आज श्रेयसीमुळे मी माझ्या आई - वडिलांचं माझ्याप्रति असलेलं प्रेम समजू शकलो होतो ..गेल्या - गेलीच त्यांना आलिंगन दिलं आणि समाधान म्हणजे नेमकं काय याच उत्तर मला त्याक्षणी मिळालं ..तो संपूर्ण दिवस मी त्यांच्यासोबतच होतो ..मागील 5 वर्षात घालवलेले प्रत्येक क्षण त्यांना सांगत होतो आणि माझ्यापेक्षाही जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहत होतो ..आईनेही सर्व काही माझ्या आवडीचच बनवलं होत आणि खूप दिवसाने ते समाधानाने झोपी गेले होते ..
गावाकडचं वातावरण आणि रात्रीची निरागसता मी खूप दिवसांनी पाहत होतो .. रात्रीची पुन्हा 11ची वेळ मात्र परिस्थिती वेगळी होती ..आज प्रत्येक क्षण आनंदाने आठवत होतो .. त्याच्यावेळी लँडलाइनवर कॉल आला.. मी तो कॉल उचलला पण समोरून कुणीच बोलत नव्हत.. काही वेळाने रडण्याचा आवाज आला तो आवाज होता श्रेयसीचा ..माझ्या तोंडून श्रेयसी हे नाव ऐकताच ती पुन्हा जोराजोराने रडु लागली .. ती प्रत्येक वेळेला फक्त सॉरी हाच शब्द म्हणत होती .. मग मीच पुढाकार घेतला आणि म्हणालो , " काहीपण का !! झालं ते सोड मला तुझा मुळीच राग नाही . " आणि बोलता बोलता ती केव्हा हसायला लागली ते देखील तिला कळालं नाही ..आज जवळजवळ दोन तास आम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत होतो शेवटी वेळेच भान राखून उद्या दुपारी अकरा वाजता आमच्या आवडत्या रेस्टॉरंट ला भेटायचं ठरलं..रात्री तीन वाजता कशीबशी झोप लागली आणि सहा वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणेच उठलो..आज सकाळपासूनच घड्याळीकडे पाहत होतो पण वेळ काही जाईना.. तिला भेटायला जायचं म्हणून सकाळी सर्व कामे आटोपून घेतली आणि नेहमीप्रमाणे अगदी वेळेवरच तयार होऊन निघालो ..असा भेटण्याची वेळ अकरा वाजताची होती परंतु मी साडेदहा वाजता तिथे पोहोचलो ..
ती मला भेटायचं असेल त्यावेळेला नेहमीच उशिरा येत असे मात्र या वेळेला सर्वच उलट घडलंं .. ती माझ्या आधीच तिथे पोहोचली होती.. मी तिथे पोहोचतो तेव्हाच तिच्या दोन वर्षाच्या मुलीने येऊन मला मिठी मारली ..आज मी तिला पहिल्यांदाच भेटलो होतो पण का माहिती नाही ती मला माझी वाटली ..त्या परी ला चॉकलेट दिल आणि मग त्या क्षणापासून ती संपूर्ण वेळ माझ्यासोबत होती ...सुरुवातीचे काही क्षण अगदी शांततेत गेले.. तेवढ्यात वेटर आला आणि ऑर्डर मागवु लागला.. मी तिला ऑर्डर देण्याची विनंती केली पण तिने सर्व पुन्हा एकदा माझ्यावर ढकललं .आम्हा दोघांचीही आवडती गोष्ट म्हणजे दोसा त्यासोबतच हिरवी चटणी म्हणजे तिचा जीव की प्राण.. दोसा ऑर्डर देताच ती माझ्याकडे पाहू लागली ..काही क्षण माझ्याकडे पाहून ती मला म्हणाली ," आजही आठवत मला काय आवडतं तर. "
मी हसून तिला म्हणालो , " आठवण्यासाठी विसरावं लागतं मॅडम ." आणि ती किंचित हसली..या क्षणापासून आमच्यातला अबोला तुटला आणि बोलण्यास सुरुवात झाली
