Nishabd - 4 books and stories free download online pdf in Marathi

निशब्द - भाग 4

माझा हात तिच्या हातात होता ..दोघांचे डोळे एकमेकांवर टिपलेले आणि हृदयात धडधड हा क्षण कसा विसरणार बरं !! तिचा हात माझ्या हातात होता.. उत्तरही न सांगताच मिळणार होतं पण तेव्हाच मला तिच्या हाताला काहीतरी लागून दिसलं ..मी तिला बाजूला बसविलं.. " श्रेयसी हे काय आहे " , मी घाबरून विचारलं ...
आज कधी नव्हे ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती ..आज तिचे हुंदके मनाला यातना पोहोचवत होते.. शेवटी मी तिच्या डोळ्यावरून हात घ्यावे आणि ती शांत झाली ..काही वेळात तिने आपला अबोला तोडला ..विश्वास तू नेहमी विचारतोस ना की मी एवढी शांत का असते ? .. मी सर्वांशी मिसळत का नाही ? ...तर एक माझे बाबा प्रशासकीय अधिकारी आहेत .. त्यांचा स्वभाव अगदी तापट असल्यामुळे आईंना त्यांनी कधीच सुखी ठेवले नाही.. नंतर मी झाले ..मुलगा झाला नाही म्हणून आईवर होणारे अत्याचार मी अगदी जवळून पाहत आले आहे .. आईचे दोन मिसकॅरेज झाले पण मुलगा काही झाला नाही मग याचा पूर्ण राग आईवर निघायचा..जेव्हा मी मोठी होऊ लागले तेव्हा त्यांचा राग माझ्यावर येऊन पडला आणि मार खान आता नित्याचंच झालं.. बाबा झोपलेले असताना मी सकाळी लवकर उठून कॉलेजला येते ..मी आजही फक्त माझ्या आईमुळे सजून येऊ शकले..मी तुझी नजर कशी रोखून होते हे मलाच माहिती ..आज खरच फ्री झाल्यासारखं वाटत आहे ..

सांग ना देशील तू मला साथ ??

