BAHIRJI NAIK AANI AAGRAYHUN SUTKA - 5 books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ५  

मजल दरमजल करीत राजे आणि सारा लवाजमा आग्रा शहराजवळ पोहचला...तारीख होती ११ मे १६६६..मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिह यांच्याकडे राजांची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली होती..१२ मे १६६६. औरंगजेबाचा वाढदिवस होता..आधी ठरविल्याप्रमाणे रामसिह राजांना येऊन भेटणार होता..पण रामसिहाकडे ऐनवेळेला औरंगजेबाने दुसरे काम सोपवले आणि रामसिहाने आपला मुन्शी गिरधारलाल याला राजांचे स्वागत करण्यासाठी पाठवले..आपल्या स्वागतासाठी एक साधा कारकून यावा हे महाराजांना खटकलं..आणि पुढे त्यांची आणि रामसिह यांची चुकामुक झाली..झाली का करवली गेली ??? औरंगजेबच तो...राजांचा बसता उठता त्याला अपमान करायचा होता..पण राजे सुद्धा आपल्या स्वराज्यासाठी सर्व सहन करत होते...आणि त्याची अशी इच्छा असावी..राजे आणि शंभु राजे मुद्दामुन उशीरा दरबारात यावेत.. का तर साऱ्या दरबाराला आणि दुनियेला पाहुंदे...हा शिवा आणि सह्याद्री या औरंगजेबासमोर कसे झुकले...सर्व दुनियेत चर्चा होऊंदे हा बुलंद पत्थरांचा राजगड या लाल किल्ल्यासमोर झुकला..

राजांना घेऊन मुन्शी गिरधारलाल जेव्हा लाल किल्ल्यासमोर पोहचला तेव्हा टळटळीत दुपार झाली होती...राजे किल्ल्यात प्रवेश करणार तेवढ्यात मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिह धावतच आला...आणि झालेल्या प्रकारची क्षमा मागू लागला...आगत स्वागत करून राजे किल्ल्याचा दरवाजातून आत प्रवेश करणार... इतक्यात तिथल्या सैनिकांनी राजांना आणि त्यांच्या माणसांनकडून सर्व शस्त्रात्रे काढून घेतली..औरंगजेबाच्या एका शिपायाने साक्षात भवानी तरवारीला हात घालावा ?? राजांच्या मस्तकावरील एकूण एक शीर फुगून गेली...पण झालेला प्रकार लक्षात येऊन रामसिहाने तो एक रिवाज असल्याचे सांगून राजांना शांत केले???

राजे जिथे औरंगजेब बसला होते तिथे आले...कंदहार पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेले मोगली साम्राज्याचा आब त्याला राजांना दाखवयाचा होता..
राजे दरबारात प्रवेश करते झाले आणि सर्व दरबाराला मोठया आवाजात सूचित करण्यात आले.. "दख्खन के जमीदार शिवाजी भोसले तशरीफ ला रे है..होशियार"..आणि आपसूक सर्वांच्या नजरा राजांनकडे वळल्या..सावळे रूप..अदमासे पाच ते सडे पाच उंची..कपाळावर ऊभे शिवगंध..तेजस्वी डोळे..चालण्यात एक प्रकारचा आब..दरबारांत दबक्या आवाजात कुजबुज चालू झाली..." यही है वो शिवाजी..जिसने आलमपनाह औरंगजेब
कि निंद उडा रखी है..क्या है ये शिवा पडद्याच्या आडून पण मोगली स्त्रियांची वाढलेली लगबग औरंगजेबच्या नजरेतुन सुटली नाही... औरंगजेबाने आपला जपमाळ असलेला उजवा हात वर केला...तास दरबार शांत झाला ..

औरंगजेबासमोर येऊन राजांनी आणि शंभू राजांनी तीन वेळा कुर्निसात बजावला....पण औरंगजेबाने जराही लक्ष दिले नाही...राजांनी आणि शंभू राजांनी दरबारीं रीतीरिवाजांप्रमाणे औरंगजेबाला वाढदिवसानिम्मित आणलेला नजराणा पेश केला..आणि तिथे त्याच्याकडे बघितल्या न बघितल्या सारखे करून रामसिह ला सांगितले " इन्हे अपने जागे पर खडा कर दो"...तेव्हा राजांना पंचहजारी मनसबदारांच्या रांगेत उभे केले गेले..आणि नंतर बादशाहाने एकमागोमाग एक अशा चौघा बड्या दरबाऱ्यांना मानाची खिलत (आहेर) सुपूर्द केली..राजांना मात्र त्याने मुद्दामुन वगळले.. आणि तेवढ्यात राजांची नजर आपल्या समोर असलेल्या जोधपूरचा जसवंतसिंहाकडे गेली...आणि तेवढ्यात तळपायांची आग मस्तकांत गेली...वीज पडून सहयाद्रीचा अभेद्य कडा प्रचंड गडगडाट करत कोसळवा तसे महाराज गर्जले..

" रामसिह ये हमारे सामने कौन खडा है ??? ... झालेल्या प्रकाराने रामसिह पुरता गोंधळून गेला होता..तो धावतच राजांकडे आला आणि अदबीने बोलू लागला..." ये जोधपूरके महाराजा जसवंतसिंह"...पण रामसिहाचे बोलणे मध्ये तोडत राजे मोठ्या आवाजात बोलले.. "ये वो ही है ना जिसने हमारे जाबाज
सिपाहयोको पिठ दिखाई थी.. ये भगौडा आज हमारे सामने खडा है..इसके पीठ पर आज भी मेरे जाबाज सिपाहयोकी समशेर कि जख्म दिखाई देंगे और ये हमें किधर खडा किया है...इतना रुतबा तो हमारे शंभू राजे रखते है.. "

औरंगजेब शांतपणे पहात होता..त्याने आपल्या सरदाराला विचारले "क्या हुआ?? कौन बदसलुखीं कर रहा है..सरदार बोलला " कुछ नाही आलमगीर.. दख्खन के जमीदार शिवाजी भोसले उनको दि गयी खिल्लत से नाखूष है "....ठीक है उनको खिल्लत अदा कर दो..औरंगजेब शांतपणे बोलला.. औरंगजेबाने जपमाळ असलेला उजवा हात खिल्लतिला लावला..आणि ती खिल्लत घेऊन एक मोगली सैनिक राजांसमोर उभा राहिला..आणि कोणालाही काही कळायच्या आत..ते खिल्लतिचे ताट भर दरबारांत औरंगजेबासमोर उडवले गेले.." ये खिल्लत..ऐसी खिल्लत तो हम अपने सरदारो को रोज दख्खन मे अदा करते है..और हम जमीदार नही..दख्खन के राजा है"..येवढे बोलून राजे औरंगजेबाला पाठ करून..रागारागात बाहेर पडले.. हे पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते.बादशाह मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता...

औरंगजेबाला पाठ करावी.. त्याची खिल्लत भर दरबारात उडवुन लावावी तेही त्याच्या वाढदिवशी ..जिथे फक्त औरंगजेबाच्या एका नजरेने शांतता पसरते..तिथे त्याचा अपमान..सर्वांदेखत अपमान..आणि औरंगजेब शांत होता..नाही तो शांत नव्हता..तो सुडाने पेटुन उठला होता..ज्या हेतूने मिर्झाराजांनी हे शिव-औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारण जुळवून आणले त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला....

क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED