बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - १ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - १

सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता ..विजांसकट तो झिम्मा फुगडी खेळत होता..त्यात अमावस्येची काळोखि रात्र किर्रर्र अंधार ...सयाजी गुडघ्या एवढ्या चिखलतना वाट काढत होता...धावतच होता... मोगली छावणी पासून जेवढ्या लवकर दूर पळता येईल तेवढे पळायचे होते..स्वराज्यावर अस्मानी संकट धावून येत होते..कोणाही मोगली सैनिकाच्या हाती लागू नये याची काळजी सयाजी घेत होता..धावता धावता पडत होता कि पडता पडता धावत होता...हात पायाला खरचटले होता...अंगावरचे कपडे पण ठीक ठिकाणी फाटले होते...अगदी कशाचेही त्याला भान नव्हते...काही करून लवकरात लवकर बहिर्जीना गाठायचे होते.

सयाजी...खबरचं अशी घेऊन आलं होता...ते ऐकून बहिर्जी चिंतेत पडले होते पण विचलित झाले नव्हते कारण त्यांना असे काहीतरी होणार याचा अंदाज होताच आणि राजांनीसुद्धा तयार राहण्यास सांगितले होते...तरी बहिर्जीनी पुन्हां पुन्हां सयाजीला विचारले...कारण अशी गोष्ट राज्यांच्या कानावर घालायची म्हणजे १००% खात्री हवी...नुसता अंदाज काही कामाचा नव्हता...आणि तशी खबर बहिर्जीनी पुढे सांगणारा ऐरा गैरा कोणीही नव्हता...बहिर्जीचा पट्टशिष्य होता..आणि चुकीच्या माहितीसाठी कडेलोटाची सजा सयाजीला ठाऊक होती...तेवढ्यात बहिर्जीनीचा अजून एक हेर धावतच आला ..दख्खनला असलेल्या अनेक मोगली छावणीतुन मोट्ठ्या लढाईसाठी तयारी चालू असल्याची पक्की खबर त्याने आणली होती...राजे आता कुठे असतील याचा अंदाज लावत बहिर्जीनी आपला घोडा बेफाम सोडला होता...

राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात राजे आपल्या काही निवडक सैनिकांसोबत स्वराज्यावर करडी पण मायेची नजर फिरवत होते .. सोनपिवळी शेती वाऱ्यावर डोलत होती... नुकताच पाऊस पडून गेला होता..बिनघोर शेतीची कामे चालली होती ...आता मोगलांचे भय राहिले नव्हते.. बाया बापड्या आपल्या राजाला बघून दोन्ही हातांची बोट डोईवर कडाकडा मोडत होती..त्यांचे आशिर्वाद राजांच्या पाठी उभे राहत होते...समोर आलेले भवानी मातेचे देऊळ पाहताच राजे घोड्यावरुन खाली उतरले आणि देवळात भवानी मातेकडे स्वराज्यासाठी सुख: मागणार तेवढ्यात तिथे भगवी वस्त्रे परिधान केलेला.. कपाळावर केशरी गंध ..काळ्याभोर जटा आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असलेला ..भरभक्कम शरीराचा..एक योगी हातात चिमटा घेऊन उभा राहिला...तेव्हा राज्यांच्या काही सरदारांनी त्याला भिक्षा म्हणुन काही द्रव्य देऊ केले पण त्याने ते घेण्यास स्पष्ट नकार दिला...आणि राजांना आशिर्वाद देऊ लागला..एखादा योगी, साधू-संत,फकीर खाली हाताने राजे परत पाठवत नाही हे त्या योग्याला ठाऊक होते...आणि बरॊबर त्या अंदाजाप्रमाणे राजे स्वतः घोड्यावरून उतरुन त्या योग्याजवळ आले...आणि त्या योग्याने राजांना आशीर्वाद देता देता... "जगदंब .. जगदंब.. जगदंब" हा परवलीचा शब्द उच्चारला...ते ऐकताच राजांना कळून चुकले ...हे दुसरे तिसरे कोणी नसुन " बहिर्जी नाईक " आहेत...काहीतरी नक्कीच म्हत्वाची खबर असल्याशिवाय "जगदंब .. जगदंब.. जगदंब" हा परवलीचा शब्द उच्चारणार नाहीत...

सैनिकांना काही अंतरावर थांबायला सांगून राजे त्या योग्याबरोबर बोलण्यासाठी उभे राहिले... बहिर्जी सांगू लागले... " राजे औरंग्याच्या सुरतेवरची थप्पड...त्याच्या जिव्हारी लागली आहे...स्वराज्य मातीमोल करायला औरंग्याचे दोन सरदार येत आहेत ...लाखो सैन्य, हत्ती, घोडे ...दख्खनचा हवा तेवढा खजिना त्यांच्या दिमतीला दिला आहे...त्यांच्या विनंतीवरून औरंगजेबाने त्यांचे कैदी नगर, परिंडा अशा मोठय़ा किल्य्यात ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे..त्यांपैकी एका सरदाराला स्वत:च्या अंगातील कबा व गळ्यातील मोत्याचा कंठा आपल्या हातांनी दिला आहे...त्या सरदाराने हि आपल्या यशासाठी धार्मिक आणि तांत्रिक विधी करवून घेतले आहे..आणि स्वतःहि ते रणधुरंदर आहेत...इतर मोगली सरदारांसारखे नाहीत ते...सत्ता,पैसा,हिरे,मोती सर्व सर्व गौण आहेत त्यांच्यासाठी..औरंगजेबाचे पिढीजात एकनिष्ठ चाकर आहेत ते..'' राजांनी विचारले बहिर्जी " आपला काय अंदाज किती वेळ आहे आपल्याकडे तयारीसाठी...२० ते २५ दिवस...बहिर्जी नि आपला अंदाज सांगतीला....मोगली आक्रमण येणार ह्याची राजांना जाणीव होती पण खुद्द हा सेनानी येईल हि कल्पना हि त्यानी केली नव्हती...
स्वराज्याचा घास घ्यायाला कळिकाळाने राहू केतू पाठविले होते...आणि ते हि जिभल्या चाटत चाटत...तुफानाच्या वेगाने सुटले होता...त्यातला एक होता औरंगजेबाच्या खास मर्जीतील दिलेरखान आणि दुसरे मिर्झाराजे जयसिंग....

क्रमशः