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला कोणीच तुझ्यापासून वेगळं करू शकत नाही हे माझं तुला वचन आहे अस म्हणताच तिने मला लगेच मिठी मारली .. काही क्षण आम्ही दोघही तसेच होतो..वेळेचं भान नव्हतं की समाजाच बंधन ... तिच्या मिठीने आमच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग त्या निसर्गाच्या सानिध्यात रचला गेला ..
शेवटच्या सत्राचे पेपर संपले आणि पुन्हा भेटत राहू असं वचन घेऊन आम्ही सर्वजण घराकडे निघालो..श्रेयसी आणि माझ्यासाठी फक्त हे दोन महिने जड जाणार होते कारण त्यानंतर ती आणि मी यूपीएससी करायला पुण्यात जाणार होतो .. शेवटी एकमेकांना आलिंगन दिलं आणि आमच्या पहिल्या टप्प्याचा इथेच शेवट झाला ..
हे दोन महिने मला फारच अवघड गेले ..सकाळी बाबांसोबत शेतात काम करायचों पण सायंकाळी श्रेयसीची ओढ मात्र राहू देत नव्हती. तिला भेटण्याची खूप इच्छा व्हायची पण तिच्याशी बोलायचे कसे , भेटायचं कुठे हा मात्र खूप मोठा प्रश्न होता .. शिवाय तिचा प्रॉपर पत्ता देखील मला माहिती नव्हता ..तिच्या बाबांच्या तापट स्वभावामुळे घरापर्यंत ओळखी असेल असा एक सुद्धा मित्र तिला नव्हता .. त्यामुळे प्रत्येक दिवस मोजून काढावा लागला.. दोन महिने संपले आणि आमचा रिझल्ट लागला माझ एग्रीगेट 83च तर तीच 80 होतं ..
निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो.. खरे तर भेटायचं श्रेयसीला होत..तिथे पोहोचल्या - पोहोचल्या सर्व मित्रांनी मनभरून शुभेच्छा दिल्या त्यामुळे मनातून खूप आनंद होत होता पण नजर आताही तिला शोधत होती.. तेव्हाच तिथे एक मुलगा आला .. मी त्याला ओळखत नव्हतो पण बहुदा तो मला ओळखत असावा.. तो जवळ आला आणि म्हणाला , " तुम्ही विश्वास दादाच ना श्रेयसीचे मित्र " ..
मी अगदीच व्याकुळतेने हो म्हणालो ..
व्याकुळता यासाठी की तो श्रेयसी बद्दल बोलत होता.. आता तो जे काही बोलणार होता त्यामुळे माझ संपूर्ण आयुष्यच बदलणार होत..मी काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिलो..त्याचे पुढचे शब्द होते , " मग दादा तुम्ही तिच्या लग्नाला का नाही आलात ? "
" काय गंमत नको करूस मित्रा ", मी रागावून म्हणालो ...
तो मला पुढे म्हणाला , " हो दादा तिच पंधरा दिवसाआधीच लग्न झालं का तुम्हाला माहिती नाही ?"
आता माझा टॉपर येण्याचा सर्व आनंद कुठेतरी दूर पळून गेला.. पाय लडखडू लागले , अश्रु कसेबसे आवरत जायला निघालो .. वाटेत जात असताना सर्वच मित्र विश करत होते पण माझं त्यांच्याकडे कदापी लक्ष नव्हतं.. घरी केव्हा जातोय याची घाई मला त्यावेळी झालेली होती.. शेवटी घरी पोहोचलो.. पाहतो तर आई-बाबा देखील आज घरीच होते .. मला खूप रडायचं होतं पण ती संधी देखील मला मिळाली नाही उलट मला त्यांच्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली ।।असंख्य प्रश्न मनात होते आणि ते मनात साठवतच संपूर्ण दिवस काढला.. रात्रीची 11 ची वेळ होती.. आई-बाबा झोपी गेले. मी बाहेर आलो .. मला पडलेल्या असंख्य प्रश्नाच उत्तर एकच होत मन भरुन रडून घेन आणि त्या क्षणी मी ते केलं ..रात्र सरत होती आणि मी तिला जागून साथ देऊ लागलो .

पास आये
दुरीया फिर भी कम ना हुइ
एक अधुरी सी हमारी कहाणी रही
आसमा को जमीन ये जरुरी नही
जा मिले , जा मिले
ईश्क सच्चा वही
जीसको मिलती नही मंजिले , मंजिले ..

रंग थे , नूर था
जब करिब तू था
एक जन्नत स था , ये जहा
वक्त की रेत पर कुछ मेरे नाम सा
लिख के छोड गया , तू कहा
हमारी अधुरी कहाणी
हमारी अधुरी कहाणी

खुसबुओ से 'तेरी युही टकरा गये
चलते , चलत देखो ना , हम कहा आ गए
जन्नते अगर यही
तू दिखे क्यू नही
चांद सुरज सभी है यहा
इंतजार सदियो से कर रहा
प्यासी बैठी है कब से यहा

हमारी अधुरी कहाणी
हमारी अधुरी कहाणी
हमारी अधुरी कहाणी
हमारी अधुरी कहाणी

प्यास का ये सफर खत्म हो जायेगा
कुछ अधुरा सा जो था पुरा हो जायेगा
झुक गया आसमा
मिल गये दो जहा
हर तरफ मिलन का समा
डोलीया है सजी खुशबूए हर कही
पढणे आया खुदा खुद यहा

हमारी अधुरी कहाणी
हमारी अधुरी कहाणी
हमारी अधुरी कहाणी
हमारी अधुरी कहाणी

सर्व विचार देखील आता स्पष्ट झाले होते आणि त्यातूनच विश्वासघात शब्द बाहेर आला .. श्रेयसिने आपल्याला दिलेलं वचन मोडलं ..आपण केवळ गरीब आहोत म्हणून तिने आपल्याला स्वीकारलं नाही.. तिने आपला विश्वास घात केला .. मग यावर उपाय काय तर तिला तिची जागा दाखवणे ..आज पूर्ण रात्र मी जागाच होतो ..उठल्याउठल्या आईने तुझे डोळे लाल का आहेत असं विचारलं ..मी मात्र हेकटपणे उत्तर द्यायला लागलो व तिथून निघून गेलो.. आता फक्त मनात एकच विचार होता तो म्हणजे तिला जागा दाखविणे आणि त्यासाठी यूपीएससी करायला पुण्याला जाण भाग होतं .. पुणे आता माझ्या जीवनाचा अट्टहास झाला.. शेवटी एका हफत्यात टीसी मिळाली आणि छान मार्क्स असल्यामुळे पुण्याच उत्तम कॉलेज अर्थशास्त्रासाठी मिळाल आणि तिथे प्रवेश मिळताच मी एका हाफत्यात तेथे दाखल झालो ...
आता माझ्या नवीन आयुष्याला देखील सुरुवात झाली ..पण त्या आयुष्यात श्रेयसी मात्र कुठेच नव्हती .. विश्वास होताच पण तोही पूर्णतः बदललेला ..या काळात घरच्यांशी मी एक शब्द देखील चांगला बोललो नव्हतो .. कॉलेजला प्रवेश मिळाल्यापासून मी तिथे लवकरच रुळलो आणि आधीच्या विश्वासला पुन्हा विसरू लागलो .. जुना एकही व्यक्ती मला आता माझ्या आयुष्यात नको होता.. सर्व काही बदलल होत फक्त उद्देश तोच होता काहीतरी होऊन तिला धडा शिकवण आणि त्यासाठी मी निरंतर प्रयत्न सुरु केले ...
ह्या सुरुवातीच्या काळात पदवीमधली ती जुनी शैली पूर्णता विसरायच ठरवल आणि केवळ अभ्यास हाच घटक महत्त्वपूर्ण बदल बनत गेला मात्र पैशाची गरज म्हणून कधीकधी वाद-विवाद , वक्तृत्व स्पर्धा होत राहिल्या .. पण अभ्यास एवढा वाढला होता की तिथे देखील माझ्या कर्तृत्वाची दखल सर्वांना घ्यावी लागली.. ओळख वाढली तसं तिथेदेखील नाव व्हायला लागल पण आता घमंड हा शब्द माझ्या प्रत्येक शब्दात जाणवत होता फक्त तो काही लोकांसाठीच होता हे मात्र विशेष ..
पी.जी.च्या या दोन वर्षाच्या काळात आमचा सहा मित्रांचा ग्रुप मधला ..मानसी, मेघा , शर्वरी , वात्सल्य , प्रदीप आणि मी असे सहा जण ..त्यातली शर्वरी सोडली तर बाकी सर्वच संपन्न अशा कुटुंबातील होते .. या सहा मधून मानसी , प्रदीप आणि वात्सल्य हे तिघे आधीच मित्र होते आणि बाकी आम्ही आमचा स्वभाव आणि कर्तुत्व यांच्या जोरावर एकमेकांशी जोडल्या गेलो ..सर्वात टॅलेंटेड ग्रुप म्हणून आमची ओळख निर्माण झाली.. आणि ती कॉलेज संपल्यावर तशीच आहे असं आज अधून-मधून सर लोक सांगतात ..
तिघांचेही द युनिक अकॅडमी मध्ये क्लास होते .. त्यामुळे त्यानी सर्वांनाच नोट्स पासून तर सर्व गोष्टींमध्ये मदत केली ..बारा-पंधरा तास अभ्यास, चर्चा आणि इंटरव्यू या सर्वांची जय्यत तयारी सुरू झाली . कॉलेजच्या शेवटच्या भाषणामध्ये सर्व सरांनी आमचं मन भरून कौतुक केलं होतं आणि पुढील आयुष्यासाठी मनभरून शुभेच्छा दिल्या..
