कुठे यशाची चव चाखायला मिळाली ..या काळात विद्यापीठाच वक्तृत्त्व स्पर्धेच बक्षिस मला मिळालं होतं त्यामुळे विश्वास हे नाव अधूनमधून ऐकायला यायचं .खर पाहता मी वर्गात एका कोपऱ्यावर बसणारा नालायक विद्यार्थी होतो अस सर्वानाच वाटायचं त्यामुळे जेमतेम दोन मित्र होते एक सुरज आणि दुसरी कृतिका ..पण कॉन्फिडन्स एवढा कमी झाला होता की स्वताच नावसुद्धा सांगू शकलो नव्हतो त्यामुळे त्यांना मी माझं आवडत नाव कौस्तुभ सांगितलं ..कधीकधी विश्वास हे नाव काही मुलांच्या ओठांवर असायचं पण मी माझं नाव कौस्तुभ सांगितलं असल्याने त्यांना कळतसुद्धा नव्हतं की ते माझंच नाव घेत आहेत ..मी मात्र तो प्रत्येक क्षण फार आनंदाने जगून घ्यायचो ..या काळात मी अभ्यासाकडेसुद्धा तेवढंच लक्ष देऊन होतो पण सरानी एखादा प्रश्न विचारला की मग मात्र बोबडी वडायची ..त्यामुळे सरानी माझं नामकरण ' ए हिरो ' अस केलं ..जेव्हा सर मला या नावाने हाक मारायचे तेव्हा संपूर्ण वर्ग माझ्याकडे बघून हसायचा ..खूप वाईट वाटायचं पण मी फार काही करू शकलो नाही ..
   त्या दिवसांचीसुद्धा एक वेगळीच मजा होती ..पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो त्यामुळे स्वताला सावरण देखील तेवढंच कठीण जात होतं ..वर्ग चालू असला की श्रेयसिकडे अधून - मधून बघायचो ..जेव्हा आपण एखादया व्यक्तीकडे बघतो आणि तिला जर त्याची जाणीव नसेल तर तो किती लकी क्षण असतो ना ?? ..कारण त्यात कुठलीच रोकटोक नसते आणि आपलं संपूर्ण प्रेम तिच्यावर ओतून टाकता येत ..जवळपास कॉलेजचे 3 वर्ष ही गोष्ट मी तिला कळू देखील दिली नव्हती ..श्रेयसी तशी फार कमी मुलांशी बोलायची ..त्यात आमच्या वर्गात तिच्यानंतर सर्वात हुशार समजला जाणारा मुलगा म्हणजे शुभम ..तो जेव्हा तिच्याशी हसून - हसून बोलायचा तेव्हा मनात कसतरी व्हायच आणि मनातली सारी ईर्षा उफाळून बाहेर यायची ..अगदी चेहऱ्यावर सर्व काही दिसायचं फक्त ते कडू घोट पिऊन मात्र स्वताला सावरव लागायचं ..सर देखील आगीत पुन्हा जास्त तेल ओतायचे ..कुठलंही काम असलं की त्या दोघांनाच सांगितलं जायचं त्यामुळे शुभमबद्दलचा राग नसानसात भिनला जायचा ..तरीही शांत राहण्यापलीकडे मात्र काहीच करु शकलो नाही ..शेवटी आपण यात करूच काय शकतो हा विचार करून तिला लपून - छपून पाहण्यातच धन्यता मानत गेलो ..
    एक असाच दिवस उजळला आणि माझे भाग्यच बदलले ..वेळ होती सकाळी 7.30 ..अर्थशास्त्राचे सर वर्गात आले आणि तुमची बरोबर 9 वाजता युनिट टेस्ट असण्याची बातमी मिळाली ..आपल्या वर्गात एखादा ऍटम बॉम्ब पडावा आणि सार काही विस्कळीत व्हावं अशी आमची स्थिती झाली होती ...अगदी दुसऱ्याच क्षणाला सर्व मुले अभ्यास करण्याच्या शर्यतीत मग्न झाली ..मुळात त्या दिवशी दुसरा कुठलाच वर्ग होणार नव्हता त्यामुळे त्या स्पर्धेला अधिकच महत्त्व प्राप्त झालं होतं ..सुमारे अर्धा तास प्रत्येक विद्यार्थी जीवाच रान करून अभ्यास करत होता ..सर्वांच्या कपाळावर चिंतेच्या रेषाही आता स्पष्ट दिसू लागल्या होत्या ..प्रत्येक व्यक्ती शर्यतीत मग्न झाला होता आणि जणू जिंकण्यासाठीच मैदानात उतरला होता ..या वातावरणात फक्त दोनच व्यक्तींच्या हातात कुठलंच पुस्तक दिसत नव्हतं ..एक म्हणजे मी ..माझ्याकडे बुक असूनसुद्धा रात्रीच्या कामाच्या थकण्याने अभ्यास करावंसं वाटत नव्हतं ..तर दुसरी व्यक्ती श्रेयसी ..आज ती माझ्या बाजूला एक बेंच सोडूनच बसली होती पण चुकून मात्र स्वताच बुक घरीच विसरून आली ..त्यामुळे तिला देखील नाईलाजाने का होइना सर्वांकडे पाहावं लागत होतं ..तिने इतरांना बुक मागण्याचा प्रयत्न केला पण ती कदाचित सर्वांच्या समोर जाईल म्हणून तिला कुणीच मदत करायला तयार झालं नाही ..ती शेवटी तशीच निराश होऊन बसली ..तिला या परिस्थिती बघन मला अगदीच असह्य झालं होतं ..तशी तिच्याशी कधीच बोललो नव्हतो त्यामुळे भीती वाटत होती पण शेवटी हिम्मत करून म्हणालो , " श्रेयसी हे माझं बुक घे , यात सर्वच लिहून आहे ."   त्याक्षणी मात्र तिने ते घेण्याच नाकारलं बहुदा तिला वाटत होतं की कदाचित त्यामुळे माझा पेपर खराब जाईल ..काही वेळ शांततेत गेला ..मी न राहवून पुन्हा एकदा तिला विचारलं , " बुक हवंय का ? " ..

यावेळी मात्र तिने ते स्वीकारलं ..पण मात्र काळजीने विचारायला विसरली नाही .." मग तू कसा अभ्यास करणार आहेस ?" ...

तेव्हा माझ्या चेहऱ्यावर फक्त हलकं स्मित उजळल..तीही दुसऱ्याच क्षणी अभ्यासात मग्न झाली ..तीच लक्ष नसताना मीही वर्गातून पळ काढला ..
   पेपर झाला होता ..दुसऱ्या दिवशी सर निकाल सांगणार होते त्यामुळे दुसऱ्याही दिवशी मुद्दामहून दांडी मारली ..निकाल हवा तसाच आला ..श्रेयसी युनिट टेस्टला प्रथम आली होती ..फक्त फरक एवढाच की त्या आनंदाच्या क्षणी मी तिला पाहू शकलो नव्हतो ..
   त्यानंतरचा दिवस उजाळला ..मी नेहमीच बसने प्रवास करत असे ..आज माझी बस वेळेच्या आधीच आली असल्याने वर्गात एकटाच गाणे गुणगुणत बसलो होतो ..गाणे म्हणण्यात एवढा व्यस्त झालो होतो की श्रेयसी केव्हा आली ते सुद्धा कळाल नाही ..काही वेळात तिने माझं बुक माझ्यासमोर ठेवलं आणि मी भानावर आलो ..आज वर्गात फक्त आम्ही दोघेच होते ..सकाळच्या धुंद वातावरणात पक्षांची किलबिल सुरू होती आणि मंद वारा चेहऱ्याला तृप्त करून जात होता ..तेवढ्यात ती म्हणाली , " धन्यवाद कौस्तुभ ..तू जर मला स्वताच बुक दिलं नसत तर कदाचित मी फेल झाले असते आणि माझं खूप हसू झालं असत सो थँक यु वेरी मच फॉर एव्हरीथिंग "...

मी आता थोडा आकाशात उडू लागलो असल्याचा भास झाला पण चेहऱ्यावर कुठलाही आव न आणता मी  शांत राहनच पसंद केलं ..
   आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती जर आपल्या समोर असेल आणि आपल्याशीच बोलत असेल तर नेमकी काय स्थिती होते हे मला आज जाणवू लागल होत ..मलाही तिच्याशी खूप काही बोलायच होत पण शब्दानेही आज माझ्याशी जणू बंडच पुकारलं ..हात पाय थरथर कापू लागले ..मल शांत पाहून शेवटी तीच म्हणाली , " तू किती सुंदर कविता करतोस अरे !! " 

" तुला कस माहिती मी कविता करतो ते ? " , मी उत्सुकतेने विचारलं ...

" तुझ्या बुकच्या पहिल्या पानावर लिहून आहेत की चारोळ्या ", ती कोमल स्वरात म्हणाली ..

तेव्हा मला आठवल की मी बुकच्या पहिल्या पानावर काही चारोळ्या लिहून ठेवल्या होत्या आणि बहुदा त्याच तिने तो होत्या ..त्या ओळी अशा ..

दिस रात्रीचा मी
का कुणास जानवे ना ?
या अपयशाच्या खुणाही
मला विसरता येईना
तरीही प्रयत्नांती परमेश्वर
यातच स्वताला शोधावं
आणि अवघ्या आयुष्याला माझ्या
मी मोत्यासारखं जपावं
मी मोत्यासारखं जपावं ..

  याच ओळी वाचून ती खूप आनंदी झाली होती ..कविता रचणे हे फक्त माझं मन हलकं करण्याचं साधन होत पण तिच्या शब्दांमुळे आणि तू कविता असच सदैव लिहीत राहावं या वाक्यामुळे कविता माझ्या जीवनातील अविभाज्य भाग झाल्या ..श्रेयसीसोबत घालवलेले हें काही क्षण मला आनंद तर देऊनच गेले होते पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मला प्रेरणा देऊन गेले ..आता प्रत्येक क्षण अन क्षण स्वतासाठी जगावस वाटत होतं आणि आता घरची स्थिती सुधारल्याने मला सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्यास मोकळीक मिळाली ..
    आता प्रत्येक गोष्ट जणू माझ्या मनासारखी घडू लागली ..एक सकारात्मक व्यक्ती आपल्याला पूर्णतः सकारात्मक बनवतो याचच ते उदाहरण होत ..या काळात विविध स्पर्धा गाजवन शिवाय अभ्यास करणसुद्धा सुरू होत ..त्यात कधीच खंड पडू दिला नव्हता ..अधून - मधून श्रेयसी कविता वाचायला मागून घ्यायची त्यामुळे कविता हे आमच्या दोघातल बोलण्याचं माध्यम बनत गेलं ...पण या सर्वात शुभम मात्र अडथळा बनत गेला ..ती बोलायला आली की तोही माझ्याशी बोलायला यायचा त्यामुळे तिच्याशी मनमोकळं बोलता येत नव्हतं शिवाय तोही श्रेयसीचा दिवाना होता त्यामुळे त्याची अधिकच भीती वाटू लागली ..तो तिच्याशी बोलण्याचे बहाणे शोधत असे व तीही त्याच्याशी तेवढ्याच प्रेमाने हसून बोलत असे हे सर्व पाहून मला असुरक्षित जाणवू लागल..माझ्या प्रेम कथेत तो मोठा अडथळा तर ठरणार नाही ना याची सतत भीती वाटत असायची ..

क्रमशा...

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Verified icon

jaydev patil 3 आठवडा पूर्वी

Verified icon

Tanvi 4 आठवडा पूर्वी

Verified icon

Smita hukkeri 2 महिना पूर्वी

शेअर करा