आज ती आपल्या स्वभावाच्या विरुद्ध म्हणजेच खूप जास्त बोलत होती ..एरव्ही तिला शांत राहणं जास्त आवडायचं ..तिच्या बोलण्यावरुन वाटत होतं की तिला मला खूप काही सांगायच होतं आणि तिने सुरुवात केली , " मान्य आहे विश्वास की मी बाबांना लग्नाच वचन दिले पण कुणालाच माझी सहमती घ्यावी अस वाटलं नाही ?.. गाय गोठ्यात जशी बांधली जावी तस मला बांधल्यां गेलं ..माझं लग्नही अगदी सस्पेन्स पद्धतीने झालं ..ना मित्र , ना नातेवाईक ..एक स्वप्नसुद्धा जगता नाही आलं .. माझं मन त्याहीवेळी तुझ्याकडेच होतं ..सतत वाटायचं तुझ्याकडे निघून यावं पण दिलेल्या वचनाची आठवण व्हायची आणि मग स्वतःच स्वतःला सावरून घ्याव लागायचं .. माझं लग्न ज्याच्याशी झालं तो म्हणजे दीपक .. दीपक दिसायला देखणा , हुशार पण का कळेना मी त्याच्याकडे तुझ्यासारखी आकर्षिल्या गेले नाही ..सुरुवातीला तर मी त्याच्यापासून दूर पडायचे..घरचे छान होते पण का माहिती नाही एक अनामिक भीती मला सतत वाटत असायची.शेवटी नको होतं तेच झालं ..मला माझं शरीर दीपकच्या स्वाधीन करावं लागलं ..असं वाटायचं हा तर माझा छळ आहे कारण माझं मन तुझ्याकडे होत ..तरीही मी काहीच करू शकले नाही . दिवस जात होते आणि मी आता ठरवलं की शरीर त्याच आहेच मग मन का असू नये ? कारण आता संपूर्ण आयुष्य तर त्याच्या सोबतच घालवायच आहे आणि मी त्या तयारीला लागले होते..तो आणि मी एक होत होतो मग ते नाईलाजाने का असेना.. आता मीही तुला विसरायचा प्रयत्न करू लागले आणि ते सोपं नसल तरी सर्वांच्या सहवासात मात्र ते जाणवत नव्हतं ..
आमच्या लग्नाला आठ महिने झाले होते अशाच एका दुपारी मला अनोळखी नंबर वरून फोन आला आणि आतापर्यंत जे मिळवलं होतं , जे स्वीकारलं होतं ते सर्व काही संपलं.. तो फोन होता दीपकचा अपघातात मृत्यू होण्याचा..हे एकताच मी जमिनीवर कोसळले.. तेव्हा माझ्या पोटात केतकी होती ..मी खाली पडताच घरचे धावून आले आणि फोन हातात घेताच सर्वांवर दुःखाच पहाड कोसळल.. शेवटी सर्वांनी मला सावरुन घेतलं ..माझी स्थिती काहीशी ठीक नव्हती ..दिपकला गाडीतून घरी आणण्यात आल.. दीपक माझ्या समोर अंगणात निपचित पडून होता ..मी त्याला उठवण्याचे बरेच प्रयत्न केले पण तो माझ काहीच एकत नव्हता..काही वेळात तो शेवटच्या प्रवासाला निघाला .त्याने सर्वाना दुःखाच्या डोंगरात सोडलं आणि एकटाच निघून गेला ..अंतिम संस्कार झाले तेव्हा मी खूप वेळ तिथेच बसून होते.. अगदी एकटीच ..तशी घरची स्थिती नाजूक होती पण मला आणि माझ्या बाळासाठी त्यांनी आनंदी राहण्यास सुरुवात केली..मी जरी त्यांची सून असले तरीही मला त्यांची मुलगी म्हणून मान्यता मिळाली .. मी काही दिवस ही बातमी बाबांना सांगितली नाही पण त्यांना अचानक बातमी कळावी आणि लगेच पंधरा दिवसात बाबा देखील हे जग सोडून गेले ..आयुष्यभर कुणाचं न ऐकणाऱ्या व्यक्तीला पश्चातापाचा असा धक्का बसला कि ते जगच सोडून गेले .. माझ्यावर पुन्हा एक मोठा अपघात झाला होता तरी माझ्या बाळासाठी तो मी पचवला
4 महिन्यांनी मला केतकी झाली आणि माझे आयुष्य बदलल. मी तिच्या आनंदासाठी जगू लागले..ती जशिजशी मोठी होऊ लागली तिला बघूनच दिवस घालवू लागले .. त्यावेळी स्वतःला व्यस्त राहता यावं म्हणून जॉब देखील करू लागले .. मागच्या काही दिवसांपासून तुझ्याबद्दल ऐकायला मिळत होत पण तुला फोन करण्याची हिंमत मात्र कधीच झाली नाही ..हाच माझ्या आयुष्याचा एक भाग आहे खरच खूप खूप सॉरी..खूप दिवसापासून हे तुला सांगायचं होत ..आज खूप मोकळं वाटत आहे ."
श्रेयसी हे सर्व सांगत होती तेव्हा तिच्या डोळ्यातून एक अश्रू देखील पडला नव्हता.. हा गुण मी आधी देखील तिच्यात बघितला होता पण यावेळी गोष्ट काही वेगळीच होती .. खरं तर पुन्हा एकदा मला आज तिचा अभिमान वाटत होता ..आज मला पुन्हा एकदा माझ्या निवडीवर अभिमान वाटत होता कारण मी योग्य मुलीवर प्रेम केलं होतं...सरतेशेवटी मी तिच्याकडून प्रॉमिस घेतलं की तू स्वतःला कधीच त्रास करून घेणार नाहीस आणि तिच्याकडून होकार मिळविल्यावरच मी शांत बसलो . "
सकाळची वेळ असल्याने तिथे आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते ..आम्हाला भेटून काही वेळच झाला होता पण ती जायला निघाली .. ती निघाली तेव्हाच मी तिला आवाज दिला पण यावेळी माझी मान मात्र खाली होती ..आणि तोंडून शब्द आले , " कॅन आय हग तू डिअर ? "
आज मला पहिल्यांदाच तिची खूप भीती वाटत होती पण तिने पुन्हा एकदा मला चुकीच ठरवल आणि अलगद येऊन मिठी मारली आणि म्हणाली , "पागल घाबरतोस कशाला तू आजही माझ्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे ,"
आणि ती गेली...मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहत होतो पण तरीही तिला पाहण्याची ओढ मात्र कमी होईना ..ती गेली पण खूप सारे अनुभव आणि आठवणी देऊन..आज श्रेयसीच खरंच खूप कौतुक वाटत होतं आणि तिला पाहून जणू वाटायला लागल
ये हौसला कैसे झुके
ये आरजू कैसे रुके
मंजिल मुश्किल तो क्या
धुंदला साहिल तो क्या
तन्हा ये दिलं तो क्या
ये हौसला कैसे झुके
ये आरजू कैसे झुके ..
आज श्रेयसीला पाहून जाणवलं की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केवळ स्त्रीच करू शकते ..स्त्री फक्त इमोशनल फुल नसते ही गोष्ट तिने सिद्ध करून दाखवली होती ..ती माझ्यासोबत असायची त्यावेळी खूप खुश असायची.. आता ती वरून मजबूत वाटत असली तरी आत मधून पार खचून गेली होती हे माझ्या शिवाय आणखी कोण चांगलं सांगू शकणार होतं ? ..तिला गरज होती ती आधाराची म्हणजे तिच्या मित्राची , विश्वासची आणि मी साथ तिला द्यायची ठरवली ..
सात दिवसाच्या माझ्या सुट्ट्या देखील संपल्या होत्या .. त्यामुळे पुन्हा एकदा नोकरीवर जाणं भाग पडलं।। मी नेहमीच माझ्या कामात व्यस्त राहत होतो पण आता वेळात वेळ काढून घरी आणि श्रेयसीला फोन करू लागलो .. तिची या काळात केतकीसाठी धडपड चालली होती.. मला जमेल तेव्हा मी कॉल करायचो आणि आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचो ..तीचा आनंदी राहण्याचा एक रस्ता म्हणजे केतकी ..मी तिला फोन करून आपल्या बोबड्या शब्दांमध्ये बोलायचो.. ती आनंदी असली की मग श्रेयसीदेखील आपोआपच आनंदी राहत असे त्यामुळे केतकी आनंदी राहणं फार गरजेचं होतं ..खरं तर मनातून मी तिला आपली मुलगीच मानत होतो पण तिला ती दया वाटू नये म्हणून पुन्हा एकदा तिचा विश्वास तेवढ्याच तत्परतेने मिळवण्याचा मी केविलवाणा प्रयत्न सुरू केला .. मात्र इकडे आई-बाबा थांबनार नव्हते ..त्यांना माझं लग्न बघायचं होतं.. मी काही काळ टाळाटाळ केली पण ते आता शक्य नव्हतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः चालून काहीच स्थळ येत होती ।। त्यामुळे घरच्यांनी देखील मला विचार करण्यास भाग पाडलं..हे सहा महिने माझ्या आयुष्याचे महत्त्वपूर्ण दिवस होते ..या काही दिवसात मी श्रेयसीच्या मनात घर करू शकलो होतो पण यावेळी ती पुढाकार घेणार नाही याची प्रचिती मला आली आणि शिवाय मीसुद्धा आता बेचैन होऊ लागलो होतो ..