या दोन वर्षांमध्ये काही गोष्टी अपेक्षितच घडल्या त्यातली एक म्हणजे शर्वरीच मला प्रपोज करण. मुळात मला आता प्रेमाचा राग होता पण हसुन स्वतःला सावरन आता मला बऱ्यापैकी जमलं होतं..त्यामुळे आमचा ग्रुप कधीच सुटला नाही आणि आजतागयत तो कायम आहे .. विश्वास मध्ये आता फार बदल झाला होता.. तेव्हा मी असं म्हणू शकतो की खेड्यात राहणारा विश्वास आता डॅशिंग झाला होता म्हणूनच तो आता सर्व मुलींना जास्त आवडू लागला होता ..
दोन वर्षाचा काळ देखील पूर्ण झाला ..आमच्या सर्वांच्याच मेहनतीला फळ आलं होतं आणि त्या वर्षी आम्ही सहाच्या सहा पण चांगल्या पदावर लागलो .. नोकरी लागल्याच्या सहा महिन्याच्या आतच मेघ आणि प्रदीपच लग्न झालं.. फर्स्ट सक्सेसफुल कपल ऑफ अवर ग्रुप अस आम्ही त्यांचं नामकरण केलं ..
मी आयपीएस झाल्यापासून दोन वर्ष माझी कार्यकिर्द अधिकच गाजली .. त्यामुळे दिवस-रात्र काम करणारा आयपीएस ऑफिसर म्हणून माझं नाव लौकिक झालं .. मुळात मी शेतकरी कुटुंबातला असल्याने समाजाबद्दल प्रेम आणि आपली जबाबदारी हे घरूनच मिळाल होत . त्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत आणि गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आपल समानतेच धोरण अधिकच गाजल.. जिथे समाजासाठी एवढं करत होतो तिथे घरच्यांशी साधं बोलणं देखील होत नव्हतं ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल.. शेवटी यूपीएससी साठी दिलेले तीन वर्ष आणि माझी कार्यकिर्द असे 2 वर्ष एकूण पाच वर्षांनी आज मी घरी जाणार होतो..या सर्व काळात मी सामंजस्याने वागायला लागलो होतो हा एक बद्दलच म्हणावं लागेल ..पी.जी. ला असणाऱ्या विश्वासमध्ये पून्हा एकदा थोडासा बदलू घडू लागला होता ..
आज पाच वर्षांनी मी घरी येणार होतो..सोबत होत अपरंपार यश पण मन मात्र बेचैन होत.. या शहराने दिलेला त्रास आज मला जसाच्या तसा आठवत होता..ट्रेनमधून मागे जाणार प्रत्येक झाड मला आठवणीच्या कप्प्यात घेऊन जात होतं आणि मी कठोर होऊ लागले .. ट्रेनमधून उतरलो.. तस तर मला आज घरी जायचं असतं पण का माहिती नाही पावले श्रेयसिच्या घराकडे वळतात..मला तिच्या घराचा पत्ता माहिती नसतो पण तो एरिया माहिती असतो.. शेवटी लोकांना पत्ता विचारून मी तिच्या घरासमोर हजर होतो ..कॉलर वर करून निधड्या छातीने मी तिच्या घरासमोर जातो..घरात डोकावून पाहतो तर कोणी दिसत नाही .. शेवटी आवाज मारतो आणि तिची आई बाहेर येते ..काकू मला घरात बोलावतात , पाणी वगैरे दिल्या जात ..माझी नजर आताही तिलाच शोधत असते.. इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा मला तिचा फोटो भिंतीवर लटकवलेला दिसतो आणि राग नसानसात भिनल्या जातो..
आता तिची आई बोलू लागते " बेटा तू कोण ? मी तुला ओळखलं नाही ? "
" काकू मी विश्वास ." , गर्विष्ठ आवाजात बोलून गेलो ..