मी सहा महिन्यांनी पुन्हा घरी परत आलो होतो पण यावेळी जास्त दिवसाच्या सुट्ट्या काढल्या होत्या ..श्रेयसी दोनदा घरीदेखील आली होती त्यामुळे घरचे तिला ओळखत होते .. आईजवळ बसलो आणि तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली.. काही क्षणांसाठी विचार देखील करण्यात आला पण त्यात मला आनंद मिळणार असल्याने शेवटी घरून देखील मला होकार मिळाला ..आता फक्त वाट होती तिच्या होकाराची आणि त्यासाठी मी सज्ज झालो..
दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता ची वेळ होती आणि त्यांच्या घरी पोहोचलो ..तेव्हा दार उघडल्या गेल आणि दीपकची छोटी बहीण घरातून बाहेर आली आणि मी काही बोलणार त्याआधीच ती आनंदाने गजबजली.. आपल्याकडे आयपीएस विश्वास आलेले आहेत अशी सर्वांना सांगत फिरू लागली .. मी आताही दारातच उभा होतो ..जेव्हा तिचे वडील आले तेव्हा त्यांनी मला आत घेतलं .. मी माझी ओळख करून दिली मी श्रेयसीचा मित्र विश्वास ..त्यांनी खूप छान आदरातिथ्य केलं ..त्यावेळी श्रेयसी बहुतेक घरी नव्हती ..मी विचारणा केली तेव्हा कळलं की ती परी ला घेऊन शॉपिंगसाठी गेली आहे ..माझ्या साठी अचूक संधी होती कारण तिच्या समोर बोलायची हिंमत मी नसतोच करू शकलो.. तिचे सासू-सासरे छान शिक्षित वाटत होते शिवाय तिला आई-वडिलांसारखंच जपत होते ..त्यामुळे ते माझी गोष्ट नक्की समजून घेतील असं वाटत होतं आणि शेवटी हिम्मत करून ती गोष्ट सांगायचं ठरवलं ..मी बोलायला लागलो ... त्यांना आधीची सर्व हकिकत सांगितली.. ती मंडळी आवाक होऊन ते सर्व ऐकत होती.. म्हटल की श्रेयसी कमजोर आहे तिला गरज आहे मैत्रीची , प्रेमाची आणि साथीची ..शिवाय पिल्लूला देखील हक्काच नात मिळेल ..मला माहित आहे की तुम्ही तिच्यासाठी खूप काही करत आहात.. मला देखील तिच्यासाठी काहीतरी करायच आहे ..मला ती संधी हवी आहे , मला नक्कीच विश्वास आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य असेल ..
आमचं बोलणं झालं आणि श्रेयसी आली..परीला भेटलो आणि मग घरी परतलो ..दोन दिवसानंतर श्रेयसी चा फोन आला आणि तिने मला भेटायला बोलवलं .. पुन्हा त्याच रेस्टॉरंटला आम्ही भेटलो ..तिच्या घरच्यांनी तिचा निर्णय विचारला होता आणि तिनेही तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल अशी ग्वाही दिली.. मनात भीती होती पण तिचा होकार कळाल्यानंतर मात्र सारं काही विसरून गेलो.. त्यावेळी आनंदाने उड्या मारावस वाटत होतं ..श्रेयसी आज पुन्हा एकदा माझी होईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा होता...
बडी मुद्दतो बाद
मिली है ये खुशीया
अब नही भरेगी
कभी मेरे सनम की अखिया ...
क्रमशः ...