नाव ऐकताच काकूंच्या डोळ्यातून काही अश्रू बाहेर पडतात.. मला तेव्हा काहीच कळत नाही पण तरीही आईचे अश्रू पुसणे हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आणि मी ते पार पडतो..
" काकू काय झालं ? ", असे केविलवाणे शब्द माझ्या तोंडून आपोआप बाहेर येतात आणि नंतरची हकीकत एकूण मी थक्क होत..
काकू बोलू लागतात , " विश्वास श्रेयसीची काहीच चूक नव्हती रे !! ती कॉलेज करून घरी आली आणि अचानक तिच्या वडिलांनी तिचं लग्न आपल्या मित्राच्या मुलाशी जाहीर केल.. तिने त्या गोष्टीचाही विरोध केला.. एवढेच नाही तर तिने सांगितलं कि ती तुझ्यावर प्रेम करते आणि ती घर सोडून तुझ्याकडे येणार देखील होती..मला आठवतंय ती निघाली आणि तिचे बाबा जमिनीवर कोसळले ..त्यांना दम्याचा त्रास होता त्यामुळे अचानक दम्याचा झटका आला ..आणि पुन्हा ती वळाली .. हॉस्पिटल ला असताना वडीलांनी औषध घेण्यास मनाई केली..शेवटी तिला त्यांच्या हट्टा समोर झुकावं लागलं .. ती आपल्या वडिलांची मनोभावे सेवा करू लागली ..बाबाच्या परत्या काळात तिने त्यांना लग्न करण्याचं वचन दिलं आणि नंतरच ते गोळ्या वगैरे घेऊ लागले ..तिचं तुझ्यावर खूप प्रेम होतं पण वडिलांच्या प्रेमाखातर तुझं प्रेम त्यागाव लागलं ..एखाद्या मुलीला वडिलांच्या प्रेमासाठी यापेक्षा मोठं काय करता येणार होतं तूच सांग ? "
मी धीरगंभीर पणे सर्व एकत होतो आणि एकता- एकता डोळ्यात अश्रू केव्हा आले ते देखील कळलं नाही ..आज ते अश्रू नव्हते , तो होता पश्चाताप .. काकू काही समोर बोलणार तेवढ्यातच ते अश्रू घेऊन मी जायला निघालो.. डोळ्यात अश्रू होते पण ते दुःखाचे नसून आनंदाचे होते ।। कित्येक वेळा वडिलांच प्रेम सोडून पळून जाणाऱ्या मुली पाहिल्या होत्या पण स्वतः दुःख पचवून वडिलांना आनंद देणारी पहिलीच मुलगी आज बघितली होती .. त्यामुळे तो आनंद होता.. आज कळत होतं की वडिलांची माया काय असते आणि त्यांच्यासाठी जगणारे किती खुशनसीब असतात ..डोळ्यावरून हात फिरवत बाहेर निघालो आणि श्रेयस ची भेट व्हावी..तिच्याशी नजरानजर व्हावी आणि परिस्थिती क्षणात बदलली..माझे अश्रू तिच्या डोळ्यात होते आणि तिचा आनंद माझ्या चेहऱ्यावर.. विश्वासचा आपण विश्वासघात केला असा तिचा विश्वास तर मी किती चुकीचा होतो ही माझी भावना ..काही क्षण तिच्याकडे पाहत होतो पण का कळेना मी तिथून तिच्याशी न बोलताच निघून गेलो ..

कुछ तो जरूर होगा
इस मोहब्बत मे
युही नही हर कोई
दिवाना सो हुआ जाता है

क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED